|
जिद्दु क्रुष्णमूर्ती किंवा जे क्रुष्णमूर्ती ह्यांनी जगण्याचे जे निराळे तत्वद्यान मांडले आहे त्यासंबधी इथे लिहिण्याचा विचार आहे "सत्य हे शब्दात पकडता येत नाही, सत्य, चिरंतन सत्य हे प्रत्येकाला हुडकावे लागणारे ' दिशाहीन रान' आहे " more to follow
|
Chinnu
| |
| Monday, March 13, 2006 - 11:18 pm: |
| 
|
keep it up adi! me waiting..
|
" स्वातंत्र्य म्हणजे कोणती प्रतिक्रिया नव्हे. स्वातंत्र्य म्हणजे कोणताही पर्याय नव्हे. आपल्याला खूप सारे पर्याय उपलब्ध असल्यामुळे आपण स्वतंत्र आहोत हा मानवाचा भ्रम आहे. स्वातंत्र्य म्हणजे केवळ शुध्द निरीक्षण.कोणत्याही दिशेखेरिज. फ़ळाची अपेक्षा आणि अपेक्षभंगाची भीति या दोहोपासून मुक्त असे निरीक्षण. असे स्वातंत्र्य हे उद्देशहीन असते. स्वातंत्र्य हा मानवाच्य उत्क्रांतीमधला शेवटचा टप्पा नव्हे, ते तर त्याच्या अस्तिवाच शोधाचे पहिले पाऊल आहे"
|
"विचार म्हणजेच काळ. विचार हा पूर्वानुभव आणि ज्ञान यातून निर्माण होतो..म्हणूनच विचार हा भूतकाळापासून अलिप्त राहू शकत नाही. म्हणूनच विचारांना नेहमी मर्यादा पडतात आणि आपण भूतकाळाचे गुलाम बनतो आणि स्वतचे आयुष्य भूतकाळाशी संघर्ष करण्यात घालवतो"
|
"जेव्हा आपल्याला स्वताच्या विचारांच्या प्रवाहाची खर्या अर्थाने जाणीव व्हायला लागते, तेव्हा आपल्याला निरीक्षण आणि निरिक्षणकर्ता, अनुभव आणि अनुभव घेणारा, विचार व विचार करणारा यातले द्वैत जाणवायला लागते. हे द्वैत जेव्हा संपेल तेव्हाच खर्या अर्थाने शुध्द निरिक्षण सुरु होऊ शकेल. यातूनच कालातीत जीवनद्रुष्टी निर्माण होईल. ज्या वेळी भूतकाळने पछाडलेल्या विचारांना आपण नाकारू, तेव्हाच खरे प्रेम अस्तिवात येऊ शकेल."
|
All the above are from "J Krishnamurthi: Essential Teachings" loosely translated in Marathi by me
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|