|
Maudee त्यातलं पहिलं वाक्य जयाचा जनी जन्म नामार्थ झाला- असं आहे.
|
Maudee
| |
| Thursday, April 13, 2006 - 5:54 am: |
| 
|
धन्यवाद अमेय......माझी चूक सुधारून तुम्ही माझ्यासाठी विचारान्चा गाभारा open केला आहे. मी फ़ारच चुकिचे म्हणत होते. नामार्थ म्हणजे ज्याच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण फ़क़्त नामासाठीच वाहीलेला आहे. आणखी एक गोष्ट इथे नमुद करावीशी वाटते..तस हे सर्वन्च्याच लक्षात आले असेल. जयाने सदा वास नामात केला... याचे २ अर्थ होतात..... म्हणजे १. जो सदासर्वदा नामातच रमला आणि २. ज्याने सदा वासनेवर मात केला..... i am impressed with this sentence पहीला अर्थ आचरणात आणणे जरासे अवघड आहे.....पण दुसरा अर्थ अभ्यासने आचरणात आणणे जमू शकेल असे वाटते.
|
Moodi
| |
| Saturday, May 20, 2006 - 10:03 pm: |
| 
|
बडी देर भई बडी देर भई कब लोंगे खबर मोरे राम कब लोंगे खबर मोरे राम एका व्यक्तीला कुणीतरी सांगीतले की श्रीरामाचा १३ कोटी जप केला तर प्रत्यक्ष दर्शन होते. त्यानुसार त्याने जप सुरु केला. दररोज तो लिहुन ठेवायचा जप किती झाला ते. १३ कोटी जप झाल्यानंतर त्याची चळवळ वाढली, का नाही दर्शन होत माझ्या प्रभुचे? काय चुकले? हे मला सांगीतलेले खोटे आहे, का मी मागे लागुन वेळ घालवला? त्याची अंतरीक तगमग वाढली अन मग देवासामोर बसुन त्याने विचारले काय झाले रे, का नाही दर्शन दिलेस? तिथेच त्याला झोप लागली, स्वप्नात त्याला दृष्टांत होवुन श्रीराम त्याला म्हणाले. अरे त्या प्रत्येक जपानुसार तू तुझ्या मागण्या मागत गेलास, आज मुलाला नोकरी दे, मग बायकोला बरे कर, अशा अनेक चिंतांचे समाधान तू करत गेलास. त्यातच निम्मे पुण्य सरले, अजुनही तुझा अर्धा जप राहिलाय रे. स्वप्नातुन तो खडबडुन जागा झाला, त्याला त्याचीच लाज वाटली, ओशाळवाणे वाटले अन पुनरपी तो जपात रंगला. माझी आजी ( आईची आई ) फारसे लिहु वाचु शकत नव्हती. १० वर्षाची होती तेव्हा एकदा आमचे प पु श्री महाराज गोंदवल्याला होते ( प पु गोंदवलेकर महाराजच) तेव्हा एकदा प्रवचानाच्या वेळेस त्यांच्या जवळ जाऊन बसली. अन त्यांना म्हणाली महाराज एवढे तुम्ही रामाचे गुणगान सांगताय मग मला भेटेल का हो तो? कसा भेटेल. महाराज तिला जवळ घेऊन प्रेमाने म्हणाले, बाळा तू अहोरात्र त्याचे नाव घे, त्याला हाक मार प्रेमाने, मग नक्की तुला दर्शन देईल बघ तो. असे सांगुन त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवुन तिला श्रीरामनामाचा अनुग्रह दिला. आजीने कधीच जप लिहुन ठेवला नाही. माझ्या लहानपणापासुन मी तिला श्रीरामाचेच नाव घेतांना बघितले. तिला दर्शन केव्हाच झाले. प्रेम, श्रद्धा, आपल्या गुरुंवर दृढ विश्वास या बळावर तिचे उभे आयुष्य रामालाच वाहिले तिने. ते दर्शन कसे झाले हे माझ्या आईला तिने सांगीतले, माझ्या आजोबांनी पण याचा अनुभव घेतला. गोंदवल्याला गेले की ती जाणिव प्रखरतेने होते. दुनिया न भाए मोहे अब तो बुला ले तेरे चरणोंमे चरणोंमे जीना नही आया मोहे अब तो छुपाले तेरे चरणोंमे चरणोंमे
|
Maudee
| |
| Monday, May 29, 2006 - 5:58 am: |
| 
|
परवा महाराजान्चे एक पुस्तक अगदी योगायोगाने मिळाले - सहज बोलणे हित उपदेश. त्यात महाराजानी भक्ताना दिलेल्या विविध प्रश्नांवरील उत्तरांचा सन्ग्रह करून ठेवलाय. पुस्तक तर छानच आहे. त्यातील काही प्रसन्ग जे सर्वाना उपयोगी पडतील असे वाटते ते लिहिते आहे. १. एका भक्ताने महराजांना विचारले की "अंतकाळी मी नाम घेईनच याची ख़ात्री काय? त्यासाठी मी काय करू?" महाराजानी उत्तर दिले "माणूस रोज झोपतो ही मरणासारख़ीच क्रिया आहे. फ़क्त रोज झोपल्यावर आपण उठतो. अंतकाळी एकदा झोपलो की उठत नाही. तेव्हा रोज झोपताना नाम घेत जा. हीच सवय अंतकाळी उपयोगी पडेल." २. एका भक्ताने महाराजांना विचारले " मला boss शी वगैरे भंडण झाले की ख़ूप राग येतो. अस वाटते की त्याला लगेच भस्म करून टाकावे. हे शक्य आहे का? महाराज म्हणाले "अस शक्य आहे. सिध्ही प्राप्त करून तू असे करू शकतोस. पण ही ख़रच त्या लायकीची गोष्ट आहे का की तू त्यासाठी आपली साधना वापरणार आहेस. त्यापेक्षा नाम घेत जा. बरे वाटेल."
|
Manutai
| |
| Thursday, June 01, 2006 - 1:25 pm: |
| 
|
एक नविन पुस्तक आले आहे. रामदासाचे आत्मकथन. खूपच वाचनिय आहे. त्यात नायकाबरोबरच महाराजान्चे पण चरिट्र आहे. कोणी इन्तेरेस्तेड असेल तर नाव कळवेन.
|
Sashal
| |
| Thursday, June 01, 2006 - 6:50 pm: |
| 
|
KD तूला हव्या आहेत त्यापैकी एक आरती मला थोडीफ़ार आठवते आहे .. माझी आजी नेहमी म्हणते .. पण शब्द थोडेफ़ार चुकले असतील .. जय जय आरती श्रीगुरूराया सद्गुरूराया नमितो तव पदी संव्हरी(?) माया मी जीव मी ब्रह्म (?) द्वैत पसारा वारुनी दिधला अद्वैत थारा (?) परम परात्पर चिन्मय खाणी शतमुख स्तविता मंदली वाणी जगत्जीवन प्रभु मंगल धामा नामरुपातीत तू अभिरामा माझ्याकडे एक पुस्तक आहे त्यात बाकीच्या दोन आहेत .. मी post करेन नंतर .. अमेयने लिहीलीये आधीच आणि त्याचे शब्द बरोबर वाटतात अजून एक छान आहे .. राम सावळा सावळा हाती लोणीयाचा गोळा मिश्री केलीसे मिश्रीत खाय कौसल्येचा सूत पण पुढचं आठवत नाही ..
|
Moodi
| |
| Wednesday, June 14, 2006 - 11:23 am: |
| 
|
अमेय तू दिलेला अभंग इथे पोस्ट करतेय.  
|
>>मिश्री केलीसे मिश्रीत सशल, एकदम गोंदवले आठवले!
|
Ashu
| |
| Thursday, July 06, 2006 - 8:10 pm: |
| 
|
अमेय माझ्याकडे आहे हे सगळे खरेतर ते महाराजान्ची प्रवचने या पुस्तकात आहे. मला आता आठतात त्या ओळी अशा नाम सदा बोलावे गावे भावे जनान्सी सान्गावे हाचि सुबोध गुरुन्चा नामा.... यत्न कसून करिन मी यश दे रामा न दे तुज्झी सत्ता हाचि सुबोध गुरुन्चा मानावा राम सर्वदा कर्ता आनन्दात असावे आलस भय द्वेश दूर त्यागवे हाचि सुबोध गुरुन्चा भोगसन्गे कुठे न गुन्तवे प्रेमात राम रमतो प्रेमाला मोल ना जगामजी हाचि सुबोध गुरुन्चा गुरुरायाला तहान प्रेमाचि
|
Can someone pl. tell me when is Gondavlekar Maharaj Jayanti (birth date ) as per Hindu Calendar. Regards, Atul S. Abhyankar
|
February 19th, Wednesday,1845 हिन्दु माघ महिना,शुध्दद्वादशी
|
Paribhi
| |
| Tuesday, November 07, 2006 - 1:54 pm: |
| 
|
श्री राम !!! ग़ोन्दावले समाधी मन्दिरातील 'नित्योपासना' CD स्वरुपात कुठे मिळू शकेल का ?
|
Mrdmahesh
| |
| Tuesday, November 07, 2006 - 2:15 pm: |
| 
|
जय जय आरती श्रीगुरूराया सद्गुरूराया नमितो तव पदी संव्हरी(?) माया मी जीव मी ब्रह्म (?) द्वैत पसारा वारुनी दिधला अद्वैत थारा (?) >> जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरु राया नमितो तव पदी संहरी माया मी जीव हा भ्रम द्वैत पसारा वारुनी दिधला अद्वैत सारा
|
Mandard
| |
| Tuesday, April 17, 2007 - 8:37 am: |
| 
|
श्री राम जय राम जय जय राम... श्री राम जय राम जय जय राम... श्री राम जय राम जय जय राम... जयाचा सदा जन्म नामात गेला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम किर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मुर्ती (चु.भु.द्या.घ्या.) बापुंचा बी बी वाचुन येथे आलो तडक. खुप छान आणि प्रसन्न वाटले. कराडला आमच्या घरी दरवर्षी गोंदवलेकर महाराजांच्या आरतीचा कार्यक्रम होत असे. पहाटे काकड आरती पासुन रात्री श्री पारगावकरांच्या भजनीमंडळाचा कार्यक्रम असे. मुडी, अमेय, सशल अजुन लिहा. श्रीराम.
|
Mandard
| |
| Tuesday, April 17, 2007 - 8:47 am: |
| 
|
श्री राम जय राम जय जय राम... श्री राम जय राम जय जय राम... श्री राम जय राम जय जय राम... (जयाचा जनी जन्म नामार्थ झाला) चुक दुरुस्ती अमेय धन्यवाद जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम किर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मुर्ती (चु.भु.द्या.घ्या.) बापुंचा बी बी वाचुन येथे आलो तडक. खुप छान आणि प्रसन्न वाटले. कराडला आमच्या घरी दरवर्षी गोंदवलेकर महाराजांच्या आरतीचा कार्यक्रम होत असे. पहाटे काकड आरती पासुन रात्री श्री पारगावकरांच्या भजनीमंडळाचा कार्यक्रम असे. मुडी, अमेय, सशल अजुन लिहा. श्रीराम.
|
परत परत यावस वाटतय की काय?
|
Mandard
| |
| Tuesday, April 17, 2007 - 6:16 pm: |
| 
|
परत परत यावस वाटतय की काय?------ पहील्या पोस्ट मधील चुक दुसर्या पोस्ट मधे सुधारली आहे. म्हणुन परत पोस्ट केले
|
मंदार, तुझ्या पोस्टच्यावर उजवीकडे एक पेन्सीलचे चित्र आहे बघ. त्यावर टिचकी मारुन बदल करू शकतोस. आत्ता सुद्धा, पहिले पोस्ट खोडू शकतोस फ़ुलीचे चित्र वापरून.
|
Mandarp
| |
| Thursday, April 26, 2007 - 6:02 am: |
| 
|
नमस्कार मित्रहो, क्रुपया कोणी इथे 'श्री ब्रम्हचैतन्या सारिखा नाही पाहीला' हे भजन पोस्ट करु शकेल का? धन्यवाद, मन्दार
|
श्री ब्रम्हचैतन्यासारखा नाही पाहिला मी नाही पाहिला मी नाही देखिला श्री ब्रम्ह.||ध्रु.|| मी बहुत वाचियेलें मी बहुत ऐकियेलें मी बहुत धुंडियेलें ऐसा नाही पाहिला १ तो मुलांमध्ये असे तो स्त्रियांमध्यें बैसे पण ऐसा निर्विकारी जगी मी नाही पाहिला २ तो मायामोह पाळी काय करतील लेकुरवाळीं पण कामक्रोधा जाळी ऐसा नाही पाहिला ३|| काहीं नसे त्याचे घरीं पण कुबेर लोळे दारीं तो वाटेंल तेंचिं करी ऐसा नाही पाहिला ४|| तो म्हणवीं अद्यानी पण द्यानियांचा द्यानी तो वेदगुढ जाणी ऐसा नाही पाहिला ५ तो ज्यासी म्हणें घर तेथे मोकळा दरबार पण नांदे रघुवीर ऐसा नाही पाहिला ६ जो जाई एकवार तो विसरे घरदार त्यासी देई नामसार ऐसा नाही पाहिला ७ तो गोंदावलेकर त्याच्या पायी मुक्ती चार दासदासांचे माहेर ऐसा नाही पाहिला ८ मंदार, अजुन काही भजने हवी असल्यास लिहिणे. | श्रीराम्|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|