|
माझी मुलेही बरेच वाचन करतात कारण आमच्याकडे वगवेगळ्या विषयांवरची असंख्य पुस्तके इकडे तिकडे पडलेली असतात व मलाच खूप वाचायला लागते
|
paragbने विचारलय त्याबद्दल इथे ( US मधे)मी पाहिले की अभ्यासाला नसले तरी वाचनाला खूप महत्व देतात शाळेत. शाळेतून home reading साठी पुस्तके देणे, अमूक इतकी पुस्तके वाचून झाली की छोटेसे बक्षिस (रंगीत स्टीकर्स पासून साधे खोडरबर इतपतच), मोठ्यांच्या वर्गाने KG वर्गात आळीपाळीने जाऊन पुस्तके वाचून दाखवणे (मग त्यांचे कौतुक बघून त्या छोट्यांना पण वाटते कधी एकदा मी पण असे इतरांना वाचून दाखवू शकेन!), रोजच्या वाचनाची नोन्द ठेवण्याची सवय असे बरेच काही सतत चालू असते. मुलेही मग हळू हळू आवडीने वाचू लागतात. सुरुवातीला ( early readers )मुलांसाठी Dr Suess सिरिज मधली पुस्तके छान आहेत. त्यात गोष्ट अशी फ़र नसते पण काहीतरी गमतीदार, rhyme होणारे शब्द किन्वा तेच तेच शब्द पुन्हा येतील अशा रचना असतात.उदा. One fish two fish blue fish red fish असे. त्यातून मग तेच तेच शब्द किन्व एकासारखे एक शब्द ( cat, hat, bat ) बघितल्यावर चटकन वाचता येऊ लागले की मुलाचा आत्मविश्वास पण वाढतो. Scholastic ची पण वेगवेगळ्या reading levels ची पुस्तके मिळतात. त्या एक एक levels पार केल्या म्हणजे मुलांना दर वेळी काहीतरी achievement वाटते. मग नन्तर chapter books सुरु करायची. यात पण खूप प्रकारची पुस्तके मिळतात. यात Junie b Johnes ही एक अशीच popular seires आहे. जूनी बी जोन्स ही लहान खोडकर मुलगी.तिचे जग तिच्या नजरेतून तिच्याच भाषेत अशी ही पुस्तके असतात. त्यामुळे मुले या जगाशी भाषेशी फ़ार लवकर relate करू शकतात आणि खुदुखुदु हसत वाचतात अगदी!(ही मुलगी महा खोडकर असल्यामुळे काही आयांना ही पुस्तके आवडत नसल्याची तक्रार ही मी ऐकली, पण मला स्वत ला मात्र ही खट्याळ मुलगी जाम आवडते!) बाकी रोज झोपताना गोष्ट वाचून दाखवणे, यातही एक chapter तू वाच मग मी वाचेन असे करता येते. बस्स आत्ता इतके आठवतेय, आणखी काही specific पुस्तकांची नावे आठवली तर लिहीन पुन्हा.
|
Paragb
| |
| Saturday, June 17, 2006 - 11:45 am: |
| 
|
Dhanyavad mandali ! Vachal tar vachal.. he vachan kuthetari khol manat aslyamule.. aplya avatibhovati asnarya mulani khoop vachave ha maza pryatna.. kadachit shobha bhagavatani lihilelya sakal madhil Arvind Gupta varil lekha mule ajun jyasta tivra zala... NBT, CBT, Eklvya, Homi Bhabha VidyaNan Sa chi barich pustake ghetali aani vatat rahilo.. maza mulga, Chinmay.. vay 5 purna.. ratri goshti aiknyacha prachand naad aat tyat Chintu chya kartoon chi bhar padliye...pan iter vela Tv va computer games jyasta priya.. t
|
Paragb
| |
| Saturday, June 17, 2006 - 11:48 am: |
| 
|
BTW Shobha Bhagwatancha to lekh va itar kahi lahan mulanchya goshti sathi joor pahavi ashi site -http://www.arvindguptatoys.com/
|
Paragb
| |
| Saturday, June 17, 2006 - 12:06 pm: |
| 
|
ज़ोहड राजेद्रसिह राजस्थानातील पानीवाला बाबा एका जमीनदाराचा मुलगा, dr ज़्हालेला ध्येयवादाने भारून जाउन एका कुग्रामात येतो. तेथे पाणी नसते, जीवन नसते, असते केवल उपास्मर, दारीद्र्य, म्रुत्यु चे सावट. थेम्ब थेम्ब पण्यासाठी चाललेला सघष्र.. त्या शणी जलजीवना आणायचा निश्चय व त्या निश्चयाची व प्रयत्नाची कहाणी- ज़ोहड
|
Paragb
| |
| Saturday, June 17, 2006 - 12:20 pm: |
| 
|
"And somewhere there are engineers Helping others fly faster than sound. But, where are the engineers Helping those who must live on the ground?" -- Karyarat, Johad, Samidha hyatil sarva vyakti kadachit varil prashanche uttar aahet.. ashe ajoon kahi Pustake suchval ka..
|
Santu
| |
| Sunday, June 18, 2006 - 7:05 am: |
| 
|
मैत्रयि तुझे विवेचन आवडले.मला जरी वाचनाची आवड असली तरी आमचे चिरंजिव पुस्तक हातात धरायला मागत नाहित. तु अजुन यावर लिहिले तर आमच्यासारख्या पालकांचा फ़ायदा होईल.
|
मलाही हे पुस्तक खुप आवडले. भिमावर असेच एक पुस्तक आहे. भिम खरा कोण होता? लेखीकेचे नाव ईंदिरा आहे. ( आडनाव मला आत्ता आठवत नाहीये.) मी हे खुप वर्षांपुर्वी वाचले आहे. जरुर वाचा. यात महाभारता तील प्रसंग भिमाच्या नजरेतुन पाहान्याचा प्रयत्न केला आहे. भिमाचे एक वेगळे रुप पहायला मिळेल. तो नुसताच आडदांड न्हवता तर एक विचारी योध्दा होता. खास करुन अर्जुना आण तो अग्नी या प्रसंगात व द्रोपदी जेव्हा भिमाला म्हणते की पुढच्या वेळेस तु मोठा भाउ हो ( तिचा नाही) त्या वेळेस. लेखीकेचे पुर्ण नाव आठवल्यास परत येथे लिहेन. Richard Bach चे Jonathan Livingston Seagull व Illusions : The Adventures of a Reluctant Messiah हे दोन्ही पुस्तक कितीदा ही वाचले तरी परत वाचावेसे वाटतात. Jonathan Livingston Seagull हा एक समुद्र पक्षी आहे त्याचा ईतर नातेवाईकांनी त्यालात तु एक seagull आहेस त्यामूळे तुझे जिवन म्हनजे मासे खाणे व थोड्या उंचीवर उडने. हा पक्षी ते मान्य करत नाही व स्वत्:ला विचारतो जर ईतर पक्षी उंच उडु शकतात तर seagull का नाही. त्याचा स्वत्:आचे हे वैचारिक यूध्द वाचायला खुप आवडेल. जेव्हा वेळेस मी फस्ट्रेट होतो त्या वेळेस हे पुस्तक परत वाचायला घेउन बसतो. या पुस्तकाचे वैशीष्ट म्हनजे हे पुस्तक video रुपात देखील मिळते. Illusions बद्दल तर मी लिहीने योग्य नाही. ते पुस्तक अनुभवन्यासाठी आहे.
|
BTW 'शाळेतल्या गमतीजमती' असं एक पुस्तक आहे. ते पण खूप छान आहे. मुलींच्या शाळेत होस्टेल वर राहणार्या गीता आणि चित्रा या त्यातल्या मुख्य नायिका आहेत. लेखिका बहुतेक ज्ञानदा नाईक आहेत. (चू.भू.द्या. घ्या. कारण नक्की आठवत नाही. खूप पूर्वी शाळेतल्या लायब्ररीतून वाचलं होतं.) खूप आवडले होते. 'शाळा' सारखे particular phase (like किशोरवय) वर नाहीये. या पुस्तकात गीता आणि चित्रा यांच्या त्या शाळेतल्या दहावीपर्यंतच्या जीवनातल्या गमतीजमती आहेत.
|
साधारण वर्षापूर्वी मी एक पुस्तक वाचले होते "प्रकाशाच्या वाटेवर".... लेखिकेचे नाव आठवत नाहीये... हे पुस्तक म्हणजे बंगलोरच्या "मनसा फाऊंडेशन" च्या श्री कृष्णानंदस्वामींच्या पुस्तकाचा अनुवाद आहे. श्री. कृष्णानंदस्वामींनी आपल्या गुरुंबद्दल, आपल्या साधने बद्दल लिहिले आहे... एखाद्या परिकथेतच शोभून दिसतील असे अद्भुत आध्यात्मिक अनुभव या पुस्तकात श्री कृष्णानंद स्वामींनी उधृत केले आहेत... माझ्याकडे हे पुस्तक आहे. अधिक माहिती साठी मनसा फाऊंडेशन इथे पहा..
|
Svalekar
| |
| Wednesday, July 19, 2006 - 11:35 am: |
| 
|
BB छान आहे. काठ आणि पर्व लेखक आठ्वत नाहित कदाचित भैरप्पा आहेत. कन्नड लेखक आहेत. दोन्हि पुस्तके छान आहेत. मला उध्वस्त व्हायचे आहे तस्लिमा नसरिन. कोवळीक सुहास शिरवळ्कर अन्मल सुहास शिरवळ्कर चक्र जयवन्त दळवी येस आय एम गिल्टि बाय गोल्डन गेट ह्र्दयस्थ नीता मान्ड्के काट्यावरचे पोर किशोर काळे झुलवा द सेव्हन्थ सीक्रेट
|
Maudee
| |
| Wednesday, July 26, 2006 - 11:13 am: |
| 
|
मध्यंतरी छावा वाचलं. इतक्या वर्षाची इच्छा होती वाचायची पण आता योग आला. पुस्तक - छावा लेख़क - शिवाजी सावंत. बर्याच जणानी वाचलं असेल हे पुस्तक. ख़र तर या विषयावर जितक लिहाल तितके कमीच आहे. तरी पण मनाला विशेष जाणवलेल्या गोष्टी - मला ख़ास करून सोयराबाईंचं आश्चर्य वाटल. त्यावेळी सुद्धा अशा प्रकारच्या बायका होत्या???? ख़ास एकता कपूर serial मध्ये शोभणार्या. असा विचार मनात तरळून गेला. परंतु सगळ्यात वाईट वाटलं ते दुर्गाबाईंच..... संभाजी राजांची दुसरी पत्नी. नवरा उभ्या महाराष्ट्राचा राजा असताना या बाईला मात्र दिलेरख़ानाच्या तावडीत जन्म घालवावा लागला कैदी म्हणुन.
|
'जल्लोष पेशीन्चा' - मूळ लेखक रूसी लाला (अनु. Dr शरदिनी डहाणूकर) नुकतेच वाचले. फार सुंदर पुस्तक आहे. सुरुवात मी जरा बिचकतच केली पण inspirational content ची पकड विलक्षण आहे. सर्वांनी आवर्जून वचावे, पण " Big C " शी सामना करणार्यानी विशेष
|
महाभारतातील अनेक आश्चर्यकारक गोष्टींचा उलगडा शंकर केशव पेंडसे लिखीत 'महाभारतातील व्यक्तिदर्शन' या पुस्तकात केला आहे. सर्वानाच ती मते पटतील असे नाही पण जिज्ञासूंनी हे पुस्तक जरूर वाचावे. या पुस्तकात देखील पेंडश्यांनी महाभारतातील सर्व व्यक्तिरेखा केवळ मानवी होत्या हेच दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. श्रीकृष्ण हा देखिल बुवाबाजी करीत असे यासारखे उल्लेख कदाचित काही जणांना न पटण्याची शक्यता आहे. पण एकदा नक्की वाचण्यासारखे हे पुस्तक आहे.
|
Dineshvs
| |
| Sunday, August 06, 2006 - 4:30 pm: |
| 
|
नुकतेच डॉ. रवि बापट यांचे, " वॉर्ड नंबर पाच, के ई एम, " हे पुस्तक वाचुन संपवले. ( शब्दांकन सुनिती जैन, रोहन प्रकाशन, पृष्ठे ३०१, किम्मत २०० रुपये. ) रुढ अर्थाने हे आत्मचरित्र नाही. बालपण, कौटुंबिक पार्श्वभुमि, यांचे उल्लेख असले तरी त्याने पुस्तकाचा अगदी थोडा भाग व्यापलाय. मुख्य झोत आहे तो जवळजवळ ५० वर्षे डॉ. ज्या क्षेत्राशी संबंधित होते त्यावर. के ई एम, म्हणजेच किंग एडवर्ड मेमोरियल हे मुंबईतील परळमधले एक महापालिकेचे रुग्णालय. हा परिसर हॉस्पिटल्सचा म्हणुनच ओळखला जातो, वाडीया बायकांचे हॉस्पिटल, वाडीया मुलांचे हॉस्पिटल, टाटा कॅन्सर हॉस्पिटल, डोळ्यांचे हॉस्पिटल ईतकेच नव्हे तर हाफ़किन संस्था आणि गुरांचे हॉस्पिटल पण याच परिसरात आहेत. हरद्याच्या डॉ. बपटांच्या तीन पिढ्या डॉक्टर आहेत. डॉ. रवि बापटांचे आई वडीलदेखील डॉक्टर होते. डॉ एका अर्थाने शेवटचा मालुसरा. त्यानी पुर्ण हयातभर याच रुग्णालयात काम केले, त्याला ते कार्यमंदिर म्हणतात. त्यानी कधीहि प्रायव्हेट प्रॅक्टिस केली नाही कि कुठल्याहि खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया केल्या नाहीत. हा निर्णय कारकिर्दीच्या अगदी सुरवातीला त्यानी घेतला, या निर्णयामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीचे ओझरते उल्लेख असले तरी, खंत अजिबात नाही. आता महापालिकेनेच खाजगी प्रॅक्टिस करायला परवानगी दिल्याने, आता कुणी डॉक्टर असे करणार नाही. या पुस्तकाचा मुख्य भाग आहे, तो त्यानी केलेल्या वेगवेगळ्या शस्त्रक्रियांच्या, त्यांच्या पेशंट्स्चा. यात राजकारणी नेते, अभिनेते, सामान्य कार्यकर्ते, लेखक असे सगळेच होते. या सर्वच कहाण्या वाचनीय आहेत. ( अतिभावुक व्यक्तीना कदाचित हि वर्णने वाचवणार नाहीत. ) परळचा हा परिसर हा एकेकाळी कामगारांचादेखील होता. त्यामुळे त्या चळवळीतील नेत्यांचे पण अनुभव आहेत. अगदी अपवादात्मक केसेस मधे नावे दिलेली नाहीत, नाहितर एरवी काहिच लपवलेले नाही. डॉ स्वतः खेळाडु होते, त्यामुळे त्या क्षेत्राचेहि दर्शन घडते. पण मला सगळ्यात मह्त्वाचा वाटला तो, डॉक्टरानी या क्षेत्रातील अनेक विषयावर मांडलेल्या मतांचा. मार्डचा संप. रॅगिंग, हॉस्पिटलमधले राजकिय हस्तक्षेप, कट प्रॅक्टिस, ईंटर्नशिप, ईच्छामरण, वैद्यकिय चाचण्या सुपर स्पेश्यालिटीज असे सगळेच विषय हाताळले आहेत. आणि या संदर्भात एक वेगळीच बाजु समोर येते. आणि आपल्याला ती विचार करायला लावते. त्यानी स्वतःकडे उगाचच मोठेपणा घेतलेला नाही. आपला शीघ्रकोपीपणा, व्यसने यांचीहि दिलखुलासपणे चर्चा केली आहे. त्यानी विकसित केलेल्या अनेक तंत्रांचा उल्लेखाहि फार विनयाने केलेला आहे. आपल्या सहकार्यांबद्दल त्यात सहकारी डॉक्टर्स, शिष्यांपासुन सिस्टर आणि मेहतर भरभरुन लिहिले आहे. औषधोपचार क्षेत्रात गेला पाच दशकात झालेल्या बदलांबद्दल, अधिकारवाणीने लिहिले आहे. माझ्यासाठी खास जिव्हाळ्याचा भाग होता, तो त्यांच्या विद्यार्थी, सहकारी, मैत्रिण, सहसंशोधक आणि गुरुहि असलेल्या डॉ शरदिनी डहाणुकरांविषयीचा. बाई आपल्यात नसल्याचे दुखः अधिकच गडद करतो हा भाग.
|
नुकतीच झोंबी, नांगरणी आणि घरभिंती अशी सलग ३ पुस्तके आनंद यादव यांची वाचली. वाचून मन सुन्न झालय. याचाच पुढचा भाग असलेल त्यांच पुस्तक आहे का?
|
Raina
| |
| Tuesday, August 08, 2006 - 2:45 am: |
| 
|
झोंबी वाचलंय पण नांगरणी आणि घरभिंती नाही. त्या पुस्तकांबद्दल लिहीणार का थोडंस please झोंबी वाचून- साध्या प्राथमिक शिक्षणासाठी किती कष्ट आणि संघर्ष करावे लागतात हे वाचून डोकं बधीर झालं. ती माती खाणारी बहिण, ती आन्शी, ती न मिळालेली शिष्यवृत्ती, तो कर्दनकाळ रतनू आणि अर्थातच नायक.... शिवाय त्या पुस्तकाची प्रस्तावना- पु.लंची..
|
आनंद यादव यान्च्या पुढच्या पुस्तकाचे नाव 'काचवेल' आहे. The last book in series
|
Swaroop
| |
| Saturday, September 02, 2006 - 4:23 pm: |
| 
|
मध्यंतरी एका family gethering च्या निमित्ताने आम्ही सर्व नातेवाइक एकत्र जमलो होतो... त्यावेळी माझे काका एक पुस्तक घेउन आले होते... "आठवणीतल्या कविता" का पाठ्यपुस्तकातील कविता असे काहीसे नाव होते त्याचे... त्यांच्या काळात... त्यांच्या अभ्यासक्रमात असणार्या कवितांचा संग्रह होता तो.... त्या कविता बघितल्या आणि माझे बाबा, इतर काका, आत्या वगैरे मंडळी हरखुनच गेली... आणि बघताबघता सगळ्यांनी त्यांच्या शाळेतल्या कविता म्हणायला सुरुवात केली.... आणि हे सगळे लोक एका वेगळ्याच जगात निघुन गेले..... आज इतक्या वर्षांनंतर सुद्धा त्यांना बर्याचश्या कविता तोंडपाठ होत्या..... मी सहज म्हणुन आठवुन बघितल... मला माझ्या अभ्यासक्रमातल्या कवितांची नावेही आठ्वायला त्रास होत होता... आणि ही मंडळी एकामागुन एक कवितात न्हाउन निघत होती.... मी नंतर माझ्या काकांकडे चौकशी केली, तेन्व्हा कळले की साधारण १९६० ते १९८० पर्यंतच्या क्रमिक कवितांचे संग्रह उपलब्ध आहेत... कुणाला शाळेच्या आठवणींनी nostelgic व्हायचे असेल तर प्रयत्न करुन पहा.... मला नक्की पुस्तकाचे नाव आणि प्रकाशन मिळाले कि इकडे लिहिनच.....
|
Svalekar
| |
| Monday, September 04, 2006 - 6:47 am: |
| 
|
हो बी, सुधा मुर्तिन्चि महाश्वेता आणि डाॅलर बहु खुप छान आहेत. महाश्वेता कोड झालेल्या स्त्रीवर आधारित आहे. छान आहे पुस्तक ते.
|
|
|