|
Jayavi
| |
| Sunday, January 29, 2006 - 6:25 pm: |
| 
|
ए आता माझा खास वर्हाडी उखाणा तीन ओळींच्या कवितेला म्हनतात हायकू तीन ओळींच्या कवितेला म्हनतात हायकू --- व्हय माहा नवरा अन म्या व्हय त्याची बायकू
|
Jayavi
| |
| Sunday, January 29, 2006 - 6:31 pm: |
| 
|
मूडी, तुझ्या उखाण्याला अजून एक सोबत खांद्याला पर्स अन हातात रुमाल, (थोडंसं लाजून्) खांद्याला पर्स अन हातात रुमाल, राव सोबत असताना येते लई धमाल
|
Moodi
| |
| Wednesday, March 15, 2006 - 11:06 am: |
| 
|
होळीचे उखाणे खानदेशातले. पारले गेले शोधायला तर क्रॅकजॅक आला दिसुन ...... रावांचे नाव घेते त्यांच्या गळ्यावर बसुन.. साडी घेईन हजाराची, जरी घरी निघते वॉरंट ..... रावांना असाच देईन मी आयुष्यभर करंट रंगात रंग लाल उठुन दिसतो सुंदर चकाचक पाठवले... राव अन होऊन आले बांदर..
|
वाकडी तिकडी बाभळ तिच्यावर बसला होला....... सखा पाटील मेला, म्हणून तुका पाटील केला....
|
Zoom
| |
| Wednesday, April 26, 2006 - 1:58 pm: |
| 
|
आब्यांच्या डहाळीवर पाय कसा देऊ लग्ना अगोदर नाव कस घेऊ
|
Maudee
| |
| Friday, May 26, 2006 - 12:23 pm: |
| 
|
कोकणचे आम्बे गोव्याचे काजू ---- नाव घ्यायला मी कशाला लाजू
|
Zakki
| |
| Tuesday, July 11, 2006 - 10:30 am: |
| 
|
देशकालपरत्वे, इंग्रजीतून उखाणे घ्यायला हवेत. असे इंग्रजी उखाणे कुणाला करता येत असल्यास पाच सहा उखाण्यांची फार तातडीने गरज आहे. कृपया लिहा. मी स्वत:, आठवत नाही इतक्या वर्षांपूर्वी, उखाणा घेतला असावा असे वाटते. आता परत, माझा उखाण्याशी संबंध जोडण्यात आला आहे. कारण मी मागे अनेक वर्षांपूर्वी नोकरी करत असताना, फुशारकी मारली होती, की ज्यातले मला काऽहीहि कळत नाही, अश्या विषयांची प्रॉजेक्ट्स मी उत्तम रीतिने हाताळू शकतो! आता भो. आ. क. असे म्हणायची वेळ आली आहे.
|
Arch
| |
| Wednesday, July 12, 2006 - 6:09 pm: |
| 
|
झक्कि, लिहिले होते न English मध्ये On west is Pacific on east is Atlantic My xxx is very romantic I am my Dad's Princess (You are your Dad's Pricess) Come on Honey it is time for kisses
|
मी पण पाहिले होते. मला वाटले तूच डिलीट केलेस. आमच्या इथे एक काका होते ते शायरी पेश केल्याप्रमाणे नेहमी हा उखाणा घ्यायचे: One बाटली Two glass ------ माझी first class
|
Arch
| |
| Wednesday, July 12, 2006 - 9:25 pm: |
| 
|
झक्कि, कोणाच लग्न आहे? मुलिच का मुलाच? Mom and Dad you will be always part of our life xxxx has chosen me as his dearest wife ( I have chosen xxxx as my dearest wife) Mom and Dad I am your loving daughter Your blessings will keep xxxx and I always together.
|
|
|