|
Ritu4u
| |
| Sunday, August 12, 2007 - 6:18 pm: |
| 
|
मला कोणी जिवतिचा फ़ोटो कुठे मिळेल ते सागेल का आणि त्यासाठी काय काय करावे लागते, ते पण सागा....
|
Maudee
| |
| Monday, August 13, 2007 - 6:05 am: |
| 
|
रितू माझ्याकडे softcopy आहे तुला पाठवून देऊ का.... तुझा id मेल कर मला
|
Maanus
| |
| Thursday, September 06, 2007 - 5:03 pm: |
| 
|
bee: तु कधी बसला नाहीस का कुठल्या व्रत उद्यापनाच्या पुजेला.. व्रत उद्यापन? नाही, ते काय असते. लहानपनी एकदा मला पन खांद्यावर दोरा बांधायचा म्हणालो, तेव्हा घरातल्यांनी सांगीतले मुंज करणे म्हणजे मांडी कापुन त्यात बेडुक टाकतात, मगच तो दोरा लावता येतो. तेव्हापासुन संस्कृत, पोथी वैगेरे च्या मार्गी नाही लागलो. सत्यनारायणाची पुजा काय ती तेवढीच माहीती आहे. कृपया राग माणून घेवु नका, पन आम्हाला लहानपनी खरच असे सांगतात. मला अजुनही त्या धाग्यास काय म्हणतात माहीत नाही, म्हणुन दोरा म्हणालोय again राग नसावा. आणि मुंज म्हणजे काय हे आता आता कळायला लागलेय. आमच्या आईसाहेब व्रत वैगेरे काहीतरी करत असतात, पन भिती बसल्यामुळे मी काही एवढे लक्ष दिले नाही तिकडे.
|
Kanak27
| |
| Tuesday, October 30, 2007 - 6:34 am: |
| 
|
Cool, i want add one more interesting thing about 9 , May u know . Take any no. ex. 35 Add no. itself. eg 3 + 5 = 8 Substract this no. from original no. eg 35 - 8 = 27 No. which comes will be alwayss 9 or multiple of 9 . Try for any no. Deepa
|
Yuga
| |
| Thursday, December 27, 2007 - 5:07 am: |
| 
|
'धार्मिक' मध्ये हे काय आहे Kanak ? काहि सम्बन्ध तरी आहे का? Maanus उद्ध्यापन म्हणजे उत्तर पूजा. आपण कोणतीही पूजा करतो ती तशीच काढता येत नाही, त्या आधी पूजा करावी लागते तिला म्हणतात उद्ध्यापन आणि गळ्यात घालतात तो दोरा म्हणजे जानवे! मुन्ज झाली की ते घालतात. मान्डी कापुन बेडुक ठेवत नाहीत, गैरसमज करुन घेउ नये
|
Supermom
| |
| Monday, January 21, 2008 - 4:07 pm: |
| 
|
मला कोणी मुंजीच्या विधींबद्दल माहिती देईल का? मला मुंज का करतात वा त्यातील विधींचे अर्थ नको आहेत. तर साधारण किती दिवसांचा सोहळा असतो, तसेच सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणकोणते विधी करायचे असतात, यातले हौसेचे कोणते व आवश्यक कोणते,तसेच मुंजीत मामाचे काम नेमके काय असते,समारंभ देखणा व्हावा यासाठी काही अनुभव, टिप्स अशी माहिती हवीय.
|
Boli
| |
| Friday, January 25, 2008 - 6:45 pm: |
| 
|
लहान मुलान्चे कान टोचण्यामागे काय उद्देश असतो, कुणाला महिती आहे का ? मला माझ्या ३ महिन्यच्या मुलाचे कान टोचावे की नाही, हा प्रश्न पडला आहे.
|
Anilbhai
| |
| Friday, January 25, 2008 - 8:54 pm: |
| 
|
which comes will be alwayss 9 or multiple of 9 .>> Suppose number is (10a + b) then (10a + b) - (a + b) = 9a in above example a=3 so 9 x a = 27
|
Arch
| |
| Saturday, January 26, 2008 - 4:09 am: |
| 
|
मला मृत्युंजय मंत्राचा अर्थ पाहिजे. कोणाला माहित असेल तर कृपया सांगा.
|
Zakki
| |
| Saturday, January 26, 2008 - 4:02 pm: |
| 
|
ओम् त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं ऊर्वारुकमिव बंधनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात् आम्ही त्र्यंबकाची (शंकराची) पूजा करतो. (तो) सुगंधित व (भक्तांची) शक्ति वाढवणारा आहे. ज्याप्रमाणे पिकलेली काकडी (फांदीवरून आपोआप) गळून पडते, तसे त्याने मला मृत्यूच्या बंधनातून सोडवून अमरत्वाकडे (न्यावे). माझ्या बायपास शस्त्रक्रिये आधी हा मंत्र म्हणायला सांगितले होते, व मी तो भक्तिभावाने म्हंटला. ढोंगी मी! एका बाजूला म्हणयचे, माझे आता सगळे झालेले आहे, फक्त एकदाचा मेलो की सुटले सगळे. तरी जगण्याची आशा सुटत नाही! हटकेश्वर हटकेश्वर!!
|
Arch
| |
| Saturday, January 26, 2008 - 8:39 pm: |
| 
|
झक्की धन्यवाद. असा जर ह्या श्लोकाचा अर्थ आहे, तर कोणी गेल्यावर का म्हणतात? त्याला मोक्ष मिळावा म्हणून न?
|
Zakki
| |
| Sunday, January 27, 2008 - 11:36 am: |
| 
|
मला तो सर्जरीपूर्वी जिवंत असताना म्हणायला सांगितला होता. मेल्यावरहि जन्ममृत्यूच्या फेर्यातून अमरत्वाकडे गेल्यास बरेच की. नाहीतर परत मी मायबोलीवर आलो म्हणजे?
|
आर्च हा मंत्र रोजच्या साठीही तु म्हणू शकतेस. योगा करताना ( व शिकवताना) माझी बायको रोज हा मंत्र म्हणत असते.
|
झक्कीकाका, उर्वारुकमिव ची संधी सोडवून सांगाल का? (माझं संस्कृत यथातथा आहे म्हणुन विचारतोय.. ) बाकी शब्द थोडेफार लागले. यजामहे हा यज्ञ ह्या नामाचा मूळ धातु का?
|
Zakki
| |
| Tuesday, January 29, 2008 - 11:35 am: |
| 
|
उर्वारुकं म्हणजे पिकलेली काकडी अधिक इव म्हणजे प्रमाणे. मी १९५९ मधे जेव्हढे शिकलो, (म्हणजे तुम्ही सर्व जन्मण्यापूर्वी व कदाचित् तुमचे बाबा अजून शाळेत जाउ लागले नसतील, तेंव्हा) त्यानंतर आणखी काहीहि शिकलो नाही. तेंव्हाचे जे आठवते त्यावर लिहीतो. संस्कृत शिकायचे असेल तर प्रथम खूप संस्कृत नुसते वाचत जावे, नि मग हळू हळू व्याकरण शब्दार्थ वगैरेची काळजी करावी असे प्रो. अशोक अकलूजकर, जे हार्वर्डमधून डॉक्टरेट झाल्यावर गेली ३५ वर्षे युरोप व कॅनडा येथे संस्कृतचे अध्यापक होते, त्यांनी मला सांगितले. भारतात आजकाल चांगले संस्कृत शिक्षण मिळणे कठिणच, असेहि त्यांचे मत आहे. तेंव्हा तुम्ही कॅनडाला जाऊन त्यांची शिकवणि लावा! जर मनोभावे प्रयत्न कराल तर ते नक्कीच शिकवतील. ते व्हॅंकूव्हर, ब्रिटिश कोलंबिया, कॅनडा येथे रहातात. त्यांची नि माझी ओळख आहे.
|
धन्यवाद झक्की काका. पण मी सध्या युरोपात आहे हो त्यामुळे कॅनडात जाउन शिकणे शक्यच नाही. पण सध्या संस्कृत पुन्: शिकावे असा विचार मनात प्रबळपणे येतोय. थोडे विषयांतर पण राहावले नाही म्हणुन लिहितो. माझे आजोबा (आईचे वडील) हे वैय्याकरणी. पुण्यातील काही लोकांना लक्ष्मणशास्त्री शेंड्ये हे नाव ऐकुन माहिती असेल. व्यवसायाने भिक्षुक पण अभ्यासाने व्याकरणाचा, विशेषत्: पाणिनीच्या पद्धतीचा गाढा अभ्यास. ते शिक्षणाने मराठी चौथी, तेसुद्धा १९२०-२५ च्या आसपास गणपतिपुळ्यात जी काही प्राथमिक शाळा असेल तिथे. परंतु त्यांनी पुढे आपल्या गुरुच्या घरी राहुन तसेच पुण्यात आल्यानंतर भिक्षुकीबरोबर संस्कृतचा अभ्यास सुरु ठेवला. त्यांच्याकडे भांडारकर इन्स्टिट्युट तसेच पुणे विद्यापीठात संशोधन करणारे अनेक लोक शिकायला, शंका निरसनाला येत. मी मामाच्या घरी ३ वर्षे होतो. आळस, करंटेपणा काहिही म्हणा, संस्कृत शिकलो नाही अण्णांकडून. इतकेच काय बाकी काही म्हणायलादेखील शिकलो नाही. आज खूप वाइट वाटते. पण एकदा गेलेले परत मिळत नाही हेच खरे. मी, बाकी मामे भावंडे शाळेत असताना क्रिकेटच्या मॅच बघत असायचो. तेव्हा अण्णा कधीतरी येउन म्हणायचे, "अरे काय हा तुमचा अभ्यास. तासभर पण करत नाही आणि येवून टीव्ही समोर बसता. आम्ही शिकत असताना (आम्ही म्हणजे ते आणि त्यांचे सह-अध्याई अनंतराव आठवले) १२-१२ तास मांडी नाही हालवायचो." तेव्हा वाटायचे काय कटकट करत आहेत. पुढे मी पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यावर व नोकरी लागल्यावर जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी एक शाल मला दिली व म्हणाले आज तु खूप शिकलास तुझ्या क्षेत्रात. तु देखील पंडित झालास. खरं सांगतो पण स्वत्:ची लाज वाटली की काय तो मी अभ्यास केला आहे ही पदवी मिळवायला आणि जो माणुस मला ज्ञानी म्हणतोय त्यांचा व्यासंग किती. असो, ह्या बा.फ. शी ह्याचा काहिही संबंध नाही. पण तरी लिहिलेच.
|
Boli
| |
| Friday, February 29, 2008 - 4:59 pm: |
| 
|
मुलाचे कान टोचण्या बद्दल कुणी सान्गु शकेल का please ?
|
मला देवघरातल्या शंकराच्या पिंडीच्या पूजेबद्दल शंका आहे एक. मी बंगली लोकांकडे पूजेत पिंड कायम पाण्यात, म्हणजे एखाद्या वाटीत पाणी ठेवुन त्यात ठेवलेली बघितलेली आहे. आणि रोजच्या पूजेच्या वेळेला पळीने पाणी घालतात. त्याचे काही specific कारण माहिती आहे का कुणाला?
|
Admin
| |
| Tuesday, January 13, 2009 - 4:51 am: |
| 
|
हा विभाग इथे हलवला आहे /node/5242
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|