|
Shreeya
| |
| | Saturday, April 15, 2006 - 9:01 pm: |
| 
|
Hi Goutami, you can get online gajanan maharaj pothi at http://www.gajanan-shegaon.com/
|
मीता, जप चालू केला असशीलच. अनुभवाची अपेक्षा करू नये. ते हळूहळू येत रहातील. सुरुवातीला मन एकाग्र करण्याकडेच लक्ष असू द्यावे. अनुभवाची अपेक्षा करून जप केले आणि जर नाही आले तर एक प्रकरचे frustration येऊ शकते. ते होऊ देऊ नकोस. काही लोकांना जप चालू करून १५ दिवसाच्या आत अनुभव आलेत तर काही लोकांना १२ / १२ वर्षे जप करून सुद्धा अनुभव आलेले नाहीत (अर्थात असे लोक खूपच कमी आहेत.) problem असतो तो जप करण्याच्या पद्धतीत. निर्विचार अवस्थेत जप होणे महत्वाचे. ते करण्याचा प्रयत्न करावा. तुला जप कसा करायचा हे "मी" तुला सांगितलेले नसून श्री स्वामींनीच माझ्याकडून सांगितले आहे. (ही माझी भावना आहे.) तेव्हा जप चालूच ठेव अनुभव नक्कीच येतील.
|
Mita
| |
| | Monday, April 24, 2006 - 10:07 pm: |
| 
|
महेश, जप अजुन सुरु केला नाही पण नामस्मरण सुरु केले आहे. अखंड घेणे काही जमत नाही,तरीहि प्रयत्न करते आहे. अगदि ५ मिनीटे सलग घेणे पण अवघड होते. मधेच मनात दुसरे विचार सुरु होतात. खरच मनाला एकाग्र करण्याएवढे अवघड दुसरे काहि नाही.
|
Moodi
| |
| | Monday, April 24, 2006 - 10:15 pm: |
| 
|
मीता जर दृढ विश्वास असेल तर मग स्वतच म्हण स्वामींना की मी शरण आलेय माझ्याकडुन हा जप तुम्हीच करुन घ्या. माझा अनुभव सांगते. मला जप करायला सांगीतला एका ज्योतिष्यानी. आई तर आधीच मागे लागली होती माझ्या. मग माळ हातात धरली की पडायची, २ बोटात धरणे खुपच कठिण झाले होते, वैतागुन मी ते सोडायचा निर्णय घेतला, मग माझे मलाच विचित्र वाटले अन मी स्वामीना म्हटले की तुम्हीच माझ्याकडुन आता हा जप करुन घ्या, स्वामींची कृपा की मला माळ हातात धरता तर आलीच अन जप पण पुर्ण होत आला. कोल्हापूरची श्री महालक्ष्मी माझी माहेरची कुलदेवता, तिने तर खुप दैवी अनुभव दिलेत. काही अनुभवांनी मी निराश होवून जेवढे दुर जायला बघते, तेवढा देव जवळ येतो. काय माहीत काय नशीब आहे ते. माझे मन एकाग्र होत नाही. पण पूजा मला आवडते हे नक्की. 
|
मीता, जप लवकरात लवकर चालू करावा. मन एकाग्र होतच नसते सुरुवातीला. शेवटी मन उभ्या पिकातलं ढोर आहे....त्याला विचारांपासून दूर करणे खरंच अवघड आहे. प्रयत्न चालू ठेवावा. माझेही मन कुठे एकाग्र होते? जेव्हा ते एकाग्र होत आहे असे वाटत असतानाच जप संपत आलेला असतो. असो. तुम्ही असेच इथे लिहित रहा. मूडी म्हणतेय ते खरेच आहे. श्री स्वामींना विनंती केली कि सगळे आपोआप होत राहील. प्रयत्न जरूर करावा.
|
श्री स्वामी समर्थ! समर्थ भक्तांना अभिवादन. मि गेले १० वर्ष समर्थांच्या भक्तित आहे.खुप प्रचिति येते.जप,नामस्मरणाने मन शांत होते.मी दिंडोरी प्रणित(नाशिक) केंद्रात जायचे.भारतात गेल्यावर नियमीत जाते. मिता अवश्य जप कर,तुला स्वामीच दिशा देतिल. " श्री स्वामी समर्थ "
|
Shreeya
| |
| | Wednesday, April 26, 2006 - 1:22 am: |
| 
|
महेशजी, मला जप आणि नामस्मरण यातिल फ़रक तर कळला पण एक शन्का आहे कारण आपण वर सान्गितल्याप्रमाणे माझ्याकडुन आत्तापर्यन्त फ़क्त नामस्मरणच झाले आहे(मला फ़रक तुम्ही सान्गितल्यावरच कळला) मग फ़क्त "जप"केल्यावरच श्री गुरुन्ची कृपा होते काय? की नामस्मरण ही चालते? कारण मला जप नियमितपणे होईल का याची खात्री नाही. "जप" जमेल तसा केला तर चालतो काय? का रोजच करावा thanks in advance!!
|
Prajaktad
| |
| | Wednesday, April 26, 2006 - 1:23 pm: |
| 
|
श्रीया!महेश तुला उत्तर देईलच नियमित जप करणे शक्य नसेल तर गुरवारी(श्री स्वामींचा वार )अवश्य जप करावा.
|
Shreeya
| |
| | Thursday, April 27, 2006 - 3:23 am: |
| 
|
Thanks prajaktad!! मी नक्की प्रयत्न करीन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!
|
Mrdmahesh
| |
| | Thursday, April 27, 2006 - 5:55 am: |
| 
|
श्रीया, वाचून आनंद वाटला की तुझ्याकडून नामस्मरण होत आहे. नामस्मरणाने तुमचा पुण्यसंचय वाढत रहातो. तुम्ही श्री स्वामी भक्तीत रममाण रहाता. नामस्मरणाने प्रत्येकाला त्याच्या पूर्वकर्माप्रमाणे फायदे होत असतात. मन शांत आणि स्थिर रहाते. पण जपामुळे तुम्ही श्री स्वामींच्या अधिक जवळ जाता. तुम्हाला आध्यात्मिक अनुभव येऊ लागतात. तुमच्या अडीअडचणीतून तुमचा तुम्हालाच मार्ग दिसू लागतो. जपामुळे तुमची आध्यात्मिक प्रगती नामस्मरणाच्या मानानी लवकर होते. हा फार मोठा फरक नामस्मरण आणि जपात आहे. तुझा प्रश्न माझ्यासारख्यासाठी अवघड आहे. मला गुरुप्राप्ती झाली ती माझी काहीतरी पूर्वपुण्याई असेल म्हणूनच. कारण मला माझ्या मित्राने (जो जप करत नाही, ज्याला गुरु नाहीत) माझ्या कुलस्वामिनी चा जप करायला सांगितले होते. तो मी केला आणि काय आश्चर्य मला गुरु फक्त दीड वर्षातच भेटले (अजून त्यांनी मला अनुग्रह दिला नाहिये. पण त्यापेक्षाही बरेच काही दिलेले आहे.). जपामुळेच श्री गुरुंची प्राप्ती होते. परंतु ते तुमच्या पूर्वपुण्याईवर किंवा जपसंख्येवर सुद्धा अवलंबून आहे. गुरुभेटीची ओढ लागली पाहिजे. श्रीया तुला गुरुप्राप्ती नक्कीच होईल आणि तशी ती होवो हीच मी श्री स्वामीचरणी प्रार्थना करतो. रोज जप जमणार नाही असे सुरुवातीलाच म्हणू नये. मला ते जमेल असेच म्हणावे. परंतु आपल्यासारख्या संसारी लोकांना रोज जप करणे जमेलच असे नाही परंतु शक्यतो जप करावा. किमान ३ माळा तरी जप करावाच. सुरुवातीला थोडे अवघड जाईल पण एकदा सवय झाली की काही अडचण येत नाही. आता माझेच बघ. अपघातामुळे मला मांडी घालून बसता येत नव्हते म्हणून माझी आई पूजा करायची. मला तो पूजेचा वेळ मिळायला लागला त्यामुळे मी रोज ११ माळा जप करत होतो. पण पुढे श्री स्वामीकृपेने मला अर्धा तास का होईना बसता येऊ लागले. मी परत पूजा करू लागलो. पण जप होईना. कसाबसा ५ माळा करू लागलो. मग ठरवले सकाळी लवकर उठून ११ माळा करायच्या मग पूजा. मला हे आता बर्यापैकी जमू लगले आहे. आता मला बरोबर ६:३० ला जाग येते (काल अगदी थकून झोपलो होतो. पाठ दुखत होती. मठात सेवा केली. तरी सुद्धा जाग आली.) हे असले काही होत असते. माझे एक स्नेही तर पहाटे ३:३० ला उठून ४५००० जप करतात. आता त्यांना येणारे अनुभव ऐकून थक्क व्हायला होते. जपाचा महिमा!!
|
Shreeya
| |
| | Friday, April 28, 2006 - 12:15 am: |
| 
|
धन्यवाद महेशजी!!! फ़ारच छान मार्गदर्शन केले तुम्ही!! माझ्या सर्व प्रश्नान्ची उत्तरे मिळाली. यापुढे मी कधीच "मला जमणार नाही" असे म्हणणार नाही. श्री स्वामी समर्थ!!! thanks again!!!
|
अग श्रेया... मी काहीच सांगत नाहीये. स्वामीच सांगत आहेत तुला. मी तर यात आताच आलोय. I am in playgroup in this field.
|
जपाबद्दल आणखी सांगयचे राहिले ते म्हणजे माळांची संख्या नेहमी विषम असावी. म्हणजे ३ / ५ / ७... अशी. ती जमेल तशी वाढवत न्यावी.
|
Mita
| |
| | Friday, April 28, 2006 - 6:43 am: |
| 
|
तुम्हा लोकांच्या प्रेमळ आग्रहामुळे मी जप सुरु केला. नामस्मरण पण जमेल तसे करते आहे. जपाची माळ नसेल तर दुसरा काहि उपाय? मी सध्या १५ मिनीटे जप करते. माळ नाही म्हणून हा मी शोधलेला उपाय आहे. महेश,मूडि,प्राजक्ता धन्यवाद, मला हा मार्ग दाखवल्याबद्दल.
|
मिता, माझे गुरु exactly हेच सांगतात. जर माळ नसेल तर किमान १५ मि. जप करावा. अगदीच मोजायचा असेल तर बोटावर करावा. पण तो अवघड आहे (कारण किती जप झाला ते कळत नाही. शिवाय तो एका विशिष्ट पद्धतीने बोटावर मोजायचा असतो जे सगळ्यांना जमतेच असे नाही.) म्हणून तू जो मार्ग काढलास तो १ नंबर . माळ मिळेपर्यंत असाच जप चालू ठेव. पुढे हळूहळू वेळ वाढवत न्यावी. बघ स्वामींनीच तुला मार्ग दाखवला.... bravo....
|
Maudee
| |
| | Friday, May 12, 2006 - 7:15 am: |
| 
|
mrdmahesh माळान्ची सन्ख़्या नेहनी विषम का असावी ह्याबदाल तुम्ही काही सान्गू शकता का?
|
शिल्पा, हा प्रश्न मला पण पडला आहे...मी माझ्या गुरूंना नक्की विचारून सांगतो..
|
श्री स्वामी समर्थ! माझ्या माहितिप्रमाणे,सम आकडा जसे २,४,६ हे आकडे पुर्णत्वाकडे निर्देश करतात. देवाच्या भक्तित किवा नुसते भक्तीत म्हणुयात! कधिच पुर्णत्व नसते म्हणुन विशम आकडे जसे ३,५,७,११ हे माझे एकिव अनुमान आहे,महेश तुम्ही तुमच्या गुरुंना विचारुन सांगा.
|
माळान्ची सन्ख़्या नेहनी विषम का असावी ह्याबदाल तुम्ही काही सान्गू शकता का? >>शिल्पा, माळांची संख्या नेहमीच विषम असावी असे नाही... शक्यतो असावी असे माझ्या गुरुंनी काल मला सांगितले... श्री स्वामी हे दत्त-अवतार मानले जातात. दत्त म्हणजे ब्रम्हा-विष्णू-महेश म्हणजेच ३ शक्ती, ३ हा आकडा विषम आहे म्हणून विषम असावी किंवा ३ च्या पटीत असावी असे त्यांचे म्हणणे पडले... पण त्याचे अजूनही काही निश्चितपणे पटेल असे कारण असावे असे गुरुंना वाटते (जे त्यांना माहित नाही.). त्यांनी पुढे मला सांगितले की तुम्ही मी सांगितल्या प्रमाणे जप विषम संख्येतच करा... तुम्हालाच त्याचे कारण आपोआप कळेल... त्यांनी मला असाही सल्ला दिला की तुम्ही अशा खोलात शक्यतो शिरू नये (या stage ला तरी) कारण अशा प्रश्नांची वेगवेगळी उत्तरे तुम्हाला मिळतील ज्यामुळे तुमचा वैचारिक गोंधळ होऊ शकतो. काही गोष्टी अशा असतात की त्यांची कारणे तुम्हाला या stage ला सांगावीच लागतात आणि काही गोष्टींची कारणे सांगता येत नाहीत. माळांच्या संख्ये बाबत दुसरी बाब लागू पडते... असो... माझ्या माहितिप्रमाणे,सम आकडा जसे २,४,६ हे आकडे पुर्णत्वाकडे निर्देश करतात.>> प्राजक्ता, मि गुरुंना याही बाबतीत विचारले... त्यांनी मला उलट प्रश्न केला की देवीचे जप हे १० माळांचे असतात मग त्याला काय म्हणायचे?.. त्यांनी पुढे असे सांगितले की मनुष्य जन्म हा मुळातच पूर्णत्वाला न पोचलेला जन्म आहे त्यामुळे जप कोणत्याही संख्येत केला तरी त्यात पूर्णत्व नसते. अर्थात हा विषयही खूप खोल आहे... माझ्या मते जे गुरुंनी करायला सांगितले आहे त्यात शंका / प्रश्न उपस्थित न करता ते ते करत रहावे व त्यातून जे आत्मज्ञान होईल तेच खरे ज्ञान आणि यातूनच आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात... मी माझ्यापरीने गुरुंना विचारून तुम्हाला यथामती उत्तरे दिली आहेत... या उत्तरांमधूनही काही शंका अजून उपस्थित होण्याची शक्यता आहे.. अशा सर्व शंकांचे निरसन स्वत:च उत्तरे शोधून करणे जास्त उचित राहील असे मला वाटते... || श्री स्वामी समर्थ
|
Maudee
| |
| | Friday, May 19, 2006 - 7:30 am: |
| 
|
नाही महेश, मी ख़ोलात नाही शिरत आहे.....फ़क्त सहज म्हणुन विचारले.... thanx
|
|
| चोखंदळ ग्राहक |
 |
| महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
| पांढर्यावरचे काळे |
|
| गावातल्या गावात |
|
| तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
| आरोह अवरोह |
|
| शुभंकरोती कल्याणम् |
|
| विखुरलेले मोती |
|
|
|
| हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|