Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 26, 2007

Hitguj » Religion » व्यक्ती » Annirudha Bapu » Archive through April 26, 2007 « Previous Next »

Nandini2911
Thursday, April 26, 2007 - 1:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाप रे.....
डोंबारीण काय अडाणी काय? मोकाट सुटलेच आहात की तुम्ही... मी शांत आहे कारण माझे संस्कार मला तसं शिकवतात. पण जर माझ्या शांततेची परिसीमा गाठली तर बघा!! "भ"ची अख्खी बाराखडी येते. बोलायला भाग पाडू नका.
मी सुरूवातीपासून एक हेल्दी डीस्कशन करायचा प्रयत्न केला आहे. स्वप्नाबाईचे सर्व ताशेरे ऐकूनदेखील. मात्र हे बापुजकीड आणि गौरीजी तुम्ही तुमची लायकी दाखवून दिली आहे.

मला मी समाजस्सेवा करते हो, कष्टाने मेहनत करून करते हो. हा डांगोरा पिटण्याची गरज कधीच वाटली नाही. समाजाची आपण सेवा करायची?? एवढे मोठे आहोत का आपण? मी समाजाचे माझ्यावर असलेले ऋण फ़ेडायचा जितका जमेल तितका प्रयत्न करते.

माझी पत्रकारिता ही "विकासात्मक पत्रकारिता" आहे. ते काय आहे हे समजवायची ही जागा नव्हे. nor i m interested

कुठल्याही प्रकारच्या अवडंबराला माझा आक्षेप आहे हे मी आधीपासुन सांगितले आहे. पण तरीही तुमच्यापैकी एकानेही धड उत्तर दिलेले नाही.

गौरीजी, आधीचे archives वाचा.... अपशब्दाना कुणी सुरुवात केली ते पहा आणि मग बोला. मी बापूसाठी आतापर्यत कुठलाही अपशब्द वापरला नाही. वापरला असल्यास दाखवून द्या. नुसते हवेत तीर मारू नका.


आणि एक गोष्ट माझ्यातर्फ़े, बापुजकीड, तुम्हाला त्या आधी मी त्या मुसलमान बाईचा पत्ता विचारला होता. तुम्ही तो अजून दिलेला नाही.

वारंवार विचारणा करूनही तुम्ही योग्य तो प्रतिसाद न दिल्यामुळे मी "तो" अनुभव धादांत खोटा आहे हे जाहीर करत आहे. तरीही तुम्हाला वाटल्यास तुम्ही मला तो पत्ता मेल करू शकता.
मात्र जून दोन तीन दिवसात मला पत्ता न मिळाल्यास या "खोट्या" अनुभवाची देखील बातमी होऊ शकते. हे ध्यानात घेणे.

आणि गौरीजी, तुमचे हे शेवटचे पोस्ट वाचून दु:ख झाले. आता कोण आम्हाला विनोदी पोस्ट्स टाकून हसवणार? आता कुठून आम्हाला बापूची "अस्सल" शिकवण सांगणार? च्च्च... वाईट झालं.


Bhramar_vihar
Thursday, April 26, 2007 - 1:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि नंदु, मुख्य म्हणजे पिसाळलेली डोंबारीण कशी असते हे आम्हाला कसं कळणार??

Anamikaa
Thursday, April 26, 2007 - 1:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विचारे बाई!
तुम्ही बापु भक्त खरच फ़ार मोठ्या मनाचे आहात असे क्षणभर मानुन चालु तुमच्या समाधानासाठी!
तसे जर असेल तर अजुन माझ्या पोस्टवर कुठलीही सकारात्मक प्रतिक्रिया नाहि तुमची?
की माझ्या माहीतीतली जी tumor पिडित बापुभक्त व्यक्ती आहे तिच्या दुःखाशी तुमचे काहीच घेणे देणे नाही? आणि तुमच्या बापुपरिवारापैकी असुनही ती व्यक्ती उपरीच ठरते तुमच्यासाठी?
नंदिनीने इतक्या वेळा त्या मुसलमान बाईंचा पत्ता द्या असा आग्रह केला त्याला तुम्ही कुणीही प्रामाणिक उत्तर द्यायची तसदी घेतली नाहीत. उलट तिलाच लक्ष्य करुन असभ्य भाषा तुम्ही इथे वापरता आहात. पुन्हा sorry म्हणुन महान बनु पहात आहात. खालच्या पातळीची भाषा वापरुन तुम्ही बापु परिवारा विषयी असलेल्या लोकांच्या मनातील मतांना आणि शंकांना धृढता प्राप्त करुन देत आहात.मला आलेले बापु भक्तांचे अनुभव मी माझ्या पोस्ट मधे कथन केलेले आहेतच त्याचे खंडन आधी करा आणि मग पुढे बोला!
सगळेच बापुभक्त एका माळेचे मणी नसतीलही कदाचित पण तुमच्या पोस्ट वरुन तरी तुम्ही स्वतः तसेच सिद्ध करण्यास हातभार लावत आहात.
जरा आत्मपरीक्षण करुन बघा.
आणि शेवटी काय आहे? माणसाने कुणालाही गुरु मानले आणि त्यांच्या शिकवणी प्रमाणे वागायचे ठरवले तरी मुळचे संस्कार आणि वृत्ती कधी ना कधी उफ़ाळुन बाहेर येतेच. यावर दिवे घ्यालच अशी आशा करते.

सखि!
तुला एक प्रमाणिक सल्ला देतेय उगिच तु स्वतची पातळी सोडुन आणि लेखणी ( keyboard ) विटाळुन पापाची धनी होवु नकोस.
नंदीनी!
तुझे सगळे प्रश्न अनुत्तरीतच राहणार याची खात्री बाळग तशी ती तुलाही आहेच म्हणा?कसलेही बादरायण संबंध जोडुन कुठुन तरी अवतारी बापुंना महान बनवीणे आणि त्यांची फ़ुकटची जाहिरात करणे हाच एककलमी कार्यक्रम चालु असतो यांचा. तेंव्हा यांना बोलुन काहिहि उपयोग नाही "पालथ्या घड्यावर पाणी"
गौरी!
तुमच्या योग्य आणि सभ्य भाषेतील उत्तराची अपेक्षा आहे. माझे आव्हान स्विकारुन त्या बापुभक्ताला मदत करणार असाल तरच बोला.
"अनामिका"



Prady
Thursday, April 26, 2007 - 1:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गौरी!
तुमच्या योग्य आणि सभ्य भाषेतील उत्तराची अपेक्षा आहे. माझे आव्हान स्विकारुन त्या बापुभक्ताला मदत करणार असाल तरच बोला<<<<<<<<<<<
विचारे बाई आणी सभ्य भाषा????? ते कसं शक्य आहे?? त्यानाही ते माहीत आहे. बापूंच्या कृपेने त्यानाही ते अवगत आहे म्हणून विचारे बाईंनी स्वत्:च जाहीर केलय की त्या परत इथे येणार नाहीत काही लिहायला.

Safaai
Thursday, April 26, 2007 - 1:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी स्वतः बापूंचा भक्त नाही, पण भक्त असलेले लोक मला अगदी जवळून माहिती आहेत, म्हणून मी पण उत्सुक आहे हे नक्की काय आहे ते पाहायला.

नंदिनी, तू जर पत्रकार आहेस तर तू स्वतः का शोधून काढत नाहीस 'तो' पत्ता? ते देत नाहीत ना, ठीक आहे, मग तू काढ. पत्रकार लोकांनी तरी proactive असायला हरकत नाही :-) (यात तू पत्रकार आहेस म्हणून तसा उल्लेख केला आहे, तुझ्या पेशाबद्दल मला काहीही बोलायचे नाहीये.)

बापूंचे भक्त कोणत्याच गोष्टीचा पुरावा द्यायला तयार नाहीत हे दिसतंच आहे, काहींची भाषा पण शिवराळ आहे, पण त्याच बरोबर त्यांना विरोध करणारे पण बर्‍याच वेळा वैयक्तिक पातळीवर येऊन बोलत आहेत. अशाने हा बीबी लवकरच बंद होण्याची लक्षणे आहेत :-)


Anamikaa
Thursday, April 26, 2007 - 2:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

prady
अग ही भिष्मप्रतिज्ञा कधी केली अविचारेबाईंनी?मला समजलेच नाही.तसे देखिल त्यांची पोस्ट पुर्णपणे वाचायचे कष्ट घ्यावेत अशी गरज मला तरी कधीही वाटली नाही म्हणुनच कदाचित त्यांचे ते वाक्य माझ्या नजरेतुन सुटले असावे.
चला आता जरा सुटकेचा निःश्वास टाकायला हरकत नाही. अशी शिवराळ भाषा वाचुन माझ्या मेंदुच खोबर होत होत पार. बापुंनी स्वप्नात दृष्टांत दिलेला दिसतोय गौरी बाईंना? की मायबोलिवरुन पायुतार व्हावे! दिवे घ्या हं बापुभक्त!
नंदिनी
आता विनोद कोण करणार ग आणि आपल्याला हसवायला विषय कोण पुरवणार? breaking news (अविचारे बाईनी) पुरवठामंत्र्यांनी राजिनामा दिलाय मायबोलीचा!
अनामिका"


Chafa
Thursday, April 26, 2007 - 2:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सफ़ाई, पण ती सुरस चमत्कार कथा म्हणजे "बोलाचाच भात..." आहे, तर नंदिनीने शोधूनही पत्ता मिळणार कसा? नंदिनी, पत्त्याचा नाद सोड, मिळणार असता तर एव्हाना मिळाला असता. कदाचित तो पत्ता बांद्र्यातच असण्याची शक्यता आहे! :-O

हा विषय खरे तर सामाजिक मनोविज्ञानचिकित्सेचा प्रबंध लिहावा इतका गहन आहे. म्हणजे इस्लामी मदरश्यांमधे जसे brainwashing होते हे आपण ऐकले की आपल्याला चीड येते. पण हे सगळे बघितले की कळते की तसे होणे कसे शक्य आहे आणि स्टोर्वी म्हणाली तसे ही नस ओळखून ती बरोबर पकडून त्याचा ठराविक लोकांतर्फे कसा गैरफायदा घेतला जाऊ शकतो हे खरेच मोठे शास्त्र आहे!

असो, बीबी बंद होण्यापूर्वी आणखी एक लिहून घेतो. :-O

सुरुवातीपासून आणि नंतरही अवडंबराचा विरोध करणारे आणि कुठल्याही भोळसट अपप्रवृत्तींचा पर्दाफार्श करणारे इतके सगळे मायबोलीकर पाहून खरोखर आनंद झाला. तुमचा सगळ्यांचा मला अभिमान वाटतो. लोकप्रबोधनाचे इतके उत्तम कार्य मायबोली नकळतपणे करत आहे; ही काही एखाद्या सामाजिक संतापेक्षा फार वेगळी बाब नाही! इत्यलम्!


Nandini2911
Thursday, April 26, 2007 - 3:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा काय झालं.. पृथ्वीतळावर खूपच चांगला दिवस उगवला. बापुजकीड, नामी, स्वप्ना, गौरीताई आणि नंदिनी एकाच दिवशी एकाच वेळेला मेल्या..

वरती आकाशात गेल्यावर चित्रगुप्ताने त्याचे अकाऊंट क्लीअर केलं. आणि त्याना परमात्म्याच्या समोर उभे केलं. त्याच्या पाप पुण्याचा हिशोब करण्यासाठी. कीड, नामी स्वप्ना, गौरी एकत्र उभ्या होत्या. नंदिनी मात्र बिनधास्तपणे "या स्वर्गाच्या इंटेरीअरचा खर्च किती असेल आणि कुणी केला असेल?" याचा विचार करत इकडे तिकडे बघत होती. बाकीच्या चौघी चांगल्याच घाबरल्या होत्या, दूर पृथ्वीवर त्याचे नातेवाईक त्याच्यासाठी रडत होते. ते दृश्य पाहून त्या सुद्धा रडत होत्या. नंदिनीला as usual माहीत होतं की कुणीही तिच्यासाठी रडणार नाही. झालं. परमात्मा आले. आज हे काम विष्णुदेवावर सोपवलं होतं. चौघीजणी त्याच्या पायाशी धावल्या. चरणस्पर्श करण्यासाठी. नंदिनी मात्र तिथेच उभी राहिली. जो नवरा बायकोकडून पाय चेपून घेतो त्याचे पाय धरण्यापेक्षा मरणं पसंद करेन हा डायलॉग तिला सुचला होता.... पण ऑलरेडी मेलेले आहोत हे लक्षात येऊन ती मरणे ला पेरलल शब्द शोधायला लागली.

भरपूर पाया पडून झाल्यावर विष्णूने त्याना उठायला सांगितले.
"उत्तिष्ठ.." असं तो म्हणाला.
"च्यायला.. अजून किती वेळ तिष्ठायचं... इथे येऊन तीन तास झाले आहेत. तिथे खाली बॉडी तशीच आहे आणि इथे मी अशी अधांतरी.. काय सिस्टीम वगैरे आहे की नाही तुमच्याकडे?" नंदिनीला सूर सापडला. तो पण वरच्या पट्टीतला.

विष्णूला आपली चूक कळली. संस्कृत फ़क्त "मार्कापुरतं" घेतलेले असते हे हे एव्हाना त्याला अनुभवाने लक्षात आलं होतंच.
"तसं नाही.. मी या बालिकाना उठायला सांगितलं."
"या? बालिका? मग मी काय पाळण्यातलं बाळ?" नंदिनी अजूनही भडकलेलीच होती. खाली तिची बॉडी बहुतेक बेवारस म्हणून डेक्लेअर होत होती. त्याचा राग काढायला हा विष्णू समोर होता. आणि काही झालं तरी आता कुणी आपल्याला देहान्त प्रायश्चिताची शिक्षा देणार नाही हे तिला ठाऊक होतं. त्यामुळे ती अजूनच बिन्धास्त.....

"राम राम.." वगैरे जप नामीने सुरू केला. बाकीच्यानी त्याच्या सुरात सूर मिसळला. नंदिनीला हे सगळं नवीन असल्यामुळे तिने पृथ्वीदर्शन सुरू केले.

"अरे मुलीनो, थांबा जरा. तुमचं अकाऊंट क्लोज झालेलं आहे." चित्रगुप्ताने सांगितलं.

"बालिकानो, काय काय केलत पृथ्वीवर?" विष्णूने सुहास्य वदनाने विचार्लं.
गौरीबाईनी या प्रश्नाची आधीच तयारी केली होती.




त्यामुळे त्यानी घडाघडा बोलायला सुरुवत केली...
"ए मराठीतून बोल" नंदिनी. दुसरं कोण?
तरीही गौरीबाईनी आपले चालूच ठेवले. अमेरीकेतून वर आलेल्या त्या.
"मराठी विसरल्या असतील" चित्रगुप्त नंदिनीच्या कानात कुजबुजला.
"विसरायला काय धाड भरली? आयुष्य सगळं इथेच गेलं ना.." नंदिनी कुजबुजली नाही.
"देवा, अरे तू आम्हाला का विचारतोस? खाली धरतीवर आम्ही आमचं सगळं काम सबमिट केलय ना?" स्वप्नाताई बोलल्या.
"कधी केव्हा कुठे?" विष्णू बोलला.
"कुणाला? कशासाठी? कुणी? 5 Ws and 1 H of any news " नंदिनी अचानक आठवल्यासारखी बोलली. सवयच होती तिला तशी.
तिच्याकडे कुणीच लक्ष दिले नाही.
"बाप्पा.. अरे असं काय करतोस?"कीड उवाच.
"आईशप्पथ... गणपतीबाप्पा कुठून आले?" नंदिनीने इकडे तिकड बघत विचारलं.
परत तिच्याकडे कुणी लक्ष दिलं नाही. जाऊ दे... तिनेही कुणाकडे लक्ष दिलं नाही.
आता मात्र धित्रगुप्ताने सर्वानी किती पुण्य केलं. कितीवेळा रामनाम लिहीलं किती समाजसेवा केली काय पाप केलं. याचा हिशोब द्यायला सुरुवात केली.
सर्वाची लेजर बूक चांगले जाडजूड होते. नंदिनीचा हिशोब मात्र एका कागदावर होता. तिलाही जास्त टेन्शन नव्हतं. नाहीतरी तिचा आणि अकाउंटचा संबंध होताच कुठे?

चित्रगुप्त जे काही वाचून दाखवत होता, ते कुणालाच कळलं नाही.
"हं. आता कुणाला काही बोलायचं असल्यास सांगा." विष्णू बोलला.
"देवा, अरे आम्ही काय सांगणार. तू तर सगळं जाणतोसच. पृथ्वीवर असताना देखील आम्ही तुझी किती सेवा केली. तुला नावं ठेवणार्या प्रत्येक व्यक्तीशी कसे भांडलो. अजून काय सांगणार? आता स्वर्गात देखील आम्ही तुझी अशीच सेवा करू.. " चौघीनी एकाच स्वरात उत्तर दिले.
"पण स्वर्ग की नरक हा फ़ैसला झालाय कुठून?" कोण बोललं हे सांगायला हवं का?
विष्णूने त्या चौघीकडे पाहिलं.
"तुम्ही खूप श्रद्धाळू आहात. खूप भक्ती केलीत. पूर्णपणे केली. त्याचं फ़ळ तुम्हाला मिळेलच. पण त्याच बरोबर... तुमच्या भक्तीचा इथे काही उपयोग नाही. कारण जी भक्ती अहंकारासोबत येते... ती वाया जाते. "मी" पणा जिथे सुटत नाही, तिथे साक्षात विष्णू देखील काही करू शकत नाही."
"ओ, असं काय म्हणताय? आम्ही इतके दिवस इतकी भक्ती केली. त्याचा काहीच कसा उपयोग नाही. हो, तिथे खाली रामनामाची ब्यान्क केली आम्ही. त्याचं पुण्य आम्हाला मिळेल म्हणुन सांगितलं होतं." विष्णूने चित्रगुप्ताकडे पाहिलं.
"त्याचं काय आहे... आमचं त्या ब्यान्केकडे कसलंही official collaberation नाही. त्यामुळे तिथलं पुण्य इथे ट्रान्स्फ़र होण्यात अडचणी येतात."





"बाप रे आता काय करायचं? तरी मी तुला सांगत होते जायच्या आधी एकदा बांद्र्याला जाऊन नीट चौकशी करून मगच वर येऊ या.." चौघीजणी कुजबुजायला लागल्या.
"कसे जाणार वाटेत. या बयेला घ्यायचं होतं ना.." गौरीताईनी नंदिनीकडे एक तिरस्कारपूर्ण कटाक्ष (??) टाकला.
नंदिनीने शांतपणे वाटेत वाचायला म्हणुन आणलेलं पुस्तक चाळायला सुरुवात केली होती.
"देवा, अरे रामनामाचे सोड... नाकीचं काहिततरी पुण्य असेल ना?" स्वप्नाताईना हाती आलेल स्वर्ग इतक्यात सोडायचा नव्हता.
"थांबा.. अजून हा हिशोब पूर्ण व्हायचा आहे." चित्रगुप्त हातातला कागद फ़डकावत म्हणाला.
"त्याला काय दोन मिनिटेही लागणार नाहीत," नामी म्हणाल्या.

नंदिनीला यातही इंटरेस्ट नव्हता.
"चित्रगुप्ता थांब.. मी मघापासून बघतोय की या बाईसाहेब जास्तच निवांत आहेत. असे निवांत दोघेचजण असतात. ज्याना खात्री असते की ते स्वर्गात जाणार आहे किंवा नरकात.. काय नंदिनी तुम्हाला काय वाटतं "
" Frankly speaking, I dont give it a damn.." नंदिनी...
"काय?" विष्णू आसनावरच तीन ताड उडाले.
"देवा... मला काहीही फ़रक पडत नाही. स्वर्ग किंवा नरक याचा"
"असं कसं म्हणते तू? स्वर्ग म्हणजे कायम सुख शांती.. नरक म्हणजे यातना दु:ख.." चित्रगुप्त म्हणाले.
"असेलही. हे सगळं तुमच्या हातात आहे त्यामुळे मी इथे बोलून काही फ़ायदा नाही. मी आयुष्यात स्वर्ग मिळावे म्हणून कहीच केलं नाही. नरक मिळेल असं काही भयानक पाप केल्याचं ही मला स्मरत नाही..."
"नाही कसं... देवाविषयी काय लिहिलं होतंस ते आठव जरा. तेच हे आमचे विष्णू" नामीबाईनी हात जोडले. विष्णूला.. नंदिनीला नव्हे.
नंदिनीने उत्तर देण्याचे टाळले. अनुभव... अनुभव.. दुसरं काही नाही.
"ठीक आहे. तू दिवसभरात काय काय करत होतीस ते तरी आठवतं?" विष्णूने विचारले.
"देवा... काय चेष्ता करतोस? आजच्या सारखा दुसरा दिवस कधी दाखवलास का? रोज एक नवी तर्‍हा... तोज एक नवी मजा. तरीपण generalize करायचा प्रयत्न करते. रोज सकाळी इठून घराची झाड्लोट करायचे. आजूबाजूच्या गल्लीतली दहा बारा पोरे पोरी यायचे. त्याचा अभ्यास घ्यायचे. काही लोक त्याला ट्युशन म्हणतात. मी शिकवणी म्हणायचे. गरीब पोराकडून कधी पैसे घेतले नाहीत, पण श्रीमंताच्या पोराकडून डबल घेत्ले.




"असं का?" गौरीबाईनी विचारले. कीडने त्याना कोपराने ढोसले.
"मग?"
"मग काय? ऑफ़िस.. तिथे जाऊन बॉसने दिलेली सगळी कामे वेळेच्या आधी पूर्ण केली. मग इकडे तिकडे टीपी केला. कधी खूप टंकाळा आला झोप आली की मग या सगळ्याना भेटून यायचे. खूप छान करमणून करायच्या सगळ्या मिळून. तेवढे एक पुण्य घाल त्याच्या पदरात. ऑफ़िस संपल्यावर मी घरी यायचे. तवर डान्सची मुलं आलेली असायची. त्याना "ताक धिना धिन" करायला लावून मी स्वयंपाक करायचे. एक्टं जेवायला टंकाळा येतो म्हणून बाजुच्या कविताला रोज घेउन यायचे. जेवल्यावर थोडावेळ पुस्तक वाचायचं किवा नेटवर कुटाळक्या करायच्या... दिवस कसा जायचा ते कळायचं सुध्दा नाही. सांग मला केव्हा मी पूजा करणार केव्हा तुझं नामस्मरण करणार? नाही म्हणायला सकाळी एकदा "प्रणम्य शिरसा" वगैरे म्हणायचे, काहीच केलं नाही असं नाही. रात्री झोपताना एकदा "सगळ्याना सुख़ी ठेव असंही सांगायचे, तू कधी ऐकलं नाहीस.. तो वेगळा मुद्दा आहे."

"सुट्टीच्या दिवशी काय कराअयचीस?" विष्णूने विचारलं.
"काय करणार? एक चोवीस तासाचा रविवार आणि त्यात ही ढीगभर कामं. कॉलेजमधे असल्यापासून "प्रेरणासाठी" कामाठी पुर्‍यामधे शिकवायला जात होतेच. पण हल्ली महिन्यातून एकदा किंवा दोनदाच जात होते. ते पाप माझ्या हिशोबामधे add करा. परत कधीमधी इकडे तिकडे फ़िराय्ला जात होते. बाकी विशेष काहीच केलं नाही मी" नंदिनीने सांगून टाकलं.
"काय मिळवलस आणि काय गमावलस आयुष्यात?"
"काहीच नाही. जाताना काय देऊन पाठवलं होतं तू? आणि येताना काय आणू दिलस? कशाचाही हव्यास धरला नाही. आला क्षण सुखाने जगले. मी हसले. बाकीच्याना हसवलं. कधी रडलेच तर अश्रू कुणाला दिसणार नाही याची काळजी घेतली. मायेला माया दिली. जिवाला जीव दिला. पण कधी कुणाचा द्वेष नाही केला. माझा द्वेष ज्यानी केला त्याना दरवेळेला समजून घेतलं. मनात कशाचं किल्मिष ठेवलं नाही."
"मरताना काय वाटलं?"
"काहीच नाही. एक ना एक दिवस तू ह दिवस दाखवणार याची खात्री होतीच. फ़क्त एक मागणं होतं. मरण येताना हसत खेळत यावं, कधीही यावं, पण ओठावर हसू ठेवून जावं. "
विष्णू गालातल्या गालात हसला.
"देवा, अरे मी काय मागणार होते तुझ्याकडे. सगळ्या सृष्टीतल्या चराचरात व्यापून राहिलेला तू... माझ्या मनात काय हे तुला माहीत नाही का? किती खेळ दाखवलेस तू? तुझे सगळे खेळ ओळखून होते रे मी. म्हणून तुला मदतीसाठी कधी बोलावलं नाही. गर्द काळ्या काळोखात सुध्दा कधी तुला "सोडव रे बाबा" म्हटलं नाही.. हो... कारण अशावेळेला तू मदतीला नागदेव पाठवणार. त्यापेक्षा सगळ्या संकटाचा स्वत्: मुकाबला केला. फ़क्त लढण्याचं बळ मागितलं. आणि ते तू दिलस.
दोन हात दोन पाय, स्वच्छ वाणी... आणि चष्मा असलेले का होईना डोळे दिलेस. अजून काय लागले जगायला. मला कधीच मन्:शातीची art of leaving ची गरज पडली नाही. आहे तशी जगत गेले. पाप की पुण्य ते तू ठरव. मला त्याच्याशी देणं घेणं नाही.
स्वर्ग किंवा नरक कुठेही रहायची तयारी आहे. कुठेही असले तरी असंच ठेव मला हेच मागणं. "

"ह्म्म...." विष्णूने चित्रगुप्ताकडून सगळे हिशोब मागून घेतले.

नामी, गौरी, कीड आणि स्वप्ना याना स्वर्ग मिळाला. त्याच्या श्रद्धेच्या आनी भक्तीच्या बदल्यात.
नंदिनीला काय मिळालं.. स्वर्ग नरक पुनर्जन्म की मोक्ष?

विष्णू हे सांगणार तेवढ्यात शिंच्या अलार्मचा गजर वाजला.

प्रश्न अनुत्तरीत राहिला. सध्यातरी.


Disha013
Thursday, April 26, 2007 - 4:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे!!!! एका दिवसात किती जण ओरडुन बोलुन गेलेत इथे!!!
निष्पन्न काहीही झाले नाही आणि होईल असे वाटत नाही! हे बापुभक्त नुसत्याच पोकळ नि बुडबुड्या POST टाकुन गेलेले दिसताहेत... बाकी काही समाजसेवा न का करेना, यांना बापुंनी नीट सभ्य बोलायला शिकवले आणि राग आवरायला शिकवले तरी पुरे,असे वाटायला लागलेय!


Gaurivichare
Thursday, April 26, 2007 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hari om Nandini,

Evde motha faltu post lihilas te kaam fakta adani patrakarach karu shakto .Ani ho

स्वर्ग नरक पुनर्जन्म की मोक्ष?
प्रश्न अनुत्तरीत राहिला
aga अनुत्तरीत kasa rahila ?

Tyache answer to adich 25 apr chya post madhe dile ahes

तुमच्या बापूसारख्यानी माझा उद्धार करण्यापेक्षा मी स्वत्: नरकात जाणे पसंद करेन.


Bgha re bapu bhaktano ata tumala patlech asel na ho kya kiti adani ahet tya.

ANd reamining all virodhak mala ase vate ki tumala tumchya aai vadalnbaddal respect nasava karan mazya bapune mala aai vadalnbaddal respect karaila nakich shikvla ahe
Karan mi adhichya post madhe lihile ahe ki kutchi hi mulgi aplya vadalbaddal upshabd ,lutat he eiku shakat nahi .

Pan tumchya virodhakanchya posts varun hech kalte ki tumala aai vadalnbaddal ajibat respect nahi karan jase mazya bapu la bolyavar maza tol dhsalto tase tumcha bahudha dhasaltat nasava karan tumhi duryanchya vadalna shivya ghalnyat expert ahat jaudet ha tumcha dosh nahi .Karama daridri mantat ashya lokana .


Hari om




Neelu_n
Thursday, April 26, 2007 - 4:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी
तुझी कल्पनाशक्ती अफाट आहे. हात टेकले तुझ्यासमोर.


Nandini2911
Thursday, April 26, 2007 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चीटींग... चीटींग...
हे असं नाही करायचं हा.. गौरीताई.
आधी म्हणायचं की लिहत नाही आणि मग लिहायचं पण चला ठीक आहे...
आमच्या करमणूकीची तर सोय झाली.
मला मध्यंतरे अडाणी ग्रूप कडून नोकरीची ऑफ़र होती.. जर मी गेले असते तर कित्ती बरे झाले असते ना.. तुम्हाला अजून कोट्या करता आल्या असत्या..
चालू दे.. तुमच्या आई वडीलाचे स्तोत्रवाले एक पुस्तक मिळाले आहे मला त्याचा book review उद्या वाचा...
आणि मी आता झोपत आहे. फ़ार आदळ आपट करू नका. शांतपणे घ्या.
एकाच पोस्ट मधे काय म्हणायचेय ते टाका. उगा एका एका वाक्याची २५ पोस्ट टाकू नका,, कुणी वाचत तर नाहीच. आणि इथली जागा वाया जाते.
बीबीला टाळं मारायला लागेल असं लिहू नका...
(काय तरी मी अपेक्षा ठेवतेय)


Mansmi18
Thursday, April 26, 2007 - 5:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार,

आता मला हे सारे चाळीत भान्डणे होतात तसे वाटायला लागले आहे.
जर हा बन्द करावा लागला तर अती दुर्दैवी आहे. मला वाटते बापुभक्तानी पुढील प्रश्नाची उत्तरे दिली तर हा जो गोन्धळ सुरु आहे तो होणार नाही.

१. त्या मुसल्मान आणि पारशी बाइचा पत्ता आणि फोन नम्बर
२. अनामिकाच्या प्रश्नाला समर्पक उत्तर त्या आजारी बापुभक्ता बद्दल

जर ही माहिती ज्याना शन्का आहे त्याना तपासता आली तर तुमच्याच शब्दाला वजन येइल.

नन्दिनी,
तुलाही एक प्र्श्न
ते एवढे सान्गत आहेत तर ते बान्द्रा ला जाउन भक्ताना प्रत्यक्ष भेटण्यात काय हरकत आहे? तुला बर्याच भक्ताना भेटुन शहानिशा करता येइल.

धन्यवाद.


Gaurivichare
Thursday, April 26, 2007 - 5:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hari om nandini,


मी आता झोपत आहे. फ़ार आदळ आपट करू नका. शांतपणे घ्या.

Mi tumchya sarkhi adani nahi ahe आदळ आपट karaila .Tumhi zopa shantpane goodnight and sweet dreams ani aaj tumchya swapnat naki narak yenar so enjoy u t tonight with u r beloved narak .

Gaurivichare
Thursday, April 26, 2007 - 5:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला मध्यंतरे अडाणी ग्रूप कडून नोकरीची ऑफ़र होती..

Adani lokana ajun dusre kon offer deuch shakat nahi

Gaurivichare
Thursday, April 26, 2007 - 5:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, तू जर पत्रकार आहेस तर तू स्वतः का शोधून काढत नाहीस 'तो' पत्ता? ते देत नाहीत ना, ठीक आहे, मग तू काढ. पत्रकार लोकांनी तरी proactive असायला हरकत नाही :-)


Aho hya fakta mothe mothe phaltu posts lihitat tevda time jar tya baila shodnyat ghalavla tar evana ti milali asti pan jaudet hyanche profile madhe hyani je kahi swatabaddal lihile ahe te saglyana mahit ahe . manun hya ashya vagtat. ho

Nandini2911
Thursday, April 26, 2007 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मा admin ,
इथे मी गेले कित्येक दिवस व्यवस्थित चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र काही id माझ्यावर अत्यन्त वैयक्तिक पातळीवर येऊन आरोप करत आहेत. कृपया लक्ष द्यावे. हा बीबी बंद केला तरी चालेल. किमान या ids ना समज द्यावी ही विनंती. अन्यथा मायबोलीवरचा हा सर्वात असभ्ये बीबी गणला जाई.
धन्यवाद.


Princess
Thursday, April 26, 2007 - 5:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गौरी विचारे, थोडा विचार करा... तुम्ही भक्तानी येथे येउन तो मुस्लिम बाईचा अनुभव सांगितला. त्यानंतर नंदिनीने पत्ता मागितला. पत्ता दिलात तर तो अनुभव खरा की खोटा हे तपासुन पाहता येईल. जर असे चमत्कार खरोखर होत असतील तर पत्ता द्यायला काय हरकत आहे? जर तो पत्ता दिला नाही तर तो अनुभव खोटा म्हणुनच गणला जाईल. तुमच्या देवावर जर तुमची श्रद्धा आहे तर मग पत्ता देण्यास का घाबरत आहात?
नंदिनी मला नाही वाटत हा बीबी बंद व्हावा असे... होऊ देत थोडी चिखलफेक पण त्यातुन सत्यासत्य पडताळुन पाहता आले तर निदान समाजातील कित्येक भाबडे लोक यातुन वाचतील. कदाचित तू आधुनिक "सावित्री फुले" म्हणुन नावाजली जाशील फरक एकच आहे की तुला vitually चिखल्फेकीचा सामना करावा लागतोय :-)


Anamikaa
Thursday, April 26, 2007 - 6:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी!
मानले तुला.
धन्य आहे तुझी आणि त्याहीपेक्षा तुझी कल्पनाशक्ती अचाट आणि अफ़ाट आहे. एकदम बिनतोड लिहिल आहेस तु?
पण अग काय हे? तुझे पोस्ट वाचुन अविचारे बाईंना त्यांची भिष्मप्रतिज्ञा मोडावी लागली आणि शिवाय बापुआज्ञा देखिल मोडावी लागलि ते वेगळे आणि आता त्याचे पातक तुझ्या टाळक्यावर म्हणजे तुझ्या नरकात जाण्यावर शिक्कामोर्तब झालेच म्हणुन समज. (कारण आता अवतारि बापु शंकराचा अवतार घेतिल बहुतेक आणि तांडव नृत्य करतील !)एक गुप्त माहीती देवु का?मला असे कळलेय कि बापु आणि छत्तिसकोटी देव यांच्यात मांडवली झाली आहे ना?(असा समज आहे बापुभक्तांचा).
आता तु आयत कोलित दिलच आहेस अविचारेबाईंच्या हातात त्यांच घोड चौखुर उधळणार आणि त्यांच्या हातातल्या पलित्याने मायबोली पेटवल्याशिवाय त्या काहि उसंत घेत नाहित?.तेंव्हा आता या बिबिला भेट देणार्‍यांनी बरोबर येताना स्वतः पुरता पाण्याचा साठा जरुर आणावा कुठे पेटलेली दिसली आग की ओता पाणी. अग्निशामकदलाला देखिल मी आगाउ सुचना देवुन ठेवायचा विचार करतेय.
मी तर आता ठरवलय एखाद दिवस जरा मुंबई बाहेर जावुन यावे उगिच कोण हात पोळुन घेईल इथे नाही का? पण त्या आधी त्या पिडित बापुभक्ताला जरा बघुन येईन म्हणते अजुन माझ्यातली माणुसकी मेलेली नाहि ना?थोडीफ़ार आर्थिक मदत देखिल करावी म्हणतेय अर्थात मला परवडेल तितकिच करु शकेन कारण मी कुणी बापु,माई वगैरे नाही भक्तांनी पैशाची उधळण करायला माझ्यावर!(भक्तांना लुबाडायला असे वाचावे)
आता जरा विश्रांती घ्यावी हेच बरे.
नंदिनि तु तुझे लिखाण चालु ठेवशीलच.पण, जरा दमान लिही उर फ़ुटायची वेळ आली तुझे ( Thursday, April 26, 2007 - 11:31 am: )चे पोस्ट वाचताना.
अविचारे बाई तुमच्या शिवराळ पोस्ट लिहिण्यातुन(खरडण्यातुन) उसंत मिळालीच तर माझ्या आव्हानाचे काय करताय? ते पण खरडा जरा! दिवे घ्यालच आपण!
अनामिका"



Gurudasb
Thursday, April 26, 2007 - 6:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चर्चा वेगळ्याच वळणाने जायला लागली आहे . बापू बाजुला राहून भक्तच स्वत : ची प्रसिद्धी करून घेत आहेत . खरा भक्त कोण ? तो गुरुजवळ काय मागतो ? त्याचे आचरण कसे असते ? भक्तहो , बापू काय सांगतात भांडण्याची अविचारी युक्ती ? यासाठीच का हे भक्त बापू जवळ जातात ?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators