Nvgole
| |
| Friday, June 23, 2006 - 7:05 am: |
| 
|
शोनू, सवर्ण म्हणजे उच्च वर्णीय. उदाहरणार्थ ब्राह्मण. मात्र वापरण्याची प्रथा, स्पृश्य, अस्पृश्य यांपैकी स्पृश्य करीता सवर्ण शब्द अशी आहे.
|
मला वाटत की सवर्ण म्हणजे "बोस्टन्स ब्राह्मीन्स" अर्थात "बोस्टनचे बामण" अस असाव!
|
Giriraj
| |
| Friday, June 23, 2006 - 10:28 am: |
| 
|
फ़ना च्या अनेक अर्थांपैकी एक 'मृत्यू' असाही होतो... तसेच 'मुक्ती' असाही अर्थ होतो
|
"सिन्दबाद" हा शब्द "शिन्देबाबा" या शब्दाच अपभ्रन्शित रुप हे का? 
|
लिम्ब्या शक्य आहे.... आपले चांगदेव आहेत ना जे १४०० वर्षे जगले आनि मुक्ताबाइने त्यांचे गर्वहरण केले ते चांगदेव... तर हे चांगदेव मूळचे चीनमधले, त्यांचे खरे नाव 'चॅंग देव'! त्याचा अपभ्रंश होऊन ते चांगदेव झाले आहे. (कैसी रही?)
|
>>>>> (कैसी रही?) बच्चों जैंसीं! .. .. DDD
|
Dineshvs
| |
| Saturday, June 24, 2006 - 3:39 pm: |
| 
|
लिंबु, रॉबीन, डीआयजी देवेंद्रनाथ कासार या लेखकाचे, " मराठीची एक बोलीभाषा इंग्रजी " असे पुस्तक लिहिलेय. त्यात इंग्रजीतल्या १५ ते २० हजार शब्दांची उत्पत्ती मराठीतुन झाल्याची थिअरी मांडली आहे. पण मला हे जरा अतिच वाटले, ऊदा. Governor हा शब्द गोवर्धन वरुन आणि Belief हा शब्द " बेल आहे ई पहा " वरुन आलाय म्हणे. बाकि मी दिवा घेतलाच आहे रे. BTW शिंदे शब्द सिसोदिया वरुन आलाय.
|
बेल आहे ई पहा >>> बाप रे too much सही अहे! अजून काय काय आहेत अशा थिअर्या
|
हितगुजवरील ख्यातनाम वैय्याकरणी (स्वयंघोषित)झक्की बोवाजी यांनी या वादात अजून उडी घेतलेली दिसत नाही.
|
Bee
| |
| Monday, June 26, 2006 - 1:53 am: |
| 
|
हो पण 'बेल आहे ई पहा' ह्या मराठी वाक्याचा अर्थ होतो तरी काय. मला काहीच कळलं नाही ह्या वाक्यातलं. कुणावर जर उपकार केलेत आणि त्या व्यक्तीने जर ते उपकार काढलेत जसे की मी अमके केले.. तमके केले तर त्याला एक शब्द आहे 'उचकणे देणे'. मी मात्र वर्हाडच ऐकला आहे हा शब्द. उदा - १. जरा काही मदत केली की लगेच उचकणे द्यायची गरज नाही ताई.. २. जाऊ दे बाई परत अशांची मदत घ्यायची नाही जी वेळोवेळी उचकणे देतात. ३. मी उचकणे देत नाही पण तुम्ही जरा तरी मदतीची जाण ठेवायची असती माई.. तर इतर ठिकाणी बोलल्या जातो का हा शब्द? नसेल तर प्रतिशब्द आहे का? शेजेवरचा अर्थ सांगितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो.
|
Aashu29
| |
| Monday, June 26, 2006 - 3:23 am: |
| 
|
उचकणे देणे म्हणजे टोमणे देणे !! खान्देशातहि बोलला जातो ह शब्द
|
बी, त्या अर्थाचा आमच्याकडे 'उसणून दाखवणे' असा शब्दप्रयोग आहे. उदा. लगेच उसणायची गरज नव्हती. ओतली एक गाडी पाण्याची आमच्याकडे, पण लगेच उसणून दाखवलं.
|
Bee
| |
| Monday, June 26, 2006 - 5:22 am: |
| 
|
'उसणून' खासच शब्द आहे हा.. तुमच्याकडे म्हणजे कुठे? पुण्यात का? हा शब्द पुणेरी वाटत नाही मात्र.. का कुणास ठावूक. आमच्याकडे 'उसनने' असा एक शब्द आहे. म्हणजे झोपेत बडबड करणे. माहिती नाही ह्यात 'न' मोठा आहे की छोटा
|
आमच्याकडे म्हणजे सांगली, कोल्हापुराकडे. त्यातसुद्धा 'ण' आहे की 'न' हे मी नक्की सांगू शकत नाही कारण हे फक्त बोलीभाषेतच ऐकलंय(जिथे ण / न असा भेदभाव न करता सगळे 'न' च असतात). माझ्या अंदाजानुसार मी 'ण' लिहिलंय. cbdg . झोपेत बरळण्याला एक शेलके क्रियापद आहे- चावळणे! :D
|
Dineshvs
| |
| Monday, June 26, 2006 - 5:46 pm: |
| 
|
महादेवाच्या पिंडीवर बेल वाहुन शपथ घेण्याशी काहितरी संबंध जोडलाय. मी पुस्तक वाचले नाही, पण मटाने १८ जुनच्या अंकात ओळख छापलीय. लेखक कोकण रेल्वे सुरक्षा दलात DIG आहेत.
|
Karadkar
| |
| Monday, June 26, 2006 - 8:01 pm: |
| 
|
गजा, अरे ते उचकणे ना? आणि चाळवणे चावळणे नाही काही. तुझा .... झाला का?

|
Raina
| |
| Wednesday, July 05, 2006 - 3:46 pm: |
| 
|
"सुशेगाद" या शब्दाचा अर्थ काय होतो? हा मराठी शब्द आहे की कोंकणी? इजिप्तायन वाचते आहे- त्यात आहे- "सारं काही सुशेगाद चालंल होतं". पुर्वी कधीतरी पु.लंच्या पुस्तकातही हा शब्द वाचल्याचं स्मरतय. अंदाज आलाय अर्थाचा- तरी नेमका शब्दार्थ हवाय.
|
Moodi
| |
| Wednesday, July 05, 2006 - 3:53 pm: |
| 
|
कोंकणी ( may be गोव्याकडील)शब्द आहे गं रैना, अर्थ बाकीचे सांगतीलच.
|
सुशेगाद = आरामात... फारशी तोषीस न घेता...
|
Raina
| |
| Wednesday, July 05, 2006 - 4:06 pm: |
| 
|
अरे व्वा ! मुडी आणि विनय मनापासून धन्यवाद !
|