Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 21, 2007

Hitguj » Religion » व्यक्ती » Annirudha Bapu » Archive through April 21, 2007 « Previous Next »

Sanghamitra
Friday, April 20, 2007 - 11:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> तुम्ही त्याना विष्णुचा अवतार कशाच्या जोरावर मानता?
अगं ते बदलून आता साईबाबा झालंय ना.
आज मी माझ्या मैत्रिणीकडून ऐकले की डॉक्टर जोशींच्या भक्तांना झालेल्या साक्षात्काराचे एक जाड पुस्तक आहे. तिच्या कोणीतरी नातेवाईक बाईंनी तिला दिलेले वाचायला. त्यात एक अनुभव दिलाय (म्हणजे त्यात बरेच आहेत पण तिने एकच वाचला :-) )
एकदा एक भक्त परिवार वसईहून बापूंच्या दर्शनाला निघाला बांद्र्याला. त्यावेळी त्या बाईने गॅसवर कुकर ठेवला होता तो बंद करायला विसरली. रात्री अकराला ते लोक घरी परत आले तेंव्हा गॅस चालू होता आणि काहीही दुर्घटना घडली नव्हती. भातही अगदी व्यवस्थित शिजला होता. :-)
बापुंच्या इथल्या भक्तांना हे पुस्तक माहितिय का?
शिवाय तिने मला हेही सांगितले की एक त्यांची अंगार्‍याची (कि उदीची) पुडी ३०० रुपयांना विकली जाते. तर हे पण खरे आहे का?
एक सहज जाणवले म्हणून,
गाडगेबाबांसारख्या समाजसुधारक संताचे किती अनुयायी आहेत आज? पण कुणी कीर्तन प्रवचन करतेय म्हटले की लाखो लोक गोळा होतात. :-(


Swapnanaik
Friday, April 20, 2007 - 12:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भ्रमर साहेब,
या पूर्वी तुम्हीच लोकांनी भक्तांना आलेल्या अनुभवांची खिल्ली उडवली... कुठच्याही संकटात जशी तुम्ही देवाला हाक मारता तशी आम्ही बापुंना हाक मारतो. अगदी... देवा बस मिळूदे.... ट्रेन मिळूदे.... असंही आपण बोलतोच ना? आणि खरंच बस वेळेत मिळाली तर आपण असं म्हणतो ना आज खरंच देव पावला.... आता मला सांगा कोणी असंही म्हणेल... त्या दिवशी रस्ता मोकळा होता म्हणून बस वेळेत आली.. पण त्या दिवशी ज्या माणसाला कुठेतरी वेळेत पोहोचायचं होतं त्याच्यासाठी ती देवाची कृपाच होती...
ज्याला याची खिल्ली उडवायची असेल तो अनेक कारणं देउन ते करू शकतो... आणि ते करताना आपण कोणाच्या भावना दुखवतो आहोत याचेही भान त्यांना राहात नाही... आणि हेच नेमके या 'BB' वर होते आहे...
जर आम्ही असे मानतो की आमची प्रत्येक लहान सहान गोष्ट बापूंच्या कृपेने होते त्यात अजुन पुरावा काय देऊ?
तरीही मी माझा एक स्वत्:चा अनुभव सांगते.... ज्यांना यालाही अंधश्रद्धा म्हणायचे असेल तर ते म्हणू शकतात....
३ वर्षांपुर्वी माझे आजोबा अमच्या गावी वारले.. आम्हाला मुंबईला कळले तेव्हा खुप रात्र झाली होती. माझे आई-बाबा, काका-काकु रात्रीच निघाले...ऑफ़ीस मुळे मला जाणं शक्य नव्हतं. ... आमच्या घरी सर्वंच बापुंना खुप मानतात... तेव्हा गावी जातानाही आईचे सतत नामस्मरण चालू होते... अचानक घाटात ड्रायव्हरचा डोळा लागला आणि त्याचा गाडीवरचा कंट्रोल सुटला... त्याचवेळी समोरून एक एस.टी. आणि मागुन एक ट्रक येत होता... गाडीत सर्वांनी फ़क्त बापुंना हाक मारली आणि आमची गाडी दोन्ही गाड्यांच्या मध्ये आडवी होउन थांबली. दोन्ही बस आणि ट्रक आमच्या गाडीवर आदळले.. गाडीच्या काचांचा चुरडा झाला... बस नादुरुस्त झाली... तरीही गाडीतल्या कोणाला साधं खरचटलंही नाही... आणि गाडी बंद सुद्धा पडली नाही...
आता यालापण कदाचित आपल्यासारखी सुज्ञ मंडळी 'यात बापुंच काय?' असं म्हणतील... पण मी याला श्रद्धा म्हणिन... जशी श्रद्धा तसं फ़ळ...


Swapnanaik
Friday, April 20, 2007 - 12:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदीनिजी,
मी तुमच्या पत्रकारीतेचा उल्लेख इतक्यासाठीच करत आले, की मला असे वाटते की, हे लोकजागृतीचे एक प्रभावी माध्यम आहे... आणि याचा उपयोग खुपच चांगल्याप्रकारे करता येतो..त्यामुळे फ़क्त इथे लिहिल्याने आणि फ़क्त आम्हाला प्रश्न्न विचारुन तुम्हाला जितकी माहीती अपेक्षित आहे कदाचित तितकी मिळणार नाही... त्यासाठी हा 'BB' खुपच छोटा आहे... कधी प्रत्यक्ष भेटा मला आवडेल मग असे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा समोरा-समोर बसून बोलू....


Gurudasb
Friday, April 20, 2007 - 12:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सामाजिक कार्य करायला बुवामहाराजच होऊन शिष्यगण तयार करून भल्या मोठ्या देणग्या घेउन काम करायचे असते असे काही असल्यास उद्यापासून मी महाराज व्हायला तयार आहे . पैसा कुणाचा आणि खर्चाचा तपशील कोण ठेवते ? [ एक गौडबन्गाल असते हे या अशा बाबतीत सगळीकडे , राजकारणी लोकांसारखे ] सदसदविवेक बुद्धीने प्रत्येकाने वागले तर स्वत : स्वत : चा मार्गदर्शक होऊ शकतो . बुवांची दुकाने थाटून मध चाखायची गरज नाही . असो. मी आस्तिक आहे पण बुवाबाजीच्या विरूद्ध आहे , म्हणूनच लिहिण्याचा प्रपंच . . चालु दे .

Mansmi18
Friday, April 20, 2007 - 12:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही कुठे म्हटलं की देव नाही?
------------------------------------------------------
भ्रमरविहार,

तुम्ही कुठल्या देवाला मानता?(कुतुहलपोटी विचारतो).

धन्यवाद.



Bhramar_vihar
Friday, April 20, 2007 - 1:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनस्मि१८, देवापेक्षा मी माणसातल्या देवाला मानतो. म्हणजे जो दयाळु आहे, ईतरांना मदत करतो, जो मदतीसाठी हाक मारल्यावर प्रत्यक्ष धावुन जातो.. चमत्कार न करता.. अशी प्रत्येक व्यक्ती, संस्था माझ्यासाठी देव आहे. आपले कुतुहल शमले असेल अशी आशा!

ashvini_k,sach_b आणखी कोण येतय ईथे?? आपले स्वागत!!


Mansmi18
Friday, April 20, 2007 - 1:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाहि हो अजुन नाही शमले. अजुनही काही प्रश्न.

१. तुम्ही कधी कुठल्याही देवळात गेला आहात का?(गणपती, सिद्धिविनायक, अश्टविनायक, विठोबा, तिरुपती वगैरे वगैरे)

२. तुम्ही कधी शिर्डी, शेगाव वगैरे ला गेलात का?

३. तुम्ही कधी देवाला हात जोडता का?

४. कुठल्या व्यक्तीसन्स्थे मधल्या देवाला तुम्ही मानता?

(मी हे प्रश्न कुत्सिततेने विचारत नाही आहे हे क्रुपया ध्यानात घ्या. आणि कदचित तुमचा गैरसमज झाल असेल तर सान्गतो कि मी बापुन्चा भक्त नाही. मला त्यान्च्याविषयी काही विशेष माहिती नाही. माझा देवावर मात्रा विश्वास आहे म्हणुन जे देवावर विश्वास नाही असे म्हणतात त्यान्चे विचार जाणुन घेण्याचे कुतुहल असल्याने मी प्रश्न करीत आहे).

धन्यवाद.


Manus80
Friday, April 20, 2007 - 5:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बाप रे, एक दम छान चर्चा होत आहे.
आणी जोशीभक्त उत्तरे न देता चर्चा वैयक्तिक नेत आहेत.
स्वप्नाजी आणि मायबोलि हे प्रभावी माध्यम नाही असे तुम्हाला का वाटते. अहो, पेपरात पत्रकारच लिहितात, इकडे तुमच्याआमच्या सारखेही लिहु शकतात.

तुमच्यावर होउन गेलेला प्रसंग खरेच वाइट होता. पण तुम्ही असे का नाही मानले कि त्या ट्रक आणि बस ड्रायवरने कौशल्याने तुम्हाला वाचवले.

जोशिभक्तगण एक विनन्ति, तुमच्या जोशिबुवाना तुम्ही का बरे ऊगिच राम साईबाबा यांचा अवतार मानता. राहुन देकी जोशिबुवा त्यांना. तुम्ही त्यान्चि त्याना राम वैगरे न मानता कराना मस्त भक्ति.


Disha013
Friday, April 20, 2007 - 5:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी सुरुवातीला हा BB वाचला,तेव्हा कुणीतरी दिलेली लिन्क बघितली होती. बापूंचे विष्णु अवतारातील फ़ोटो म्हणुन. आणि आता कळतेय की ते साईबाबांचा अवतार म्हणुन declare झालेय...
एकाच जन्मात २,२ अवतार कसे काय घेतले बुवा?
बापुभक्त याचे स्पष्टीकरण करतील काय?
बाकी मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत. केवळ उस्तुकता वाटली म्हणुन विचारले.
बाकी कोणतीही व्यक्ती जिची देव म्हणुन व्यक्तिपुजा केली जाते, ती आपल्या भक्तांना कधीही असे सांगताना मी बघितले नाहिये की आपला थोडा वेळ आणि पैसा अनाथाश्रमात दे,वृद्धाश्रमात दे. एखाद्या झोपडपट्तीत जावुन तेथील भुकेल्या मुलांना अन्नदान कर.मला काहिही देवु नकोस.
आहे का कुणी असे?


Nanya
Friday, April 20, 2007 - 5:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण माझे आता confusion झाले आहे. हे लोक जोशिंचे भक्त आहेत का साइबाबांचेविष्णुचे(किंवा इतर कुठल्यातरी देवाचे?). भक्तच जोशिबुवाना फ़सवतात, कि मि तुमचा भक्त म्हणुन (आणि भक्ति मात्र दुसर्या देवाचि)आणि ज़ोशिबुवा भक्ताना(देव म्हणता ना द्या मग मोबदला). दोघेही स्वत्:च्या स्वार्थासाठि भक्ति करताहेत असे वाटते आहे. म्हणुन देव दगडाचाच बरा.. तो चांगल्या घटनांचे credit मागत नाही आणि त्याला शिव्या दिल्या तरि फ़रक पडत नाही. उगिच हाडामांसाच्या व्यक्तिला देव म्हणले म्हणुन काय त्याचे वासना थोडेही संपणार आहेत..

Gurudasb
Friday, April 20, 2007 - 5:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Swapnanaik , आपण वर्णन केलेल्या प्रसंगात गाडीत सर्व बापुभक्तच होते असे आपल्या लिहिण्यावरून दिसते . गाडीला अपघात होऊ नये व जीवित हानी होऊ नये म्हणून आता प्रत्येक गाडीत एक फोटो लावायला RTO ला नियम करायला सांगायला हवे . ही तर टोकाची अंधश्रद्धा झाली . काही नोकरी , कामधंदा न करता केवळ त्यांचे नामस्मरण करून घरी बसून पोट भरत असेल तर मी तयार आहे " भक्त " [ कि भोक्ता ] व्हायला .

Upas
Friday, April 20, 2007 - 7:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफा तुझ्या पोस्टवर चर्चा करावी म्हणून नाही पण तरीही लिहावसं वाटलं.. :-) मी रचनाला जे म्हटलं होतं त्यात सर्व सामान्य माणसांकडून अवडंबर का माजवलं जातय हे शोधायचा प्रयत्न होता पण नामस्मरण आणि सद्गुरू ह्यांद्वारे होणारी आध्यात्मिक उन्नती (आता हे म्हणजे काय, किंवा ती होतेय हे कसं कळणार हा ह्या बीबी चा विषय नाही) ह्यातून जवळ जवळ प्रत्येक जण जात असतोच. तर अशा आध्यात्मिक मार्गांचे स्गळेच प्रवर्तक लबाड आहेत आणि उपासना करणारे सरसकट साधक दुर्बळ आहेत असे मात्र नव्हे. आपल्याला काय हवे आहे आणि ते कसे मिळवता येईल हे ज्याचे त्याने ठरवायचे.
मला बापूंबद्दल विशेष माहिती नाही पण एकाच गोष्टीचे आश्चर्य वाटते की जर ते एकिकडे मी देवाचा अवतार नाही असे म्हणत असतील तर त्यांचे वेगवेगळ्या अवतारतील फोटो त्यांनी कसे काढून दिले? आणि जर समाजसेवा हाच मुद्दा मानला तर बंग दांपत्य, बाबा आमट्यांसरखे कैक सामाजसेवक स्वतःस देव म्हणवून न घेता कितीतरी समाजपयोगी गोश्टी करत आहेतच की.. समाजसेवा आणि अध्यात्मिक उन्नती ह्या दोन पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत किंवा असाव्यात असे मला तरी वाटते. असो!


Vinaydesai
Friday, April 20, 2007 - 9:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास, कापा-जोडा (Cut/Paste) करायला कितीसा वेळ लागतो.... :-)

दिशा, ते पूर्वी साईबाबांचा अवतार होते, आता श्रीविष्णू आहेत...


Peshawa
Friday, April 20, 2007 - 10:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सम्घमित्राचा 'पोपट' मुद्दा एकदम पटेश. बाबांच्या भक्तानी त्याना काय मानावे काय मानु नये हा त्यांचा प्रश्ण आहे पण भक्तांची संख्या वाढु लागली कि तो वैय्क्तीक प्रश्ण न रहाता त्याला सामाजीक रुप जास्त येते.

केवळ आनंद मिळतो आणि वय्क्तिक असेच स्वरुप असेल तर कुठलेही व्यसन RAV parties ह्याना असलेला विरोध सुधा बिनकामाचा होइल. पण ह्या सर्वाला सामाजिक संदर्भ प्राप्त होतात म्हणुनच ते चर्चिले जातात.

समाज म्हणुन असे उठसुठ साधु बाबा आई अम्मा ह्यांच्या चरणि लागलेल्याने समाजावर काय परिणाम होतो हा विचर करायला हवा.

त्यातुन आध्यात्माचा संबंध भारतात सत्याशी पर्यायने सर्वोच्च ज्ञानाशी लावलेला आहे. अशा वेळेस असे ज्ञान नसलेले (अनाधीकारी (?) ) बाबा माता आइ अम्मा हे त्यांच्या शिश्याना ज्या वाटेने घेउन जातात त्यामुळे शिश्य 'जाग्रुत' होतो का आंधळा हा मोठा प्रष्ण आहे... तर्काच्या मर्यादा जाणुन न घेता भक्ती किंवा (अंध?) विश्वासाला आपलेसे करणे किंबहुना शरण जाणे हे कोणत्याही सद्गुरूला अपेक्षित असते का? असल्यास तसे का?

बापु थोर समाजसेव्क असणे आणी त्याना परम सत्याचे ज्ञान झाले असणॅ ह्यातला फ़रक त्यांच्या भक्ताना कळावा किंवा तो कळतो इतके त्यांनी दर्श्वावे इतकेच अपेक्षित आहे... त्यांचा दावा बापुना अंतीम सत्य कळाले आहे हे मान्य क्रणे अवगढ आहे कारण ते सत्य कळण्यासाठी साधना करावी लागते असा प्रचलीत समज आहे... कदाचीत अंधविश्वास आहे असेही म्हणता येइल


ps: व्याकरण आणि शुद्धलेखन चुकांसाठी दिलगिर आहे...


Gaurivichare
Saturday, April 21, 2007 - 3:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

My Dear All Aniruddha Bhakta's
why u guys r aruging with such nonsense ppl .Bapuni aplyala kai sangitle ahe?Vaada vaadi jasta karu naka and dont forget our loving meena tai's wording "je ale te taruni gele je na ale te tasech rahile aniruddha cha zala to urla duja dukhatachi rutla "

so dont give ne expl to such nonsense ppl.



Gaurivichare
Saturday, April 21, 2007 - 3:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

aniruddha anirudhha saisamrtha aniruddha
aniruddha aniruddha shri ram krishana aniruddha

jai jai sai sai sai aniruddha
jai shri ram ram aniruddha
jai shri krishna krishna aniruddha
jai shri shive shive shri shive aniruddha

bassssssssssss he gajar ,ani tyanche namsmaran chalu theva he sagle namune aao aap scrap lihaiche band kartil

hari om

Gaurivichare
Saturday, April 21, 2007 - 3:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिवाय तिने मला हेही सांगितले की एक त्यांची अंगार्‍याची (कि उदीची) पुडी ३०० रुपयांना विकली जाते. तर हे पण खरे आहे का?
एक सहज जाणवले म्हणून,

he tumala jyani sangitle tyana chaple mara tumala nit mahiti nastana kashala fukatchya bata marta

Aniruddha trust tarfe mofat udi vatap keli jate .pl hyana koni tari kolhapur camp chi mahiti dyare ani hyanchi tond band kara

Bhramar_vihar
Saturday, April 21, 2007 - 4:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"je ale te taruni gele je na ale te tasech rahile aniruddha cha zala to urla duja dukhatachi rutla "
म्हणजे अनिरुद्धाच्या भजनी लागला तोच तरेल?? अस कुठल्याही देवाने सांगितलेले ऐकले/ वाचले नाही आतापर्यंत. जाणकारांनी प्रकाश टाकावा! कारण माज्यामते हे म्हणजे "मला हप्ता दिलात तर ठीक आहे, तुमची गाडी उचलुन नेणार नाही" असं म्हणणार्‍या म्युनिसिपालीटीच्या कर्मचार्‍यासारख वाटत!

गौरी विचारे आपलेही स्वागत. मायबोलीवर ईतरही अनेक बिबि आहेत त्यांचा लाभ घ्यावा! :-)


Nandini2911
Saturday, April 21, 2007 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गौरीजी, संघमित्राने तुम्हाला "हे खरं आहे का?" म्हणून विचारले होते. सरळ उत्तर द्या ना... उगाच चप्पल वगैरेच्या गोष्टी कशाला आणता?


स्वप्नाताईना दिलेली समज त्याना कळली कारण आता त्या "बराच रिकामा वेळ मिळतो वाटते" या कुत्सितपणापासून ते "समोरासमोर चर्चा करू" या वाक्या पर्यंत आले आहेत. प्रगती आहे.

नवीन आलेल्या सर्व बापू भक्तासाठी एक निवेदन्: मायबोली हे एक public forum असून देश विदेशातले कित्येक मराठी इथे येत असतात. विविध विषयावर इथे चर्चा आणि गप्पा होत असतात. त्यापैकीच एक बापुचा विषय आहे. इथे कुणीही "बापूच्या मागे हात धुवून लागलेले" नाही.
इथे अजूनही विषय आहेत. तिथेही आपण भेट दिलीत तर हे आपल्याला लक्षात येईल.

बापूभक्ताना काही प्रश्न विचारले होते. त्याची उत्तरे देण्याचे टाळले गेले आहे. चर्चा वैत्यक्तिक पातळीवर न नेता जास्तीत जास्त मुद्द्याचा परामर्श घेतला जावा ही अपेक्षा. यामुळे आमच्या आणि तुमच्या माहितीत भर पडेल.


Sach_b
Saturday, April 21, 2007 - 5:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे भ्रमर तुम्हाला मानलं यार यासाठी नाही की तुम्ही कुठल्या देवाला मानत नाही म्हणून...तर यासाठी की तुमच्याकडे विलक्षण चिकीत्सक बुद्धी आहे म्हणून.. तुम्ही बरोबर ओळखलेत की मी केवळ इथे यायचं म्हणूनच मायबोलीचा सभासद झालो आहे.. तुम्ही हार्डवेअर क्षेत्रातले आहात खूप मोठ्ठ क्षेत्र आहे ते.. मलादेखील या क्षेत्रातबद्दल बरचसं माहीत आहे, पण म्हणून काही मी त्या क्षेत्राबद्द्ल काहीही मतं मांडावं हे योग्य नाही. माझ्या क्षेत्राबद्द्लही मी तेच म्हणेन..तसंच अध्यात्म हे क्षेत्र ही फार वेगळं आहे.. प्रपंचाशी निगडीत असलं तरी ते वेगळं आहे...तुमच्या क्षेत्रात राहील्याने तुमचा फायदा होत असेल तर तुम्ही तिथे राहीलं पाहीजे...त्याचप्रमाणे अध्यात्मात राहील्याने जर कुणाचा फायदा होत असेल तर त्याने तेथे राहावं....बस्सं एवढंचं...

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators