Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 24, 2007

Hitguj » Religion » व्यक्ती » Annirudha Bapu » Archive through April 24, 2007 « Previous Next »

Nandini2911
Tuesday, April 24, 2007 - 12:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीपा.. या आपलेही स्वागत आहे इथे. ते वरचे अनुभव वाचून सांगितलं की फ़ोटो वाटा तर म्हणे आम्हाला हॉस्पिटल स्वच्छ करण्यात स्वारस्य आहे. :-) आणि समाजसेवेचा विषय काढला की म्हणे बापू अवतार आहेत.

बरे.. त्या लहान मुलीच्या अनुभवाविषयी.. मी शाळेत असताना माझा डान्स परफ़ॉर्मन्स होता. त्यादिवशी मला एकदम traditional dress मधे बघूउन माझा लहान भाऊ (वय वर्षे साडेचार) सगळ्या गल्लीभर सांगत गेला की माझी दिदी आज दुर्गामाता आहे म्हणून :-) मुसलमानाची गल्ली असून देखील सगळे मला बघायला आले होते. की काय भानगड आहे म्हणून :-)

तो अनुभव वाचताना मला माझा भाऊच आठवायला लागला.


Bhramar_vihar
Tuesday, April 24, 2007 - 12:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी, नीलच्या post मधी "ते" quote माझ्याकडुन वाचले गेले नाही, क्षमस्व!

आणी आपल्या आई-बापाबद्दल कुणी अपशब्द काढला तर वाइटतला वाइट माणूसही आपला संयम घालवतो..

मित्रा अपशब्द?? कुणि वापरले??? दाखवुन दे.. मी त्याचा निषेध करतो!

तुम्हाला राग आला कारण तुम्हाला बापू आवडत नाहीत... बापुंना "अवतार" म्हनुन portray केलं जातय हे आवडत नाही.

आणि हो... हॉस्पिटल मध्ये फ़ोटो वाटण्याऐवजी आम्ही त्या हॉस्पिटल्सची स्वच्छता करण्यात जास्त स्वारस्य मानतो... दर रविवारी अशा हॉस्पिटल्सची आणि शाळांची स्वच्छता करण्याचे काम बापूभक्त करतात... या बद्दल आपले काय मत आहे?

अत्यंत स्तुत्य उपक्रम! तुमचे कौतुकच वाटते मला. पण... bapuskid ने लिहिलेला चमत्कार वाचुन काय म्हणावे???? हा विचार भक्तांकडुन का केला जात नाही की ह्यामुळे बापु हा टीकेचा विषय होउ शकतात. दुसरे असे की ज्या बापुभक्त इस्पितळत दाखल झाल्या होत्या त्यांना का नाही फोटोने गुण आला? चमत्कार लिहुन बापुंना "देव" बनवु नका हेच सांगणं आहे.

'तुम्हा सर्वाना एकच प्रश्न विचारला होता की बापु साईबाबाचे, विष्णुचे अवतार आहेत हे खरं आहे का?'
मी आधीहि म्हटले... बापुंनी आजवर स्वत्: कधीही असे म्हटलेले नाही...

स्वप्नाजी, तुम्ही ईथे तुम्ही " मी बापुंना साईबाबांचे, विष्णुचे अवतार मानत नाही" असे statement करु शकता का?




Nandini2911
Tuesday, April 24, 2007 - 12:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुळात ज्या व्यक्तीला गुण आला त्या व्यक्तीवर कुठलेही औषधोपचार केले नव्हते का?
मला आश्चर्य त्या मुसलमान बाईचे वाटते... काफ़िर पे यकीन.. लाहौल विलाकुवत.. कुठे दुसरीकडे समजले ना तर जाईल कामातून..


Sayonara
Tuesday, April 24, 2007 - 12:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो हॉस्पिटलचा अनुभव वाचून मलाही गदगदून, गहिवरुन आलंय. नेटवरुन एखादा फोटो प्रिंट करुन घरात लावावा म्हणते.
भ्रमर, नंदिनी, तुमच्या चिकाटीचे कौतुक करावे तेवढे थोडेच. आणि ते ही त्यांच्यासमोर ज्यांनी आपली सद्सद्विवेकबुद्धी थोर समाजसेवक, अनेक अवतारी बापूंच्या चरणी वाहिली आहे. लगे रहो!!!!


Swapnanaik
Tuesday, April 24, 2007 - 12:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो सायोनारा... सगळ्यांच्या चिकाटीचे इतके कौतुक केलेत... पण या इथे त्याचा काही उपयोग आहे का?
आणि भ्रमर... बापु आमच्यासाठी देव आहे आणि राहील... त्यांना अवतार मानण्याने किंवा न मानण्याने आमच्यात श्रद्धेत तरी काही फ़रक पडणार नाही...
पण मला वाटते तुम्हाला खुपच फ़रक पडतो आहे.. मग शोधा की सत्य... नील आहे सोबतीला.... आमच्यासारख्या अडाणी... कुणालाही देव अवतार मानण्यार्‍या लोकांबरोबर वेळ कशाला वाया घालवायचा ना?


Nandini2911
Tuesday, April 24, 2007 - 12:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

The photo was framed and was placed with other gods of muslims.

<<<अतिरंजितपणाचीही सीमा असते. मुसलमानाच्या देवाचे फ़ोटो????
बाप रे... तुम्हाला काबाचे फ़ोटो म्हणायचे आहे का? आणि कुठलाही जगातला मुसलमान फ़ोटोच्या समोर नाही तर मक्केच्या दिशेलाच तोंड करून नमाझ पढतो. तुम्ही जी संध्याकाळची नमाझ म्हणताय ती मगरीबचा नमाझ असते दिवसातली सगळ्यात मोठी नमाझ.. त्यावेळेला घरचा मेन दरवाजा बंद असतो... आणि नमाझ ही कधीच हॉलमधे पढली जात नाही...


Nandini2911
Tuesday, April 24, 2007 - 12:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो सायोनारा... सगळ्यांच्या चिकाटीचे इतके कौतुक केलेत... पण या इथे त्याचा काही उपयोग आहे का?
>>>>
एकदम आवडेश...

Sanghamitra
Tuesday, April 24, 2007 - 12:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी फार प्रामाणिक वाटतेय तुझे लिखाण. खरंतर तुझ्या पोस्ट्स वाचून मला वाटले की तू खरेच धार्मिक आहेस. त्यामुळे त्या Time Frame मधे तू ज्या कुठल्या देव किंवा गुरूसमोर आली असतीस त्याला मानायला सुरूवात केली असतीस.
अनुभव वगैरे भाग सोडला तर बाकीचे छान लिहीलेस.
अनुभवाचे म्हणाल तर नंदिनीने अगदी समर्पक उदाहरण दिलेय तिच्या लहान भावाचे. एकदा मनात बसले की प्रत्येक गोष्ट आपण त्याच्याशीच रिलेट करत रहातो.
एकटेपणाची आणि अंधाराची भिती वाटायला लागली की सावल्यांचीही भुते होतात. कारण ती आपल्या मनातच असतात. तसेच एकदा हे सुरू झाले की मग घडेल त्या गोष्टीला असा अर्थ लावायाची सवयच लागते माणसाला.
आमच्या ओळखीच्या एका मुलाचा बाईकवरून पडून पाय फ्रॅक्चर झाला.
नवीन लग्न झालेली बायको म्हणाली तो गणपतीचा फोटो तुम्ही पश्चिमेला लावलाय ना म्हणून. (सासूने लावला असेल.)
आई म्हणतेय अमावस्या ना आज. (म्हणजे दर अमावस्येला सुट्टी घेऊन घरात बसावे.)
शेजारीण म्हणतेय, काळी चप्पल कशाला वापरता?
आत्येबहीण म्हणतेय फ़ेंग शुईच्या घंटामधे सहा(की असाच कुठला तरी तथाकथित अशुभ नंबर) का लावल्यात? (हरे राम. आपले कमी पडतेय म्हणून अगदी हिमालयापल्याड जाऊन अंधश्रद्धा घेऊन येतात लोक.)
मुलगा म्हणाला स्पीडब्रेकर दिसला नाही त्यामुळे ऐनवेळी ब्रेक दाबून गाडी स्किड झाली.
ज्याला हवे ते त्याने घ्यावे. :-)
असो बाकी अनुभववाचन मनोरंजक आहे. :-)


Saavat
Tuesday, April 24, 2007 - 2:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आश्विनी,
मलापण, तुमच्या मागच्या दोन्हीही पोष्ट आवडल्या!

Sayonara
Tuesday, April 24, 2007 - 3:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वप्ना नाईक, काही उपयोग नाही हे माहित असूनही त्यांनी चिकाटी सोडली नाहीये म्हणून तर कौतुक!!!

Manus80
Tuesday, April 24, 2007 - 3:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Joshibhaktas,

I will suggest you to please keep control of your language. I hope tumche Guru tumhala aashya bhashet pravachan nakkich det naahit. "Yeoon de 56 lok, etc.....". (Me tyanche ek seminar aikle aahe so I can say that confidently.)

SWAPNAJI, tumhi swathala adani samajata na mag aamchya sarkhya hushaar lokache aika aani jara sarasaar vichar karun bagha manje tumhala kalel. Aani aase samja hi aamchi additional samajseva tumhala yogya marg dakhavayachi.

Tumhi lok tyana kasale Avtaar nahi na manat, mag jagala tase naka dhakhavoo na. Ha clearly publicity stunt vatato to attract more people. Karan nustya "Anniruddha" navavar konihi yenar nahi pan te vishnu / saibaba yanche avtaar bolale ki nakki lok yetil. Mag "Bapucha" parat mahnel aamchi sankhya mothi mahnoon.

Mahesh
Tuesday, April 24, 2007 - 4:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हरे राम, ही चर्चा फारच वेगवान होत चालली आहे. आणी मला सविस्तर लिहायला वेळ मिळत नाहीये. आत्ता एका दमात २ ते ३ archives वाचून काढले. धन्य आहे रे या लोकांची.
नंदीनी, भ्रमर कृपया लिहिणे सोडु नका. मी पण लवकरच येईन लिहायला.
नेमका पुढचे २ आठवडे देशात चाललो आहे. त्यानंतरच जमेल पण अखंड वाचतो आहे.


Anamikaa
Tuesday, April 24, 2007 - 4:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वप्नाजी,बापुंचे बाळ,अश्विनि!
मी गेले दोन दिवस वाट बघते आहे कि तुम्हा बापुभक्तांपैकी कुणीतरी मला इपत्र लिहील? पण माझी आशा फ़ोल ठरलि(तशी ती ठरणारच होती)
त्या बिचार्‍या तुमच्याच सारख्या एका संकटात असलेल्या बापुभक्ताची माहिति घेण्यासाठी? पण अजुनतरी तुमच्यापैकी कुणीही तशी तसदि घेतल्याचे दिसत नाही. अर्थात तिला आर्थिक मदतिचि गरज आहे म्हंटल्यावर तुम्हा बापुभक्तांपैकी किंवा स्वतः बापु देखिल पुढे येणार नाहित याची मला पुर्ण खात्रि आहे.

बापुंचे बाळ
मी ज्या व्यक्ति संदर्भात इथे नमुद केले होते तिच्या घरात जागोजागी बापुंचे फोटो लावले आहेत तसेच त्या फोटोंची पुजा आणि जे काही इतर सोपस्कार करावे लागतात ते देखिल नित्यनेमाने चालु आहेतच,पण अजुनही त्या व्यक्तिच्या प्रकृतीत काहीही सकारात्मक फ़रक पडला नसुन दिवसेंदिवस तिची प्रकृती खालावत चालली आहे.
आणि आता तिला लवकरात लवकर जर उपचार मिळाले नाहित तर तिच्या जिवावर देखिल बेतू शकते तसेच तिला १२ वर्षाचा एक मुलगा आहे. उद्या जर त्या व्यक्तिचे काहि बरेवाईट झाले तर त्या बिचार्‍या लहान मुलाच्या डोक्यावरुन आईचे छत्र हरवेल.
आता जर त्या आजाराने ग्रासलेल्या व्यक्तिची हाक तुमच्या अवतारी बापुं पर्यंत पोहोचत नसेल तर तर तुम्ही माध्यम होण्याचे पवित्र कार्य करुच शकता नाही का? तेंव्हा माणुसकीच्या नात्याने का होईना पण त्या व्यक्तिला मदत करुन तुम्ही आणि तुमचे बापु देखिल थोडेफ़ार पुण्य कमवु शकाल..............
हे सगळे लिहिण्याचा प्रयास एव्हढ्याच साठी की जर तुमच्या अवतारी बापुंचे फ़क्त फोटोच जवळ बाळगुन माणसे बरी होणार असतिल.तर मग या देशातिल सगळी हॉस्पिटल बंद करुन त्याजागी बापुंच्या फोटोंचे छापखाने चालु करायची विनंति शासनाला करायला हवी..............
या पृथ्वीवर जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला प्राक्तन चुकले नाही. आणि आपल्या चांगल्या वाईट कर्मांचा लेखाजोखा इथेच चुकता करुन जायचा आहे. आपले कर्म चांगले असेल तर अश्या बापुंच्या भजनी लागायची गरज एखाद्या सारासार बुद्धि असलेल्या विवेकी माणसाला तरी भासत नाही..............आणि हो स्वप्नाजी उगिच तुमच्या अवतारी बापुंना त्या थोर विभुतिंच्या पंक्तीत नेवुन बसवायचा व्रुथा प्रयत्न करु नका.उगीचच शालजोडीतले आहेर मिळतिल तुम्हांला आम्हा मायबोलीकरांकडुन.तुम्ही तुमच्या बापुंचे महत्व कितिहि वाढवण्याचा प्रयत्न केला तरि तो किमान इथे या मायबोलीवर तरी हाणुन पाडण्यात येइल हे ध्यानात ठेवा!कारण इथे वावरणारे सगळे मायबोलीकर सुज्ञ आणि सारासार विवेकबुद्धी जागृत ठेवुन लिखाण करणारे आहेत.
तुमच्या बापुंच्या असण्याला इथे लिखाण करणार्‍या कुणाचाच विरोध नाहि.फ़क्त स्वतःला अमुक एका देवाचा अवतार मानण्याला आणि म्हणवुन घेण्याला सर्वांचा आक्षेप आहे आणि राहील. कारण ही गोष्ट आमच्या श्रद्धेशी निगडित आहे आणि आमच्या श्रद्धेशी खेळण्याचा प्रयत्न कुणिहि करु नये. ................

मी तुम्हा बापुभक्तांना इथे उघड उघड आव्हान देते कि जर खरच तुम्ही आणि तुमचे अवतारी बापु इतके प्रामाणिक असाल आणि तुमचि संस्था जर तथाकथित समाजसेवा करत असेल तर त्या बापु भक्ताला मदत करुन दाखवाच. त्या भक्ताच्या उपचारासाठी किमान ३ एक लाखांचा खर्च अपेक्षित आहे. आकडा बघुनच तुमच्यापैकी कुणी खिशात हात घालणार नाही याची पुर्ण कल्पना आहे.................. कारण स्वतचे दिर हॉस्पीटलमधे अत्यावस्थ असताना त्यांच्याच घरी जावुन जेवणावर आडवा हात मारणारे. आणि हॉस्पीटलमधे पैसे खरच करावे लागु नये म्हणुन पाकिट आणावयास विसरले असे सांगणारे बापुभक्त माझ्या माहितित आहेत. हा अनुभव माझा स्वतःचा आहे. माझे वडिल हॉस्पीटल मधे कोमात असताना माझ्या एका बापुभक्त असलेल्या नातेवाईकास कळवण्यात आले असता त्याने सांगितले कि नक्की कोमात आहेत की गेलेत ते मला सांगा नाहीतर माझी खेप फ़ुकट जाईल.
असली संवेदनाशुन्य माणसेच फ़क्त अवतारी बापुंचे भक्त असु शकतात या बद्दल मला मुळीच शंका नाहि! कारण दाभोळकरांच्या पत्नीचे निधन झाल्यावर देखिल स्वतच्या स्वार्थासाठि हे सत्य लोकांपासुन लपविण्याचा आटोकाट प्रयत्न करणारी व्यक्ती लोकांना काय उपदेश करणार म्हणा? एखाद्या व्यक्तिच्या मृत्युचे भांडवल करुन स्वतच्या स्वार्थाची पोळी भाजणारे काय कुणाला मार्ग दाखवणार?
१००० रुपयाचे पास घेवुन तुमच्या बापुंचे प्रवचनाला हजेरी लावुन देखिल जर एखाद्या माणसाच्या वर्तनात,विचारसरणीत सकारात्मक फ़रक पडत नसेल तर काय करायचे आहे तुमच्या बापुंचे देवपण? पण म्हणतात ना "आडात नाहि तर पोहोर्‍यात कुठुन येणार?" .मुळात तुमच्या बापुंचे व्यक्तिगत आयुष्यातिल वागणे आणि भक्तांसमोरिल वागणे किति विसंगत आहे हे निल यांच्या पोस्ट वरुन सिद्ध झाले आहेच. त्यामुळे त्यांच्या प्रवचनांचा किती प्रभाव पडत असेल? त्याचा आजमास आम्ही लावु शकतोच.


"अनामिका"


Disha013
Tuesday, April 24, 2007 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

LOL ,आता बापुभक्तच confused आहेत.... अवतार नक्की कशाचा? साईबाबा,विष्णु की जीजस?
स्वप्नाजी,तुम्ही मागील लिंकमधील बापुंचे फोटो बघितलेत का हो?

bravo नन्दिनी आणि भ्रमर!
पण डोळ्यांवरची झापडे काढली तरच दिसेल या ना जगाला.
नंदिनी, दुर्गामाता :-)

बापुजकिड,भन्नाट अनुभव लिहिलेत!


Yogindra
Tuesday, April 24, 2007 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sorry about not using devanagri. Have been following this BB for a while.

I just had to make a comment based on the statements made by the pro and anti bapu cohorts here. I feel that there is a hughe gap in perception of reality and its quite evident by the writings of the two groups who have expressed there opinion.

Perception of reality has little to do with intelligence per se or educational status but rather to do with upbringing and the type of environment one experienced when she / he grew up.

I believe unfortunately in our beloved nation one loses self confidence very early in life as the system never supports him unless his family is well to do. Thus you have a large chunk of our population that has lost trust in the system to take care of them and will look for confidence boosting mechanisms and seek supernatural explainations for all good that happens to them. I believe Bapu is one of many such mechanisms that exists in our country. If people feel soothed by his presence in their life I say let it be. However if his presence or propoganda hurts or decieves the common man I believe that the detractors have a point.
I made the point about the systems because if you look at developed western nations or even better the scandinavians you may appreciate the point I am trying to bring home. In that, in these countries the systems are so well developed that the ordinary man on average does not feel the need of confidence boosters in the name of religion.
Sorry about my rant but I had to express my self. Thanks for your attention and patience.It is deeply appreciated.


Neel_hs
Tuesday, April 24, 2007 - 5:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनामीका,उत्त्तम ! !I will post some more eye opener posts.I am a little busy this week,will join you guys soon..
Bhramar,nandini, good work!Dont feel i went away in middle,just a little busy.Will join you guys soon.


Neelu_n
Tuesday, April 24, 2007 - 5:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>बापुंचे बाळ
अनामिका LOL
तर बापुंचे बाळ तुमचे अनुभव वाचुन मलाही अगदी गदगदुन आलं.
दिशाजी तुम्ही म्हणताय ते खरय हे भक्तच गोंधळलेले आहेत. एक म्हणतोय ते देवाचे अवतार आहेत. एक म्हणतो ते देवाचे अवतार नाहीत. आधी एक काय ठरवा मग काय ती चर्चा करा.
अनामिका चांगले लिहलयस. एक कुतुहुल म्हणुन विचारते तु म्हणतेयस ती व्यक्ती जर एवढी बापु भक्त असेल तर बापुंच्या कानापर्यंत ही बातमी कुठल्या भक्ताने घातली नाही का?
बाकी नंदिनी, भ्रमर अगदी योग्य अचुक लिहताय. लगे रहो.
सायनोरा तीर मारलात खरा पण...


Deepad
Tuesday, April 24, 2007 - 6:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय साच,
अत्र्यांच्या त्या गोष्टीचा अगदी सेम टू सेम संबंध कदाचित नसेलही पण माझ्या बोलण्याचा अर्थ समजणार्यांना समजला आहे. आत्तापर्यन्तचे सगळे वाचून एकच गोष्ट सिद्ध होते की विरोधकांच्या एकाही शंकेचे बापू समर्थकांना धडपणे निरसन करता आले नाही. पण आम्हीच कसे खरे हे मात्रं जोडून तोडून सांगता. तूमची कमाल वाट्ते खरी. गुड!


Sayonara
Tuesday, April 24, 2007 - 6:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापू समर्थक खरंतर स्वतलाच पटवून देताहेत की ते कसे खरे आणि त्यांचे बापू कसे महान. बाकीच्यांच सोडाच!!!! सारखं तेच तेच म्हटल्याने विश्वास बसायला लागतो.

Mansmi18
Tuesday, April 24, 2007 - 6:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रथम मी स्पष्ट करु इछ्छितो कि मी बापुन्चा भक्त नाही कि विरोधकही नाही आणि मला दोन्ही बाजुन्च्या प्रामणिक पणा बद्दल जराही शन्का नाही. पण काही प्रश्न विचारवेसे वाटतात.

१. सद्गुरु हे त्यान्च्या शिष्याना ब्रम्हा, विष्णु, महेश वाटतात हे पुढील श्लोकात म्हटलेले आहे.
"गुरुर्ब्रम्हा, गुरुर्विश्णु, गुरुर्देवो महेश्वर्:
गुरुर्साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नम:"
म्हणुन जर बापुशिष्याना ते विश्णुचे अवतार वाटले तर त्यात वावगे काय? त्याना तसे मानणे चुकिचे आहे हे त्याना सान्गणारे आपण कोण?

२. जर नील यान्च्याकडे काही पुरावे असतील तर ते व्रुत्तपत्र किन्वा टीवी वाहिन्यान्कडे का गेले नाहीत?(तेहेलका वगैरे मन्डळी अतिशय आवडीने स्टिन्ग मधे सहभागी झाली असती आणि त्यानी बापुन्चा खोटेपणा किन्वा गैरव्यवहार उघड पाडला असता.) जर आपले पोलिस शन्कराचार्याना अटक करु शकतात तर बापुना अटक करायला कितिसा वेळ लागेल?


३. इकडे जी मन्डळी फोटो, लोकेट्स, मुर्ती वगैरेच्या विरोधात लिहित आहेत ती मन्डळी..श्री स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाराज यान्च्या मुर्ती, लोकेट्स, स्टीकर्स, तसेच शिर्डी ला असण्यार्या अभिशेकाच्या पावत्या याबद्द्ल लिहितील का? त्याला तुमचा विरोध नाही का? जर नसेल तर तो का?(जर तो असेल तर मला त्यान्च्या बोर्ड्स वर तशी काही पोस्ट्स दिसली नाही)

जर आरोपाना पुराव्याची जोड नसेल तर ती केवळ चिखल्फ़ेक ठरते असे मला वाटते. नील यानी येथे पुरावे मान्डले तर ते पाहायला आम्हाला अतिशय आवडेल.

धन्यवाद.







चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators