|
Dineshvs
| |
| Thursday, February 09, 2006 - 1:51 am: |
| 
|
HH मला त्यातल्या मेजवानींची वर्णने वाचायची होती. आणि वरचे कारण तर आहेच, फ़क्त चुलत मावस पुतणीच्या आत्येसासुच्या मावसबहिणीच्या मैत्रिणीची मैत्रिण, असा फ़रक आहे.
|
Aj_onnet
| |
| Thursday, February 23, 2006 - 10:57 am: |
| 
|
नुकतेच, अतुल धामनकरांचे ' मृगकथा ' हे पुस्तक वाचले. अतुल धामनकर ह्या अरण्यवेड्या निसर्गनिरिक्षकाचे हे पहीलेच पुस्तक. हरीणाच्या भारतात आढळणार्या आठ नऊ जातींबद्दल ह्यात बर्यापैकी विस्ताराने लिहले आहे. लेखकाचे जंगलातील त्या संदर्भातील अनुभव ह्या लिखाणाला कायम सोबत करतात. त्या त्या हरणाच्या जातींची वैशिष्ट्ये, सवयी, इतर प्राण्याबरोबरचे सहजीवन ह्याच्या विस्तृत अन सहजसोप्या भाषेतील नोंदी यात आढळतील. खूप सोप्या भाषेत अन अन ओघवत्या शैलीत लिहलेले हे पुस्तक आपल्याला खूप जवळून हरीण अन त्याच्या भोवतालच्या अरण्याचे दर्शन घडवून आणते. लिखाणाला काही रेखाचित्रे व कृष्णधवल छायाचित्रांची साथ आहे. अधिक रंगीत छायाचित्रे असती तर बरे झाले असते. ( बहुधा कृष्णमेघचे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या अपेक्षा वाढल्यात !! अर्थात अतुलचे नविन पुस्तक ' अरण्यवाचन ' ही बरेच चकचकीत आहे म्हणा ) नुकतेच संभाजी ' अनुभवून ' संपले. त्यावरील अभिप्राय लिहायला आता शब्दच सापडत नाहीत.
|
सध्या मी " तोत्तोचान " हे पुस्तक वाचते आहे. जपान मधील लोकप्रिय TV artist तेत्सुको कुरोयानागी हिने तीच्या शाळेबद्दल्च्या आठवणी सांगितल्या आहेत. यातला कुठलाच प्रसंग काल्पनीक नाहीये, जस लक्षात आहे तस तीने सांगीतले आहे. तोमोई(जगावेग़ळ्या तीच्या शाळेचे नाव) आणि तीची स्थापना करणारे " सोसाकु कोबायाशी " यांनी मुलांना वाढवीण्यासाठी खुप वेगळ्या प्रकारे शिक्षण दिले. शाळेतल्या आणि घरातल्या गमतीजमती नी हे पुस्तक मनाला स्पर्शुन जाते. या मुळेच तीला unisef च सद्भावना दुत म्हणुन ही गौरवले गेले आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद केलेला आहे चेतना सरदेश्मुख यांनी. २००४ मध्ये ८वी आव्रुत्ती निघाली. मराठी अनुवाद "national book trust of india" हे लोकप्रिय पुस्तक विश्वाला संदेश देतय्- हजारो फ़ुलं फ़ुलु दे विचारधारांचा संघर्ष होउ दे.. विश्वाला नवजीवन मिळु दे!!!
|
लोपा तोत्तोचान मी पण वाचले आहे. फारच सुन्दर आहे.
|
लुइसा मे अल्कॉट ह्या अमेरिकन लेखिकेची लिटल विमेन आणि गुड वाइव्ज ही दोन पुस्तके आहेत. शान्ता शेळकेन्नी या दोन्ही पुस्तकान्चा " चौघीजणी " या नावाने एकत्र अनुवाद केलेला आहे. कुणी वाचलय का हे पुस्तक नसेल तर प्लिज वाचा. अप्रतिम पुस्तक आहे.
|
प्रभाकर पेंढारकर लिखित 'रारंग ढांग' हे पुस्तक नक्की वाचा. हिमालयात border road organization रस्ते बांधणीच काम करते. इतक्या उंचीवर, अत्यंत कठिण परिस्थित हे काम करताना एका civilian ला engineer म्हणून घेतल जात आणि त्याच्या द्रुष्टिकोनातून खूपश्या सत्य परिस्थीवर आधारलेल हे एक अप्रतीम पुस्तक आहे. ( by the way, ), हिमालयतल्या नितळ उभ्या कड्यांना "ढांग" म्हणतात.
|
lopa, tya serial che naav " kachhi dhup" ase hote.
|
Rucha285
| |
| Wednesday, April 05, 2006 - 7:15 am: |
| 
|
हो, रारंग ढान्ग हे पुस्तक मी पण वाचलय. अप्रतिम पुस्तक आहे. प्रभाकर पेन्ढारकरान्ची सगळीच पुस्तके खूप छान असतात.
|
Aasim
| |
| Monday, April 10, 2006 - 8:22 am: |
| 
|
nuktach "Nath ha majha" he kanchan ghanekar yanche pustak vachale. Dr.kashinath ghanker yanchya jeevanavarche he pustak khup changle vatale. ek kalakaar mhanun ani manus mhanun tyanche ayushya kiti vegala hote he khup chan lehilay. Housefull natak mhanje kashinath ghanekar ashi tyanchi khyati hoti. pan tyancha swabhav baryach lokanshi julat nase,tyamule honare matmedh ....gharatli dukkha ...tyat adaklela kalakaar..ya sarvanche chhan varnan kelay...ani shevati tyanche dukkhad nidhan... ekunach he eka great kalakaarabaddal che khup chaan pustak ahe..milalyas nakki vacha
|
Dineshvs
| |
| Friday, May 12, 2006 - 4:27 pm: |
| 
|
" ईसतंबुल ते कैरो, लेखकाच्या दृष्टीतून इस्ल्माची दोन रुपं " लेखक निळू दामले, मौज प्रकाशन पृष्ठे १९२, किंमत १५० रुपये. निळु दामले पत्रकार आहेत. त्यांचे लेखन एकदा वाचले कि आणखी काय वाचायला मिळतेय याचा शोध आपसुकच चालु होतो. पुस्तकाचे शीर्षक पुरेसे बोलके आहे, तरिही मधला ते, थोडासा बुचकळ्यात टाकणारा आहे. ईस्तंबुल हि तुर्कस्तानची राजधानी तर कैरो ईजिप्तची. हे पुस्तक म्हणजे या दोन शहरातल्या प्रवासाचे वर्णन नाही, पण या दोन शहरातील माणसांमधील अंतर मात्र ते जरुर दाखवतं. ईजिप्तायन मधुन मीना प्रभुनी, त्या देशाची छानच सफर घडवलीय, पण या लेखकाला तिथल्या ऐतिहासिक वास्तुत मुळीच रस नाही. ईतिहासात मात्र अवश्य आहे, आणि त्या ईतिहासाचे ओझे ती माणसे अजुन कशी वाहताहेत, याचे विवेचन आहे. या पुस्तकाबद्दल लिहिण्या आधी, थोडे वैयक्तीक लिहावे लागेल. भारतात वाढलेल्या हिंदु माणसाला पारंपारिक रित्या जेवढा ईतर धर्मांचा तिटकारा करायला शिकवला जातो, तितका मलाहि शिकवण्यात आला. पुस्तक मागुन ऊघडले, तर मुसलमान आहेस का ? असा प्रश्ण अगदी सहज विचारला जात असे. पण नोकरी आणि प्रवासाच्या निमित्ताने, मला जी मित्रमंडळी मिळाली, त्यामुळे ह्या तिटकार्याचा अंशदेखील माझ्यात ऊरला नाही. ईजिप्शियन, जॉर्डनियन, कुवैती, पाकिस्तानी, ओमानी, बांगला देशी, बदायुनी, ईराणी, लेबनानी, फ़िलिस्तीनी, अश्या अनेक देशातील मुस्लीम स्त्रीया आणि पुरुषांबरोबर मी काम केले आहे. त्यांच्याशी मैत्री करताना वा गप्पा मारताना, त्यांचा धर्म ना कधी आड आला ना मधे आला. रुकैया ( लेबनानी ) जुमाना ( जॉर्डनीयन ) आणि हुदा ( ईजिप्शियन ) या तर माझ्या सहकारी होत्या. रुकैयाचे नैतिक अध : पतन माझ्याच समोर झाले. जुमानाचे लग्न जुळणे, नियोजित वराशी बोलताना तिचे हरखुन जाणे आणि लग्नाला जाताना, डोळ्यात पाणी आणुन आमचा निरोप घेणे, तर अजुनहि आठवतेय. हुदा आमच्या ऑफ़िसमधे अरेबिक टायपिस्ट होती. घरी लहान मुलीला संभाळायला कोणीच नसल्याने, ती तीन वर्षाच्या साराला ऑफ़िसमधे घेऊन यायची. बाहुलीसारखी सारा आमच्या मांडीवरच बसायची. कामात लुडबुड करायची. हुदाला पण आमचा आधार वाटायचा. साराला माझ्या ताब्यात देऊन, ती शॉपींगला देखील जायची. या सगळ्या मित्रमैत्रीणींचा फक्त मानवी चेहराच दिसला. या लेखकाने पण असेच काहि चेहरे आणि त्यामागची माणशे भेटवली आहेत. फक्त फरक एवढाच कि माझी दोस्ती हि २. ९ २००१ पुर्वीची, तर हे पुस्तक त्या नंतरचं. लेखक मनात काहि योजना ठरवुनच गेला होता. पण ती यशस्वी होईल, याची त्यावेळी तरी शक्यता नव्हती. पण पुर्णपणे नाही तरी बर्याच प्रमाणात ती योजना साकार झालीय. तुर्कस्तान म्हणजेच टर्की, देश हा ९९ % मुस्लीम लोकसंख्या असलेला देश, पण कोणीही त्या देशाला मुस्लीम मानत नाही, कारण तो तसा नाहीच. याऊलट ४,००० वर्षांपासुनचा ईतिहास जाणणारा ईजिप्त, एकेकाळी संस्कृतीचे वैभव मिरवत होता. त्यावेळी ईस्लामचा जन्महि झालेला नव्हता. पण त्या काळापासुन, आजच्या मुस्लीम ब्रदरहुडची निर्मिती होईपर्यंत या देशाचा ईतिहास, या लेखकाने आपल्या पुढे ठेवला आहे. ईथे आपल्याला भेटतात ती काहि माणसे, काहि सामान्य तर काहि पत्रकार, राजकारणी वैगरे. ईजिप्तायनमधे भेटलीली, मीना प्रभुंची मैत्रिणदेखील ईथे आहे. हि माणसे अगदी मोकळेपणी लेखकाशी बोललीत. लेखकानी त्याना बोलते केलेय, अर्थात काहिनी आपले मुखवटे ऊतरवले नाहीत, हेहि खरेच. पण या सगळ्याना बोलते करण्याचे लेखकाचे कौशल्य वादातीत आहे. लेखकाने त्यांची शब्दचित्रे रंगवली नाहीत, थोडेफार वर्णन आहे, आणि बर्याच जणांचे फोटोज आहेत. पण या सगळ्यातुन लेखकाने जे दुवे जोडुन दिलेत, ते मात्र एरवी आपल्या कधी ऊमगलेच नसते. तुर्क ईतके पुढारलेले का ? ईस्लाम आणि ख्रिश्चन धर्म देखील ईतका संकुचित का ? हे धर्म पाळणार्यांची नेमकी गोची कशी होते, त्यावर त्या लोकानी काय ऊपाय केलेत, त्या ऊपायांचे फ़लित काय ? आपण हिंदु आहोत त्यामुळे आपण कसे वेगळे आहोत. आपले विचार नेमके ईतरांपासुन कसे वेगळे आहेत, आपल्या धर्माचे नेमके वेगळेपण काय, हे सगळे अगदी सोप्या भाषेत दिलेय. संदर्भ ईतिहासाचे असले तरी कुठलेहि धार्मिक संदर्भ दिलेले नाहीत. लेखकाने स्वत : चे विचारहि अगदी नेमकेपणे मांडले आहेत. खरेतर यातले सगळेच विचार मला ईथे लिहावेसे वाटताहेत, पण वानगीम्हणुन काहि ओळी देतोय. पृष्ठ १९० आणि १९२ आज एकविसाव्या शतकात धर्म टिकुन आहे याचं कारण, माणसाच्या मनातला गोंधळ, अशांतता, दु : ख, न सुटलेली कोडी, अर्थाची उकल न झालेल्या घटना हे आहे; आणि धर्म टिकुन आहे म्हणुनच माणसं त्याचा गैरवापर करत आहेत. दु : ख, वेदना आणि न उलगडलेली कोडी जोवर शिल्लक राहतील तोवर धर्म जाणार नाही. तेंव्हा धर्म घालवण्याच्या नादाला न लागता तो अधिक बरा कसा होईल, त्याचा त्रास कमी कसा करता येईल, त्याचा गैरवापर कसा कमी करता येईल, याकडे लक्ष देणं बरं. देव आहे असं सिद्ध करता येत नाही. देव नाही असंहि सिद्ध करता येत नाही. तरिही माणसंए देव मानला, देव आदेश देतो, कसं जगावं ते सांगतो, असं माणसानं मानलं. क्रिकेट हा खेळ माणसानंच तयार केला. अगदी अलिकडच्या काळात. खेळात एक पंच निर्माण केला. खेळाचे नियम आपण तयार केले व ते पाळले जातात की नाही ते ठरवण्याचे अधिकार पंचाला दिले. चारपाच फ़ुटाचा काटकुळा पंच. बोट वर करुन फ़लंदाज बाद झाला असे जाहिर करतो. सात फ़ुटी दोनशे किलो वजनाचा फलंदाज ते गुपचुप मन्य करुन मैदान सोडुन जातो. समजा त्या खेळाडुने पंचाच्या टाळक्यात बॅट घातली; आणि मी आऊट नाहिच मुळी असं म्हटलं तर काय होईल ? तसं म्हणाला तर क्रिकेटचा खेळच होणार नाही. %&%& आपण नियम ठरवतो. पाळतो. ताकदीच्या जोरावर, दादागिरीवर तिथला व्यवहार होत नाही. देव आपणच निर्मिलेला आहे. क्रिकेटसारखे धर्माचे व्यवहारहि आपणच काळानुसार ठरवलेले आहेत. गणपतीला धोतर आणि सरस्वतीला साडी नेसवली ती मुळगावकर दलाल यांच्यासारख्या कलाकारानी. %&%&% तेव्हा आपले नियम आपण आपल्या सोयीनुसार ठरवणं हा भाग महत्वाचा. हिंदुना ते बर्यापैकी जमलं आहे. ख्रिस्ती लोकानांहि ते काहिसं जमलं आहे. मुसलमानाना ते कमी जमलं आहे. $%$$% देव आणि धर्म नाहिसे होतील असं दिसत नाहीत. ते असतील. ते आपल्या सुखासाठी, आपल्या हातातले असतील याची व्यवस्था व्हायला हवी. %&%&% मी ईथे सलग लिहिलेले नाही. हा विवेचनातला थोडासाच भाग आहे. सपुर्ण विवेचन वाचनीय आहेच. पण त्यापुर्वी आपले रंगीत चष्मे ऊतरुन ठेवावे लागतील. मुखपृष्ठावरील, फोटो काढण्यास नकार देणार्या ईजिप्शियन बाईचा फोटो खुपच बोलका आहे. लेखकाची जेरुसलेम आणि अस्वस्थ अफ़गाण हि पुस्तकेपण वचनीय आहेत.
|
दिनेशदा आणि Gs1 , इतक्या अप्रतीम पुस्तकांची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद! नक्की वाचेन ही सगळी. दिनेशदा तुमची"रंगीत चष्मे उतरून ठेवावे लागतील" ही ओळ फार फार भावली. आपल्यातले बरेच 'शहेनशहा' देखिल वाचायला तयार होत नाहीत. ही पुस्तकं तर बरीच intense वाटतात.
|
Ninavi
| |
| Friday, May 12, 2006 - 4:47 pm: |
| 
|
>>>> भारतात वाढलेल्या हिंदु माणसाला पारंपारिक रित्या जेवढा ईतर धर्मांचा तिटकारा करायला शिकवला जातो, तितका मलाहि शिकवण्यात आला. हे विधान धक्कादायक आहे. मला तरी नाही कोणी शिकवला असा तिटकारा करायला. पुस्तक चांगलं वाटतंय, या वेळी भारतात गेले की नक्की घेईन. ' बुरख्याआडच्या स्त्रिया' वर चर्चा झाल्ये का इथे?
|
Dineshvs
| |
| Friday, May 12, 2006 - 5:28 pm: |
| 
|
निनावि, या पुस्त्कातील ईजिप्शियन स्त्री च्या जीवनातले वास्तव, तुला वाचवणार नाही ईतके भयानक आहे. आणि ते तर मधुचन्द्राच्या रात्रीबद्दलचे आहे. शिवाय माझ्या लहानपणी पाकिस्तानच्या लढाईच्या जखमा ताज्या होत्या. बांगला देशाचे युद्ध तर माझ्या डोळ्यासमोरच घडले. ब्लॅक आऊट आणि कुलुपी तोफा अजुन आठवताहेत. त्यावेळी एकंदर हवेतच मुस्लीम द्वेष होता. पण तरिही मी जेवढा, हाच शब्द वापरलाय, कारण या पुस्तकात मुस्लीम आणि ख्रिस्ती ईतर धर्मीयांचा किती दुस्वास करतात, याबद्दल भरपुर विवेचन आहे. आणि माझा द्वेष तेवढा नव्हता, असे मला म्हणायचे होते.
|
Vinayak
| |
| Tuesday, May 16, 2006 - 9:25 pm: |
| 
|
दिनेश धन्यवाद. बर्याच दिवसानी मायबोलिवर काही संक्षिप्त आणि समर्पक वाचायला मिळाले. मागवतोच आता हे पुस्तक!
|
Paragb
| |
| Tuesday, May 23, 2006 - 8:09 am: |
| 
|
'बाकी शून्य' कुणी वाचलय का
|
Paragb
| |
| Tuesday, May 23, 2006 - 8:15 am: |
| 
|
operation yamu नुकतेच वाचले या वर त्या बद्दल काहिच नव्हवते. Mahesh Elkunchvar याना ती 21st Century कथा वाटली. मला मात्र खूप किचकट वाटली..
|
Paragb
| |
| Tuesday, May 23, 2006 - 2:53 pm: |
| 
|
Istambul te... सुरु केलय पण पकड घेत नाहीय
|
Bee
| |
| Wednesday, May 24, 2006 - 4:34 am: |
| 
|
कुणाची आहेत ही दोन्ही पुस्तके जरा लेखक कळतील का पराग? कुणाला कानडी यू. आर. अनंतमुर्ती ह्या ज्ञानपीठ विजेत्या लेखकाची मराठीमध्ये अनुवादीत झालेली पुस्तके माहिती आहेत का? मी दिवाळी अंकात त्यांची एक खूपच भावस्पर्शी कथा वाचली. पण आता आणखी एक कथा वाचतो आहे त्या कथेचा अनुवाद मुळात फ़सला आहे. मुळ पुस्तकाला ज्ञानपीठ मिळाला आहे पण ही अनुवादीत प्रत एकदम रटाळ वाटली. केशव मेश्राम ह्यांचे एक पुस्तक वाचतो आहे हकीकत आणि जटायू, दोन्ही लघू कादंबर्या आहेत. खूप सुंदर आहे पुस्तक. उपरा, उचल्या, दया पवारांचे कुठले बरे ते पुस्तक.. तर ह्या दलित साहित्यापेक्षा खूपच वेगळे असे केशव मेश्राम ह्यांचे पुस्तक आहे.
|
Paragb
| |
| Wednesday, May 24, 2006 - 5:12 am: |
| 
|
"operation yamu" Makarand Sathe
|
Paragb
| |
| Wednesday, May 24, 2006 - 5:43 am: |
| 
|
"Baki Shunya" Kamlesh Valavalkar, Rajhans.. he pustak 'Shala' cha pudhil bhag mhanve ka(?) karan he eka college madhi mulache aatmacharitra aahe.. ajun purn nahi zale.
|
|
|