|
Ashwini_k
| |
| Wednesday, April 25, 2007 - 11:25 am: |
| 
|
Hari Om Bapuskid, Konihi kitihi chidavale tari emotional houn sanyam sodu nakos (w.r.t. meaning of Bapuskid given by Himscool). Bapu bhaktanni bhavanechya bharat lihilelya shabdancha viparyas karanare, swatahchya matapityancha babtit doosrya koni kadhlelya udgaranchi pratikriya collar dharoon detat (chook nahi, aaplya aai vadilanchya baddal apashabda kadhanaryachi chidach yete). Ani hi matra tyanna dadagiri vatat nahi. Pan kahi asale tarihi aapan sanyam balagoonach uttar dile pahije. Nahi ka ? Hari om.
|
आईवडिलांना (ते तसे करा म्हणत नसले तरी) दैवत मानणे यात गैर काही नाही, ती संस्कृती आहे. जे मोठ्या श्रद्धेने आपल्याला दैवत मानतात, त्या बालकांना स्वार्थासाठी ओरबाडून घेण्याची बुद्धी त्या आईवडिलांकडे असू नये.
|
Naami
| |
| Wednesday, April 25, 2007 - 11:43 am: |
| 
|
अरे वा! प्रकरण पत्त्यांपर्यंत आले तर. काही हरकत नाही मी माझा सुद्धा अनुभव इथे लिहीते आणि हो कोणाला प्रूव्ह करण्यासाठी माझा पत्ता हवा असेल तर त्यांनी जरुर मला मेल करावा. अगदी ज्यांना ज्यांना बापुंचे अनुभव आले प्रत्यक्ष अशा अनेक भक्तांच्या मुखातून मी तुम्हाला ते ऐकवू शकेल. 'मी दिड महिन्याची प्रेग्नंट होते त्यावेळी मला ब्लिडींग होत होते. डाॅक्टरांनी माझी सोनोग्राफी केली तेव्हा निदर्शनास आले की माझ्या गर्भ पिशवीच्या तोंडाशी गाठ आहे. त्यामुळे नाॅर्मल डिलिव्हरी होण्याची शक्यता नव्हती. डाॅक्टरांनी मला प्रिकाॅशन घ्यायला सांगितले आणि औषधे दिली. पण आर्थिक स्थिती ठिक नसल्यामुळे मला ती महागडी औषधं घेणे परवडत नव्हते. त्यामुळे एकही औषधं न घेता मी बापुवर सोडून दिले. आणि कोणतेही प्रिकाॅशन न घेता नियमीतपणे कार्यालयीन आणि घरची सगळी कामे करत होते. सहाव्या महिन्यापासून मला बापूंची उदी फार खावीशी वाटू लागली. ज्या उदीचे बापू भक्त असुनही मला कधीच आकर्षण वाटले नव्हते ती उदी मी सतत खात होते. आठवण येइल तशी. सातव्या महीन्यात पुन्हा माझी सोनोग्राफी करण्यात आली. कोणतेही औषध न घेताही माझ्या गर्भाशयाला असणारी गाठ नाहीशी झाली होती आणि माझे बाळ अगदी व्यवस्थित वाढत होते. माझी ड्यु डेट ७ मार्च होती. डिलीव्हरीच्या आदल्या दिवसापर्यंत मी कामावर जात होते आणि घरची सुद्धा सगळी कामे करत होते. १२ फेब्रुवारीला मी साईचरित्रावरील परिक्षा दिली. १३ फेब्रुवारीला कामावर गेले. १४ फेब्रुवारीला पहाटे ३ वाजता अंगावरुन स्त्राव जाउ लागला. घरी फक्त मी एकटीच होते. माझे मि. मुंबईच्या बाहेर होते. मला समजले की आता कोणत्याही क्षणी डिलीव्हरी होउ शकते. त्याही स्थितीत मी ४ वाजता उथून कपडे धुतले. ५ वाजता बापुंच्या मंदिरातील एक सेवेकरी महिला माझ्याच कम्पाउंड्मधे राहत होति तिला फोन करुन बोलावले. ५ मिनीटातच त्या काकी आल्या. घरातुन निघताना बापुच्या फोटोसमोर उभी राहिले आणि म्हट्लं, बापु आज सगळे नातेवाइक असुनही मला तुझ्याशिवाय कोणीच नाही. तुच माझी आई आहेस आणि तुच वडिलही. डोळ्यात पाणी आणून घरातून निघाले. ज्या क्षणाला प्रत्येक मुलीला आपल्या जवळच्या माणसांची गरज असते अशा क्षणाला माझ्याजवळ फक्त माझा बापू होता. अगदी १०८%. खाली उतरुन आम्ही चालु लागलो बरेच अंतर चालुन गेलो तरी रिक्षा मिळत नव्हती. त्या काकी म्हणाल्या बापु एखादा रिक्षा तरी येउ देत. तितक्यात समोरुन रिक्षा आली. आम्ही बसलो आणि रिक्षात समोरच बापुंच फोतो होत. काकी म्हणाली बघ बापु तुला न्यायला आले. गरोदरपणी मी कोणतीही औषधे घेतली नव्हती, मला जेवणही निट मिळत नव्हते. (पौष्टिक आहार) दुपारि ३-३.३० च्य दरम्यान माझी नाॅर्मल डिलीव्हरी झाली माझा मुलगा सव्वा तीन किलो वजनाचा होता. हा माझा सगळ्यात मोठा अनुभव होता.' यापुढेहि अजुन आहे पण वेळेअभावी देउ शकत नाहि. असे अनेक अनुभव आहेत. पदोपदी माझा बापू त्याच्या अनेक लेकरांना सांभाळत आहे. तुम्हाला सांगून पटणार नाही. हरि आऊं!
|
Princess
| |
| Wednesday, April 25, 2007 - 12:16 pm: |
| 
|
हे रामा, हे कृष्णा वाचव रे बाबा मला... ठरवले होते लिहायचेच नाही. कारण उपयोग होणार नाही हे माहिती आहे. पण आता नामीचे पोस्ट वाचले म्हणुन लिहिते आहे. मी pregnant असताना मला देखील bleeding झाले होते आणि sonography मध्ये नामीला सांगितलेल्या problem पेक्षा मोठा problem मला सांगितला होता. (गर्भाशयावर अनेक गाठी ( multiple ) असणे हा सुद्धा मेडिकली अगदी छोटा issue समजला जातो.) पण सहसा अशा केसेस मध्ये डॉक्टर्स औषध देत नाहीत कारण गर्भाशयाला गाठ असणे किंवा वार ( placenta ) खाली असणे हे problems सातव्या महिन्यात आपोआप बरे होतात (९०%). तसेच माझाही झाला (कुठलीही उदी न खाता हे विशेष ). पण problem detect झाल्यनंतर प्रत्येक डॉक्टरचे कर्तव्य असते पेशंटला कल्पना देणे. म्हणुन मलाही सांगितले होते की जर placenta वर आला नाही तर c-section करावे लागेल. माझी normal deleivery झाली पण मी त्यासाठी कुठल्या बुवा बापुला मानण्या पेक्षा माझ्या डॉक्टरला मानते. डॉक्टरची फक्त degree असुन उपयोग नसतो. डॉक्टरचे काम करणारेच खरे डॉक्टर. नाहीतर कुणी gold medalist असला आणि समाजाला उपयोग नसला तर काय अर्थ त्या डिग्रीला??? नामी, माझ्या या प्रोब्लेम साठी मी मुंबई मधल्या सगळ्या मोठ्या (हो सगळ्या) हॉस्पिटल मध्ये जाऊन आलीये. त्यामुळे असे अनुभव लिहिताना थोडा विचार करा हो. आपण लिहितोय त्याला शास्त्रीय आधार आहे का हे तरी तपासुन घ्या. गर्भाशयाला गरोदर पणात आलेली गाठ उदी खाउन बरी होणे ही माझ्या मते अंधश्रद्धेची परिसीमा आहे.
|
Mandarp
| |
| Wednesday, April 25, 2007 - 12:17 pm: |
| 
|
मित्रहो, एवढे सगळे पोस्ट्स वाचुन मला फक्त अल्बर्ट आईन्स्टाइन चे एक वाक्य नमूद करावेसे वाटते. There are only two ways to live your life. One is as though nothing is a miracle. The other is as though everything is a miracle." --A. Einstein आता ह्यातील कोणता भाग प्रमाण मानायचा हे प्रत्येकानी ठरवावे. मन्दार
|
Sayonara
| |
| Wednesday, April 25, 2007 - 12:24 pm: |
| 
|
BTW , ह्या उदी मुंबईत कुठे मिळतात की त्या घ्यायला बांन्द्र्याला जावं लागेल?
|
सायो, अगं बांद्रा मुंबईतच आहे.. 
|
>>>> BTW , ह्या उदी मुंबईत कुठे मिळतात की त्या घ्यायला बांन्द्र्याला जावं लागेल? गरज नाही कुठे जाण्याची घरच्या घरी उदबत्ती पेटवुन हातात धरुन आवडत्या दैवताचे स्मरण / जप / मन्त्र म्हणत रहावे उदबत्ती पुर्ण जळेस्तोवर! ती पडलेली उदी वापर! पथ्य, बसताना पुर्वेकडे तोन्ड करुन बसावे (जर देवघराचे तोन्ड पश्चिमेकडे नसेल तर किन्वा देवघरच नसेल तर), बसायच्या आधी हात पाय तोन्ड स्वच्छ धुवुन मगच काही आसन घेवुन बसावे, आणि घेतलेल्या मन्त्राचा जप त्या जळत्या उदबत्तीवर लक्ष केन्द्रिन करुन करावा! प्रयोग करुन पहा! कुठलीच देवता आवडत नसेल तर बापुन्चे नाव घेवुन जप केलात तरी चालेल! श्रद्धेने केलेली कोणतीही गोष्ट वाया जात नाही, अन्यथा श्रद्धेने, पण "राम राम" ऐवजी "मरा मरा मरा" असे म्हणणार्या वाल्याचा वाल्मिकी झाला नस्ता! एनीवे....! मी आपला एक फुकटचा सल्ला दिला.... मी कोणत्या बापु बिपुन्कडे जात नाही.... माझ्याकडेच बरेचदा बरेचजण येतात! DDD
|
हे अनुभव मेडीकली कधीच मानले जाणार नाहीत. नामीबाई, अहो निसर्ग आपली कामगिरी चोख बजावतो. त्याला बापु काही करु शकत नाही. आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीची सांगड बापुंशी घालणं हा मनाचा कमकुवतपणा आहे. मला सांगा, तुम्ही बापुंच्या भजनी लागण्या आधी तुमच्या आयुष्यात कधीच काही चांगले घडले नाही का? bapuskid भलतेच सुटलेत. पत्ता शोधुन ठेवा हो. मी विचार करतोय अं. नि. स. ला पण घेउन यायचं. आश्विनि.. Bapu bhaktanni bhavanechya bharat lihilelya shabdancha viparyas karanare, swatahchya matapityancha babtit doosrya koni kadhlelya udgaranchi pratikriya collar dharoon detat (chook nahi, aaplya aai vadilanchya baddal apashabda kadhanaryachi chidach yete). Ani hi matra tyanna dadagiri vatat nahi. ईथे कॉल्र कोणी कोणाची धरलीये??
|
Sayonara
| |
| Wednesday, April 25, 2007 - 1:05 pm: |
| 
|
विनय, मला माहितेय की बांन्द्रा मुंबईत येत. मी वाढलेय तिथेच. आणि हे महान बापू जिथे डेरा टाकतात गुरुवारी ती माझी शाळा आहे. LT , साध्या उदबत्तीची उदी आणि बापूंची उदी ह्यात काहीच फरक नाही? बापूभक्त, ठोका ह्या लिंब्याला. बरं जाऊदेत तो TP . उदीच्या चौकशीचं कारण हे की माझ्या बाबांचं छोटंस ऑपरेशन करावं लागणार आहे. आणि ते खूप घाबरले आहेत मनातून. तर ही उदी खाल्ल्याने कदाचित ऑपरेशन टळू शकेल. नाही कां? इथले सगळे जादुई अनुभव वाचून मी आता भक्त व्हायच्या मार्गावर आहे. हरी ओम.
|
मी पण अजून पत्त्याची वाट बघतेय. साधारण माहिती अशी आहे कि या बाई जोगेश्वरीला राहतात. जरा अजून specify केलत तर बरे होईल. मी पण एक दोन दैनिकाच्या संपादकाशी बोलले आहे. बातमीत दम आहे. देऊन टाका म्हणाले. (मुसलमान बाईने हिंदू माणसाचा फ़ोटो लावणे... क्या बात है..) तर प्लीज तेवढा तो पता द्या... आता द्याच... आव्हान आहे अजून तुम्ही स्विकारलेलं दिसत नाही??? आणि प्लीज मला परत ते शाळेत यायला सांगू नका. काय आहे.. मीडीया दिसलं की सगळेजण आपापले अनुभव (खरे खोटे) सांगत सुटतील... आम्हाला फ़क्त genuine अनुभव हवे आहेत. तरी प्लीज पत्ता द्या.. उद्या सकाळपर्य्नत दिलात तरी चालेल. तवर मी जरा आमच्या "बापुच्या" (शुद्ध मराठीत त्याला "बाप" म्हणतात. ) त्याच्याकडून थोडी माहिती घेते. ठीक आहे ना? पत्ता नीट लिहून ठेवा.
|
Prady
| |
| Wednesday, April 25, 2007 - 2:24 pm: |
| 
|
अगं नंदिनी तुला पत्ते मिळतील की नाही माहीत नाही. पण अनामिकेने आव्हान केलं होतं बापूभक्ताच्या मदती साठी. त्या आव्हानाला अजून प्रतिसाद दिसत नाही. अजून "छप्पन" वेळा लिहीलस तरी पत्ते मिळतील असं वाटत नाही.
|
Anamikaa
| |
| Wednesday, April 25, 2007 - 4:33 pm: |
| 
|
माझी पोस्ट अजुन बापुभक्तांच्या दृष्टिस पडली नाही बहुतेक. आणि बापुंपर्यंत देखिल भक्ताची आर्त हाक पोहोचलेली दिसत नाहि अजुन........................................! सगळ्यात महत्वाचे त्या पिडित व्यक्तीला आर्थिक मदतिची जास्त गरज आहे. आणि जिथे तथाकथित अवतारी बापु भक्तांकडुनच उकळुन स्वतःची तुमडी भरतायत ते कशाला कुणा भक्ताच्या मदतिसाठी स्वतःच्या खिशाला तोशिस पडु देणार आहेत? असो आजच समजले कि त्या व्यक्तिच्या भावजयीच्या आईने मदतिचा हात पुढे केला आहे(ह्याच भावजयीचा वारंवार पाणऊतारा पिडित व्यक्तिने केलेला आहे तसेच तिच्या आईला म्हातारी थेरडी अश्या प्रकारचे हिन शब्द वापरुन संभावना केली आहे) आणि उद्या पासुन तिची radiation therapy चालु होइल. असो त्या माऊलीने जे केले यालाच निष्काम कर्म म्हणत असतिल ना? बापुंपेक्षा जिने मदतिचा हात पुढे केलाय तिचे आभार मानुन कृतज्ञता व्यक्त करणे जास्त योग्य नाहि का? "अनामिका" ** Post edited by Moderator **
|
Hari om Nandini, Mi kai mante udya 26 April Guruvar ahe manje amachya bapuncha vaar manje ata wrong meaning kadu naka mala ase manaiche ahe ki udya pan amche bapu bandra la yetil amchya kadaun upasna karvun ghenar . Mag tumhi sagle virodhak neel sahebana gheun ani media madle kai te dainik vagere saglyana gheun udyach bandra la ya . Akha Dainik apura padel evde anubhav eikala yetil tyahi peksha imp manje sansthe kutche kutche project handle karte ani udi 300 rs vikata ki free viktat he pan kalel ho tumala . Ani neel saheb tumhi pan tumchya hierachy madle lok je tumala thode bahut athavt astil te pan astilach ki ho tithe .Manje friday cha dainik akhay amchya sansthe var asel vow jithe tithe fakta hari om cha gajar asel Hari Om Mana Hari om Mana anande bharpur kashala jata dur amche bandra pandharpur . So My dera all bapu bhakt udyacha guruvar ek vegla guruvar asel aplya saglyansathi karan udya Nandini madam,Neel ,Bharmar ,ashe uchya shrestha bhakta bandra la yenar ahet along with media . Swapna mala vrutant neet sang bcaz i stay in US or otherwise mi nandini chya mobile varch ph karin mante kase vatle he vicharaila . Neel tumhi nahi gelat tar amchya sanstha paise kuthe kharch karte ka udavte he pan kalel na ho?so u must go tomorrow with nandini. Kaal kare so parso aur parso kare vo kabhi nahi .ka ho nandini madam barobar na?Mi kai mante tumhi evdya hadachya reporter ahat tar jach udya bandra la along with ur gr8 bhakt neel ,bharmar .Mahesh bahutek japan varun india la pohchla asel mag tyala pan ghya ani nasel tar tyala airport varun pick kara kadachit to india la pochaichaya margavar asel;tyane post kele hote ki india la yet ahe manun mante ho mi . Hari om
|
Mahesh
| |
| Wednesday, April 25, 2007 - 5:37 pm: |
| 
|
हे लोक खरोखर सुटले आहेत. या असल्या बिनतर्काच्या गोष्टी ऐकण्या ऐकवण्यापेक्षा जरा स्वत्:वर विश्वास ठेवा. मला तर शंका आहे की जोशी आणी मंडळी mass hypnotism साठी काहीतरी जबरदस्त formula वापरत असावेत. चांगली सामाजिक कामे करणे, लोकांना भक्तीसाठी उद्युक्त करणे (स्वत्:च्या नाही तर खर्या देवाच्या) येथपर्यंत ठीक आहे. ईकडे सर्वांचा आक्षेप हाच आहे की त्यांनी आणीकिंवा तुम्ही त्यांना देव बिव मानू नये. आता तुम्ही म्हणालच की का मानू नये. कारणे याआधी पण लिहिली गेली आहेत. या मंडळींची काय साधना आहे, काय आध्यात्मिक बैठक आहे, काय अभ्यास आहे ते कळेल का ? आणी ते सुद्धा आधीपासूनचा, नंतरचा नाही. उगाच कोणीही उठून पुर्वसुरींबरोबर तुलना करण्यात काय हशील आहे ? लॉर्ड काय, सद्गुरू काय काहीही काय ? पुर्वीच्या संतमंडळींच्या कथांपैकी मनाला येतील त्या घेऊन या आधुनिक बाबाला चिकटवत आहेत. आध्यात्मिक शब्दसंग्रह पण कसला छान छान तयार करून ठेवला आहे. विश्वास आणी श्रद्धा असणे वेगळे, अंधश्रद्धा असणे वेगळे. परत परत दाभोळकर, बांद्रा, ई. सांगू नका, काहीतरी genuine आणी पटेल असे सांगा. नंतर परत वेळ मिळेल तसे लिहिनच.
|
Storvi
| |
| Wednesday, April 25, 2007 - 5:47 pm: |
| 
|
इथले सगळे अनुभव वाचुन मला आता माझा अनुभव लिहायची हुक्की आवरत नाहीये... तर काय झाले ना की मी तान्ही होते, (१२ दिवसांची) तेंव्हा माझा एक डोळा लहान झाला आणि त्यातुन पाणी वगैरे येत होते... आणि infection झाले.. मग Dr. म्हणाले की operation करावे लागेल. मातोश्रींना एवढ्या तान्ह्या मुलीचे operation करावेसे वाटले नाही. दुसर्या दिवशी date दिली होती, पण अदल्या दिवशी एक साई बाबांच्य भक्त बाई आई ला भेटल्या त्या तेंव्हा अश्याच चमत्कार करतात म्हणुन प्रसिद्ध होत्या, त्यांनी म्हणे माझ्या डोळ्यावरुन हात फ़िरवला आणि म्हणाल्या काही गरज नाही पडणार operation ची. दुसर्या दिवशी माझा डोळा normal झाला. आता माझे आई-वडील काही बुवा-बाजी माननारे नसले तरी आआंखो-देखा ला विश्वास ठेवावाच लागतो ना. तर त्यांनी त्यांच्या मती प्रमाणे योग्य ते केले. त्यांना नक्की काय प्रकार झाला माहीत नव्हते त्या मुळे त्यांनी फ़ार थोड्या लोकांना हा प्रकार सांगितला... fast forward 30 years माझी मुलगी साधारण १२ दिवसांची असतांना तिला exactly हेच झाले. फ़क्त Dr's नी मला सांगितले की हा प्रोब्लेम blocked tearduct मुळे होतो, आणि तो आपोआप बरा होतो, पुर्वी ह्या साठी operation करत असत आता आम्हाला कळुन चुकले आहे की त्याची काही गरज नसते, त्यामुळे आईचे दुध डोळ्यावर लावा, ते उत्तम antibiotic असते, आणि वाट पहा... तर असेच साधारण महिना भर चालल्यानंन्तर (शेवटी मीही आईच आहे, त्यामूळे दर काही दिवसांनी clinic मध्ये जात होते, अजुन का नही बरं झालं विचारायला) Dr कडुन आल्या नन्तर अचानक तिचा डोळा normal झाला तो कायमचाच. म्हणजे अक्षर्षः घरी येताना गाडीत... आणि सुदैवाने हाही चमत्कार पहायला मातोश्री समोरच होत्या.. काय ती देवाची कृपा! 
|
गौरीताई, ठीक आहे पण मला आधी त्या मुसलमान बाईचा पत्ता द्या.. मग मी बान्द्रा काय कुठेही जाईन. मी तुम्हाला challenge दिलेले आहे (आव्हान समजलं नाही बहुतेक) मला फ़क्त त्या मुसलमान बाईचा पत्ता द्या... बापुजकीड, I repeat, I have given you a challenge about that Muslim lady experience. Either you provide me the address of that lady or accept that you have bluffed. ** Post edited by Moderator **
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|