|
Nitu_teen
| |
| Sunday, January 15, 2006 - 12:14 pm: |
| 
|
चांदोबाने कविता केली. हातामधुन खाली पडली. एका परीने झेलली हातात आणि काढली चित्रे त्यात. मग कवितेत शिरला सूर गेली उडुन दूरदूर.
|
Nitu_teen
| |
| Sunday, January 15, 2006 - 12:25 pm: |
| 
|
एक परी फ़ुलवेडी फ़ुलासारखी नेसते साडी फ़ुलामधुन येते जाते फ़ुलासारखी छत्री घेते बिचारीला नाही मूल पाळण्यामध्ये ठेवते फ़ुल.
|
Bee
| |
| Sunday, January 15, 2006 - 3:23 pm: |
| 
|
विंदाच्या बालकविता अगदी झक्कास असतात. त्यातही आशय असतो, फ़क्त गम्मत जम्मत नसते. आता हीच एक बालकविता पहा. मानवी प्रवृत्ती किती समर्पकपणे मांडली त्यांनी पंढरपूरच्या वेषीपाशी आहे एक शाळा सगळी मुले गोरी एक मात्र काळा दंगा करतो फ़ार खोड्या करण्यात अट्टळ मारायचे कसे मास्तर म्हणतात्; असायचा विठ्ठल आहे की नाही धम्माल अगदी विंदाप्रेमींना विनंती आहे की विंदांच्या बालकविता, कणिकेच्या बीबीवर त्यांच्या कणिका, कवितेच्या बीबीवर कविता लिहाव्यात. ह्या कवीच्या खूपशा कविता आपण लिहिल्या नाहीत जितक्या ग्रेस आणि कुसुमाग्रजांच्या लिहिल्यात. अष्टदर्शन नावाचा काव्यसंग्रह नुकताच प्रसिद्ध झाला, त्यालाच ऐकले आहे की ज्ञानपिठ मिळाला, त्या काव्यसंग्रहातील काही कविता योग्य त्या बीबीवर लिहाव्यात. मी असे वाचले आहे की, अष्टदर्शन मधील कविता छंदोबद्ध आहेत म्हणून, मी आजवर विंदांच्या कविता मुक्तछंदातूनच वाचल्या आहेत.
|
Mitwa
| |
| Saturday, February 04, 2006 - 2:31 am: |
| 
|
लहानपणी एका किशोरच्या दिवाळीअंकात विंदांची एका गाढवाला भेटला कोल्हा, म्हणाला लंगडत उशीर ज़ाला ही कविता कुणाच्या संग्रहात असल्यास पोस्ट करावी. मितवा
|
|
|