Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 18, 2007

Hitguj » Religion » व्यक्ती » Annirudha Bapu » Archive through January 18, 2007 « Previous Next »

Vaishali30
Wednesday, January 17, 2007 - 10:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sarvapratham Maayboliche aabhar. Maaybolichi sarva topics kharach khup chhan aahet. Tyamule tyamadhe aankhi kaahi add karavese vatale mhanun ha chhotasa prayatna. Mi Annirudha Bapunchi Bhakta aahe. Maaybolichya group madhe koni Bapunche bhakta aslyas kalva. mala tyanchyasi bolayala nakkich avadel.

Mahesh
Wednesday, January 17, 2007 - 11:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे अनिरुद्ध बापू कोण आहेत ?
त्यांचे नाव कधीतरी वाचले / ऐकले आहे,
पण त्यांची काहीच माहिती नाहीये.
जरा सांगू शकाल का ?
देवनागरीत लिहिलेत तर वाचायला सोपे जाईल.


Ajjuka
Thursday, January 18, 2007 - 6:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही ही ही..
कोणीही उठतो आणि सांगतो मी विष्णूचा अवतार.. चालले सगळे मागे मागे..
मुंबईच्या के. ई. एम. हॉस्पिटलमधल्या एका डॉक्टरला mal practise च्या संदर्भात नोकरीतून म्हणे काढले आणि मग अचानक त्याला आपण विष्णूचा अवतार असल्याचा साक्षात्कार झाला... त्याचा अनिरूद्ध बापू झाला...


Mahesh
Thursday, January 18, 2007 - 7:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय सांगतेस काय आज्जुका ?
मला या व्यक्तिची नावापलीकडे काहीच माहिती नाहीये.
पण मागे एकदा मी पुण्यात अवेळीच कसलीतरी पालखी पाहिली होती. त्यात कोणी व्यक्ती होती की नाही आठवत नाही, पण या अनिरुद्ध बापूंच्या नावाचे फलक होते सगळीकडे. आणी चांगले सुशिक्षित, सुसंस्कृत दिसणारे लोकच खुप होते गर्दीमधे.
पण हे सत् गृहस्थ नक्की कोण आहेत, काय करतात, एवढे प्रसिद्ध होण्यासारखे त्यांनी काय केले आहे, हे जाणुन घ्यायला आवडेल.
मी लगेच त्यांचा भक्त किंवा अभक्त होणार आहे असे नाही, पण माहिती असलेली बरी.


Vaishali30
Thursday, January 18, 2007 - 8:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्याड्म अज्युका अनिरुद्ध बापू हे स्वत:ला कोणाचा अवतार मानत नाहीत. आणि आपल्याला जर कोणाबद्द्ल अपुरी माहिती असेल तर त्याबद्दल कधीहि न बोलणे बरे. अन्यथा स्वत्:चे हसू होण्याचा जास्त सम्भव असतो.

Ajjuka
Thursday, January 18, 2007 - 8:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश, डॉक्टर असणे, के ई एम, मुंबई आणि नोकरीतून काढून टाकणे इत्यादी माहिती मी जमवलिये.. या व्यक्तीच्या कर्तुत्वाबद्दल..
मधे लोकप्रभा मधे वर्षभर यांचं गुर्‍हाळ येत होतं.. त्यात फक्त सर्वसामान्यांना दिपवून टाकणारी जड जड अलंकारीक भाषा आणि शब्दांचा मस्त गुंता असायचा पण मुद्दा काहीच नाही.
या बापूच्या स्तोत्रांपैकी एका स्तोत्रात.. तुला दोन रूपये दिले तर तू दोन लाखाची परतफेड करतोस.. अश्या स्वरूपाची ओळ आहे. ते ऐकून मी हसून हसून मेले होते.
या बापूच्या नावे थोडेफार सामाजिक कार्य चालते म्हणे.. साक्षरता, गरिबांना मदत इत्यादी इत्यादी.. पण यासाठी देव, अवतार असल्याचा सगळा गाजावाजा का करायला हवा कळत नाही.
हे जे सगळे लोकांना मूर्ख बनवण्याचे आश्रम आहेत इथे करोडोंनी देणग्या येत असतात.. यांची उपासना केंद्रे असतात त्यात पुढे बसण्याचा मान मिळायचा असेल तर मोठी देणगी द्यावी लागते किंवा मोठे तिकिट काढावे लागते.
आता एवढ्या जमवलेल्या पैशातून एखाद दुसरा टक्का 'समाजोपयोगी' कामासाठी खर्च केला तर कौतुक काय? tax benefit साठी कितीतरी industries हे करतातच की. पण निदान industries मधून काहीतरी उत्पादन होत असते. इथे तेही नाही.
एकटा बापूच नाही सगळ्याच आश्रमाबद्दल हे म्हणता येईल..
मुळात आपल्या पिढीतच गेल्या पिढीपेक्षा दैववाद वाढतोय.. स्वतःच्या कर्तुत्वावर पुढे जाण्यापेक्षा या बुवा महाराजांच्या कुबड्या लोकांना जवळच्या वाटतायत..
बर यांचे कर्तुत्व सगळे चमत्कारांच्यापुरतेच हो.. याचं ते केलं, त्याचं हे केलं, याला तिथून सोडवलं.. इत्यादी इत्यादी..
जगण्याची philosophy नाही ना देत हे लोक. आणि खरे बोलावे, कष्ट करावे इत्यादी basic गोष्टी सांगायला गुरू बिरूंची का गरज पडते??
असो..


Ajjuka
Thursday, January 18, 2007 - 8:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैशाली बाई,
तुम्ही का चिडताय? तुमचे गुरू इतके पॉवरबाज असतील तर ते माझं काय करायचं ते करतीलच की.. किंवा ते खरंच एवढे महान असतील तर माझ्यासारख्या.. षड्रीपूंनी भरलेल्या सामान्य बाईच्या बडबडण्याने त्यांना काय फरक पडणार.. नाही का!!
तुम्हाला हसावसं वाटतय ना तर हसा की.. मला नाही भिती कुणी मला हसेल बिसेल याची. जे पटतं ते संपूर्ण आणि तसंच स्वीकारण्याची, तेच आयुष्यात बाणवायची हिंमत आहे माझ्यात.


Lopamudraa
Thursday, January 18, 2007 - 10:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी एक प्रकार मी ऐकलाय या बापुंबद्दल..
धुळ्याला हे बापु भक्तांना दर्शन द्यायला येणार होते.. तेही हेलिकोप्टर ने आणि ज्यला त्यांना हार घालायचा (पहिल्यांनादा स्वागत कराचे जवळ जावुन म्हणजे हेलिपंड जवळ.)मान हवा त्याने २५००० हजार द्याय्चे आणि हार घालाय्चा.. अजुन बरेच किस्से माहित आहेत मला.. माझी एक नात्यतली मावशी यांची खुप मोठ्ठी भक्त आहे. रोज पुजा करते तीच्यासमोर इतर सगळे त्यांचे भांडे फ़ोडत असतात. ती रडेल पण त्यांची भक्ती सोडत नाहि. तीला खुप सम्जाउन सांगितले सगळ्यांनी पण काही फ़रक नाहि.


Ajjuka
Thursday, January 18, 2007 - 11:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपण एकमकांना रामराम म्हणतो.. भेटल्यावर आणि निघताना.
गुजराथी लोक 'जय श्रीकृष्ण' म्हणतात.
बापूचे भक्त 'हरि ओम बापू!' असं म्हणतात..
ओम श्री अनिरूद्धाय नमः असं कैक गाड्यांवर लिहिलेलं असतं..
माझ्या घरातच हे प्रकरण आहे.. मला, संदीपला मिळालेल्या यशाचे श्रेय आमच्या कष्टापेक्षा.. 'बापूंची कृपा' असे मानले जाते तेव्हा तिडीक जाते डोक्यात.
रामाची, कृष्णाची, शंकराची, म्हसोबाची, खंडोबाची, मरीआईची, वेताळाची कोणाचीही कृपा म्हणा.. परवडेल.. पण बापूची???? माणूस च ना तो? माणूस म्हणून असलेले सगळे गूणदोष आहेतच ना त्याच्यात.. तो कसा काय देव झाला? काय त्रास आहे..
आता हे देव बनवणं नाही तर काय? आणि स्वतः नसाल करत हो पण हे एवढे भक्तगण आहेत ढीगाने ते म्हणतायत तुम्हाला देव त्यांना सांगा ना मी देव बिव काही नाही ते.. सामान्य माणूस आहे. माझी भजनं, आरत्या करू नका, गाडीवर मी देव असल्याप्रमाणे माझ्या नावाची stickers चिकटवू नका.. आहे हिंमत? नाही.. तस केलं तर stickers, photos इत्यादी merchandise चालणार कसा.. आणि profit होणार कुठून..
डॉक्टरकी झेपेना... मग काढला बिनभांडवली.. हमखास हजार टक्के profit देणारा धंदा.. लोकांना मूर्ख बनवायचा..
सगळ्यात वाईट म्हणजे.. हे भक्तगण असले कह्यात असतात ह्यांच्या.. जरा काही बोललं गेलं यांच्यविरूद्ध की चवताळून उठतात.. भावना दुखावतात म्हणे यांच्या.. अहो पण काय म्हणून दुनियेनेही मूर्ख बनायच.. तुम्ही बनलात म्हणून..


Princess
Thursday, January 18, 2007 - 11:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका well said . अरे देवा, मला वाटले फ़क्त माझ्याच नशीबी आहे ही कटकट... जे काही चांगले झालय, होणारेय, ते त्या बापुमुळेच... मला लग्ना नंतर खुप मानसिक त्रास झाला होता या गोष्टीचा.... कोणीतरी समदु:खी मिळाल्याचा आनंद झालाय. तु या सगळ्याशी कसे deal करतेस ए.भा.प्र.:-)?

मला तर माझी सासु जबरदस्ती त्यान्च्या दर्शनाला घेउन गेली होती.... आज आठवले तर माझाच राग येतो. जे आपण मनत नाही त्याला चिकटुन रहण्यासाठी पण हिम्मत लागते:-(

पण शिंची कटकट आहे यार... डॉक्टरकीची एक सीट नासवली. आणि डॉक्टरकी सोडुन काय करताय.... तर बापुगिरी.... i really hate this



Gurudasb
Thursday, January 18, 2007 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहं ब्रह्मास्मि l अहं ब्रह्मास्मि l l l l

Princess
Thursday, January 18, 2007 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यांच्या बद्दल तुला अजुन काय माहिती आहे? जरा सांग ना... होउ दे की पितळ उघडे...:-)

Vaishali30
Thursday, January 18, 2007 - 11:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रत्येक नण्याला दोन बाजू असतात. त्यामुळे कोणाला जे काही बोलायचे असेल ते बोला. मात्र मी बापू भक्त आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. हे सदर फक्त बापू भक्तासाठी आहे. त्यामुळे ज्याला निन्दा करायची त्यने खुशाल करावी.
असो, महेश इतके मेल वाचल्यामुळे तुमचा नक्कीच गैरसमज झाला असेल. बापू कोणी चमत्कारी, जादुगर नाहीत, ते सदगुरु आहेत. प्रपन्च संभळुन परमार्थ कसा साधायचा हे त्यान्च्याकडुन आम्ही शिकलो. बान्द्र्याला दर गुरुवारी प्रवचन असते. जुईनगर येथे त्यान्चे मंदिर आहे. सम्पूर्ण जगभर त्यान्ची उपासना केन्द्रे आहेत. आज करोडोपटीने त्यान्चे भक्त आहेत. त्यान्च्या १३ कलमी योजना आहेत. ज्याद्वारे गरिब, अनाथ लोकान मदत केली जाते. ज्यामधे बारामास चारा, चरख्यावर सूत कातणे, अन्नपूण, रक्तदान, रामनाम ब्यन्क, अहिल्या सन्घ, ए ए डी एम, भाषा सन्गम आदिचा समावेश आहे.
भक्ति आणि सेवेतून ईश्वराला प्राप्त करणे, संकटे आल्यानंतरही न डगमगता सामना करणे हे त्यानीच आम्हला शिकवले.


Vinaydesai
Thursday, January 18, 2007 - 2:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Unfortunately वैशाली.. बापू हे विष्णू, त्यांची बायको ही लक्ष्मी आणि त्यांचे एक जवळचे मित्र हे शेषनाग असं स्पष्टपणे लोकांना सांगितलं जातं, त्यांच्याच भक्तांकडून......

बाकी चालू द्या...


Zakki
Thursday, January 18, 2007 - 2:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुळात आपल्या पिढीतच गेल्या पिढीपेक्षा दैववाद वाढतोय.. स्वतःच्या कर्तुत्वावर पुढे जाण्यापेक्षा या बुवा महाराजांच्या कुबड्या लोकांना जवळच्या वाटतायत..

गेल्या पिढीत सुद्धा हे प्रकार होते. खुद्द माझ्या भावाला एका 'बाबा' ने आमचे अमेरिकेतले घर नागपुरात बसून दाखवले! नशीब माझा भाऊ त्याला फक्त नमस्कार करून पुन: तिकडे गेला नाही!

आता या 'कुबड्या घेणार्‍या' लोकांबद्दल बोलायचे, तर नसते कुणाला काहीच कर्तृत्व! अपयश गिळून पुन: उभे रहाणे, हे करायला लागणारी मनाची ताकद त्यांच्यात नसते.

हुषार, प्रचंड श्रीमंत लोक सुद्धा त्या बाबांच्या मागे लागतात. ते का हे माझ्यासारख्या श्रीमंत नसलेल्या माणसाला कळत नाही, पण एकच खात्री आहे, की ते बाबाच्या मागे लागले तरी कुठेतरी स्वत:ची अक्कल लढवल्याशिवाय श्रीमंत झाले नाहीत. जसे सुंदर बाईला जाहीरातीत घेतले की विक्री वाढते, तसेच बाबांचे नाव घेतले की बरेच लोक त्यांचा माल विकत घेऊन त्यांना आणखी श्रीमंत करत असतील!



Divya
Thursday, January 18, 2007 - 3:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला स्वताला सुद्धा हे प्रकरण फ़ारस पटल नाही. मी ते लोकप्रभाचे लेख वाचले होते, खुपच न पटण्यासारख आहे. अध्यात्मात खरा गुरु तुम्हाला आत्मज्ञानाच्या संदर्भात मार्गदर्शन करतो. आत्तापर्यन्त होउन गेलेल्या संतांमधे असे देणग्या स्वीकारणारे, स्वताला विष्णुचा अवतार म्हणवणारे आणि स्वताची आरती करुन घेणारे कोणी दिसले नाही. एखादा तत्वज्ञानी असण असु शकेल पण म्हणुन तो काही देव नाही.

Ajjuka
Thursday, January 18, 2007 - 3:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

|हे सदर फक्त बापू भक्तासाठी आहे.|

माफ करा बाई हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला नाही. बापू भक्त असलात तरी नाही. असो, तुमच्या वैयक्तिक श्रद्धा तुमच्यापाशी.. तुम्ही काय करावं हे मी सांगू शकत नाही पण जे बापूला मानत नाहीत ते चूक असे म्हणणार्‍या बापूभक्तांना मी काडीची किंमत देत नाही..

|भक्ति आणि सेवेतून ईश्वराला प्राप्त करणे, संकटे आल्यानंतरही न डगमगता सामना करणे हे त्यानीच आम्हला शिकवले.|

मला एक सांगा ह्यासाठी बडबड करणारा भोंदू बाबा का लागतो? भक्ति व सेवा यातून ईश्वर मिळतो हे सांगण्यासाठी देवाचा अवतार म्हणवणारा माणूस कशाला? येशू ख्रिस्त, महम्मद पैगंबर, यच्चयावत हिंदू महात्मे, महात्मा गांधी आणि तुमचा आमचा पहिला गुरू आपापली आई... हे सगळेच हेच सांगतात.. तरीही कळले नाही? येणारी परिस्थितीच संकटांना तोंड द्यायला शिकवते हो तुम्हाला. आणि ती शिकवणं न घेता येण्याएवढे करंटे, दुबळे तुम्ही असाल तर पडता मोडून.. survival of the fittest.. असो..

प्रिंसेस, स्माईली टाकल्यामुळे तुझा सूर नक्की कसा आहे ते कळत नाहीये पण जर खरंच मी कसं deal करते याच्याशी हे हवं असेल तर त्याचं उत्तर
"मला नाही भिती कुणी मला हसेल बिसेल याची. जे पटतं ते संपूर्ण आणि तसंच स्वीकारण्याची, तेच आयुष्यात बाणवायची हिंमत आहे माझ्यात."
य माझ्या वरच्या वाक्यात आहे.

झक्की.. मला गहीवरून येण्यापूर्वी तुम्ही काहीतरी वेडेविद्रेपणा सुरू करा.. कृपया.. :-)



Mansmi18
Thursday, January 18, 2007 - 3:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Vaishali30,
You can always ignore the messages you do not agree with and correspond to those who do.
Do not try to tell others what they should do/not do..people do not like it and they wont follow it.

Ajjuka,

I do not see what point you are trying to make by posting these messages. Do you feel this person should close this BB?

"Mala nahi Bhiti koni mala hasel yachi, Je patate te sampoorna sweekarnyachi, tech banavayachi himmat ahe mazyat".
If you stand by your statement above you should also accept right of other people to follow the same for the principle that they believe in.

Kind regards




Mrinmayee
Thursday, January 18, 2007 - 3:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी देखील 'अनिरुध्द बापुंची' भक्त आहे. गेल्या तेरा वर्षांपासून अनुग्रह घेतलाय. त्यांच्याबद्दल लिहिण्यासारखे भरपूर आहे. पण आज त्यांच्या दुपारच्या भोजनाची जबाबदारी मी शिरी घेतल्यामुळे लिहिण्यास वेळ नाही. तेव्हा पुन्हा कधीतरी.. :-)

Kedarjoshi
Thursday, January 18, 2007 - 4:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बान्द्र्याला दर गुरुवारी प्रवचन असते. जुईनगर येथे त्यान्चे मंदिर आहे.>>>>>>.

काय चाल्लय काय? जिंवत माणसाचे मंदीर. का? प्रत्यक्ष कृष्णाचे पण मंदीर न्हवते तो जिंवत असताना.

वैशाली तुमची रास मकर किंवा तुळ आहे काय? कारण ह्या राशीचे लोक भोंदुगिरी, बुवाबाजी ला बळी पडतात व त्यांना ते कळत नाही.

मान्य की तुम्ही भक्त आहात. पण थोडा विचार करा. दुसर्या एखाद्या (कितीही चांगल्या) माणसाचे भक्त होन्या पेक्षा तेवढा वेळ ध्यानात राम वा कृष्णाचा भक्तीत घाला. मोक्ष खरच असेल तर तो प्राप्त होन्यास मदत होईल.

माझ्या आज्जीला मी असेच सुनावाले होते. आसाराम बापु मुळे. आता ते वेड थोडे बंद झाले पन तितक्यात रामदेव आलेच. (निदान ते योगा तरी शिकवतात म्हणुन ओके).

अशा बुबाबाजी(ई) करणार्या लोकांपासुन सावध राहा.

जे लोक " अंह ब्रम्हास्मी " म्हणतात त्यांना " तत्वमसि " हा शब्द माहीत नसतो.

अज्जुका म्हणते ते बरोबर आहे. त्याचा विचार करा. व कुठल्याही बुबा ला बळी पडु नका.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators