Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 10, 2007

Hitguj » Religion » व्यक्ती » Annirudha Bapu » Archive through April 10, 2007 « Previous Next »

Bhramar_vihar
Saturday, April 07, 2007 - 5:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे बापु आधी साईबाबांचा अवतार होते, मग विष्णुचा झाले. सुचितदा ला शेषनाग म्हटलेले पसंत नव्हते म्हणुन आता बहुधा रामावतार धारण केलाय. :-)

स्वप्नाजी म्हणतात त्याप्रमणे बापु स्वत:ला देव नाही म्हणवुन गेत.. पण आपल्या अनुयायांना हे सांगतही नाहीत की मी देव असल्याचा प्रचार करु नका!

आता दाभोळकरांविषयी. अनिरुद्ध जोशी बापु होण्या आधी दाभोळकरांचे मित्र होते. त्यांचे नियमित येणे जाणे होते, तेव्हा त्यांना साईबाबांच्या "त्या" तीन वस्तुंबद्दल माहीती होतीच. मग एके दिवशी ते येउन सांगतात की त्या माझ्या तीन वस्तु द्या, मीच साईबाबा आहे हा भोंगळपणा नाहीतर काय आहे? आणि दाभोळकरांना ते का पटलं की त्यांना "पटवलं" गेलं??

सामाजिक कार्य चांगलच आहे. पण मी आधी म्हटल्याप्रमाणे का नाही ते आपल्या भक्तांना गुटखा, सिगारेट सोडण्याचे आदेश देत???? माझ्या ओळखीचे एक कुटुंब. नवरा बायको दोघेही bank मधे. बापुंच्या नादी लागले. बायकोने vrs घेतली. नवरा bank बुडवुन भक्तीमधे. शेवटी बॅंकेने गोव्याला transfer केली.. तर महाशय राजीनामा देऊन मुंबईत येण्याच्या मागे. आता बोला!


Nandini2911
Saturday, April 07, 2007 - 9:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भ्रमा... :-):-)
काय मस्त माहिती दिलीस रे... bank बडवून भक्ती मध्ये..



Mansmi18
Sunday, April 08, 2007 - 11:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनामिका, नन्दिनी, सव्यसाची, भ्रमरविहार आणि इतर,

प्रथम मी स्पश्ट करु इच्छितो कि मी बापु किन्वा अनिरुद्ध जोशीन्चा भक्त किन्वा अनुयायी नाही. मी त्यान्च्याविशयी फ़ार थोडे वाचले आहे त्यामुळे माझे त्यान्च्याबद्दल चान्गले अथवा वाईट काहीच विचार नाहीत. मी या बोर्डवर पोस्ट करायचे नाही असे ठरविले होते पण चर्चा फ़ारच एकान्गी होते आहे असे वाटल्याने लिहित आहे.

प्रथम, ज्या हक्काने(विचार स्वातन्त्र्य वगैरे) काही लोक इथे या जोशिन्च्या विरुद्ध लिहित आहेत त्यानी हा बोर्ड ज्यानी सुरु केला त्यान्चा पण हक्क मान्य करायला नको का? त्यान्चा मुख्य उद्देश जे समविचारि लोक आहेत त्यान्च्यासाठि बनवला असणार मग तिथे येउन आपण त्यान्च्या भावनान्चि खिल्ली उडवणे कितपत योग्य आहे? त्यान्ची श्रद्धा किन्वा अन्धश्रद्धा जि काही आहे ति आपल्या जागी आहे. त्यानी जोशीना राम, क्रुश्ण, शेश काहिही मानले आणि त्या श्रद्धेने त्याना समाधान मिळाले तर त्यात गैर काहि आहे असे मला वाटत नाही.

याचा अर्थ मी जे लोक आपले कामधाम सोडुन देतात किन्वा आपली कर्तव्य सोडुन अवडम्बर माजवतात त्यान्चे समर्थन करतो असा मुळिच नाही. ज़े वाइट आहे त्याचे पितळ उघडे नक्किच पाडले पाहिजे पण त्यासाठि हा फ़ोरम मला योग्य वाटत नाहि. कदाचित "बापु आणि अन्धश्रद्धा" नावाचा फ़ोरम उघडुन त्यान्च्यावर टीका करणे जास्त सोयिस्कर ठरेल.

मला ज्या लोकानी अन्धश्रद्धा वगैरेवर बरच लिहिले आहे त्याना एक प्रश्न विचारयचा आहे. तुम्हि लोक सत्यनारायण पुजा करणारे, सिद्धिविनायक, अश्टविनायक याना जाणरे, गजानन महाराज, गोन्दवलेकर महाराज, अम्मची, श्री रविशन्कर, साइबाबा, सन्त तुकाराम, रामदास, ज्ञानेश्वर याना मानणारे याना पण अन्धश्रद्ध म्हणाल का? जर नाही तर श्रद्धे मधे डावे उजवे ठरविणारे आपण कोण?

स्वप्ना,
तुम्हाला एकनाथ महाराजन्च्या एका अभन्गाचि आठवण करुन द्याविशी वाटते

निन्दक कामाचा कामाचा गडी आत्मारामाचा
निन्दक आमुचा सखा आमची वस्त्रे धुतो फ़ुका
निन्दक आमुचि गन्गा आमुचि पापे नेतो भन्गा
निन्दक आमुचा गुरु एका जनार्दनी थोरु

जाता जाता,
अनामिका, नन्दिनि, सव्यसाची, भ्रमर्विहार
तुम्हि लिहिले आहे ते अगदी योग्य आहे आणि तुमच्या शुद्ध हेतुबद्दल मला अजिबात शन्का नाही परन्तु जिथे लिहिले आहे तो फ़ोरम चुकिचा वाटला म्हणुन काळ्यावर पान्ढरे. चु भु द्या घ्या

धन्यवाद.



Savyasachi
Monday, April 09, 2007 - 2:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे मनस्मी, हा फ़क्त अनिरुद्ध बापू अशा नावाचा आहे. तेंव्हा बापूंच्या बाजूने आणि विरुद्ध दोन्ही बोलायचा आहे अस म्हणायला पाहीजे. नाहीतर फ़क्त भक्तांसाठी वेग़ळा काढावा योग्य शिर्षक देऊन. चर्चा एकांगी होत आहे कारण बापूंचे समर्थक पळून गेले आहेत. ते सविस्तरपणे माहिती द्यायला तयार नाहीत. त्याला कोण काय करणार. आणि तुमची श्रद्धा भक्कम असेल तर भावना दुखावल्या जाणार नाहीत.
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फ़रक आहे. आणि तु दिलेल्या यादीपैकी माझी कशावरच श्रद्धा नाही. शेवटच्या ३ संतांबद्दल एक आदर आहे की त्यान्नी समाजासाठी मार्गदर्शनाचे काम केले. मी रामाचा अवतार आहे वगैरे न सांगता. तुझ शेवटच वाक्य फ़ारच typical आहे. "श्रद्धे मधे डावे उजवे .... ". सगळेच अंधश्रद्धाळू हा प्रश्ण विचारतातच.
असो. ज्यांनी सुरू केला त्यांनी त्यांचा हक्क बजावावा. इतरांना त्यांचा बजावूदेत.
बाकी, जो डॉक्टर होता त्याने रुग्णसेवा करायची सोडुन तो बापू का बनला? तेवढे केले असते तरी भरपूर समाजसेवा झाली असती.


Zakasrao
Monday, April 09, 2007 - 5:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय लोक्स.
मी अलीकडेच एक कथा वाचली. ती डायरेक्ट बापुंशी सम्बधित नाही पण वाचाच.त्याचे ४ भाग आहेत. त्याची लिन्क ह्या लिन्क वर गेल्यानंतर उजव्या बाजुला दिसेलच तर वाचा
ही कथा

Mahesh
Monday, April 09, 2007 - 7:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्म्म्म्म, या कथाकाराचे काय झाले असेल पुढे ? कारण मागे कोणीतरी या बोर्डवर लिहिले आहे की, कोणी काही विरुद्ध बोलले, लिहिले तर जोशींचे काही भक्त कायदेशीर कारवाई करू शकतात.

Nandini2911
Monday, April 09, 2007 - 7:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनस्मी.. तुमचे बरेचसे मुद्दे पटले. पण चर्चा एकांगी का होत आहे कारण कुणी उत्तर द्यायला तयार नाही. मी जवळ जवळ महिनाभर वाट बघत होते उत्तर देण्याची.
मला वाटतं की हल्ली सर्वच अध्यात्मिक गुरूनी "आम्ही समाजसेवा करतो" हे बोलून "आम्ही नाही भोंदू बाबा" हा पवित्रा घेतला आहे. मुळात कुणीही जेव्हा गुरू बनतो तेव्हा त्याला तुम्ही का मानता याचं उत्तर बरेचसे अनुयायी देऊ शकत नाही. बापुच काय आसारामबापू, निर्मलादेवी. कलावती आई.. या सर्वाना "मानणारे" का मानतो हे सांगू नाही शकत आणि जर प्रश्न विचारले तर "तुम्ही आमच्या श्रद्धेची आणि भावनेची खिल्ली उडवत आहात" असं सर्रासपणे म्हटले जाते. एक खुली चर्चा त्यामुळे घडतच नाही.
अनिरुध्द जोशी कदाचित खूप चांगले अध्यात्मिक मार्गदर्शक असतील. पण ते काय मार्गदर्शन करतात. हे त्याचे शिष्य नाही सांगू शकत.. वरच्या पोस्टस वाचल्यावर ते लक्षात येईलच. त्यात्तच व्यक्ती म्हटल्यावर चांगले वाईट येतेच.. पण इथे "देवाचा अवतार" म्हटल्यावर तो डोळसपणा देखील घालवला जातो.
शेवटी श्रद्धा ही वैयक्तिक असावी असे माझे मत आहे. माझी गणपतीवर श्रद्धा आहे.. पण म्हणून मी त्याचे लॉकेट घालत नाही किंवा डेस्कवर त्याचे फ़ोटो लावत नाही. तोही मला कधी असे कर म्हणून सांगत नाही.
मला राग या अवडंबराचा येतो.
(गणपतीच्या देखील मूर्त्या विकल्या जातात.. पण त्याचे अर्थकारण त्याच्या पर्यंत पोचत नाही.... :-) )


Savyasachi
Monday, April 09, 2007 - 2:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकास कथा. मस्तच लिहिली आहे.

Mansmi18
Monday, April 09, 2007 - 2:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नन्दिनी,

तुम्हि कलावती आई यान्चा उल्लेख केला आहे आणि त्याना लोक का मानतात हे सान्गत नाहीत असे म्हटले आहे म्हणुन खुलासा करीत आहे. मी वयाच्या आठ्व्या वर्शापासून आतापर्यन्त (जवळ्जवळ २८ वर्शे)आइन्चा मार्ग अवलम्बितो आहे. आइना मी गुरुस्थानी मानले आहे.

मला परमपुज्य आइन्चा मार्ग आकर्शित करण्याचे काही मुद्दे:

१. आइनी स्वत:ला कधी देवाचा अवतार वगैरे म्हणवुन घेतले नाही.

२. आइन्च्या इथे वर्ग़णी वगैरे कधीच मागितली जात नाही. आरतीतहि पैसे टाकण्यास मनाइ आहे.(भक्तीत पैशाचा सम्बन्ध आणला कि भक्ती गढुळ होते आणि मुळस्थानाचे नाव वाइट होते अशी आइन्ची शिकवण आहे).

३. आइनी कधिही देवाचे किन्वा आइन्चे स्मरण केल्यास सन्कटे येणारच नाहीत असे सान्गितले नाही. उलट "शरीर हे प्रारब्धाच्या अधीन असल्याने सन्कटे येणारच, हरीस्मरणाने सन्कटे सहन करण्याचे सामर्थ्य अन्गी येते" असे आइन्चे सान्गणे आहे.

४. आइनी कधी अन्धश्रद्धेला समर्थन कधिही दिलेले नाही. उलट न विचार करता केल्या जाणार्या कर्मकान्डाना (उदा. सत्यनारायण पुजा इ) ल विरोधच केला आहे.

५. एकदा आइन्ची बदनामी असलेला लेख प. पु आइनी स्वत: वाचुन दाखविला होता.

६. परमपुज्य आइन्चे निधन १९७८ सालि झाले आहे. त्यान्च्या हयातीतच त्यान्च्या घरचे लोक त्यान्च्या विरोधात होते आणि नन्तरही एक नातु सोडला तर इतर कोणी नातेवाइक त्यान्च्या अनुयायामधे नाहीत.(त्यामुळे आर्थिक फ़ायद्याचा आरोप आइन्वर कुणिही कधीच करु शकत नाहीत.)

७. त्यान्ची शिकवण त्यान्च्या चरीत्रात व श्रीहरिमन्दिर बेळ्गाव यान्च्या साइटवर पाहता येइल.

८. परमपुज्य आइन्च्या भजनामुळे अत्यन्त आनन्दाचा आणि मन्:शान्तीचा अनुभव मला आला आहे आणि तो उत्तरोत्तर येत राहील.

मला आइन्ची कोणाशीही तुलना करायची नाही परन्तु तुम्ही मुद्दा आणला म्हणुन मला सान्गावेसे वाटले. हाच मार्ग चान्गला आणि इतर देवाला न मानणारे मुर्ख असे मात्र मी मुळिच म्हणणार नाही. शेवटी ज्याने त्याने आपल्या आनन्दासाठी आपल्याला हवा तो मार्ग अनुसरावा. जर नास्तिकाना त्याच्या श्रद्धेने(किन्वा श्रद्धेच्या अभावाने) आनन्द मिळत असेल तर त्यान्चाही आदरच आहे. परन्तु आम्ही म्हणतो तेच योग्य आणि इतर मार्ग अनुसरणारे अन्धश्रद्ध असे म्हणणे किन्वा त्यान्चि खिल्ली उडवणे कितपत योग्य आहे?

धन्यवाद.






Neelu_n
Monday, April 09, 2007 - 5:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनस्मि तुमच्या म्हणण्याशी मी सहमत आहे.
नंदिनी एका नातलगांच्या मार्फत आईंच्या मंदिरात जाण्याचा योग आला. ईतर ठिकाणी आढळणारे पैशाचे स्तोम मला तिथे आढळले नाही. फक्त हरीस्मरण करा येवढाच त्यांचा आग्रह असतो. माझ्या वाचनात आलेल्या पुस्तकांनुसार भक्तीत पैशाचा सम्बन्ध आणला कि भक्ती गढुळ होते , प्रारब्धात आहे ते अटळ आहे पण हरीस्मरणाने सन्कटे सहन करण्याचे सामर्थ्य अन्गी येते हेच विचार आईच्या हयातीत आणि नंतरही लोकांपर्यंत जात होते. हरीस्मरण सोडुन अजुन कशाचीच तिथे सक्ती होत नाही असा माझातरी अनुभव आहे. म्हणुनच मलाही आईंचा मनापासुन आदर आहे. पण मंदिरात जाणे वगैरे प्रकारात माझे कधीच सातत्य नसल्याने सध्या त्यांच्या मंदिरांमध्ये कसे वातावरण असते हे मला माहित नाही कारण माझा हा अनुभव ३ ते ४ वर्षापुर्वीचा आहे. आणि जर तसे काही होत असेल तर नक्कीच तो दोष त्यांच्या भक्तांच्या स्वभावाचा असेल असे मला वाटते. असे काही होते असते आणि जर आज आई असत्या तर नक्कीच त्यांनी प्रथम अश्या माणसांना दुर केले असते अथवा शासन केले असते.
हा बीबी त्यांचा नाही पण तु उल्लेख केला म्हणुन मलाही खुलासा करावसा वाटला.


Upas
Monday, April 09, 2007 - 10:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार कुणाला दुखवण्याचा हेतू नाही पण परमपूज्य आइंचे नाव वाचले आणि लिहावेसे वाटले. कार्याची पूर्ण माहिती करून घेउनच शंका काढावी असे मला तरी वाटते.
मी आईची ग्रंथसंपदा वाचली आहे, त्यांची प्रवचने आणि भजने ऐकली आहेत.. त्यांच्या साहित्याचा, त्यांनी जो निरनिराळ्या भाषेतील संतवाद्मयाचा एकत्रित संग्रह उपलब्ध करून दिला आहे तो केवळ अप्रतिम आहे. परम्पूज्य आईंनी अंधश्रद्धेला विरोध केलाच शिवाय प्रवचनातून समाज प्रबोधनही केले आहे. त्यांनी स्वतःला कधीही देव मानले नसून उलट भक्तांना हरिस्मरणात रंगण्याचे सोप्पे मार्ग दिले आहेत.. शिवाय आइंची शिस्त अतिशय कडक असून पैशाच्या बाबतीत बरेच दंडक त्यांनी स्वतः घालून दिले आहेत, आरती न लावणे, थाळीत पैसे न जमवणे हे त्यातले काही.
अनगोळच्या हरीमंदिरात जाऊन एक छान आध्यत्मिक अनुभव घेता येईल हे नक्की.. पुन्हा एकदा. हे इथे सांगण्याचा उद्देश असा की अपूर्ण माहितीवरून आईंचे नाव इथे लिहिले गेले आहे असे वाटले आणि एक उपासक म्हणून मला चार शब्द लिहावेसे वाटले इतकचं.. धन्यवाद!
अजून एक, जर शक्य झाल्यास आईंनी लिहिलेल बोधामृत जरूर वाचावं!


Karadkar
Tuesday, April 10, 2007 - 3:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नन्दिनी, तु ज्यांची नावे घेतलिस त्यांच्या प्रवचनाना, भजनाना कधि गेलेली आहेस का?

मला आसारामबापु, निर्मला देवी, अनिरुद्ध बापु कोणाचाच्काहीही अनुभव नाही. पण मी कलावती आईची शिश्य आहे. आणि तु त्यांना बाकिच्यांच्या पंक्तीमधे बसवण्यापुर्वी कधी कोणत्या हरीमंदीरात गेलेली आहेस का? आणि गेली असशील तर तुला कय पटले नाही हे जरा व्यवस्थीत समजावुन सांगशील का?

पैसे, तांदुळ न ठेवुन देणे. फुले, प्रसाद असलए काही न आणणे, मंदीराला मदत करु का विचारले असता फ़क्त नमस्मरण करा म्हनुन सांगणे ह्यात वाईट काय आहे ते सांगशील का?

बरीच उदाहरणे मनस्मी, नीलु, आणि उपास ने दिलेली आहेतच. तेच मी परत लिहिण्यात अर्थ नाही.

माझे म्हणणे असे अज्जिबत नाही की अमचा विश्वास आहे म्हाणजे तुझा किंवा असायलाच हवा. माझ्या सद्सदविवेक्बुद्धिला जे पटते ते तुझ्या पटेलच असे नाही पण ते नाहीच असे म्हणण्यात अर्थ नाही.

आणि हा BB बापुंच्या भक्तांसाठी आहे. तुला आईंच्याबद्दल कही बोलायचे असेल तर त्या BB वर आपण बोलु.


Bhramar_vihar
Tuesday, April 10, 2007 - 4:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापुच काय आसारामबापू, निर्मलादेवी. कलावती आई.. या सर्वाना "मानणारे" का मानतो हे सांगू नाही शकत

मला वाटतं की नंदिनीने कलावतीआईंचा अनादर केलेला नाही. ति असही म्हणते की यामुळे खुली चर्चा नाहि घडत. तुम्ही सर्वानी ही चर्चा होते हे दाखवुन दिलेले आहेच. त्यामुळे आईंविषयी चर्चा ईथेच थांबवुया का?

Nandini2911
Tuesday, April 10, 2007 - 5:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भ्रमा.. एकदम बरोबर.. मला आधी वाटलं मी चुकून आईच्या बीबीवरच आले.
हो, मी आईच्या बेळगावच्या मंदिरात गेलेले आहे. साधारण पणे पावसच्या स्वरुपानंदाची आणि आईची शिकवण मला सारखीच वाटली आहे. पण मी परत एकदा सांगते.. की बहुतेक भक्त जे अवडंबर माजवतात मला त्याचा राग येतो..
त्यमधे कुणाच्याही श्रद्धेला दुखवण्याचा हेतू नाही. जे माझं वैयक्तिक मत आहे ते राहीलच.. पण तुमच्या सर्वाच्या मताचा आदर आहे आणि एवढी छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.. बापूभक्तानी इथे चर्चा कशी करावी हे पाहिलं तर बरे होइल...


Mansmi18
Tuesday, April 10, 2007 - 4:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नन्दिनी, भ्रमर

धन्यवाद.

ही चर्चा माझ्यापुरती इथे सम्पली आहे.


Peshawa
Tuesday, April 10, 2007 - 8:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटतं की हल्ली सर्वच अध्यात्मिक गुरूनी "आम्ही समाजसेवा करतो" हे बोलून "आम्ही नाही भोंदू बाबा" हा पवित्रा घेतला आहे. मुळात कुणीही जेव्हा गुरू बनतो तेव्हा त्याला तुम्ही का मानता याचं उत्तर बरेचसे अनुयायी देऊ शकत नाही.>>>

अनुयायी देउ शकत नाहीत करण उत्तराच विचर करून श्रध्ह / अंधश्रध्हा होत नाही. श्रध्ह ही मनाची अवस्था आहे. जशी प्रेम आहे. नलायक म्हणता येइल अशा माणसांन्वर जिवापाड प्रेम करणारी माणसे नंदिनी आपण पाहीली नाहीत काय? त्याचाच हा भाग. प्रेम जस आंधळा असत तशिच श्रध्ह देखील.

तसेही अध्यात्माचा बाजार आहे हे मान्य करण अजुनही आपल्याला जड का जाते? गुरु विशयी असलेल ऐतिहासिक वलय आजच्या काळत तसच असाव ही देखील एक प्रकारची शर्ध्हाच नाही का? जड जात म्हणुन चिड्चिड होते. पण एकदा अध्यात्म हि commodity आहे आणि इतर commodity सारखीच ति वापरून पैस मिळवण गैर नाही हे मान्य केल की बपु सारखे businessman बद्दल राग येत नाही.

पण जेंव्हा त्या जागेचा गैर वापर होउन भक्तांचा शोशण सुरु होत ते मात्रा वाईट...

एकंदरीतच तुमचा ह्या विशयावरचा संताप मी समजू शकतो असो


Rachana_barve
Tuesday, April 10, 2007 - 10:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजकाल परमेश्वराच्या सान्निध्यात जायला आपल्याला माध्याम का शोधावे लागते?
दासबोध, न्यानेश्वरी वगैरे मधल्या शिकवणीपेक्षा असे काय वेगळे शिकवले जाते? गेल्या १० - १५ वर्षात गुरुंच प्रस्थ का वाढल असेल एव्हढ ह्याचा अचंबा वाटतो.


Mansmi18
Wednesday, April 11, 2007 - 12:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना,

तुम्हि दासबोध नीट वाचला आहे का?
क्रुपया दासबोधातील दशक ५ समास १ ओवी ३६ ते ४६ वाचलीत तर
तुमच्या प्रश्नाची उत्तरे मिळतील.

यापुढे क्रुपया महान ग्रन्थान्चा दाखला देण्याआधी त्यात काय लिहिले आहे ते आधी वाचाल का?

धन्यवाद.

http://sanskritdocuments.org/marathi/dndAs/dAsabodh05.pdf

Rachana_barve
Wednesday, April 11, 2007 - 1:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनस्मी तुमचा गैरसमज झाला. मला कोणत्या गुरु, ग्रंथ वगैरे बद्दल काही एक म्हणायचे नाही. पण ही सत्यपरिस्थीती आहे की आजकाल गुरुंच प्रस्थ वाढल आहे. माझा आक्षेप व्यक्तीपुजेला होता.

मी स्वत : अशा दोन तीन गुरुंच्या ठीकाणी जाऊन भजन प्रवचन ऐकल आहे. अध्यात्मासाठी आजकाल पैसे मोजावे लागतात. भले ते पैसे लोकांच्या मदतीसाठी खर्च करतो का म्हणेनात.
परत एकदा मी एखादा गुरु किंवा ग्रंथ ह्याबद्दल बोलत नाहीये. असो, मला आश्चर्य इतकेच वाटत होते की का बर आजकालच्या पिढीला ह्या गुरुंची इतकी गरज भासू लागली आहे. माझ्या लहानपणी मी इतकी गुरुंची नाव ऐकली नव्हती जितकी आजकाल ऐकते आहे.

असो, मला ह्यावर आता काही बोलायचे नाही कारण काही बोलल की लगेच भावनाच दुखावल्या जातात.


Mahesh
Wednesday, April 11, 2007 - 1:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह दासबोध online available आहे हे पाहून फारच आनंद झाला.
समास २ मधे गुरूलक्षण सांगितले आहे ते पण पहाण्यासारखे आहे.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators