Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 20, 2007

Hitguj » Religion » व्यक्ती » Annirudha Bapu » Archive through April 20, 2007 « Previous Next »

Nandini2911
Thursday, April 19, 2007 - 7:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ani nandini, halli jasta kam nasta watta ... barech BB lihita ... patrakar lokanna itka wel milto ... ? very good
>>>>>>
also, for a matter of fact I have a friend who is journalist and i know the kind of work he does ... may be i relate to jornalism more through him .. so asked whether jouralists really have so much time and immaturity to write BBs rather than presenting facts स्वप्नाजी.. ही चर्चा बापूविषयी चालू आहे. त्यामुळे त्या विषयावरच बोललात तर बरे होईल. मी काय करत असते हा इथे बोलण्याचा विषय नाही.
मायबोलीवर लिहिणे ही जर immaturity वाटत असेल तर तुम्हाला वाटो. तोही इथे बोलण्याचा विषय नाही.
इथे लिहिण्याइतका मला वेळ कसा मिळतो हा तुमच्या गेल्या तीन पोस्टचा सूर आहे... तर म्हणुन मी सांगते की I am very good in multi-tasking
असो.... त्याविषयी हा बीबी नव्हे.
मी इथे कुणाचीही खिल्ली उडवलेली नाही. उडवली असल्यास तसे दाखवून द्यावे.

प्रफ़ुल्ल्ल, तुमची मते पटली. मी परत सांगते.. माझा आक्षेप हा भक्तीच्या अवडंबराला आहे आणि Marketing ला आहे. त्यावर जरा प्रकाश टाकला तर बरे होईल.
नामी, इथे तुमचे स्वत्:चे मत आणि विवेचन अभिप्रेत आहे. कृपया दुसर्याचे उतारे देऊ नका. आणि दिल्यास का आणि त्याचा चर्चेशी काय संबंध तेही सांगा.


Anjalisavio
Thursday, April 19, 2007 - 8:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डॉ. अनिरुद्ध जोशी वयाने ५६ वर्शाचे आहेत. त्यान्चे शिक्षण एम डी पर्यन्त झाले आहे. ते शिक्षणाने आणि वयाने थोर आहेत. त्यामुळे त्यान्चा उल्लेख एकेरि वाचुन थोडे ठीक नाही वाटले.
आपण देवाला सुद्धा हे देवा, असच म्हणतो ना? आपलि आई वयाने, आधिकाराने ती किति मोठी आहे? पण ए आईच म्हनतो. तो अनादर नसतो. तो असतो आपलेपणा. कुणि कुणाला एकेरी नावाने हाक मारली तर अपमान होतो असा गैरसमज दुर व्हावा ह्यासाठि लिहिले हे. बाकि चालु द्या

Mansmi18
Thursday, April 19, 2007 - 9:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अन्जली,

तुमची अनलॉज़ी या ठिकाणी बहुधा लागु पडत नाही कारण पेशवे यानी बापुन्बद्दल आइसारख्या जिव्हाळ्याने लिहिले आहे असे वाटले नाही.:-)
पण कदाचित त्यानी प्रेमापोटीहि लिहिले असेल कोणास ठाउक.

तुम्हाला वाइट वाटले असेल तर क्षमस्व.


Bhramar_vihar
Thursday, April 19, 2007 - 10:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी कोण आहे?
मी कोणाचाही अवतार नाही.
मी कालही अनिरुद्ध होतो, आजही अनिरुद्ध आहे आणि यापुढेही अनिरुद्धच राहील.
-अनिरुद्ध
नामी, मग तुम्ही भक्तजन त्यांना कशाला साईबाबाचा, विष्णुचा, रामाचा अवतात म्हणुन portray करता. अनिरुद्ध राहु द्या की त्यांना!

Sanghamitra
Thursday, April 19, 2007 - 1:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


च्यायला छान लिहीलेय अगदी. एकदम पटले.
आणि पेशवे, पेशवाई हा मराठीचा सुवर्णकाल होता हे आठवा आणि जरा शुद्धलेखन तपासा की पोस्टायच्या आधी :-)
मी खूप दिवसांपासून हा बीबी वाचतीय पण सगळे लोक एवढी चर्चा करतायत त्याचे मात्र आश्चर्य वाटले.
अध्यात्मातले मला फारसे कळत नाही.
पण माणसाला ज्या कुठल्या निरुपद्रवी गोष्टी आनंद देत असतील त्या करू द्याव्यात की.
आपण कोण त्यांना सांगणारे?
(हं जर जबाबदार्‍या टाळून, पैसे वगैरे उधळून कोणी हे असले उद्योग करत असेल तर चिंतेची बाब आहे.)
एखाद्याला वाचनाचा छंद, एखाद्याला खेळण्याचा तसं या बहुतेक भक्तांना अध्यात्माचा असं म्हणता येईल.
मग आपण मायबोलीवर येऊन तावातावाने चर्चा करतो तेही तसेच. :-)
नाहीतरी जे लोक स्वतः खंबीर असतात त्यांना स्वतःला सावरता येतेच बहुतेक प्रसंगांमधून पण जे दुबळेच आहेत (आणि असे लोक खूप आहेत समाजात. ) त्यांनी एखाद्या व्यसनाच्या आहारी जाण्यापेक्षा असे आध्यात्मिक समाधान मिळवले तर काय वाईट आहे?
आणि जर हे बाबा, बापू, मां लोक पैसे कमावण्यासाठी हे सगळे करतात म्हटले तरी एवढ्या लोकांना मानसिक समाधान दिलेय म्हटल्यावर तेही जस्टिफ़ाईडच आहे.
(कॉस्मिक काउन्सेलर म्हणू हवं तर.)
प्रसिद्धीसाठी करतात म्हटले तरी पुन्हा तेच. कित्येक लोकांना जर ते मानसिक त्रासातून सोडवत असतील तर काय हरकत आहे
प्रसिद्धी मिळवायला?
आता या अशा वरकरणी कार्यक्रमातून काही समाजविघातक कामे होत असतील जसे काही वाईट प्रथा किंवा इतर काही
(जे मी डॉक्टर अनिरुद्ध जोशींबद्दल तरी कधी ऐकले नाहीये पण इतर काही बाबांबद्दल ऐकलेय) तर जरूर याबद्दल आवाज उठवावा.
आता तसा या भक्तांचा उपद्रव म्हणजे सतत काही ना काही त्याबद्दल सांगत रहाणे.
एकूणच बापूच असे नाही तर कुठल्याही बाबांचे भक्त हे जरा जास्तच उत्साही असतात गुणगान करण्यात.
कुणी प्रभावित झालेच तर बरेच.
आपली कम्युनिटी वाढवणे आणि आपण करतोय ते बरोबर यावर शिक्कामोर्तब करून घेणे हे बहुतेक उद्देश असावेत.
मी कित्येक रिक्षांच्या, गाड्यांच्या मागे वाचते अनिरुद्धाय नमः लिहीलेले.
आमच्या इथल्या एका पार्लरमधे मुव्हीमधल्या गाण्याच्या चालींवर बापुंच्या आरत्या चालू असतात.
हे सगळे मला विनोदी वाटते पण जर ते स्ट्रेसबस्टरचे काम करत असेल तर असू दे की.
म्हणजे जे लोक तावातावाने विरोधात लिहीतायत हे प्रूव्ह करा ते प्रूव्ह करा ते कशासाठी?
आमचा पोपट सग्गळं सग्गळं बोलतो म्हटलं तर तुम्ही "नाही मला फक्त क्यिर्र ऐकू येतंय" म्हणून त्या पोपट पाळणार्‍याचे मत बदलणार आहे का? :-)


Mansmi18
Thursday, April 19, 2007 - 1:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वाना अक्षय त्रुतियेच्या हार्दिक शुभेच्छा.

सन्घमित्रा,
अतिशय समर्पक पोस्ट. मीहि मागे एकदा असेच पोस्ट केले होते पण कुणी ऐकलच नाही हो:-)


Chyayla
Thursday, April 19, 2007 - 2:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ब्रह्मज्ञान हे पुस्तक वाचुन किंवा स्वप्रयत्ने शक्य नाही. त्यासाठी ब्रह्मज्ञानी सद्ग़ुरुची गरज असते

प्रफ़ुल अगदी बरोबर आहे, आणी त्या गुरुलाही तेवढ्याच तोलामोलाचा शिष्य मिळणे हे भाग्यच आहे. स्वामी रामकृष्णाना काय शिष्य कमी होते पण स्वामी विवेकानन्दान्सारखा शिष्य एकच ना.

ईथेही एकवेळ सन्मानिय व्यक्ति म्हणुन अनिरुद्ध बापु यान्च्याबद्दल कुणाचा आकस नसावा पण शिष्याना त्याना अवतार म्हणुन घेतल्याने त्यावर सगळ्याना हरकत आहे, व म्हणुन त्याला सिद्ध करा असा त्यान्ची मागणी आहे आणी ती सहाजिकच आहे. जर कधी कुणीही काही दावा करेल तर प्रष्न तर उठणारच. तेन्व्हा शिष्यान्नीच अवडम्बर दीसेल असे न करता काय ते वास्तव ओळखुन आचरण करायला हवे. म्हणजे त्याना पण कुणी उगाच नावे ठेवणार नाहीत.
वस्तुता: अनिरुद्ध बापुच काय हे चराचर, प्रत्येक प्राणी, मनुष्य हे भगवन्ताचीच अभिव्यक्ती आहे हे एक परमसत्य आहे. त्यातल्या त्यात अवतार हे केवळ एक कालपरत्वे समतोल निर्माण करण्यासाठी असलेले मर्यादित कार्य आहे. अवताराच्यावरही उठुन उच्च विचार करायला हवा, केवळ त्यातच गुन्तुन राहण्यात अर्थ नाही.


एखाद्या व्यसनाच्या आहारी जाण्यापेक्षा असे आध्यात्मिक समाधान मिळवले तर काय वाईट आहे?
आता या अशा वरकरणी कार्यक्रमातून काही समाजविघातक कामे होत असतील जसे काही वाईट प्रथा किंवा इतर काही तर जरूर याबद्दल आवाज उठवावा.

आता तसा या भक्तांचा उपद्रव म्हणजे सतत काही ना काही त्याबद्दल सांगत रहाणे.
सन्घमित्रा अगदी योग्य व नेमक्या शब्दात सान्गितलेस मला तरी पटले तुझे विचार.

स्वामी विवेकानन्दान्नी पाश्चात्य व भारतिय मानसिकतेच एक उदाहरण दीले आहे. अमेरिकेत कदाचित ५ लोक मिळुन एखादा उद्योग स्थापन करतिल व मेहनत, सचोटी, शिस्त या बळावर काही महिन्यातच त्याची भरभराट करुन दाखवतील तर तेच करायला भारतियाना वर्षे लागायची. भारतात जर कुणी असे म्हटले की एका पायावर उभे राहिल्याने आत्मसाक्षात्कार होतो तरी ते कितिही विचित्र असेल तरी त्याला पन्नास्-एक अनुयायी सहज मिळतील.
यात दोघान्चीही तळमळ दीसुन येते, अध्यात्मिकते द्वारी परमसत्य जाणण्याची तर भौतिकतेतुन वास्तव जीवनात उत्कर्ष साधन्याची पण दोघानमधेही एक दुसर्याचा अभाव आहे.


या वरुन ते म्हणतात की जगात भौतिकता व अध्यात्मिकता दोघान्चेही महत्व आहे. पाश्चात्याना अध्यात्म तर तितकेच भारतियाना वास्तव भौतिकतेची निकड आहे, आणी अशा प्रकारे दोघानमधेही समतोल झाल्यास हे जग सुखी होइल.
तसेच काही ईथे बापुभक्ताना व विरोधकानाही तितकेच लागू होइल असे वाटते.


समीरने खूप मस्त लिहीलय ते वाचले तरी समजेल की अध्यात्म काय आहे ते
नन्दिनी साठी खुलासा मला अध्यात्म पुर्ण समजले / जाणले असा दावा नाही, पण प्रयत्न करतोय.


Manus80
Thursday, April 19, 2007 - 4:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी जोशीभक्त नाही की त्यांचा विरोधक हि नाहि. बापु इकडे लिहित नाहि कारण माझ्यासाठि बापु म्हणजे महात्मा गांधी.

हा बिबि मी खुप दिवस वाचत आहे. वाचताना असे वाटते कि जोशीभक्त काहि विचारले कि परत प्रश्न विचारतात पण उत्तरे काहि देत नाहित.
वाटले होते जोशीबद्दल काहि माहिती मिळेल पण भ्रमनिरास झाला.

मलाहि खुप शन्का आहेत पण आधी लोकानी विचारलेली उत्तरे मिळुन दे.




Chafa
Friday, April 20, 2007 - 12:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्रा, :-)

रचना, नंदिनी, भ्रमरविहार, महेश, सव्यासची, पेशवा, प्रिंसेस, देशी, वगैरे सगळ्यांनी छान लिहिलंय! आणि मुख्य म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या patience चे मला कौतुक वाटते! मला नसते जमले!

पण शेवटी काय, की गुरु, नामस्मरण, पूजा अर्चना, हे सगळे दुबळ्या मनाचे कुठलातरी आधार मिळवण्याचे वेगवेगळे मार्ग! (उपासचे पोस्ट वाचूनही हेच अधोरेखित झाल्यासारखे वाटले.) तेव्हा, ज्यांना हे कळते आणि ज्यांना स्वतःच्या मनावर आणि जीवनावर स्वतः ताबा मिळवता येतो, त्यांना त्याचे माजवलेले अवडंबर नकोसे वाटते. ज्यांना हे कळत नाही, ते दाखवून दिलेला मार्ग चालत राहतात. पुनरावृत्ती करुन दोन दाखले द्यावेसे वाटतात. कबीराचा एक दोहा इथे पुन्हा लिहितोः

माला फेरत जुग गया, फिरा न मन का फेर
कर का मनका छाँड के, मन का मनका फेर

हा दोहा म्हणजे झोपल्याचे सोंग घेतलेल्यांसाठी नेत्रांजन आहे! (संघमित्राच्या उदाहरणात सांगायचे झाले तर पिंजर्‍यात पोपटाऐवजी डोमकावळा असल्याचाच क्रूर साक्षात्कार! :-O)

विनोबा भाव्यांनी सांगितलेली देवाची व्याख्या म्हणजे बीजगणितातला 'क्ष'! अज्ञात उत्तर मिळवण्यासाठी, समोर ठेवलेला प्रश्न सोडवण्यासाठी, सोबत गृहीत धरलेला एक आधार! हा आधार प्रश्न पडण्यापूर्वीही अस्तित्वात नव्हता आणि उत्तर मिळाल्यावरही नसणार आहे. पण प्रश्न सोडवण्यासाठी मात्र गरजेचा आहे. आता देवच जर हा आधार, तर मग गुरुची काय गरज? दासबोध सांगतो म्हणून? ( 2D linear equations सोडवायला सुद्धा देवाचाच दोनदा आधार घेता येतो बरं! :-) )

संत आणि महात्मे यांचे महत्व समाजात अनन्यसाधारण आहे. तळागाळातल्या, मागासलेल्या आणि दुबळ्या वर्गाचे समाजप्रबोधन ते अनेक दशके करत आले आहेत. पण आधुनिक समाजातले संत म्हणजे स्वतः नामानिराळे राहून लोककल्याणासाठी अहोरात्र झटणारे ते अनेक लोक. पर्यावरण संवर्धनासाठी, मुक्या प्राण्यांसाठी, अशिक्षित भुकेल्या मुलांसाठी, आपद्ग्रस्तांसाठी मदत करणारे! कुठल्याशा कर्मपीठात अभिषेक करणारे नव्हेत; किंवा आपण विष्णूचा अवतार आहोत, सत्यसाईबाबा आहोत, या मंत्राचा जप करा आणि त्या तीर्थक्षेत्रांना भेट द्या वगैरे सांगणारे नव्हेत!

असो, एवढे लिहिता लिहीताच माझा patience संपला! या पोस्टवर बरीच चर्चा होईल कदाचित, पण मी पुढे लिहिणार नाहीये, तेव्हा सर्वांना चर्चेसाठी शुभेच्छा! :-)


Swapnanaik
Friday, April 20, 2007 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्यांना बापुंबद्दल इतका प्रॉब्लेम आहे त्यांनी स्वत्: सगळ्या गोष्टी शोधाव्यात. कदाचीत तुम्ही सगळे आम्हा बापू भक्तांपेक्षा खुपच सुज्ञ, सुशिक्षित आहात की तुम्हाला कोणत्याही गुरूची गरज नसावी. तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास कोणताही बापू भक्त बांधिल नाही आणि तुमच्या बापूविरोधात लिहिण्याने आम्हाला काहीच फ़रकही पडत नाही. तुमचा इथे बापूविरोधात 'BB' लिहिण्यात जो काही हेतु असेल तो 'BB' लिहून साध्य होईल असे मला वाटत नाही. असो, पण हे पण किती आश्चर्यकारक आहे की या जगातले सर्व विषय सोडून प्रत्येक जण बापूंच्याच मागे लागला आहे. :-) चांगले आहे.. कदाचित आम्हा बापू भक्तांपेक्षा तुम्हीच बापूंचे नाव जास्त घेत असाल....त्यांचा विचार करत असाल.... That itself is so amazing :-)

Prafull
Friday, April 20, 2007 - 6:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़ा, अंधश्रद्धा, कर्मकांड ह्याला तुमचा विरोध मान्य पण तसे करताना तुम्ही सद्ग़ुरु ही "दुबळ्या मनाची गरज" असे लिहिले म्हणून थोडेसे स्पष्टीकरण. तुम्ही म्हणता की मदत करावी आणि तसे करणारे हे खरे संत. ही अशी मदत का करावी ह्याचे कारण काय? जर उद्या मला मरायचे आहे तर मी जगाची काळजी का करावी? जाताना शे दोनशे लोकाना घेउन गेलो तर काय वाइट केले? आप मेला जग बुडाले अशी म्हण आहेच की.
सद्ग़ुरु हया सेवेमागचे कारण दाखवून देतो. जेव्हा ज्ञानेश्वर माऊली ला सद्ग़ुरु कृपेने ब्रह्मज्ञान झाले तेव्हा आपला अनुभव व्यक्त करताना ते म्हणतात "विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले अवघेची जाहले देह ब्रह्म"
संत कबीर म्हणतात " All know that the drop merges into the ocean but few know that the ocean merges into the drop "
सद्ग़ुरु आणि समाज सेवक यात हाच फ़रक आहे की सद्ग़ुरु विश्वाची एकात्मता अनुभवतात आणि तसा अनुभव आपल्या शिष्यांना देऊन वसुधेव कुटुम्बकम चा उपदेश देतात. याउलट समाज सेवक असा अनुभव न घेताच वसुधेव कुटुम्बकम चा सन्देश देतात.
आता ह्यामधे श्रद्धाळू कोण आणि अन्धश्रद्धाळू कोण ते तुम्ही ठरवा.


Nandini2911
Friday, April 20, 2007 - 6:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वप्नाजी, गैरसमज कित्ती मोहक असतात ना?
इथे कुणीही बापूच्या मागे हात धुवून लागलेले नाही. कुणीतरी तुम्हाला तुमच्या गुरूविषयी प्रस्न विचारत आहे. त्यामधे विरोधापेक्षाही कुतूहलाचा भाग जास्त आहे? कोण आहेत बापू? का त्याचे भक्त त्याना देव मानतात? असे कित्येक प्रश्न तुम्हाला विचारले होते. एकाही प्रशाचे आपल्यपैकी कुणीही उत्तर दिलेले नाही. आणि आता तर तुम्ही बापूभक्त बांधिल नाही असे म्हणून चक्क पळ काढताय.. This is not healthy discussion . चर्चा करा ना.. खुल्या दिलाने करा.. आमचे मुद्दे चुकत असतील तर पटवून द्या....


Swapnanaik
Friday, April 20, 2007 - 7:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, बापु म्हणजे 'fraud' आहे, फ़क्त भक्तीचे अवडंबर आहे अशा आशयाने आपण लिहिणे चालू केले. झोपलेल्याला उठवता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्ट प्रुव्ह करुन हवी आहे त्याची उत्तरे पण तुम्हाला माझ्याकडुनच हवी असतील तर तुम्ही पत्रकार असल्याचा या समाजाला काय उपयोग झाला?
स्वत्: जाऊन प्रयत्न करा की.... सत्य शोधा... आम्ही बाबा बापुडे... आम्हाला गुरुंची गरज आहे... खरंच तुमच्याइतके शहाणे नाही.... मग आम्हाला शहाणपण द्यायला जर आम्ही तुमच्याकडे पहात असू तर करा की मदत... :-) तुम्ही खरंच
'prove' केलत की बापू 'fraud' आहे तर समाजाला फ़ायदाच आहे ना? आणि तुमच्या 'profession' ची कर्तव्यपूर्ती सुद्धा....
आम्ही पामर... अंधश्रद्धाळु....मग तुम्हीच काढा की आम्हाला बाहेर यातुन... :-) आधी देव आहे हे प्रुव्ह करा मग बापू देव आहे हे आम्ही प्रुव्ह करतो...


Naami
Friday, April 20, 2007 - 8:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्व बापु विरोधकांना नमस्कार.
खरंतर तुम्हाला विरोधक म्हणणे योग्य वाटत नाही. कारण तुमच्या सगळ्यांच्या पोस्ट वाचल्यानंतर हेच निदर्शनास आले की खरंच तुम्हाला बापुंबद्द्ल काहिहि माहिती नाहि आणि म्हणुनच तुमच्या प्रत्येकाच्या प्रश्नांना उत्तरे देण्यापेक्षा आणि त्यातून वादावाद करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर मी जास्त भर देऊ इच्छिते.

अनेक सेवाभावी संस्था सामाजिक कार्य करतात ह्यात वादच नाहि. पण बापु कशाप्रकारे कार्य करतात हे मला तुम्हाला सांगायचे आहे. म्हणुनच मी माझ्या वरील पोस्टमधे १३ कलमांची फक्त नावे नमुद केली आहेत. ह्या प्रत्येक कलमाची सविस्तर माहिती मी इथे देणारच आहे. पण कामामुळे थोडा उशीर होत आहे.

कोणीतरी वर म्हटले आहे की भक्ति करणे दुबळ्याचे काम आहे. हे जर खरं असेल तर तुम्ही शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, झाशीची राणी, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक यांना दुबळे म्हणाल का? आतापर्यंत कोणाही बापु भक्ताने तुम्हाला इथे हे म्हटलेले नाही की तुम्हि बापुंकडे या. हो ज्यांना त्यांच्याबद्द्ल माहीती घेण्याची उत्कंठा आहे त्यांनी जरुर यावे. स्वत्: बापुंनी जाहीरपणे सांगितले आहे की कोणालाही माझ्या बापुकडे या असे सांगु नका. ज्याला यायचे असेल तो येईल. पण तुम्ही कोणावर जबरदस्ती करु नका. बापुभक्तांचा समाजातील कोणत्याही व्यक्तीला त्रास नाहि. जर निरपेक्ष सेवा करणे, रामरक्षा, घोरकष्टोधरण स्तोत्र, साइचरित्र वाचणे, दत्तबावन्नी म्हणणे, रामनाम वही लिहिणे, चरखा चालविणे, कोणतीही पुजा करताना अवडंबर न माजवता शुद्ध भक्तिभावाने पूजा करणे, विधवा स्त्रियांचे अलंकार न उतरविणे,तिला समाजात मानाचे स्थान देणे, देवाला खुश करण्यासाठी फाजिल नवस न करणे, प्राण्यांचा बळी न देणे (कारण काही ठिकाणी अजुनही देवाला खुश करण्यासाठी प्राण्यांना बळी दिले जाते ह्या व अशा अनेक प्रथा. हे सगळं करणे जर अंधश्रद्धा असेल तर मग श्रद्धा कोणती? आणि म्हणुनच बापुंची १३ कलम योजना मला तुम्हाल सांगायची आहे. बापुला त्यांचे भक्त देव का मानतात ह्या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला यातुनच मिळेल. पण एखाद्य तज्ञाकडे जायचे आणि त्यालाच त्याच्या त्याविषयीच्या ज्ञानत रोस्स करायचे, असा प्रकार होणार असेल तरि मला माझे जे कार्य करायचे ते मी करणारच आहे.
चु. भु. घ. द.


Bhramar_vihar
Friday, April 20, 2007 - 8:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सद्ग़ुरु आणि समाज सेवक यात हाच फ़रक आहे की सद्ग़ुरु विश्वाची एकात्मता अनुभवतात आणि तसा अनुभव आपल्या शिष्यांना देऊन वसुधेव कुटुम्बकम चा उपदेश देतात. याउलट समाज सेवक असा अनुभव न घेताच वसुधेव कुटुम्बकम चा सन्देश देतात

फरक एव्हढाच की कुठल्याही समाजसेवकाला देवाचा अवतार म्हणुन पादुकापूजन केल्याचे किंवा त्याचे sticker लावल्याचे दिसत नाही. आणि विश्वाची एकात्मता अनुभवो किंवा नाही, समाजाची सेवा निरपेक्षपणे करणे हाच मानवधर्म नाही का?

नामी, तुमचे म्हणणे ऐकायला मी उत्सुक आहे. विशेषत: १३ कलमी कार्यक्रम


Bhramar_vihar
Friday, April 20, 2007 - 9:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आधी देव आहे हे प्रुव्ह करा मग बापू देव आहे हे आम्ही प्रुव्ह करतो...
स्वप्नाजी, अहो देव नाही म्हणुन बापु देव नाहि अस कस होउ शकेल? जरा विचार करा की, आणि आम्ही कुठे म्हटलं की देव नाही? आमचं म्हणण की बापु देव नाही.... ते आहेत हे तुम्ही prove करा! बांधिल नाही वगैरे बोलुन पळ काढु नका!

Sach_b
Friday, April 20, 2007 - 9:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटत की कोणाबद्द्ल कोणतही मत लिहीताना किंवा मांडताना सारासार विचार करणं फार महत्वाचं आहे... बापूंबद्द्ल वलगना करत राहण्यामुळे त्यांच्या कार्यात, त्यांच्या अस्तित्वात काडीचाही फरक पडणार नाही..

Bhramar_vihar
Friday, April 20, 2007 - 10:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापूंबद्द्ल वलगना करत राहण्यामुळे त्यांच्या कार्यात, त्यांच्या अस्तित्वात काडीचाही फरक पडणार नाही..

या, नविन भक्त. तुम्ही केवळ ईथे यायच म्हणुन मायबोलीचे सभासद झालात का? कारण तुमचे एकच post आहे मायबोलीवर आणि तेही ईथेच. आणि वल्गना कोण करतय? आम्ही फक्त काही प्र्शन विचारुन आमचे कुतुहल शमवत होतो. पण भक्तगण उत्तर द्यायला बांधिल नाहीत असं म्हणतायत. तुम्ही उत्तर दिलत तरी चालेल.

Nandini2911
Friday, April 20, 2007 - 11:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वप्नाजी... प्लीज माझ्या प्रोफ़ेशनचा इथे उल्लेख करून तुम्ही दर वेळेला काय सिद्ध करत आहात?
तुम्ही बापुभक्त आहात म्हणून हे प्रश्न तुम्हाला विचारले जात आहेत. देव आहे हे prove करायची गरज नाही. इथे कुणीही athiest नाही.


बापू fraud आहेत हे मी कुठे म्हटलय? दाखवून द्या...
माझं म्हणणं एवढेच आहे की तुम्ही त्याना विष्णुचा अवतार कशाच्या जोरावर मानता? हे फ़क्त तुम्ही सांगा... इथे कुणी भांडायला बसलेले नाहीत. इथे येणारा प्रत्येक जण त्याच्या कामात बिझी आहे. फ़क्त बापुविरोधात लिहिण्यासाठी कुणीही मायबोलीचा मेंबर नाही.
कुठलेही विधान करण्या आधी ते prove करता येते ना ते पहा.. (फ़क्त बापू संदर्भात मी बोलत नाही आहे).
उदाहरण द्यायचे झाल्यास कलावती आईचा उल्लेख झाल्यावर काय प्रतिक्रिया आल्या ते तपासून पहा. आणि मग बोला
आणि आम्ही बांधिल नाही म्हणुन हात वर करू नका... कारण आम्ही मौनाचा अर्थ हवा तसा लावू शकता.
आणि परत माझ्या प्रोफ़ेशनचा जर तुम्ही उल्लेख केलात.... तर..... (या मौनाचा तुम्ही हवा तसा अर्थ लावू शकता :-) )


Ashwini_k
Friday, April 20, 2007 - 11:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hari om to all,
This is a test message.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators