|
घोसावळ्याची भाजी ४ घोसावळी ३ पाकळ्या लसुण ३ हिरव्या मिरच्या जिरे कोथिम्बिर लसुण मिरची जिरे घालुन वाटुन घ्या. घोसावळी बारिक चौकोनी चिरुन घ्या कढईत जरा बेतान तेल घलुन फ़ोडणी करा त्यात मोहरी, जिरे, थोडिशी वाटलेली लसुण मिरची घाला लगेच घोसावळी घाला मग परत वरुन उरलेली लसुण मिरची आणि मिठ चविला किन्चित साखर घाला. वर पाण्याच झाकण ठेवुन वाफ़ द्या शिजल्यावर वरुन बारिक चिरुन कोथिम्बिर घाला. अतिशय रुचकर भाजी तयार होते. यात काळजी घ्यायचि म्हणजे मिठ जरा कमी घालाव कारण भाजी शिजल्यावर आकारान कमी होते खारट होण्याचि शक्यता असते आणि घोसावळी धुवुन पुसुन कोरडी करुन चिरावीत.
|
Mita
| |
| Friday, January 13, 2006 - 7:57 pm: |
| 
|
घोसवळे म्हणजे कोणती भाजी?? कशी दिसते..काहि दुसरे नाव आहे का??
|
Suniti_in
| |
| Saturday, January 14, 2006 - 2:15 am: |
| 
|
mita घोसावळे म्हणजे गिलके. ते हिरवे दोडक्यासारखे आकाराने असतात. फक्त त्यावर शीरा नसतात. याची भजीही छान लागते. कोवळे असतील तर चव छान लागते. us मधे जे squash मिळतात त्यांची चव बरीचशी अशीच असते.
|
घोसावळे म्हणजेच घोसाळी असे दिसते. त्यामुळे मिताचा गोंधळ झालेला दिसतो..........
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|