|
साहीत्य : अंडी, खिमा ( नेहमीप्रमाणे सर्व मसाला वगैरे घालुन शिजवून अगदी कोरडा करुन घेणे), कॉर्नफ्लोर, मीठ, तळण्यास तूप किंवा तेल ( तूप घेतल्यास डालडा घ्यावे पण काहीना आवडत नसल्यास सनफ्लॉवर तेल घ्यावे) अंडी उकडून घ्यावी. उकडताना मधून मधून वर खाली करत राहावीत. अशाने पिवळा बलक मधोमध राहतो. थंड झाल्यावर साले काढून कॉर्नफ्लोर मध्ये घोळवावीत. शिजवलेला खिमा मिक्सर मध्ये बारीक करुन घ्यावा. आता अंड्यावर हा खिमा लावून सर्व अंडी खिम्याने व्यवस्थित कव्हर करून घ्यावीत. एक अंडे फ़ेटून त्यात एकेक अंडे बुडवून काढावे व डीप फ्राय करावे. अशी सर्व अंडी तळुन झाल्यावर ती मधून उभी कापावीत. प्लेटमध्ये arrange करुन सजवावीत. मध्ये पिवळा बलक बाजूने पांढरा बलक व नंतर खिम्याचे कोटिंग यामुळे ती डोळ्यासारखी दिसतात. उर्दू मध्ये नर्गिस म्हणजे कमळ. त्यामुळे याला नर्गिस कबाब अस म्हणतात. परंतु याचे नाव कमळासारखे डोळे या अर्थामुळे पडले की नर्गिस या अभिनेत्रीच्या डोळ्यांमुळे हे दिनेश जास्त चांगल सांगू शकतील
|
Moodi
| |
| Tuesday, January 10, 2006 - 1:18 pm: |
| 
|
व्वा! काय छान अन सोपी कृती आहे ग शर्मिला. पण एक शंका आहे, अंडे उकडले की ते गुळगुळीत असते ना, मग त्यावर खिमा कव्हर होईल का?
|
हो बरोबर आहे तुझ मूडी. म्हणुन अंड्याला कॉर्नफ्लोर लावायच म्हणजे गुळगुळीतपणा जाउन खिमा नीट कव्हर होतो. आणि तळल्यावर कव्हर सुटत नाही
|
Dineshvs
| |
| Tuesday, January 10, 2006 - 5:29 pm: |
| 
|
हे आमचे शाकाहारी नर्गिसी कबाब बरं का. घट्ट लालसर टोमॅटो घेऊन ते देठाकडुन पोखरायचे. हिरवे वाटाणे तेलात शिजवुन त्यात हिरवी मिरची, आले, कोथिंबीर घालुन, हिरवे सारण करायचे. ते टोमेटोत भरायचे. मग बाटाटावड्याप्रमाणे बेसनाचा घोळ करुन त्यात हे टोमॅटो बुडवुन तळायचे.आणि खाताना अर्धे कापुन खायचे. सारणात पनीर, गाजर घातले तर आणखी एक रंग मिळतो.
|
Milindaa
| |
| Tuesday, January 10, 2006 - 5:42 pm: |
| 
|
हे अंड्याच्या रेसिपीज मध्ये कसे आले पण ? ते तेवढे योग्य त्या जागी टाकता का ? एक शंका आहे. यामध्ये टोमॅटो चा आतला गर तसाच राहील. म्हणजे नंतर कापले की त्यातून तो गर सगळा बाहेर येईल आणि ते बर्यापैकी messy होईल असे वाटते आहे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|