|
Suniti_in
| |
| Friday, January 13, 2006 - 6:14 pm: |
| 
|
भोगी सक्रांतीसाठी मिक्स भाजी- यासाठी ब-याच भाज्या वापरतात. तरी काॅमन भाज्या म्हणजे वांगी, गाजर, बटाटा, ओला पावटा, शेवगा, ओला हरबरा. यात आवडीप्रमाणे इतर भाज्याही घालता येतील. जसे मटार, वाल पापडी, टोमॅटो. सर्व भाज्यांचे चौकोनी तुकडे करून पाण्याने धुवून त्यांना मीठ हळद लावून ठेवावे. आल, लसून जीरे, ओले खोबरे(नसेल तर सुके खोबरे किसून किंचीत परतलेले), १ चमचा भाजलेली खसखस, १ चमचा भाजलेले तीळ हे सर्व मिश्रण वाटून घ्यावे. तेलात हिंग मोहरीची फोडणी देऊन वरील मसाला परतून त्यात भाज्यांचे तुकडे चांगले परतून घ्यावे. मीठ घालून थोडे पाणी घालावे. वरून चिंचेचा थोडा कोळ व गुळ घालावा. याने भाजीला छान चव येते. नंतर कोथिंबीर घालून उकळ आणावी. ही भाजी सुकीदेखील करतात वाटत काहीजण. कुणाला येत असेल तर लिहा इथे.
|
Dineshvs
| |
| Monday, January 16, 2006 - 4:56 pm: |
| 
|
या भाजीला याच दिवशी फ़ार छान चव येते. त्यात तीळ पण घालतात. मला मिश्र भाज्यांची घडाभाजी खुप आवडते ती अशी. वांगी, गाजर, घेवडा, कणीस, शिंगाडे, शेवग्याच्या शेंगा, गाजर, मुला, खुटावळे ( डबल बीन्स ) कोनफ़ळ, लाल भोपळा, हरबरे, भूईमुगाचे दाणे अश्या सगळ्या आवडीच्या भाज्या घ्याव्यात. एखादी कमी जास्त चालेल. त्याला तिखट मीठ लावुन घ्यावे. छोटे कांदे अख्खे घ्यावेत. काहि कांदे बारिक चिरुन चुरावेत. त्यात थोडे ओले खोबरे, ऊसाचा रस वा गुळ, कोथिंबीर, चिरुन घालावे. थोडे मिरीदाणे ठेचुन घालावेत. रोजचा मसाला वा काळा मसाला घालावा. त्यात थोडे तेल घालावे. हा मसाला भाज्याना चोळुन घ्यावा. शक्य असला तर मातीचा घडा घ्यावा ( तयार करुन घ्यावा, कृति खाली देतोय ) त्यात या भाज्या रचाव्यात. घट्ट झाकण लावावे. झाकणाला कणीक सैलसर भिजवुन लिंपावी. मग शेकोटीत वा मंद आचेवर हा घडा ठेवावा. अधुन मधुन फ़डक्याने धरुन आसडावा. कणीक फ़ोडुन वाफ़ बाहेर यायला लागली आणि खमंग वास सुटला कि ऊतरावी. अपेक्षेपेक्षा फ़ार कमी वेळात हि भाजी होते. भाकरी वा गवसण्यांबरोबर खावी. मित्रमंडळीना बोलावुन खिलवावी, एकट्याने खाऊ नये. घडा नसला तर जाड बुडाचे भांडे घ्यावे. त्याला घट्ट बसेल असे झाकण लावावे.
|
Dineshvs
| |
| Monday, January 16, 2006 - 5:44 pm: |
| 
|
मातीचा घडा जेवण शिजवण्यासाठी वापरण्यापुर्वी असा तयार करुन घ्यावा. शक्य तो लाल मातीचा जाडसर घडा आणावा. आणताना तो वाजवुन पक्का आहे ना ते बघावा. त्यात काठोकाठ पाणी भरुन बारा तास ठेवावे. यावेळी थोडेफ़ार पाणी गळणारच, पण ते फ़ार असु नये. मग ते पाणी ओतुन टाकावे. परत त्यात पाणी भरुन गॅसवर ठेवावा. पाणी थोड्याच वेळात ऊकळु लागेल. एकादे मिनिटभर ऊकळु द्यावे. गॅस बंद करावा. थोडे निवल्यावर, पाणी ओतुन, घडा ऊपडा घालुन ठेवावा. सुकला कि वापरायला तयार. यात शक्यतो लाकडी चमचे वापरावेत. भाज्याना अप्रतिम चव येते, तसेच पदार्थ बराच वेळ गरमहि राहतात.
|
Daizy
| |
| Tuesday, January 17, 2006 - 8:00 am: |
| 
|
दिनेश अतिशय सुंदर रेसीपी आहे. तोडाला पणिच आले पन मातिचा घड्याची चव येणार नाही कशालाच! हो ना?
|
या मिक्स भाजीला आमच्याकडे'खेंगट' उच्चार खेंगाट असे म्हणतात...
|
Nalini
| |
| Friday, January 05, 2007 - 1:14 pm: |
| 
|
रॉबिनहूड, गाजराच्या भाजीला ' खेंगट' म्हणतात ना?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|