|
Vidya
| |
| Friday, July 02, 1999 - 9:32 pm: |
|
|
sabudana vada pan tasa karayla sopa sabudana 3 tas bhijavun thevaycha ek vati sabudanyasathi 2 batate boil karayche skin kadhun batate ani bhijavlela sabudana ekatra smash karaycha.Tyat chilli salt jeera ghalun changle malayche .Ani chote chote vade karun talayche. curdbarabar khalle kinva chutney barabar khalle tari chan lagtat Ya mahinyat ekadasi ahe na .try kara
|
Paus
| |
| Wednesday, May 08, 2002 - 4:28 am: |
|
|
ajun ek tip: vadyachya peethat kinchit aale kisun ghatle tar jara shi tikhat chav yete.. lil punjant.
|
Psg
| |
| Wednesday, August 02, 2006 - 5:39 am: |
|
|
साहित्य: साबूदाणा २ वाट्या, २ बटाटे- एक उकडून, एक कच्चा, मीठ, तिखट- आवडीनुसार, जीरे २ टीस्पून, बारिक चिरलेली कोथिंबीर, दाण्याचे कूट- थोडे भरड- अर्धी वाटी, तळायला आणि मोहनाला तेल. कृति- साबूदाणा खिचडीला भिजवतो तसा भिजवणे. भिजल्यानंतर हातानी मोकळा करून त्यात मीठ, तिखट, कोथिंबीर, जीरे, उकडलेला बटाटा मॅश करून, दाण्याचे कूट घालणे आणि mix करणे. पाव वाटी तेलाचे मोहन घालणे (मोहन चांगले झाले पाहिजे, तेलातून धूर यायला हवा). कच्चा बटाटा किसून घालणे. सर्व एकत्र करून गोळा करणे. शक्य तितकं कमी पाणी घालणे. साबूदाण्याच्या ओलसरपणामुळे आणि तेलामुळे पाणि कमीच लागते. चांगले मळून गोळा करणे. याचे छोटे वडे करणे. वडे चपटे करणे, म्हणजे आतून कच्चे रहात नाही. तेलात दोन्ही बाजू लालसर होईपर्यंत तळून घेणे. बरोबर दाण्याची चटणी- दही देणे, खाणे!! मोहन आणि कच्चा बटाटा घातल्यामुळे वडे कुरकुरीत होतात. आणि वडा चपटाही हवा. बटाटावड्या सारखा गोलू केला, तर हा वडा आतून कच्चा रहातो. आणि केल्याबरोबर लगेच खाणे. करुन ठेवून दिले, तर सबूदाणा मऊ पडतोच. श्रावण चालू आहे, उपासाला करून खा आणि सांगा कसे झाले ते
|
Bee
| |
| Wednesday, August 02, 2006 - 9:25 am: |
|
|
मी एकदा microwave मध्ये साबूदाना वडा भाजून केला होता. तळला नव्हता आणि तो एकदम खुसखुशीत झाला होता. फ़क्त एकच की भिजवलेला साबूदाना आधी तूपात अरतपरत केला होता आणि नंतर सगळे जिन्नस एकजीव केले. सोबतीला रताळ्याची कढी केली होती. एकदम छान झाले होते combination. रताळ्याची कढी एकदम सोपी आहे. एकच रताळे मऊसर शिजवलेले घ्यायचे आणि त्याला semi-liquid-semi solid दह्यात फ़ेटायचे. बेसनाचे पिठ न वापरता रताळ्याची paste वापरायची. वरतून वाळलेल्या लाल मिरच्यांची कडक आणि दमदार फ़ोडणी द्यायची की झाली कढी.
|
Savani
| |
| Wednesday, August 02, 2006 - 12:24 pm: |
|
|
सा. वड्यांमधे मोहन घालतात हे मला माहितीच नव्हतं पूनम छान टीप आहे ही. करून पाह्यला हवेत. बी, तुमची रताळ्याची कढी पण नवीनच प्रकार वाटतोय. करून पाहीन.
|
Mrinmayee
| |
| Wednesday, August 02, 2006 - 12:45 pm: |
|
|
साबुदाणा वड्यासाठी आणखी काही टिप्स: (या मिळाल्या आहेत एका बाईंकडून ज्या पार्टी ऑर्डर्स घेतात असे सगळे पदार्थ करण्याच्या.) * बटाटा, सगळे मसाले (वाटलेलं जीरं, आलं, हिरवी मिरची, तिखट, मीठ घालून खूप मळायचा, साजुक तुपाचा हात लावून. * साबुदाणा भिजवताना आधी पाण्यात भिजवून ३-४ तासांनी (फुगून आल्यावर) थोडं आंबट दही घालायचं. * बटाट्याच्या मिश्रणात भिजवलेला साबुदाणा एकत्र करून अगदी अलगद हातानी मळायचा. (साबुदाणा जास्त मळल्या जायला नको). पाणी अजीबात न लावता साजुक तुपाचा हात लावून फार न दाबता वडे करायचे. साबुदाणा लगदा न झाल्यामुळे चांगला फुलून येतो आणि वडा कुरकुरित होतो.
|
Prady
| |
| Wednesday, August 02, 2006 - 1:42 pm: |
|
|
मी ह्या वड्याच्या पिठात थोडी उपासाची भाजणी पण घालते.
|
माझी आई वरीचे तांदूळ शिजवून घालते, त्याने वडे छान कुरकुरीत होतात.
|
Mepunekar
| |
| Wednesday, August 02, 2006 - 8:58 pm: |
|
|
Are wa, chan tips ahet saglya..Psg , thanx g, agdi vyavstit praman lihiles, ata me karun baghte nakki..Kaccha batata ani mohan ghalne he mala mahit navte.. Karun baghte ya somvari ani lagech sangte
|
Mepunekar
| |
| Saturday, August 12, 2006 - 7:07 pm: |
|
|
ईथे टिप्स वाचुन मी साबुदाणा वडे केले आणी मस्त कुरकुरित झाले.पूनम, म्रु.. धन्यवाद..मी साबुदाणा भिजवुन नन्तर तासभर आधी १ स्पून दहि घातले, मस्त चव अली..
|
Moodi
| |
| Monday, August 14, 2006 - 8:14 am: |
|
|
psg तू दिलेल्या कृतीप्रमाणे शनीवारी वडे केले होते, चवीलाही छान अन एकदम कुरकुरीत झाले होते. फक्त एकच बदल, तो म्हणजे लाल तिखटा ऐवजी हिरवी मिर्ची मिश्रणात वाटुन घातली आणि नारळाची चटणी होतीच जोडीला. खूपच धन्यवाद गं.
|
Psg
| |
| Monday, August 14, 2006 - 10:13 am: |
|
|
अरे वा.. मूडी आणि पुणेकर.. आवडले ना? झालं तर!
|
Prady
| |
| Monday, August 14, 2006 - 12:36 pm: |
|
|
माझं काय चुकलं माहित नाही. तळायला कढईत सोडले तर विरघळायलाच लागले वडे. शेवटी घातली थोडी भाजणी आणी पाण्याचा हात लाऊन थापले.
|
Asira
| |
| Monday, August 14, 2006 - 6:21 pm: |
|
|
Prady, kadachit batata kami padalaa asel. Maze pan asech zale hote, mag ajun thoda ukadalela batata ghatala, mag neet zale.
|
Dineshvs
| |
| Tuesday, August 15, 2006 - 5:07 pm: |
|
|
दुर्गा भागवतांच्या कृतिप्रमाणे काकडी किसुन घट्ट पिळुन तो किस वड्याच्या पिठात मिसळायचा, त्याने वडे छान कुरकुरीत होतात, तसेच पिळुन घेतलेल्या काकडीच्या पाण्यात चटणी वाटायची, म्हणजे तिलाहि छान चव येते.
|
Prady
| |
| Thursday, May 03, 2007 - 2:26 pm: |
|
|
PSG तुझ्या कृतीने काल साबुदाणे वडे केले. एकदम जम्या. Thanks
|
Akhi
| |
| Thursday, May 15, 2008 - 11:01 am: |
|
|
साबुदाणा गरम पाण्यमधे भिजवुन घ्यावा. त्यात उकडलेले बटाटा किंचीत लाल तिखट आणे मीठ, जीरे पावडर टाकणे. वडे हलक्या हाताने थापुन तळावे. आणी गरम गरम वडे मिरची च्या चटनी सोबत खाणे. मला दाण्याचा कुट टाकुन केलेले वडे मनापसुन आवडत नाही. म्हनुन ही क्रुती.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|