Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 22, 2007

Hitguj » Religion » व्यक्ती » Annirudha Bapu » Archive through January 22, 2007 « Previous Next »

Chafa
Friday, January 19, 2007 - 4:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला असं वाततं की ही कीड काढून टाकण्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे.
>>> वा! अज्जुका, इथे लिहायचं नाही असं ठरवलं होतं पण तुझं कौतुक करण्यासाठी मुद्दाम लिहितोय. एकदम मस्त आणि योग्य विचार. नुसतं गप्प बसून कुठल्याही अनुचित आणि फालतू विचारसरणीचा अथवा प्रथेचा डोळे मिटून उदो उदो न करता त्यातलं पितळ उघडं पाडलंच पाहिजे. माहिती चुकीची किंवा अधुरी असली तरी प्रश्न तरी विचारलेच पाहिजेत. तुला पूर्ण अनुमोदन! किमान यावेळी तरी बरेच लोक असं म्हणायला पुढे आले याबद्दल अभिनंदनही!

Ajjuka
Friday, January 19, 2007 - 4:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद चाफा..
मला पण आश्चर्यचा सुखद धक्का आहे हा की बहुतांशी मते ह्या प्रकाराच्या विरोधी आहेत. आशेला वाव आहे..


Princess
Friday, January 19, 2007 - 5:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, माझा पुर्ण पाठिंबा तुला. आणि असे काही करण्यात तुला कुठल्याही प्रकारच्या मदतीची गरज असेल तर मी, माझे आई वडिल आणि भाउ सहकुटुंब तयार आहोत. आम्हाला मार्ग सुचत नव्हता. तुम्ही काही करु शकत असाल तर जरूर करा. आप आगे बढो हम तुम्हारे साथ है!!!

Ajjuka
Friday, January 19, 2007 - 5:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्या अनेक सेवाभावी संस्था मुंबईत, महाराष्ट्रात आहेत ज्या फक्त काम करतात. त्यांना विष्णू, शेषनाग.. इत्यादी शिक्के आणि दिपवून टाकणारी गुंता प्रवचने यांची गरज नसते.
बाबा आमटे, बंग दांपत्य आणि कित्येक उदाहरणे. साधं महाराष्ट्रात पाणी प्रश्नावर काम करणारी कितिक माणसं माहीतीयेत मला जे महाल, गाद्या, गिरद्या दूर सारून केवळ कामच करतायत. आणि त्यांना कोणी मोठं मानू लागलं तर तो मोठेपणा स्पष्टपणे नाकारतात. केवळ कामाची ओळख मानतात. त्यांच्या कार्याचं मला कौतुक आहे. आदर आहे.
समाजकार्याच्या वरील यादीबद्दल म्हणायचे तर..
२६ जुलै ला मदतकार्य करणारी तुमच्या शिक्क्याची माणसंच फक्त नव्हती.. आणि मुळात ही शिक्क्याची माणसं शिक्का आहे म्हणून मदत करत नव्हती.. ती माणसं आहेत म्हणून करत होती.. त्याने बापू मोठा कसा झाला?
आणि बाकीच्या यादीबद्दलही हेच म्हणता येईल..

आता वैयक्तिक बद्दल.. तुमच्यापैकी कुणालाही एका शब्दाने मी काही म्हणाले नाहीये.. आपणंच.. मर्यादा सोडणे, कीव येते इत्यादी वाक्प्रचार वापरून वैयक्तिक पातळीवर उतरता आहात. इतकेच काय तुमचे वय आणि पत्रकाराचा हुद्दा सांगून दडपण आणायचा प्रयत्न करता आहात अन्यथा त्याची गरज होती असे वाटत नाही. पण दुर्दैव तुमचं.. मला नाही हो भिती वाटत. अनेक सच्चे पत्रकार मी पाह्यले आहेत. अमाप आदर आहे मला त्यांच्याबद्दल. आणि त्यांना त्यांच्या status चा असा वापर करताना नाही हो पाह्यलं मी. पत्रकार आहे असं सांगत वाट्टेल त्या पातळीला जाऊन, आपली मर्यादा सोडून भर press conf मधे वाट्टेल ते प्रश्न विचारणारे पत्रकारही बघितलेत.. उत्तरही दिली आहेत.

बर आता पत्रकार काका.. हे विष्णू, लक्ष्मी आणि शेषनाग काय प्रकरण आहे उपासना केंद्रात पुढे बसायला जास्त तिकिट का? तुला दोन रूपये दिले तर तू दोन लाख देतोस अश्या स्वरूपाच्या ओळी असलेल्या स्तोत्राचि पुस्तके, विष्णूच्या पोज मधे बापूने दिलेले फोटो, stickers इत्यादींची विक्री का असते? तुम्ही लोक नुसतं हरी ओम न म्हणता हरी ओम बापू का म्हणता? ऑम विष्णवे नमः असं न म्हणता अनिरूद्धाय नमः अस का म्हणता? (यातले काही नाकारू नका कृपया कारण हे मी स्वतःच्या डोळ्यांनी कानांनी अनुभवलेय. ) आणि जर तो माणूस स्वतःला देव मानत नाही तर तो हे देव्हारे माजवणं थांबवत का नाही? याची उत्तरे द्याल का?

बाकी KEM आणि malpractise हे संदर्भ संपूर्णपणे खोटे आहेत का हे सांगू शकाल का?


Kedarjoshi
Friday, January 19, 2007 - 7:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पेशवे तुम्ही छान करमनुक केलीत ती लिंक देऊन. धन्यवाद. जाम हसलो. १,३ व ९.जेपिजी पाहुन.
बर हे रुप दिसल कोणाला? शेषांना की लक्ष्मीला. नी काढल कोणत्या कमेर्याने. SLR, P&S ह्यावर कोणी प्रकाश पाडेल काय?



Yoga
Friday, January 19, 2007 - 8:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनस्मी अगदी बरोबर, सुज्ञास अधिक सांगणे न बरे.

Mansmi18
Friday, January 19, 2007 - 8:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Yoga, Ajjuka

Let me clarify something here:
I am not a follower of Aniruddha Bapu. I have read/heard something about him through papers. I do not have any knowledge what he stands for so I have no opinion about him.

I was browsing through message boards and came across interesting discussion here. I thought the discussion was being one sided and vindictive so I posted some messages.

I would like to see a healthy discussion with both sides stating facts. Inasmuchas I would like to see facts from ajjuka about if Bapu was dismissed from KEM whether there are any wrongdoings from him. I would also like to see justifications if any from any of Bapu's followers about those photos, avatar of sesha naag, vishnu, lakshmi etc.

Ajjuka,
I know you are prudent enough, however I came across an article where Nana patekar was sued by a bapu bhakta for defamation as he had made some remarks about him. I would suggest you exercise caution about statements that you make.

Regards and peace

Storvi
Friday, January 19, 2007 - 9:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह क्या site है. पेश्व्या लै कर्मणुक झाली... :-) घ्या आणि ह्या पर्मेश्वराच्या अवताराने sue केले? काय गरज होती, एवढ्या महान आत्म्याला क्षुद्र लोकांच्या बोलण्याने काय फ़रक पडतो? :-)

Peshawa
Friday, January 19, 2007 - 11:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I would like to see a healthy discussion with both sides stating facts...>>

yes stating fact is a must. However in sociological issues perception/experience of the facts plays key role. Again sociological issue is not only logical but also in first place social in nature and therefore emotional. A debate on sociological issues is incomplete without emotional content. it is left to the individual who debates sociological problems to come to the conclusion that achieves emotional and logical balance.

the emotion of bhaktI is acceptable so is the disgust and also the skepticism.

On a lighter note One can call bapu a pig depict this in a vivid million color pictograph and when sued can demonstrate that it is not any different from calling him Vishnu. Equivocation is another fallacy of reasoning and Hindu Puranas are a graveyard of reason :-)

Yes it is one sided discussion so far but I am waiting for a Bapu bhakta to let us know the facts behind bapu phenomenon. I had a room mate and he had a different take on Aniruddha JoshI (Bapu). According to him the man was (is?) skeptical about his godliness. Someone approached Aniruddha saying that Aniruddha is next (next?eems Sai of Puttaparthi is now history) Sai Avatar But what happened after that is my curiosity. An Aniruddha premi is more than welcome to narrate the story.


Limbutimbu
Saturday, January 20, 2007 - 1:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्हाला "भगवान" रजनीश चाल्ले......!
हे बापू का नाही चालत????
DDD

Bhramar_vihar
Saturday, January 20, 2007 - 4:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसं आम्ही लिंबुला पण चालवुन घेतो की राव! :-)

अंनिसच्या नरेंद्र दाभोळकरांनी आपल्या पुस्तकात बापुची माहिती दिली आहे. पण ते चमत्काराचा दावा करत नसल्याने अंनिस काही करत नाहीये! बापू तेव्हढा हुषार नक्कीच आहे. योगकाका, बापु स्वत: का नाही सांगत भक्ताना की मी देव नाहिये म्हणुन?? आणि त्याची पेन्स,स्टीकर यांची जी industry उभी राहिली आहे त्याच काय?? अगदी औषध पण विकली जातात. बापूने आपल्या भक्ताना दारु आणि सिगारेट सोडण्याचे आवाहन करुन दाखवावे, आणि त्यातले किती जण हे करतात ते बघा. माझा एक मित्र आहे, जो मागील ६ वर्षे बापूचा भक्त आहे. त्याचि सिगारेट नाही सुटु शकली!


Mahesh
Saturday, January 20, 2007 - 6:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या आधीच्या मेसेज नंतर फारच मुद्दे आले आहेत. आज्जुका, लिंक पाहिली आणी खुप हसलो.
पत्रकार महाशय, तुमच्या सांगण्याप्रमाणे जर हे बापू स्वतःला अवतार, ई. मानत नाहीत तर त्यांनी हे प्रकार आपण होउन थांबवायला हवे होते. पण तसे अजिबात न होता त्यामधे अमर्याद वाढच झालेली दिसते.
वर आज्जुकाने आणी सर्वांनी लिहिले आहेच त्याप्रमाणे सामाजिक कार्य करताना हा देवाधर्माचा भोंदुपणा कशाला हवा ?
लिंबुटिंबु, या व्यक्तीची सुभाषबाबुंशी तुलना कशी होउ शकते ?
रजनीशांबद्दल म्हणत असाल तर त्यांना भारतात मानणार्‍यांपेक्षा विरोध करणारेच जास्त होते असे वाटते. बाहेरचेच लोक भलत्याच कारणांसाठी त्यांच्या नादी लागले होते.
माझ्या आधीच्या मेसेज मधे लिहिल्याप्रमाणे हे बापू चांगले समाजसेवक असतीलही, पटत नाही ते केले जाणारे अवडंबर.
मला अजुन एक मुद्दा लिहायचा होता तो असा,
अशिक्षित लोकांमधे अंधश्रद्धा असेल तर ती काढण्यासाठी सुशिक्षित लोक प्रयत्न करू शकतात आणी अशिक्षित लोक एका मर्यादेनंतर तर्कवितर्क करत नाहीत.
पण अंधश्रद्धा सुशिक्षित लोकांमधेच असणे जास्त भयानक आहे. कारण ती काढणे अवघड तर आहेच. पण त्याचा सर्वात मोठा दुष्परीणाम हा आहे की अशिक्षित लोकांना असे वाटते की हे चांगले शिकले सवरलेले लोक मानतात म्हणजे नक्कीच तथ्य असले पाहिजे आणी मग हे प्रकार गुणाकाराप्रमाणे वाढत जातात. त्याला कितीही सामाजिक कार्याची झालर लावली तरी हे परीणाम टाळता येत नाहीत.
सद्ध्या झी वर असलेल्या या सुखांनो या मालिकेमधे असाच विषय हाताळला आहे असे वाटते. विक्रम गोखले विरुद्ध विनय आपटे.


Ajjuka
Saturday, January 20, 2007 - 8:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनस्मि,
तुमच्या concern बद्दल आभार. तीच लक्षात आलं म्हणून नंतर उत्तर देणे टाळले होते. असो..

पण हे कोर्ट नाही कुठलेच साक्षीपुरावे दाखल करायला. आणि बापूसारख्या 'वजनदार' माणसाने एव्हाना सगळे पुरावे नष्ट केले असण्याची शक्यता खूपच मोठी आहे नाही का? मी पत्रकार नाही की investigator नाही.
पण विष्णूचा अवतार, शेषनाग इत्यादी प्रकार म्हणजे भोंदूगिरी आहे हे माझे मत आहे आणि ते मांडण्यात काहीच गैर नाही. आणि इथल्या कुणीच भक्तांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायचे कष्ट घेतलेले नाहीत.
साधं म्हणजे.. समाजसेवा करणारी माणसे महत्वाची की त्यांचा शिक्का ह्या प्रश्नाला पण कुणी भक्त सामोरं जाताना दिसत नाही.
मला फक्त आमचे गुरू ग्रेट, त्यांची महती जो अनुभवतो त्यालाच कळते, तुम्ही मर्यादा सोडलीत, आमच्या लोकांनी केवढं आगळं वेगळं समाजकार्य केलंय... इत्यादी इत्यादी मुद्देच परत परत येताना दिसतायत.. त्यात परत मी अमुक आहे, माझे वय अमुक आहे असा pressure टाकायचा प्रयत्न.


Arch
Sunday, January 21, 2007 - 3:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ह्या बापूंबद्दल कधी ऐकल नाही किंवा वाचल नाही. पण एखाद्याला त्यांच प्रवचन ऐकून शांती मिळत असेल तर काय वाईट आहे? जोपर्यंत त्यांच्यामुळे समाजाला त्रास होत नाही किंवा त्यांच प्रवचन ऐकाव हे आपल्यावर लादल जात नाही किंवा कोणाचा गैरफ़ायदा घेतला जात नाही तोपर्यंत इतरांच्या भावनांवर आक्षेप घ्यायचा आपल्याला काय अधिकार आहे?

जन्मभर फ़कीर म्हणून जगलेल्या साईबाबांची मंदीर बांधली जातात सोन्याच्या, चांदीच्या पादुका केल्या जातात त्याबद्दल इथे कुठे वाचल्याच आठवत नाही.

सत्यसाईबाबा हवेतून नवरत्नांचे हार काढल्याच ऐकल आणि वाचल पण मग ते अशी नवरत्न काढून देशाची गरिबी दूर का करत नाहीत हे कधी कोणी सांगितल्याच आठवत नाही.

जेथे लोक सिध्दी विनायकाच्या मंदिरावर सोन्याचा कळस चढवताना पाहिल आहे तिथे भुकेल्या मुलांसाठी हा पैसा का वापरला नाही असा प्रश्ण का विचारला जात नाही?.

किती गोष्टी आकलानाबाहेरच्या आहेत. पण जशी ज्याची श्रध्दा अस म्हणून दुर्लक्षपण किती करायच कोण जाणे!


Nanduk_ind
Sunday, January 21, 2007 - 12:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुनिया झुकती हे झुकानेवाला चाहीये

Prady
Sunday, January 21, 2007 - 4:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च welcome back खूप दिवसांनी दिसलीस.

Dineshvs
Sunday, January 21, 2007 - 6:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका,
मला तुझे विचार वाचुन, एक मैत्रिण म्हणुन तुझा खुप अभिमान वाटतो.
तुझ्या निर्भिडपणाला मी मनापासुन दाद देतोय.
बाकि मी तुझ्या मताशी १०० टक्के सहमत आहे.


Mahesh
Monday, January 22, 2007 - 4:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन एक मुद्दा म्हणजे, बरेच लोक त्यांचा काळा पैसा अशा ठिकाणी देणगीच्या स्वरुपात देऊन, नंतर वेगळ्या मार्गाने तो पांढरा करत असण्याची पण शक्यता आहे. उदा. वर उल्लेख केल्याप्रमाणे पेन्स, किचेन्स, ई. ची मोठी Industry .
यामधे बापूंसारख्या लोकांचा प्रत्यक्ष हात असेल असे नाही, पण बरेचदा चांगल्या व्यक्तीची प्रसिद्धी वापरून आपले उखळ पांढरे करणारे लोक असतात समाजात.
हे सर्व निव्वळ अंदाज आहेत, खरी परिस्थिती हरी जाणे.


Himscool
Monday, January 22, 2007 - 11:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी इथे एक वेगळा मुद्दा मांडू इच्छितो... ही जी सर्व बाबा, बुवा वगैरे मंडळी आहेत आणि त्यांचे जे प्रस्थ आहे हे मुळात का घडत आहे ह्यावर जरा विचार व्हावा असे वाटते आहे जेणे करून असे का घडते त्याची कारणमीमांसा करता येणे शक्य होईल...

सध्या धकाधकीच्या जीवनात सगळेजण प्रचंड Stress खाली असतात. त्यामुळे depression येणे, इतर काही मानसिक आजार होणे असे परिणाम होतात... बर्‍याच वेळा ओळखीचे कोणी तरी कोणत्या तरी बाबांचे नाव सुचवते व त्यांच्याकडे जाऊन आलास / आलीस तर बरे वाटेल असे सुचवते.. आणि तो किंवा ती एकदा तिथे जाऊन येतो / ते... जेणे करूण काही कालासाठी मानसिक समाधान मिळते... आणि मग नेहमी नेहमी तिथे जाऊन त्यांचा अनुयय वगैरे प्रकार चालू होतो.. आणि मग काही जण ह्याचा योग्य प्रकारे गैरवापर करून पैसे मिळवण्याचा उद्योग करतात...
कमकुवत किंवा दुर्बळ मनोवृत्तीची माणसे हीच बहुतेक वेळेस ह्या प्रकारात आढळतात.. ह्या परिस्थिती मध्ये त्यांना मदत होण्यासाठी दुसरे काही मार्ग उपलब्ध आहेत का जेणे करुन ह्या लोकांचे मानसिक स्वास्थ सुधारेल?


Manmouji
Tuesday, January 23, 2007 - 2:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे एखादा माणुस व्यसनाकडे जसा वळतो, तसाच बुवाकडे वळतो, असे असावे काय?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators