|
Moodi
| |
| Tuesday, December 13, 2005 - 3:27 pm: |
|
|
ही खालची सुपारी एकदम मस्त आहे. याने पोटातील gases जातातच, पोट दुखी जी अपचनाने झालीय ती पण जाते. १ वाटी बडीशेप, २ मोठे चमचे ओवा, २ मोठे चमचे बाळंत शेपा, १ मोठा चमचा तीळ, अर्धी वाटी सुके खोबरे किस अन १ टीस्पुन / छोटा चमचा मीठ. कृती : प्रथम मीठ अर्धी वाटी पाण्यात विरघळवुन घ्यावे. परातीत किंवा ट्रेमध्ये बडीशेप अन बाळंतशेपा घेवुन त्याला हे मीठाचे विरघळलेले पाण लावुन रात्रभर तसेच ठेवावे.. दुसर्या दिवशी सकाळी ते मंद आंचेवर भाजावे. नंतर ओवा, तीळ अन सुके खोबरे किस वेगवेगळे भाजुन घ्यावे. अन मग हे सरव बडीशेप अन बाळंतशेपेत एकत्र करावे अन मग कोरड्या बाटलीत भरावे. मी याची पावडर केली होती पण त्या शेपा ओलसर राहिल्या चुकुन त्यामुळे मी असा पर्याय सुचवेन की ती बडीशेप अन बाळंतशेप रात्रभर मीठाच्या पाण्यात ठेवण्यापेक्षा, त्या वेगवेगळ्या भाजतानाच त्यावर मीठाचे पाणी अधुन मधुन शिंपडत रहावे. जसे आपण खारे शेंगदाणे भाजतो ना तसे. अन सुके खोबरे किस व तीळ हे भाजल्यानंतर तसेच ठेवुन फक्त बडीशेप, ओवा अन बाळंतशेप भाजल्यावर त्याची पावडर करुन मग उरलेले त्यात मिसळावे, म्हणजे खोबरे व तीळ. ही सुपारी जड जेवणानंतर एकदम उत्तम. पोट खुप हलके वाटते. माझी मैत्रीण जेव्हा प्रेग्नंट होती तेव्हा तिने ओवा वगळुन बाकी सर्वाची अशी सुपारी केली होती. पोटातील वात याने निघुन जातो मात्र आवडली तरी भाजीसारखी बकाणे भरु नयेत. चिमुटभर बास. मात्र प्रेग्नंट मुलीनी ही एकदम ट्राय करु नये. दिनेश तुमचे काय मत आहे?
|
Moodi
| |
| Tuesday, December 13, 2005 - 3:32 pm: |
|
|
जीरा गोळी २० ते २५ आमसुले, अर्धा चमचा मीठ, १ चमचा जीरे, १ चमचा साखर, २ चमचे पिठीसाखर कृती : पिठीसाखर सोडुन इतर सर्व चिकट होईपर्यंत बारीक वाटावे. त्या मिश्रणाच्या छोट्या छोट्या गोळ्या करुन त्या पिठीसाखरेत घोळवाव्यात.. मग १ दिवस उन्हात वाळवुन मग कोरड्या बाटलीत भराव्यात. पित्तावर चांगल्या, अन एरव्ही पण मस्त. दिनेश अहो इकडे कोवळे पण उन्ह नाही ह्याला पर्याय सांगाल का?
|
Moodi
| |
| Wednesday, January 11, 2006 - 1:39 pm: |
|
|
खारकेचे पान. १० ते १५ खारका, ४ चमचे भाजलेली बडीशेप, केशर काड्या किंचीत गरम करुन चुरुन, चमचाभर गुलकंद, वेलदोडा पुड १ टीस्पुन. खारका भिजवा, चांगल्या भिजल्या की कपड्याने कोरड्या करुन आतील बी काढा. बडीशेप, गुलकंद, वेलदोडा पुड,केशर काड्या एकत्र करा. खारकेत हा मसाला भरा अन दोन्ही तोंडे जुळवुन घट्ट बांधुन फ्रीझमध्ये ठेवा. हवे तेव्हा काढुन खा.
|
Rimzim
| |
| Wednesday, January 11, 2006 - 7:28 pm: |
|
|
hi moodi and all, awala supari la ithe kahi paryay aahe ka? or ithe kuthe awale milatil ka in usa?
|
एक साधी मुखशुद्धि म्हणजे जेवल्यावर लाल टोमॅटोची एखादी फोड तोंडात टाका. (थोडसं मीठ लावलेली)
|
Suniti_in
| |
| Thursday, January 12, 2006 - 6:10 pm: |
|
|
रिमझिम मला indian store मधे फ्रोजन आवळे मिळाले बघ इकडे. मुडी त्याचे काही प्रकार करता येतील का
|
Moodi
| |
| Thursday, January 12, 2006 - 6:23 pm: |
|
|
सुनिती इथे बघ मी अन बाकीच्यानी लिहिलेय आवळ्याविषयी. /hitguj/messages/103383/92943.html?1133193264
|
Zakki
| |
| Thursday, January 12, 2006 - 8:42 pm: |
|
|
मूडी, खारकांऐवजी ते मिश्रण खजूरात भरले की ज्याला खजूरी पान म्हणतात ते होते का? पुण्यात औंधच्या एका fancy दुकानात नि टिळक रोडवरच्या सहकारी भांडार का कुठल्याशा दुकानात एक दोनदा मिळाले होते. मी जवळपास १०, १२ विकत आणून office मधल्य एकेकाला एकेक दिले. सर्वांना आवडले. तसेच एक सुपारी पण मी अनेकदा आणून office मधे ठेवली. पण लोकांनी नुसती थोडीशी तिथेच खाण्या ऐवजी चक्क कागदाच्या पुडित बांधून घरी नेली, नि वर मला म्हणाले अहो, सुपारी संपली, दोन दिवस झाले, पुन केंव्हा आणणार? असे हे सुशिक्षित पुणेकर. बाकी अमेरिकेत नि भारतात फरक असायचाच. कदाचित भारतीय संस्कृटीचे हे वैशिष्ठ्य असावे.
|
Prajaktad
| |
| Monday, November 28, 2005 - 3:54 pm: |
|
|
मागे एकदा मि आवळा सुपारिचि रेसिपि लिहलि होति वाहिलि असेल म्हणुन परत लिहतेय! रेसिपि १ आवळे उकडुन बिया काढुन गरम असतनाच smash करुन लगदा करावा.यात थोडे आले किसुन घालावे.काळे मिथ,मिठ,जिरे पुड घालुन मळुन घ्यावे.मग ताटात थापुन वाळवावे...ओलसर असतानाच वड्या कापुन चांगल्या सुकु द्याव्या. रेसिपि २ कच्चे आवळे बारिक किसणिने किसुन वाळवावे हि सुपारि पाढंरि दिसते.
|
Madhavm
| |
| Monday, December 19, 2005 - 10:11 am: |
|
|
हल्ली एक आवळ्याचा ready snack मिळतो. मला नाव नक्की आठवत नाही पण बहुतेक Vitamala ह्यात छान खुसखुशीत पाकवलेले आवळ्याचे तुकडे असतात. मी करुन बघीतला. मी साखरेच्या पाकात आवळ्याचे तुकडे टाकून मग ते उन्हात वाळवले. पण तो प्रकार चिकट झाला. कोणी crisp होण्याकरता बदल सांगू शकेल का?
|
Madhavm
| |
| Monday, December 19, 2005 - 10:40 am: |
|
|
कोकणात पानाच्या टपरीवर Ginger Chat म्हणून प्रकार मिळतो. मस्तच लागतो. तोंडाला चव नसेल तर, मळमळत असेल तर किंवा जेवणानंतर सुपारीसारखा खायला एकदम सही प्रकार आहे. करायला एकदम सोपा. १. आले सोलून त्याचे लहान तुकडे करावे. २. लिंबांचा रस काढून त्यात पीठीसाखर, सैंधव काळे मीठ्) व थोडे साधे मीठ कालवावे. ३. ह्या रसात आल्याचे तुकडे ३-४ तास बुडवून ठेवावे. ४. मग ते उन्हात वाळवावेत. (वरून कोरडे वाटले तरी अजून २-३ दिवस वाळू द्यावेत म्हणजे आतून पूर्ण वाळतात व २-३ वर्ष सहज टिकतात.) बाजारात मिळणार्या Ginger Chat पेक्षा हा प्रकार थोडा तिखट होतो. तसा नको असल्यास आल्याचे तुकडे गरम पाण्यातून काढावेत म्हणजे त्याचा अर्क कमी होइल. (आले शिजवायचे नाही.)
|
Prarthana
| |
| Tuesday, November 14, 2006 - 9:11 am: |
|
|
विड्यच्या पानाचे सर्व सहित्य, विड्याच्या पानासहीत मिक्सर मधून काढावे. काचेच्या बाट्लीत ठेवून ती फ़्रीज मध्ये ठेवावी. किंवा सावलीत वाळ्वून ठेवावे.
|
Madya
| |
| Thursday, March 22, 2007 - 4:57 am: |
|
|
घरगुती पाचक बनवायची क्रुती कुणाला माहित आहे का?
|
Dineshvs
| |
| Thursday, March 22, 2007 - 9:13 am: |
|
|
Madya आले स्वच्छ धुवुन पुसुन प्लॅष्टिकच्या किसणीवर किसुन घ्यावे. पाण्याचा हात लागु देऊ नये. मग हा किस कोरड्या फ़डक्यात घालुन पिळून रस काढावा. तो रस जेवढा निघेल तितकाच लिंबाचा रस त्यात मिसळावा. हे सगळे काचेच्या वाडग्यात करावे. मग त्यात चवीप्रमाणे सैंधव मिसळावे. आणि जरुर भासलीच तर थोडी साखर घालावी. काचेच्या बाटलीत भरुन फ़्रीजमधे ठेवावे. फ़ार जास्त प्रमाणात करु नये. दोन चार दिवसात संपवावे. जेवण्यापुर्वी वा जेवल्यावर एक चमचा प्यावे.
|
Dhanashri
| |
| Thursday, March 22, 2007 - 9:18 am: |
|
|
कीसलेले आले,मीठ साखर,सैन्धव लिम्बु रस एकत्र करणे झाले घरगुती पाचक.
|
Madya
| |
| Thursday, March 22, 2007 - 10:20 am: |
|
|
सैन्धव म्हणजे काय, कसे असते दिसायला
|
Dineshvs
| |
| Thursday, March 22, 2007 - 10:25 am: |
|
|
सैंधव म्हणजे खणीतुन मिळालेले मीठ. त्याचे काळपट लालसर रंगाचे खडे मिळतात किंवा गुलाबी रंगाची पावडर मिळते. रॉक सॉल्ट म्हणुनही ते बाजारात मिळते. पावडर मिळत असेल तर तीच घ्यावी कारण खडे फ़ोडुन कुटुन घ्यावे लागतात, व त्यात कच असते. भारतात काळे मीठ किंवा सैंधव या नावानेच मिळते. वाण्याच्या दुकानात किंवा ज्यांच्याकडे आयुर्वेदिक औषधे मिळतात त्यांच्याकडे असते. नुसतेहि चवीला छान लागते. कापलेली फळे ( संत्री, पेरु, द्राक्षे, कलिंगड ) वैगरेवर घालुन छान लागते.
|
Lajo
| |
| Thursday, March 22, 2007 - 10:51 pm: |
|
|
माझी आई या पाचकात थोडा कुटलेला ओवा घालते. गॅस कमी होण्यासाठी आणि चवीला पण छान लागते.
|
Dineshvs
| |
| Thursday, April 19, 2007 - 4:21 pm: |
|
|
तसा ओवा नुसता खायला खुप तिखट लागतो. म्हणुन पुटाचा ओवा करुन ठेवायचा. तो खायला छान करतो. एक वाटी किंचीत शेकलेल्या ओव्याला रोज एक लिंबाचा रस, अर्धा चमचा सैंधव आणि पाव चमचा साखर लावुन तो उन्हात वाळवायचा. फ़्रीजमधेहि वाळु शकतो. असे साताठ वेळा करायचे. म्हणजे ओव्याला छान पुटे चढतात. मग तो खायला छान लागतो. तसा बटाटा, गवार आदी भाज्यांच्या फोडणीत तो घालता येतो. पनीर वैगरे ग्रील करताना, ओव्याची पुड शिवरता येते.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|