Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 16, 2006

Hitguj » Language and Literature » इतर साहित्य » मी वाचलेले पुस्तक » Archive through June 16, 2006 « Previous Next »

Devdattag
Wednesday, May 24, 2006 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पराग.. मकरंद साठ्यांच लिखाण थोडं वेगळ्या पद्धतीचं आहे..
सुर्य पाहिलेला माणूस सारखं अगदी वेगळ्या धाटणीचं नाटक त्यांच्या लेखनशैली बद्दल बरंच काहि सांगून जातं


Paragb
Wednesday, May 24, 2006 - 8:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणाला पुस्तकान्ची यादी हवी असल्यास मला सागा. आमच्या वाचनालयातिल पुस्तकाची एक pdf file आहे. मी ती forward करेन

Savyasachi
Thursday, May 25, 2006 - 4:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालच not without my daughter वाचुन झाले. केवळ अशक्य कथा आहे त्या बाईच्या जिद्दिची कमाल वाटली.

Nayana
Friday, June 02, 2006 - 12:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी सध्या शोभा दे चे speedpost वाचते आहे. चांगले वाटत आहे. I agree with Soha शोभा डे खूप मोकळेपणाने लिहिते. हे तिने तिच्या मुलांना letters लिहिली आहेत.पण ती खरच छान आहेत.

Santu
Thursday, June 08, 2006 - 8:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बर बाई अग तर अग

मुडि
तुझ पण परिक्षण छान.
सरोजीनी वैद्य यांनी
त्यानी संपादित केलेले त्यांच्या आईच "आठवणी काळाच्या व माणसांच्या" वाचलय का? फ़ार छान आहे.


Pujarins
Saturday, June 10, 2006 - 4:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>अशी ही परिक्रमा चालत पूर्ण करण्यासाठी तीन वर्षे तीन महिने तेरा दिवस लागतात....
माझ्या माहितीप्रमाणे नर्मदा परिक्रमा ४ महिन्यांत होते.
पूर्वी आणि आजही संन्याशी लोक चातुर्मासात ही परिक्रमा करतात.

नर्मदा परिक्रमणावरच 'कुण्या एकाची भ्रमणगाथा' नावाचे अतीशय सुंदर पुस्तक 'गो. नी. दांडेकरांनी लिहिलेय. खास दांडेकरी शैलीतले हे अप्रतीम पुस्तक आहे. परिक्षण नंतर लिहिण्याचा प्रयत्न करेन


Bhramar_vihar
Saturday, June 10, 2006 - 5:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

selective meory मधे शोभा डे ने आपल्या आयुष्यातील काही गोष्टींचा उलगडा मात्र नाही केला. उदा. तिच किलाचंद बरोबर लग्न का मोडल. कारण तिने ईतरांच्या खाजगी आयुष्याच जे प्रदर्शन केलय त्यावरून तरी तिने स्वत:च्या आयुष्यातील काही गोष्टी लपवून ठेवल्या अस वाटत. मी ह्या पुस्तकाचा मराठी अनुवाद वाचला. अनुवादकर्तीच नाव नाही लक्षात पण फार छान केलाय

Gs1
Saturday, June 10, 2006 - 9:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आरती, छानच आठवण करून दिलीस. त्यातल्या अध्यात्मिक वा चमत्कार या अनुभवाम्बद्दल जरा शंका आली तरी एकंदर परिक्रमावऊत्त झपाटून टकते. मला तर नर्मदे हर आणि मग गोनीदांची कुणा एकाची भ्रमणगाथा ही कादंबरी वाचली की आपण सुद्धा जावे असे वाटू लागले होते.
वर पुजारींनी म्हटले आहे तसे परिक्रमा चार महिन्यात पूर्ण करतात.


Soha
Monday, June 12, 2006 - 8:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

selective memory चा अनुवाद अपर्णा वेलणकर यान्नी केला आहे असे मला वाटते. मलाही शोभा डे ने तिच्या किलाचन्द बरोबरच्या आयुष्याबद्दल काही लिहिले नाही हे जरा खटकलेच. अर्थात तिच्या सासुबाईन्शी म्हन्जे किलाचन्दान्च्या आईशी तिचे सम्बन्ध अजूनही चान्गले आहेत असा एक ओझरता उल्लेख आहे.

Deemdu
Monday, June 12, 2006 - 9:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साद देती हिमशिखरे तर great आहेच, त्याचबरोबर भारतीय अध्यात्मीक रहस्याच्या शोधात - Paul Brinton हे ही पुस्तक निदान माझ्यातरी अवडत्या पुस्तकांच्या यादीत आहे.

रार बघु जमल तर गुळवणी माहाराजांच्या मठात जाऊन कधी ह्या गृहस्थांना बघता येत का ते बघते.

BTW मला ते नर्मदे हरहर तिथेच (म्हणजे माहाराजांच्या मठात) मिळु शकेल का?


Archanamandar
Monday, June 12, 2006 - 2:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Jhumpa Lahiri चं 'NameSake' कित्तीतरी भावना धावत आल्या मनात. फारच छान आहे. त्यावरही आता सिनेमा येतोय म्हणे.
लमाण वाचलय का कुणी लेखक लागू साहेब. अतिशय सुरेख आहे.

अर्चना.
http://archanascribbles.blogspot.com


Santu
Monday, June 12, 2006 - 2:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोण लागू?
नाव काय त्यांच


Asami
Monday, June 12, 2006 - 2:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रीराम लागू. चांगले अहे पुस्तक

Gs1
Monday, June 12, 2006 - 2:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जी के प्रधानांचे अजून एक पुस्तक आहे दिमडू. त्यांच्या मृत्यूपश्चात छापले गेले ते.

अर्चना, बर्‍याच वर्षांनी येते आहेस मायबोलीवर..



Paragb
Wednesday, June 14, 2006 - 4:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

NBT chi pustak kuni vachata ka ? kahi anuvad phar chhan astat.. lahan mulansathi tar NBT apratim. 'Saare Milun hasuya' anuvadit aahe... bhasha kami laghavi tari dekhil changale pustak aahe. Mala lahan mulansathi kuni pustakanchi nave suchvel ka ?

Maitreyee
Wednesday, June 14, 2006 - 4:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किती वयाच्या मुलासाठी हवे आहे? english की मराठी?

Paragb
Thursday, June 15, 2006 - 8:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

saha varshe va pudhil (kuthalihi chaltil hindi pan).. lahan mulana vachnachi avad kashi lavavi ?

Maudee
Thursday, June 15, 2006 - 9:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पराग, मला वाटत मी या प्रश्नाच उत्तर देऊ शकते.

लहान मुले नेहमिच मोठ्या माणसाच अनुकरण करतात. त्यामुळे जर मुलाना वाचायची सवय लावायची असेल तर त्या घरातल्या मोठ्या माणसानी वाचलं पाहीजे तर त्या मुलाना वाचावसं वाटेल.

एक गोष्ट होती. एक पालकसभा असते. तिथे सगळे पालक तक्रार करत असतात की आमची मुलं वाचत नाहीत. पण एक मुलगा मात्र वाचत असतो. त्या मुलाच्या आइ वडिलाना सारे विचारतात की तुम्हाला कसं काय जमल तुमच्या मुलाला ही सवय लावायला?ते म्हणतात तो मुलगाच यावर चांगल उत्तर देऊ शकेल.
तर यावरच त्या मुलाच उत्तर फ़ार बोलकं आहे.तो मुलगा म्हणतो "आमच्या घरात आई,बाबा, आजोबा सगळे दिवसातून किमान अर्धा तास तरी काहीतरी वाचतात त्यामुळे मलाही वाचावसं वाटत म्हणुन मी वाचतो.":-)


Bee
Friday, June 16, 2006 - 7:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पराग, मी माझ्या भाचीला अर्धीच कथा वाचून दाखवितो मग पुढे शेवट काय असेल म्हणून ती वाचायचा प्रयत्न करते. पण मला वाटते पाच सहा वर्ष तर गोष्टी ऐकण्याचे वय आहे... फ़ार फ़ार तर चित्र बघून काय असेल ह्यात हे समजण्याचे वय आहे. काही ठिकाणी मी story telling sessions बघितले आहेत ज्यात मुले खूप रस घेऊन ऐकतात. काही ग्रंथालयात खास child section असतो त्यामुळे मुले पुस्तकांकडे लक्ष द्यायला लागतात. मुलांना चित्रमय पुस्तते खूप आवडतात. मला आठवते मी लहानपणी लोकमत मधले मिनीचे कार्टूनच खूप आवडीने वाचायचो कारण तिचा तो कुत्रा आणि मांजर खूप रंगीबेरंगी दिसायच्यात. पुस्तकांची आवड खरे तर कुठल्याही वयात निर्माण होऊ शकते. फ़रक इतकाच की जर लहानपणापासून वाचत राहिलो की स्कोप वाढत जातो.. शिवाय घरात जर पुस्तके रेंगाळत राहिली की मुले आपोआप ती हातात घेऊन वाचायला सुरवात करतात. हा अनुभव मी स्वत घेतला आहे आणि आता बहिणींच्या मुलांबरोबर हे घडत असताना बघतो आहे की घरता पुस्तके असलीत की ती आपणहून वाचतात. ऐकदा तर मी जेवन करून जरा डोके टेकविले तर भाची म्हणते हे काय आज पुस्तक नाही वाचणार का.. म्हणजे त्यांच्याही लक्षात येत की कुणी काय करत.

मोठ्यांना पुस्तकातून कदाचित तत्वज्ञान गंभीरपणा अपेक्षित असेल पण मुलांना मात्र मनोरंजच लागत.


Soha
Friday, June 16, 2006 - 8:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रमेश जोशींचे "माझी कॉर्पोरेट यात्रा" हे पुस्तक कोणी वाचले का? दुधाच्या पिशव्या सीलबंद करण्याचे यंत्र ते बनवतात. उद्योजकतेचे बाळकडू त्यांना त्यांच्या मामांकडून मिळाले. पण त्यांचे मामा मुख्यत्वे भारतभर बांधकामची सरकारी कंत्राटे घेत. त्या व्यवसायत त्यांचे भागीदार म्हणून जोशींनी सुरुवात केली. पण मामांच्या अकस्मिक म्रुत्युमुळे व्यवसायाची जबबाबदारी त्यांच्यावर पडली.
त्यातून हा नवा उद्योग त्यांना कसा सापडला? त्यांनी कसा वाढवला? त्यात त्यांना आलेले अनुभव ह्या पुस्तकाल मांडले आहेत. त्याचबरोबर उद्योग जगात, विशेष्:त छोट्या उद्योग्-धंद्यांमधे गेल्या २५-३० वर्षात कसे बदल झाले आहेत हे त्यांनी छान मांडले आहे.
मराठी लोकांनी मोठ्याप्रमाणात उद्योग्-व्यवसायात पडावे असे वटत असेल तर घरात तसे वातावरण असले पाहिजे ह्या साठी ते म्हणतात की पुण्याच्या बोहरी आळी सारख्या भागातून मुलांना नुसते सहज फ़िरवून आणावे.
त्यांचे असे अनेक मार्मिक विचार पुस्तकात जागोजागी सापडतात.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators