|
Ramsakha
| |
| Friday, April 13, 2007 - 5:39 am: |
| 
|
|| हरि ॐ || रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे | रामेणाभिहता निशाचरचमु रामाय तस्मै नम: || रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोस्म्यहं | रामेचित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ||३७|| रामरायाच्या ईच्छेने, रामरायाच्या प्रेरणेने, रामरायाच्या आर्शिवादाने एक छोटासा प्रयास रामरायाच माझ्याकडुन करुन घेत आहे. उद्देश फक्त एकच की त्याच्या प्रेमाचा अथांग महासागर असलेलि हि रामरक्षा त्याच्या प्रत्येक लेकरापर्यंत पोहोचावि. "रामरक्षा" हे केवळ एक स्तोत्र नाहि तर हे संपुर्ण "रामायण" आहे आणि "रामायण" हे आपल्याला सदासर्वकाळ आदर्शवादिच आहे. "रामायण" हे आपल्या जिवनाचे सुत्रच समजायला काहिच हरकत नाहि. प्रत्तेकाने परमेश्वरि नियमांच पुर्णतः पालन करुन आपल आयुष्य कस सुन्दरपणे जगावं हे त्या मर्यादापुरुषोत्तमाने आपल्याला दाखऊन दिल आहे......स्वतः पुर्णपणे तस जगुन. सर्व प्रथम या ठिकाणि मला हे रहस्य इथे मांडावस वाटत् (जर कोणाला माहित नसेल तर) कि "रामरक्षा" म्हणजे "शिव" आणि "पार्वति" मधला सुसंवाद आहे. "शिव" जो रामरायाचा सर्वोत्तम भक्त आहे तो आपल्या लाडक्या पार्वतिला सांगतोय कि राम नाम कस त्याच्या मनाला आनंद देत्?? राम नाम भक्ताच्या आयुष्यात कस कार्य करत्?? राम नाम कस सकळ दुष्टांचा आणि संकटांचा बिमोड करत्?? राम नाम कस आपल्या भक्ताचा प्रत्तेक पातळिवर उद्धार करत्?? अस हे राम नाम कस या अखिल विश्वात सर्वश्रेष्ठ आहे?? आणि "शिव" कस या सर्वश्रेष्ठ राम नामाचा अखंडपणे स्मरण करतोय?? साक्षात परम सुंदर "शिव" आणि जगन्माता "पार्वति" यांच्यामधला हा सुसंवाद. हाच सुसंवाद, हिच रामरायाचि गाथा, हेच रामरायाच प्रेम शिवाला संपुर्ण विश्वाच्या कल्याणासाठि प्रत्येकाला उपलब्ध करायच होतं आणि म्हणुनच या शुभ कार्यासाठि त्यानि "बुधकौशिक ॠषि" (रामरायाचा उच्चतम भक्त) यांचि निवड केलि आणि त्यांना स्वप्नामधे शिव-पार्वतिचा हा सुसंवाद प्रत्यक्ष पाहण्याच आणि एकण्याच सौभाग्य मिळाल. पुढे शिवाच्याच आज्ञेवरुन त्यांनि हा सुसंवाद "रामरक्षा" या शिर्षकाने संपुर्ण विश्वासाठि लिहुन काढला. आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः | तथा लिखितवान् प्रातः प्रबुध्दो बुधकौशिकः ||१५|| (रामरक्षा) हजारो वर्षांपासुन रामरक्षेचि हि परंपरा अविरत चालत आलि आहे पण बदलत्या काळानुसार, बदलत्या युगानुसार माणसाला या परंपरेच विस्मरण झाल. तो रामापासुन अर्थातच रामरक्षेपासुन दुर गेला पण यामुळे रामाचं अथवा रामरक्षेचं महत्व तिळमात्रहि कमि होत नाहि. संस्कार, परंपरा कधिहि बदलत नाहित. त्या बदलल्या जाऊच शकत नाहित म्हणुनच आपण त्यांना परंपरा म्हणतो कारण हि परमेश्वरानि मानवाला त्याच्या सुखि जिवनासाठि दिलेलि संपत्ति आहे आणि परमेश्वर कधिहि बदलत नाहि. तो काल जसा होता आजहि तसाच आहे आणि तसाच राहणार. बदलतो तो माणुस आणि त्याचे विचार. पाश्चिमात्य संस्कृतिच अनुकरण करुन प्रत्येक भारतिय आपल्या धर्मापासुन आणि त्याच्या तत्वांपासुन दुर होत गेला. पण याच बदललेल्या, आपल्या धर्मापासुन दुर गेलेल्या माणसला आज अनेक आपत्तिंना आणि संकटांना तोंड द्याव लागत आहे मग ते वैयक्तिक पातळिवर असो अथवा सामाजिक पातळिवर. समर्थ रामदासांनि म्हंटल्या प्रमाणे "रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग" अशीच आमचि स्थिति असते. युध्द असत् माझच माझ्या प्रारब्धाशि आणि जर हे युध्द मला जिंकायच असेल तर मला रामरक्षेत सांगितल्या प्रमाणे "राम" आणि "लक्ष्मण" यांच्याच मार्गावरुन चालायला हव कारण हे दोघेच सदैव माझ रक्षण करण्यासाठि सज्ज असतात. आत्तसज्ज धनुषाविषुस्पृशा वक्षया शुगनिषंगसंगिनौ | रक्षणाय मम रामलक्ष्मणा वग्रतः पथि सदैव गच्छताम ||२०|| संनध्दः कवचि खडगी चापबाणधरो युवा | गच्छन मनोरथोस्माकं रामः पातु सलक्ष्मणः ||२१|| (रामरक्षा) रामरक्षेतला प्रत्तेक श्लोक......नह्वे रामरक्षेतला प्रत्तेक शब्द हे रामाच खड्ग (अस्त्र) आहे जे आमच्या शरिर, मन आणि बुध्दि या तिनहि पातळिंवर प्रवेश करुन तिथल्या सगळ्या वाईट गोष्टींचा, दुर्गुणांचा, विकृतींचा आणि भयाचा संहार करत्. सामान्यतः "रामरक्षा" हे सर्व प्रकारच्या वाईट शक्तिंपासुन रक्षण करणार् अथवा वाईट शक्तिंपासुन तात्काळ मुक्तता देणार् एक प्रभावि स्तोत्र इतकिच त्याचि ख्याति आहे पण ते तस नसुन याचि महति, याच कार्य अफाट आहे. चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् | एकैकमक्षरं पुंसां महापातक नाशनम् ||१|| (रामरक्षा) रामरक्षेच्या नित्य आणि प्रेमपुर्वक पठणाने आपल्या प्रत्तेक पापाचा नाश होतो, केवळ याच जन्माच्या नाहि तर अनेक जन्मिच्या. "या अखिल विश्वात अस एकहि पाप नाही ज्याला रामरक्षा जाळू शकत नाही आणि असा एकहि पापी नाही ज्याला रामरक्षा शुध्द करु शकत नाही". हि साक्षात रामरायाचि ग्वाहि आहे. पण हा तर रामरक्षेचा सहज गुण झाला म्हणजे रामरक्षेच्या नित्य पठणाने या सर्व गोष्टि आपोआपच घडुन येणार आहेत पण मग याहि पलिकडे, रामरक्षेचा प्रत्तेक श्लोक हा आपल्या आयुष्याशी निगडित आहे. या प्रत्तेक श्लोकामध्ये आपल्या आयुष्याच गुढ लपल आहे कारण साक्षात शिवाच्या मुखातुन निघालेले हे शब्द इतके वरवरचे असुच शकत नाहीत. आणि या साठिच त्या रामरायाच्या अकारण कारुण्याने आपल्या सगळ्यांसाठी त्यानेच रामरक्षेच गुढ खुल केल आहे. लवकरच "रामरक्षा आणि त्याचे गुढ" हा प्रबंध आपल्या सर्वांसाठी खुला होणार आहे ज्यामध्ये रामरक्षेतला प्रत्तेक श्लोक आपल्या आयुष्याशी निगडित कसा??? रामराया आपल्या आयुष्यात कसा कार्यरत होतो??? त्याचं अकारण कारुण्य, त्याच प्रेम आपल्या पर्यंत कस पोहोचत असतं??? त्याला आपल्या लेकरांकडुन काय अपेक्षा असते??? त्याच प्रेम आपण कस संपादन करु शकतो??? या आणि अशा अनेक प्रश्नांचि ऊत्तरं आपल्याला मिळतिल. यामध्दे रामरक्षेचा प्रत्तेक श्लोक विस्तारितपणे मांडला गेला आहे. "रामरक्षा" हे आपल्या शरीर, मन आणि बुध्दिच कवच आहे. "रामरक्षा" हि आपल्या सर्वांगिण विकासाचि गुरुकील्ली आहे. "रामरक्षा" हे त्या रामरायाचा अस रसायन आहे, अस प्रेम आहे कि जे दगडालाही पाझर फोडु शकत्. "रामरक्षा" हे आपल्या प्रत्तेक प्रश्नाच ऊत्तर आहे आणि "रामरक्षा" हा असा मार्ग आहे ज्यावरुन नित्य चालत राहिलो तर एक ना एक दिवस हा "रामराया" आपल्याला भेटणारच आहे, अगदि १००%. अनेकांचि हिच समस्या आहे की त्यांना रामरक्षेची चाल माहित नसल्यामुळे रामरक्षा बोलता येत नाही. अनेक उच्चार कळत नाहित. यासाठिच रामरायाच्या कृपेने आपल्यासाठि रामरक्षेचे अतिशय सुंदर असे MP3 Version झाले आहे. यामध्ये प्रत्येक उच्चार अतिशय स्पष्टपणे केला गेला आहे. शिवाय रामरक्षेचा TEXT हि आपल्याकडे available आहे. कोणालाहि रामरक्षेचे MP3 Version किंवा TEXT हवे असल्यास, ramsakhaa@rediffmail.com या ID वर नक्कि e-mail करा. शेवटि एकच ईच्छा व्यक्त करीन की ज्या कोणाला स्वतःहाला त्या रामरायाच्या चरणांशी कायमच् बांधुन घ्यायच आहे त्याने आदि स्वतःहाला रामरक्षेशी बांधुन घ्यायला हवं आणि जो रामरायाच्या चरणांशी कायमचा बांधला गेला त्याच्या बद्दल मि इतकच बोलु शकतो कि "आनंदाचे डोहि आनंद तरंग". काहिच कळत नसताना इतक् बोलण हे खरच बरोबर नाही आणि ते हि तुमच्या सारख्या ज्ञाती भक्तांसमोर. पण यातला प्रत्तेक शब्द रामरायाचाच आहे तरीही काही वावगं बोललो असेन तर क्षमा करावी. रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे | रामेणाभिहता निशाचरचमु रामाय तस्मै नम: || रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोस्म्यहं | रामेचित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ||३७|| || हरि ॐ ||
|
Hemantp
| |
| Friday, April 13, 2007 - 10:25 am: |
| 
|
रामसखा : तुमचा उपक्रम स्तुत्य आहे. तुम्ही रामरक्षा विवेचन आणि text ईथे पोस्ट करु शकता. MP3 साठी कदाचित तुम्हाला admin/mods ची परवानगी लागेल. ते नक्कीच उत्तर देतील.
|
Mansmi18
| |
| Monday, April 30, 2007 - 3:33 pm: |
| 
|
श्री राम राम रामेती रमे रामे मनोरमे सहस्त्रनामतत्तुल्य रामनाम वरानने रामसखा, अतिशय सुन्दर शब्दात विवेचन केलेत. धन्यवाद.
|
रामसखा.......... तुमच्या पोस्ट ची वाट पाहतो आहे. प्लीज रामरक्षा टेक्स्ट आणि ंP३ देण्याचि क्रुपा व्हावी.
|
|| श्री राम समर्थ माझ्याकडे रामरक्षा टेक्स्ट आणि ंP३ आहे. पण ंP३ इथे पोस्ट करता येत नाही आणि टेक्स्ट साठिहि वेगलि फ़ाइल आहे, म्हणुनच मि माझा इ-मेल दिला आहे. क्रुपया मला इ-मेल करावा.
|
Madhusut
| |
| Friday, June 08, 2007 - 10:51 pm: |
| 
|
नमस्ते. आपल्याला दैनंदीन स्तोत्रे खालिल वेब लींकवर मिळ्तील... जय श्री राम! http://amit.chakradeo.net/2006/12/19/religious-stotra/
|
अमित चक्रदेव इंक. ही वेबसाईट कोणी तयार केली आहे, याची माहिती इथे कोणी देवू शकेल काय ?
|
Ramsakha
| |
| Wednesday, October 24, 2007 - 1:50 pm: |
| 
|
आजहि मला "रामरक्षे" साठि अनेक इ-मेल येत आहेत. मला नक्किच याचा आनन्द होत आहे. असेच भरपुर मेल येउदेत आणि सगळ्यान्नि रामरक्षा म्हणुदेत हिच इच्छा.
|
Piapeti
| |
| Thursday, December 20, 2007 - 10:28 am: |
| 
|
मला ही हवे आहे रामरक्षा स्तोत्र
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|