Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 14, 2006

Hitguj » Religion » व्यक्ती » Shree Swami Samarth » Archive through April 14, 2006 « Previous Next »

Mai
Thursday, March 30, 2006 - 10:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो मूडी मला तेच म्हणायचे होते, कारण इथे आमच्याकडे आता शुक्रवार उजाडला आहे ना
मला कोणी स्वामीन्च्या आवडीचे पदार्थ कोणते होते ते सान्गाल का, कारण त्याना सन्ध्याकाळी नेवैद्य दाखवायचा आहे.


Moodi
Thursday, March 30, 2006 - 10:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग ऑस्ट्रेलीयात आहे होय, मी समजले की us मध्ये आहेस.

भजी, पुरण तर माहीत आहे मला. नाहीतर पुरणाच्या ऐवजी लाडु पण बनवु शकतेस.


Mai
Thursday, March 30, 2006 - 10:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks moodi.
devnagari madhye thanks madhlaa "tha " kasaa lihitaat malaa maahit nahi, mhanun he english !!
I know that He used to like Moogachi khichadi also ! Is that true ?

Moodi
Thursday, March 30, 2006 - 10:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ग. पण पुरण अन भजी सुद्धा. थॅंक्स असे लिही tha.c.nks .

Maanus
Thursday, March 30, 2006 - 10:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे सांगायचेच विसरलो.
आज डेअरी वर स्वामी समर्थांचा जयंती बद्दल कार्यक्रम आहे.

नव्यानेच तिथे पादुकांची स्थापना झाल्याने जास्त लोकांना माहीती नाही. माझ्यामते कार्यक्रम दिवसभर आहे.

चांदनी चौकापासुन २५ कि. मी. वर पौड गाव आहे. गाव जिथे संपते तिथे कुणालाही डेअरी कुठे आहे विचारले तरी ते तुम्हाला डेअरीवर घेउन जातील. गावात नविन आलेल्या पाखरांशिवाय बाकी सगळ्यांना डेअरी कुठे माहीत आहे. कोणी पत्ता सांगणार नाही असे नाहीच, तरी detail मधे सांगतो कसे जायचे.

जेव्हा तुम्ही पौड गावात शिरता, तेव्हा S.T. Stand ला दोन रस्ते आहेत डावीकडचा मुळशी धरणाकडे जाणारा रस्ता घ्या. दुसरा रस्ता कुळ्याला जातो.

ह्या रस्त्यावर गाडीने साधारण ८-१० मिनीट गेल्यावर गाव संपते, तेव्हा लगेच उजवीकडे काही steel च्या पत्र्याची shades लागतील, तीच डेअरी. आत जायला घाबरु नका, आत एकपन म्हैस नसल्याने स्वच्छता चांगली आहे.

टीप: तुम्हाला ह्या program व्यतिरीक्त कधी जायचे असेल तर गुरवारी जा. त्याचे काय आहे सध्या व्यवसाय बंद असल्याने बाकी दिवशी कोणी तिथे असेल नसेल सांगता येत नाही. तर उगाच तुमचा खोळंबा नको व्हायला.


Mai
Thursday, March 30, 2006 - 10:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थॅंक्स ग मूडी
आता ठरला नेवैद्याचा बेत.


Moodi
Thursday, March 30, 2006 - 10:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता भारतात असते तर निदान हे डेअरीकडे जमले नसते तरी निगडी, चिंचवड किंवा पुण्यातील मठात नक्कीच गेले असते.
पण पुढे जमेल तेव्हा बघेन रे हे तू सांगीतलेले ठिकाण.


Mai
Thursday, March 30, 2006 - 11:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणुस, बरे झाले सान्गितलेस ते, आता मी पुढच्या महिन्यात येईन तिकडे तेव्हा नक्की दर्शनाला येईन मठात.

Moodi
Friday, March 31, 2006 - 10:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज आमचे गुरु दत्तावतार श्री स्वामी समर्थ यांची जयंती. त्यांना अगणीत प्रणाम.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.


Maudee
Friday, March 31, 2006 - 11:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे समर्थान्च्या भक्तान्चा ग्रूप बघून माज़ा आनन्द गगनात मावात नहिये...मी पण जप करते...गेले काहि वर्Yए.....काही अनुभव पण आले आहेत मला...

Mrdmahesh
Monday, April 03, 2006 - 5:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Maudee, कृपया तुम्ही
/hitguj/messages/103384/104553.html?1142837126 या बीबी वर तुमचे अनुभव लिहावेत अशी माझी तुम्हाला विनंती आहे.
आमच्य स्वामींच्या मठात उत्सव खूप छान झाला. तिथून यावेसे वाटत नव्हते.


Mrdmahesh
Thursday, April 13, 2006 - 9:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज (१३ एप्रिल) ऑफिसला येताना एक रिक्षाच्या मागे श्री स्वामी समर्थ असे लिहिले होते आणि ते पाहून माझ्या डोळ्यात टचकन पाणी आले. ते का आले ते सांगतो. -
बरोबर १ वर्षापूर्वी मला अपघात झाला होता. गुडघ्याला दुखापत झाली. आतले लिगामेंट हाडातून निघाले होते. तिथेच छोटे छोटे २ फ्रॅक्चर्स पण झाले होते. operation झाले पायाला plaster घातले. ते २ महिन्यांनी काढले. physiotherapy मुळे चालू लागलो. डॉ. नी ऑफिसला जायची परवानगी दिली. रिक्षा करून जावं लागायचं. पत्नी रिक्षा बोलवायची (मी कुबड्यांच्या साह्याने चालायचो) मी बसून जायचो. पहिल्या दिवशी जाताना हा रिक्षावाला अशी काही रिक्षा चालवायचा की बस. त्यातून ही पुण्याची traffic काही नियम नाहीत. जीव मुठीत धरून निघालो. थोडे अंतर गेल्यावर पुढे एक रिक्षा होती त्याच्या पाठीमागे श्री स्वामी समर्थ असे लिहिले होते खूप बरे वाटले. रिक्षावाला धोकादायकपणे रिक्षा चालवत होता. त्याच्यावर ओरडावे असे वाटले तेवढ्यात २ वाहने गेली दोन्हीवर तेच लिहिलेले! पुढे टिळक रोड वर तर ५ / ६ वाहने गेली त्यावरही श्री स्वामी समर्थ! जणू काही स्वामी मला सांगत होते अरे भिऊ नकोस मी आहे ना तुझ्या पाठीशी! अंगावर रोमांच उभे राहिले. डोळे पाण्याने भरून आले. श्री स्वामी मला जणू सांगत असावेत, तुझे भोग तू भोगत आहेस. तुझ्या कर्माचीच फळे आहेत ती. पण आता तू माझ्याकडे आला आहेस. तुला तुझा हा भोग जाणवणार नाही याची काळजी मी घेतो. रिक्षावाल्यावर ओरडलो नाही. ऑफिसला सुखरूप पोहोचलो. नंतर दीड दोन महिने मी रिक्षाने जात होतो. जवळपास रोज (जाताना / येताना दोन्हीवेळी) मला श्री स्वामी समर्थ असे लिहिलेली ८ / ९ वाहने हमखास दिसायचीच. आता हे बंद झाले आहे. आता जेव्हा जेव्हा मी ऑफिसला जाताना / येताना स्वामींचे स्मरण करतो तेव्हा तेव्हा २ / ३ मिनिटात श्री स्वामी समर्थ असे लिहिलेले (किंवा त्यांचे sticker असलेले) वाहन समोर येतेच. आणि आजही तेच झाले होते.


Mrdmahesh
Thursday, April 13, 2006 - 9:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आधीच्याच post शी संबंधित आहे हा अनुभव -
ऑफिस मधून घरी जाताना आमचा security guard सर रिक्षा आणतो असे म्हणून मला रिक्षा आणून द्यायचा. त्याला पण मर्यादा होत्या तो shift मध्ये काम करायचा. त्यादिवशी दुसराच security guard होता. घरी जाताना lift मध्ये विचार केला की आज मला कोणी रिक्षा आणून देईल का? रिक्षा मिळेल का? (कारण रिक्षा स्टॅंड रस्त्याच्या पलिकडच्या बाजूला होता. रिक्षावाले या बाजूला यायला नकार देत. शिवाय लांब अंतर असल्यामुळे तर रिक्षा मिळणे अवघड व्हायचे.) स्वामींचे स्मरण केले आणि तसाच कुबड्या टेकत टेकत lift मधून बाहेर पडलो. as expected security guard ने नुसते पाहिले आणि तो कामात गर्क झाला. इतरवेळी तिथे २ / ३ security guards आणि office boys असतातच पण नेमके त्यादिवशी तिथे त्या एकट्या security guard शिवाय कोणीही नव्हते. तेवढ्यात एक माणूस समोर आला आणि म्हणाला "सर रिक्षा आणतो." आणि रिक्षा आणायला निघून गेला सुद्धा! त्याने रिक्षा आणली. मी त्याला विचारले "तू कोण?" त्याने सांगितले "मी driver आहे. माझी गाडी तुमच्या कंपनीने भाड्याने घेतली आहे." आता पहा कोण कुठला माणूस. काही संबंध नसताना त्याने मला रिक्षा अत्यंत आदराने आणून दिली होती. ही श्री स्वामींचीच लीला नव्हे तर दुसरे काय?
अशा दिव्य परमात्म्यांना शरण गेले तर ते अशी छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा आपली पाठराखण करत असतात.
श्री स्वामी समर्थांना माझे कोटी कोटी प्रणाम!


Moodi
Thursday, April 13, 2006 - 12:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश असे अगणीत अनुभव मी अन माझ्या आईने घेतलेत. परमेश्वर कोणत्या न कोणत्या रुपाने आपल्या पाठिशी रहातोच, फक्त आपण ते ध्यानात ठेवावे.

पुण्यातील मंडईमधील मठात मी नेहेमी जाते. लग्नापूर्वी मी एकदा अशीच दर्शनासाठी गेले होते तेव्हा तिथे एका मुलाने माझ्या हातात पास दिला अन म्हणाला की आज उत्सवानिमीत्त जवळच्या हॉलमध्ये प्रसादाचे जेवण आहे, चला तिकडे. मला काम असल्याने खुप घाईत होते तेव्हा तो म्हणाला अहो इथे लोकांना मागुन सुद्धा अशी संधी मिळत नाही, देवाला नाही म्हणुन नका. मग मी तिकडे गेले अन प्रसाद घेतला.
मठात एवढी गर्दी असुनही मला पटकन ती संधी मिळाली याचेच आश्चर्य वाटले. स्वामींचीच कृपा.


Mrdmahesh
Thursday, April 13, 2006 - 2:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश असे अगणीत अनुभव मी अन माझ्या आईने घेतलेत.>>
तुमचे अनुभव इथे लिहाल का?
महेश तुमची मेल मिळाली आहे, उत्तर पाठवेन वेळ मिळाला की रागवु नये.>>
BTW मला अजूनही तुमची mail मिळालेली नाही. आता मला वेळ मिळालाय मी रागवीन बरंका

Moodi
Thursday, April 13, 2006 - 2:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लक्षात आहे हो पण दररोज एवढ्या मेल येतात की मग असे होते ते.. faint

Mita
Thursday, April 13, 2006 - 8:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांचे अनुभव फ़ारच छान आहेत. स्वामी समर्थ यांच्याबद्दल ऐकून माहिती होते पण प्रत्यक्श अनुभव असलेले कोणी माहित नव्हते.

मूडि,महेश मला नामस्मरण कधी करावे, कसे करावे, त्याचे काहि नियम आहेत का, नामस्मरण सुरु करण्यासाठि चांगला दिवस कोणता याची माहिती द्याल का?


Ameyadeshpande
Thursday, April 13, 2006 - 8:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीता - आज आत्ता ताबडतोब :-) (मुडी, महेश सांगतील पण माझं म्हणणं आहे ह्या गोष्टीला वेळ वगैरे बघायची गरज नाही) अखंड आणि अविरत घ्यावं.

Mrdmahesh
Friday, April 14, 2006 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडि,महेश मला नामस्मरण कधी करावे, कसे करावे, त्याचे काहि नियम आहेत का, नामस्मरण सुरु करण्यासाठि चांगला दिवस कोणता याची माहिती द्याल का? >>
मीता, अमेय जसे म्हणतो तसे नामस्मरण करायला दिवस वेळ पहावी लागत नाही. नामस्मरण आणि जप या दोन भिन्न गोष्टी आहेत. नामस्मरण हे अखंड असावे. रोजचे व्यवहार करत असताना आपण जे नाम घेतो ते नामस्मरण. पण माळ घेऊन किंवा बोटावर नाम मोजून, ध्यान लावून जे नाम घेतले जाते तो जप. जपात लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे. माळ घेऊन इकडे तिकडे हिंडत जप करणारे खूप आहेत. त्याला जप म्हणत नाहीत. ते नामस्मरण होते.
श्री स्वामींचा जप असा करावा:
शांत जागी, शांत वेळी (शक्यतो पहाटे) जमिनीवर सतरंजी / चटई / लोकरीची छोटी चादर टाकून बसावे (गादीवर बसून जप करू नयेत). समोर श्री स्वामींचा फोटो असावा. मन शांत करावे. मनातील जितके विचार काढून टाकता येतील तेवढे काढून टाकावेत. माळ घेऊन "श्री स्वामी समर्थ" हा जप करावा. मुख्य मण्यापासून सुरुवात करावी.
एका माळे पसून जप सुरू करावा. पुढे पुढे माळांची संख्या वाढवत न्यावी. मुख्य मण्या पर्यंत आल्यानंतर एक माळ झाली असे समजावे. मुख्य मणी cross करून पुढे जाऊ नये. मुख्य मण्याला धरून माळ फिरवावी ( screw फिरवतो तशी) म्हणजे परत उलट्या दिशेने जप सुरु होईल.
जप करताना ओठ / जीभ वापरू नये. तो कंठातून करायचा असतो पुढे पुढे तो बेंबी पसून करायचा असतो. वरील सर्व गोष्टी पहिल्याच प्रयत्नात करायचा अट्टाहास करू नये जसे जमेल तसे करत रहावे. जप करताना डोळे मिटून दोन भुवयांच्या मध्ये मन एकाग्र करावे. जप शक्यतो दुसर्‍याला ऐकू जाईल इतक्या मोठ्याने करू नये. पहाटे ३ ते दु. १२ व नंतर दु. ३ ते रा. १२ पर्यंत जप करावा. नामस्मरणाला वेळेचे बंधन नाही. स्त्रियांनी "त्या" ४ दिवसात जप करू नये. परंतु नामस्मरण भरपूर करावे. नामस्मरणाला नियम नाहीत. जपाला नियम आहेत.
संसारातल्या सर्व जबाबदार्‍या, कर्तव्ये पार पाडत जप जसा जमेल तसा करावा. कधी कधी जप करता येत नाही. जप कमी होतो. असे झाले तरी चालेल पण शक्यतो जप करण्याचाच प्रयत्न करावा.
मी माझ्या बुद्धी प्रमाणे तुम्हाला शक्य ते सर्व सांगितले आहे (मला जे माहित आहे). खरंतर या गोष्टीत गुरु शिवाय प्रगती होत नाही. श्री स्वामींना विनंती करा की मला गुरुप्राप्ती व्हावी. तुम्हांला नक्कीच गुरु भेटतील.
या बीबी वरचे अनुभव वाचून तुम्हाला जशी प्रेरणा मिळाली तशीच इतरांना पण मिळो व तुमच्या श्री स्वामी भक्तीत वाढ होवो, त्यांची सेवा तुमच्या कडून होवो हीच श्री स्वामी चरणी प्रार्थना.


Mita
Saturday, April 15, 2006 - 12:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश,अगदि हिच सगळि माहिती मला हवी होती. आपले खूपखूप आभार. अमेय तुला पण thanks .:-)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators