Naami
| |
| Thursday, April 26, 2007 - 9:02 am: |
| 
|
पत्ता मिळाला नाही नामी अजून.. मी वाट बघतेय. ही पोस्ट तुमचीच ना नंदिनीजी. मग शब्द का पालटत आहात. नंदिनीजी माझ्याकडे अशी अनेक उदाहरणे आहेत आणि हो मी स्वत्: जुईनगरला राहते. त्यामुळे मी स्वत्: माझा वेळ काढून तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेन. बघा तुम्हाला वेळ मिळतो का?
|
भ्रमा, जगातली सगळीच तत्वे "मेडिकल" मधे सामावली जाऊ शकत नाहीत! उदी पुरते बोलायचे तर, मन्त्रशकीने भारलेली उदी कामास येते! कुणी कोणत्या मन्त्राने भारली ते महत्वाचे असते! बाहेरील (भुत)बाधा, काही प्रमाणात वेडाचे झटके, नजर लागणे इत्यादी बाबीन्वर तिचा उपयोग केला जातो! लोकान्ना पडताळा येतो म्हणुन लोक त्याचा वापर करतात! (लोक डोक्टरचाही पडताळा घेत असतात.... कोटा शिश्टिममध्ल्या डॉक्टरान्कडे कोणी जात नस्ते....! येवढेच नव्हे तर कोणत्याही जागृत देवस्थानात देवापुढे लावल्या जाणार्या उदबत्त्यान्चा अन्गारा न विसरता कपाळि लावायची पद्धत हे! शन्कराचे रुप तर असल्यातसल्या उदी नव्हेत तर चक्क "चिता भस्म" लेवुन असते असे मानले गेले आहे! (कृपया पुराव्यादाखल शन्कराला पुढे आणुन उभा कर असे सान्गु नका! माझी तेवढी पात्रता नाही) थोडावेळ उदी बाजुला ठेव, आणि मी सान्गतो तो एक प्रयोग हापिसात बसल्या बसल्या कर! तुझ्या आजुबाजुला कोणी तुझ्याकडे लक्ष नसलेली व्यक्ती शोध! शक्यतो सुन्दर व्यक्ती बघ! आणि आता मनाशी निश्चय कर की त्या व्यक्तीने माझ्याकडे बघावे! (निश्चय केला नाहीस तरी चालेल) आता मन पुर्णपणे त्या व्यक्तीवर केन्द्रित कर तसेच तुझी नजरही पुर्ण पणे त्या व्यक्तीवर रोखुन धर! माझा अनुभव असा हे की जर मी कुणाकडे रोखुन एकटक बघु लागलो तर ती ती व्यक्ती अस्वस्थ होते व थोड्याच वेळात त्या व्यक्तीचे नजर नेमकी माझ्या नजरेला भिडते! व्हाईस वर्सा.... जर माझ्याकडे कुणी "एकटक" नजरेने बघत असल्यास मी (अस्वस्थ न होता) आपोआप त्या व्यक्तीच्या दिशेला मान फिरवुन तिच्या नजरेला नजर भिडवतो! आता याचा उदीशि काय सम्बन्ध??? तर, मेडिकल शाखेला अजुनही अज्ञात असलेल्या काही मानवी प्रभाव क्षेत्रान्मधिल बदलान्मुळे (जी पन्चेन्द्रियान्च्या व्यतिरिक्त मानली जातात व पन्चेद्रिये दरवेळेस या प्रभावक्षेत्रान्ना समजु शकतीलच असे नाही) जाणिवा होत असतात व त्या त्या जाणिवान्प्रमाणे कृती होत असते! ह्या मानवी प्रभाव क्षेत्रान्ची जोपासना करणे किन्वा त्यात बाह्यात्कारी कुशक्तीन्मुळे झालेला बिघाड दुर करणे या साठी मन्त्रावलेल्या उदीचा उपयोग करुन घेतात! जो परिणाम केवळ तुझ्या एका नजरेने दुर बसलेल्या व्यक्तीवर होतो, तशाच प्रकारे उदी प्रत्यक्ष शरिरावर धारण केल्याने / लावल्याने होतो! हाही उपाय पटत नसेल, तर एक काम नक्की कर! ज्यावेळेस एखादा भला थोरला आ वासुन जाम्भई देत असेल तर ती समोरुन बघ! किन्वा तू जाम्भई देताना समोर कोण असेल अस बघुन जाम्भई दे! नव्वद टक्के वेळेचा असा अनुभव हे की एकाने जाम्भई दिली तर त्याच्या बरोबर समोर असणार्यालाही आतुन जाम्भईची उन्का होते, तोही प्रत्यक्ष जाम्भई देतो किन्वा दात दातावर घट्ट रोवुन जाम्भई तोन्डात जिरवतो! मी अनुभव किन्वा अनुभुती शिवाय काहीच बोलत नाही, तेव्हा आता प्रयोग कर आणि रिझल्ट मला सान्ग! निगेटीव्ह आला तर तुला दुसरा उपाय सान्गेन..... तुझ्याच भल्यासाठी....... अस का?? फार पुर्वी आमच्या लहानपणी... कोण पाठमोरे सुन्दर दिसले की "अर्रे पल्लट्ट" असे म्हणायची पद्धत होती.. ज्याच्या बोलण्याने लाम्बची "ती" पलटुन इकडे बघायची त्याची कॉलर त्या दिवसापुरति ताठ व्हायची! तुला उपाय अशासाठी की हापिसातला एखादा कारकुन देखिल जर तुझ्या नजरेने "पलटत" नसेल.....! तर कठीण हे रे भो तुझ! DDD
|
Naami
| |
| Thursday, April 26, 2007 - 9:40 am: |
| 
|
भ्रमरजी, अध्यात्म आणि विज्ञान ह्यांचं कधीच वाकडं नव्हतं आणि नाही. हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे. उदीचे महत्त्व मला स्वत्:ला माहीत नव्हतं हे मला साईचरित्रामधून आणि प्रत्यक्ष अनुभवावरुनच कळले. कोणतीही गोष्ट स्वत्:ला पटल्याशिवाय मी इतरांना सांगत नाही हा माझा स्वभाव आहे. मी इथे कोणाला ते करण्यासाठी सांगितलेले नाही, फक्त माझा अनुभव सांगितला आहे. उदीचा विषय आला म्हणून सांगते की, साईनाथांनी आपल्या भक्तांना उदी देउन बरे केल्याची अनेक उदाहरणे साईचरित्रामध्ये आहेत. भक्त चांदोरकरांनी दूर गावच्या आपल्या मुलीला बरे वाटावे म्हणून शिरडीतच त्यांनी रस्त्यावरची माती बाबांची उदी समजून आपल्या पत्नीच्या माथी लावली आणि त्यांच्या मुलीला आराम वाटला. इथे त्यांचा भाव आणि श्रद्धा महत्त्वाची होती. रस्त्यातील मातीने उदीचे कार्य केले होते.
|
Me_sakhi
| |
| Thursday, April 26, 2007 - 9:41 am: |
| 
|
मॉड मी माझ्या मागिल पोस्ट्मधिल भाषाप्रयोगा बद्दल क्षमा मागते.पण गौरी विचारे यांच्या चुकिच्या भाषाप्रयोग केलेल्या पोस्ट वाचुन स्वतःला रोखु शकले नाही. तुम्ही ती पोस्ट उडवु शकता. गौरीविचारे यांना योग्य भाषेचा आणि जास्त करुन मराठीचा वापर करण्यास सांगावे अशी नम्र विनंती करतेय. मायबोलीची मर्यादा बापुभक्तांनी राखावी इतकीच अपेक्षा. सखि
|
Yoga
| |
| Thursday, April 26, 2007 - 10:05 am: |
| 
|
सगळ्या अपेक्षा बापू भक्तांकडूनच का केल्या जात आहेत मला समजत नाही. आणि सगळ्यांना एकाच तराजूत तोलले जात आहे.
|
पत्ता मिळाला नाही नामी अजून.. मी वाट बघतेय. >>>>. मी तुमचा पत्त्ता केव्हा मागितला आहे? मी त्या मुसलमान बाईच्या पत्त्याची वाट पहात आहे. अजूनही बघतच आहे. या चर्चेमधे कित्येक वेळा मूळ मुद्द्याला बगल देण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यामधीलच हा एक. लिंबू, तू ज्या अतींद्रीय शक्त्ती म्हणतोस.. त्यावर माझा पुर्ण विश्वास आहे. म्हणूनच मी नामी याच्या अनुभवावर प्रश्न उठवलेले नाहीत. (मेडीकल हा माझा प्रान्तदेखील नाही) मी बापुजकीड याच्या अनुभवावर प्रश्न उठवले आहेत. ज्यावर मला "कुणीही" उत्तर दिलेले नाही. म्हणुन मी त्या बाईचा पत्ता मागितला आहे. तोही मला मिळालेला नाही. तुमचा अनुभव जर मेडीकली प्रूव्ह झाला असेल तर तसे डॉक्टर लिहून देतात. (माझ्या आजीचे गुडघ्याचे हाड ७०व्या वर्षी सांधून आले. हे शक्य नव्हतं असे डॉक्टराना वाटत होते. तसे arthopedic surgeon ने लिहून दिले आहे. ) तसे असेल तर मी तेही मीडीयमधे आणण्यास उत्सुक आहे. अजून एक गोष्ट... इथे माझ्या प्रोफ़ेशनचा वारंवार उद्धार झालेला आहे. स्वप्नाजीचा एक मित्र पत्रकार आहे. आणि मी बापूच्या अवडंबराच्या आणि त्याना देवाचा "अवतार" मानण्याच्या विरोधात आहे. तरीही.. बातमी ही बातमी असते. त्यामुळे जर खरोखर अनुभवात दम असेल तर कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय ही बातमी लिहिली जाईल. याची मी खात्री देते. नामी... तुमचा मेडीकल अनुभवाविषयी आपण नंतर चर्चा करू या. सध्या मी माझे लक्ष फ़क्त त्या मुसलमान बाईवर केंद्रित केले आहे. तरी बापुजकीड, कृपया म्ला लवकरात लवकर पत्त्ता द्यावा ही पुन्हा एकवार विनंती.
|
Bapuskid
| |
| Thursday, April 26, 2007 - 10:36 am: |
| 
|
Ramo Rajmani sadaa vijayate Ramam Ramesham bhaje Ramenaa bhihtaa nishaacharchamoo Ramaay tasmai namah Ramannaasti paraayanam partaram Ramasya daasosmyaham Rame Chittalayah sadaa bhavtu me bho Ram maamudhhar Ram Rameti Rameti Ramey Rame manoramey I Sahastra naam tatulyam Ram naam varaananey SHAMASVA ANIRUDHA...... SHARANYAM SHARANYAM SHRI ANIRUDHAM BAPPA PLEASE FORGIVE ME. ** Post Edited by Moderator **
|
Mandarp
| |
| Thursday, April 26, 2007 - 10:52 am: |
| 
|
अरेSSS त्या आईन्स्टाईन चे जरा आईका की रे!!!!! उगाच किती भांडताय? मन्दार
|
Naami
| |
| Thursday, April 26, 2007 - 10:54 am: |
| 
|
नंदिनी, तू स्वत्:च माझ्या नावाचा उल्लेख इथे करुन पोस्ट केलेस म्हणून कदाचित माझा गैरसमजही झाला असेल. पण नंदिनी आम्ही काही इथे एकत्र बसून बीबी लिहीत नाही. त्यामुळे आमच्यासाठीही हा अनुभव नवीनच होता. ज्यांनी हा अनुभव इथे सांगितला त्या इथे नाहीत हे कालच्या त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी सांगितले आहे. इथे कोणाचीच वैयक्तिक दुश्मनी नाही. नंदिनी, मला पत्रकारांचा फार अभिमान वाटतो. कारण मी स्वत्: ह्या क्षेत्रामध्ये ६ वर्ष होते. मला सुद्धा माझ्या एका पत्रकार नातेवाईकाने बापुंबद्द्ल सांगितले होते. जे गैरसमज तुमच्यामध्ये आहेत. ते जाणण्यासाठीच मी बापुंच्या मंदिरात गेले होते. तिथे गेल्यानंतरच मला बापु काय आहेत हे समजले. बापू कोण आहे? काय आहे? हे त्याचा प्रत्येक भक्त जाणतो. इथे कोणीही बापु अमुक तमुकचा अवतार आहे हे म्हटलेले नाही. तो आमच्यासाठी देव आहे आणि कोणत्याही देवासमोर हात जोडले तरी तो बापुच आहे हेच आम्ही समजतो. माझे स्वत्:चे अनेक अनुभव आहेत आणि इतरांचेही. तू बापू भक्त व्हावंस असे मी म्हणत नाही पण तू ज्याप्रकारे बापुंच्या विरोधात लिहित आहेस त्यावरुन मला तरी असे वाटते की तू एकदा जुईनगरला नक्कि ये. हे मी तुला एक पत्रकार मैत्रीण म्हणून सांगते.
|
Naami
| |
| Thursday, April 26, 2007 - 11:04 am: |
| 
|
सर्व बापूभक्तांसाठि एक विनंती, मान्य आहे की कोणी आपल्या बापूबद्दल अपशब्द काढल्यावर ते सहन होणे शक्य नाही. पण आपल्या बापुने आपल्याला रामाचा आदर्श घालून दिला आहे. ज्याने कैकयीला मातेचेच स्थान दिले आणि तिचा आदरच केला. मग तुम्ही हे का विसरत आहात? रावणाला सुद्धा त्याने संधीच दिली. हे का विसरत आहात? प्रेमाने जग जिंकता येतं, तिथे अपशब्द वापरुन आपल्या बापूला का बोल लावत आहात? संयम ठेवा. हेच बापूची शिकवण आहे. ज्यांना बापुबद्द्ल काही माहितच नाही त्यांच्यासोबत भांडण्यात काय अर्थ आहे? उगीच आपला वेळ का घालवत आहात?
|
Princess
| |
| Thursday, April 26, 2007 - 12:15 pm: |
| 
|
नामी, आतापर्यंत वाचलेल्या बापुभक्तांच्या पोस्ट्स मध्ये फक्त तुमचीच भाषा जरा संयत वाटते. त्या मुस्लिम स्त्रीचा पत्ता कदाचित नंतर मिळेल असे गृहित धरुया. अजुनही काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरे देउ शकाल का? १. अनिरुद्ध जोशी देवाचा अवतार आहेत का? ऑप्शन्स्: हो किंवा नाही २. असल्यास कुठल्या देवाचा? ऑप्शन्स्: ३६ कोटी पैकी एकच सांगा ३. ते अवतारी महापुरुष आहेत हे कधी सिद्ध झालेय का? ऑप्शन्स्: हो किंवा नाही अजुनही शंका आहेत पण त्या नंतर विचारेन.
|
Sayonara
| |
| Thursday, April 26, 2007 - 12:20 pm: |
| 
|
छे छे, काय शामत आमची 'बापूभक्त असे का बोलतात?' विचारण्याची. आम्ही मनात काय ते समजून चुकलोच अहोत. बापूसकीड आणि गौरी बाई विचारेंनी आज एक पुडी जास्तच उदी खाऊन घ्यावी. खालची भाषा वापरुन आपली जीभ विटाळल्याबद्दल!!!! अशीच भाषा तुमच्याकडून येऊ देत. तीच अपेक्षा आहे.
|
बपुस्किद, डोंबारी कोण हे तुम्ही दाखवुन दिलेले आहेच. ईतर मायबोलीकरही हे जाणुन चुकले असतील. छान आहे. हे बापुंनी वाचलं तर ते "हे राम" असच म्हणतील!
|
Asami
| |
| Thursday, April 26, 2007 - 12:44 pm: |
| 
|
लिंब्या जांभईच्या संसर्गामधे काहीही magical नाहिये रे. stastically proove झालय कसे ते. link आता handy नाहिये पण मिळाली कि email करतो
|
Aho sakhi bai tumchya peksha punya dyan daan ahmi karto ?Aniruddha upasna trust tarfe Borivali (E)chya sanjay nagar laprosy colony madhe jaun tithlya students ahmi mofat shikvato tumchya bhashet vina mulya mag tumchya peksha jasta dyandanache punya ahmich karto गौरीजी अमेरीकेतून खास बोरीवलीला येतात बरे का...... Aho nandini bai post neet vacha mi post madhe ahmi lihile ahe mi lihile nahi and for u r kind info i didnt born and brought up in US i just came 4 months before. Hyani kodge ,zoppad patti bolele chalte pan ahmi bapu bhaktani ekhada upshabda vaparla ki hyacha gajavaja karaila he sagle tayar astat.Aplya vadalnchi koni tingal tavali karat asel, tyanchya baddal jar chukiche bolat asel ,atishai mehnat karun samajkarya karnarya tyanchya kamabaddal jar te lutat vagere ase bolnar astil tar malach nahi bhartatlya pratek mulila raag ha yenarach ani tyachat jar upshabda nighala tar tyat kahich vait nahi. On top of that i said sorry karan ha mancha mothe pana fakta bapu bhaktach karu shaktat So this is my last scrap Hari om ** Post edited by Moderator **
|
लिंबु, आपण स्वतंत्र चर्चा करु. ही ती जागा नव्हे.
|
Zelam
| |
| Thursday, April 26, 2007 - 1:08 pm: |
| 
|
recently हा BB वाचला. बापुजकिड, गौरी विचारे तुमची भाषा अधिकाधिक hostile का होते आहे? आणि नंदिनी वर personal attack का? तिने तुम्हाला पत्ता विचारला म्हणून? बापुजकिड तुम्हाला तर म्हणे विचारायचे पण नाही अशी भाषा का वापरली म्हणून. वाट्टेल ते बोलून मग रामरक्षेने वाणी शुद्ध करून काय फायदा? हीच का तुमच्या बापूंची शिकवण? केवळ लोक तुमच्या बापूना अवतार मानत नाहीत म्हणून त्याना काहीही बोलायला तुम्ही मोकळे का?
|
Pillu
| |
| Thursday, April 26, 2007 - 1:09 pm: |
| 
|
आडमिन ना मी विनंती करतो की ही बिबि बंद करावी श्रद्दा कोनाची कोठेही असु शकते प्रश्न हा आहे की ज्याच्या विशयी आपण श्रद्धा बाळगतो तो त्या लायकीचा आहेका? पुढ्च्याने मान हलवली की मागचा त्याचेच अनुकरण करतो बापुच्या भक्तांडुन या पेक्शा अपेक्षीत काही नाही. बापुसकीड पेक्षा शिवराळ भाशा आम्हालाही वापरता येतात पण त्यासाठी ही जागा नव्हे.
|
लिंबू, असामी, गूगलमधे "Why is yawning contagious" घालून शोधलं तर खूप लिंक्स आहेत.
|
मला वाटत की पूनम princess ने दिलेल्या format मधे चर्चा करावी. लिंबु, जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे टक लावुन बघितलं जातं आणि त्या व्यक्तीने एकदा आपली नजर पकडली की ती cautious होते. आणि मग वारंवार आपल्याकडे पाहु लागते. कॉलेजात हे धंदे अमाप केले भौ!!! उदी आणि अतिंद्रीय शक्ती यावर आपण मग चर्चा करु. प्रत्यक्ष भेटितच बोलु कसं? अमेय, very good . लिंबुचे post वाचल्यावर मी हेच केले. google कर रे LT . बदाबदा results कोसळतील!
|