Zakki
| |
| Thursday, April 27, 2006 - 11:36 pm: |
| 
|
अर्थात् माझे सगळे ज्ञान १९५९ साली मी जे शिकलो त्यावर आधारित आहे. आता जर ते अमरकोष नि पाणिनी कालबाह्य नि unacceptable ठरले असतील, तर माझे सगळेच लिखाण व्यर्थ! admin ना सांगून उडवून टाका!
|
भले,भले बोवाजी भले!(यालाच ते सरदारजी बल्ले बल्ले म्हणतात.)तुम्ही खाशी हाणलीत. बंगालीत भद्र लोक म्हनजे सभ्य.खानदानी लोक.म्हणून मी आपला हितगुज वरील लोकाना भद्र लोक समजत होतो.पण तुम्ही अमरकोषातील दोरीने त्याना भलत्याच दावणीला बांधलं की वो. तात्पर्य एकाच शब्दाचे अनेक अर्थ हा काही जो घोळ भाषेच्या पेप्रात असतो त्याचे हे आविष्करण म्हणावे काय? एनी वे पण तुमच्या पोस्टने हितगुजने एक वेगळी उंची गाठलीय यात शंका नाही. ब्राव्हो! तुम्ही अमरसिंहाचे नाव घेतले तेव्हा मला तो समाजवादी पक्षाचा अमरसिंह आठवला!म्हटले काय हे भुतामुखी भागवत? पण पुढे उलगडा झाला. बुलडोझर शब्दाला सरकारी भाषेत बलिवर्दसंयंत्र असा एक छान शब्द आहे.
|
Vaatsaru
| |
| Friday, April 28, 2006 - 1:34 am: |
| 
|
सर्वश्री रॉबिनहूड आणि झक्की ह्यांचे मनोमीलन. अभूतपूर्व पण दोघांचेही विवेचन सुरेख
|
वा वा झक्की! छान विवेचन! अन अजुन लक्षात हे तुमच्या हे विशेष! पुस्तके पण बाळगुन आहात का?
|
वा झक्की ४० वर्षांपुर्वी शिकलेल्या गोष्टी इतक्या छान सांगितल्यात! तुम्ही सांगितलेल्या त्या समानार्थी शब्दांमधल्या "शाखामृग" शब्दाचाही उल्लेख गीतरामायणात आहे... gadima.com वर गेलात तर हेही सांगितलय की गदिमांनी गीतरामायणासाठी मूळ संस्कृत रामायणाचा आधार घेतलाच होता... वाली ला राम झाडा आडुन बाण मारतात त्यानंतर वाली त्यांना म्हणतो असा लपून बाण मारण्याचा अधर्म तुम्ही का केलात... त्यावर रामांनी दिलेल्या उत्तरातलं हे एक कडवं आहे... नृपति खेळती वनी मृग येते लपुनि मारिती बाण पशू ते दोष कासया त्या क्रिडेतें शाखामृग तू क्रूर पशूहुन वालीवध ना खलनिर्दालन...
|
वा वा काय मजा आली हे सगळं वाचताना. रॉबीन, झक्की खूपच मनोरंजक आणि सुटसुटीत माहीती दिलीत. अमेय बरोबर मला तेच विचारायचं होतं की रामाशी बेडकांची निष्ठा कसली? तशी एखादी रामायणाची उपकथा असेल तर ती कळावी असा हेतू होता. पण आता ते स्पष्टच झालं.
|
Upas
| |
| Thursday, May 11, 2006 - 1:20 pm: |
| 
|
योगायोग म्हणजे परवाच श्री राम रानडे यांजकडून हा एक नवीन संदर्भ कळला.. मंथरेचा मुलगा मंडूक (मंडूक म्हणजेच बेडूक.. ) मंथरा जरी रामाला वनात धाडण्यात कारणीभूत असली तरी मंडूक रामभक्त असतो.. तो मारुतीच्या पाठीवर बसून लंकेत जातो.. आणि तिथेच रहातो.. तसेच जेव्हा राम रावणावर विजय मिळवतो पण शेवटी सीतेचा त्याग करायचे ठरवतो तेव्हा मंडूक रामावर प्रचंड प्रक्षुब्ध होतो.. वाल्मिकी रामायणात मंडुकाचा उल्लेख आहे असे कळते!!
|
Aappa
| |
| Friday, May 19, 2006 - 12:04 pm: |
| 
|
" नक्षत्र " या शब्दाचा अर्थ कोणी सांगेल का??? जितके जास्त अर्थ सांगाल तेवढे बरे होईल .
|
Pooh
| |
| Friday, May 19, 2006 - 12:59 pm: |
| 
|
नक्षत्र म्हणजे जे कधीही आपल्या स्थानावरून हलत नाही ते. (संस्कृत मधे "न क्षरति यस्य नक्षत्र:")
|
Vadini
| |
| Wednesday, May 24, 2006 - 8:20 pm: |
| 
|
Nakshatra ya shabda-che taara-anek taare,soorya,moti,27 motyan-chi maal ase sandarbha-nusar badalanare vividh arth Sanskrit shabda-koshat aadhaltat.
|
Bee
| |
| Friday, May 26, 2006 - 7:12 am: |
| 
|
मला १७५६ चा संदर्भ कुणी सांगू शकेल का? जसे की तुझ्यासारखे मी १७५६ बघितलेत असे आपण वाद घालताना म्हणतो. धन्यवाद!
|
Aj_onnet
| |
| Friday, May 26, 2006 - 10:54 am: |
| 
|
मी १७६० हा आकडा अश्याच संदर्भात ऐकला आहे! का प्रदेशानुसार हा आकडा बदलतो? मलाही त्याबद्दल जाणुन घ्यायला आवडेल.
|
Bee
| |
| Friday, May 26, 2006 - 11:14 am: |
| 
|
नाही १७५६च आकडा आहे तो अजय..
|
Maudee
| |
| Friday, May 26, 2006 - 11:22 am: |
| 
|
मी पण १७६० हाच आकडा ऐकला आहे....
|
Pha
| |
| Friday, May 26, 2006 - 12:03 pm: |
| 
|
१७६० आणि ५६ हे वेगवेगळे दोन आकडे वेगवेगळ्या म्हणी / वाक्प्रचारांत वापरले जातात. १. नकटीच्या लग्नाला १७६० विघ्नं. २. 'तुमच्यासारखे ५६ लोक पाहिलेत' वगैरे वाक्यांममध्ये जिथे तुमच्यासारखे 'य' लोक पाहिलेत असं सुचवायचं असतं तेव्हा.
|
Asami
| |
| Friday, May 26, 2006 - 2:52 pm: |
| 
|
नकटीच्या लग्नाला सत्राशे विघ्ने असे आहे न ते ?
|
मला तर आधी वाटलं इथे १८५७ चा उठाव किंवा तसं काहीतरी बोलणं चाललयं बाकी मी ही १७६० आणि ५६ हे दोनच आकडे ऐकून आहे...
|
मराठीत 'क्ष' व्यक्ती अथवा कोणी एक सामान्य माणूस असा उल्लेख करताना अथवा उदाहरण देताना सोमाजी गोमाजी कापसे अश्या नावाचा उल्लेख असतो. ह्या सोमाजी गोमाजी कापसे चा मूळ सन्दर्भ काय आहे? विशेष म्हणजे महाराष्ट्रात हे नाव सर्वत्र वापरले जाते. निदान मागच्या पिढीत तरी. बहुधा मागच्या पिढीतील एखाद्या पाठ्य पुस्तकात त्याचा सन्दर्भ असावा...
|
Bee
| |
| Friday, June 02, 2006 - 10:31 am: |
| 
|
सामसुम, सुमसाम पैकी नक्की कुठला शब्द बरोबर आहे की दोन्ही शब्द बरोबर आहेत? मी चित्रपट बघितला किंवा मी चित्रपट पाहिला ह्या दोन्ही वाक्यांचा अर्थ सारखाच होतो. तर बघणे आणि पाहणे ह्या दोन क्रियेत नक्की फ़रक कुठे आहे? काहीजण पाहणेला पहाणे असे म्हणतात हे चुक की बरोबर?
|
Chioo
| |
| Friday, June 02, 2006 - 12:43 pm: |
| 
|
mala vatate, 'baghane' mhanaje ekhadi gosht muddam jaun baghane. tyamule kahi dakhavtana aapan 'bagh' mhanato. 'paha' mhanat nahi. 'priye paha' he ganyasathi. 'priye bagh' he ganyat changale nahi vatanar. 'pahane' mhanaje 'najares padane'. hi kriya muddam ghadat nahi. aani mala 'saamsum' ha shabd jast barobar vatato aahe.
|