|
Dineshvs
| |
| Wednesday, January 11, 2006 - 4:51 pm: |
|
|
तिकडे घाईघाईने लिहिले होते ते आता सविस्तर लिहितो. सहा मध्यम आकाराचे लाल घट्ट टोमॅटो घेऊन ते देठाकडुन पोखरावे. आतला सगळा गर बाहेर काढुन ते ऊपडे घालावेत. तेलाची फ़ोडणी करुन त्यात हिंग हळद घालुन दोन वाट्या हिरवे वाटाणे घालावेत. फ़्रोझन असले तरी चालतील. तेलात परतुन ते शिजवावेत. त्यात वाटलेली हिरवी मिरची, आले व कोथिंबीर घालावी. मीठ घालावे.माऊ शिजल्यानंतर डावेने ते घोटुन घ्यावेत. याच सारणात गाजराचे तुकडे घालता येतील, ते आधी परतुन घ्यावे लागतील. व वाटाणे वेगळे शिजवावे लागतील. मग हे सारण पोखरलेल्या टोमॅटोत दाबुन भरावे. बटाटेवड्यासाठी वेगळे बेसन मिळते ते आणुन त्याचा भज्याच्या पिठाप्रमाणे घोळ करावा. ते न मिळाल्यास बेसनात अर्धे तांदळाचे पिठ मिसळुन घोळ करावा. कारवारी पद्धतीचे तांदुळ आणि तुरडाळ भिजवुन वाटुन केलेला घोळहि चालेल. हौस असल्यास, पनीर मैदा व मीठ मिसळुन त्याचा घोळ करावा. या घोळात टोमॅटो बुडवुन तळावा. वरचे कव्हर शिजण्यापुरताच तळावा. आतले सारण शिजलेले आहे, हे लक्षात ठेवावे. खाताना याचे ऊभे दोन काप करुन घ्यावेत. घट्ट भरलेल्या सारणामुळे टोमॅटोचा आकार तसाच राहतो. एखादी मलाईदार पांढरी वा केशरी करि करुन त्यात हे घालता येतील.
|
Meggi
| |
| Tuesday, January 17, 2006 - 8:20 am: |
|
|
दिनेश, ही मलाईदार करी कशी करायची?
|
Shyamli
| |
| Tuesday, January 17, 2006 - 8:27 am: |
|
|
हो आता पांढरी करी सांगा(च्)
|
Deemdu
| |
| Tuesday, January 17, 2006 - 10:10 am: |
|
|
हो आणि ती केशरी करी ही सांगा दिनेशभाउ तीच हो ती व्हेज बिर्याणी बरोबर मिळते हाटीलात आणि मलई कोफ़्ता नावाची जी भाजी मिळते त्याची करी कशी करायची?
|
Moodi
| |
| Tuesday, January 17, 2006 - 10:19 am: |
|
|
दिमडु मलई कोफ्ता इथे आहे ग. /hitguj/messages/103383/91407.html?1129536290
|
Dineshvs
| |
| Tuesday, January 17, 2006 - 6:19 pm: |
|
|
हो तशीच तशीच करायची, नाही केली तरी चालेल. पकोडा म्हणुन हा आयटेम खाता येतो.
|
Nandita
| |
| Friday, January 27, 2006 - 4:52 am: |
|
|
maI kala k$na paihlaI hI krIÊ Canaca JaalaI pNa duQaacyaa pavaDrI evajaI maI taMdLaca ipz Gaatla
|
अहो दिनेश, मी केले हे कोफ़्ते पण ते डाळीच पिठ चिकटलच नाही टोमॅटोला. म्हणजे बटाट्यावड्यांना कस आवरण असत तस चढलच नाही. पण चव मस्त झाली होती. नुसतेच टोमॅटो तळल्याने वरच कव्हर सुट झाल आणि मग मी ते करी मध्ये टाकले. काय चुकल माझ नक्की?
|
Bee
| |
| Tuesday, June 13, 2006 - 7:16 am: |
|
|
दिनेश, टोमॅटो पोखरायचे कसे? त्यातील गर काढून मधात छिद्र पाडायचे का.. म्हणजे जर गर काढला तर आपोआपच छिद्रही पडेलच.. पण मग गर वाया जाणार नाही का?
|
त्यातील गर काढून मधात छिद्र पाडायचे का<<< नाही, छिद्र पाडून गर काढायचा. वाया कशाला जाईल खाऊन टाकायचा. :-)
|
Dineshvs
| |
| Tuesday, June 20, 2006 - 12:45 am: |
|
|
रचना, पीठ जरा पातळ भिजवले गेले असणार. शिवाय बेसनात मी लिहिल्याप्रमाणे तांदळाचे पीठ वैगरे मिसळावे लागतेच. जास्त वेळ तेलात राहिले तरी असे होईल. अखंड टोमॅटोवर पीठ चिकटत नाही, पण भरण्यासाठी जो छेद दिलेला असतो त्यामुळे चिकटते.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|