Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
आंबोशीचे लोणचे ...

Hitguj » Cuisine and Recipies » पानाची डावी बाजू अर्थात चटणी, लोणचे, कोशींबीर » लोणची » आंबोशीचे लोणचे « Previous Next »

Dineshvs
Friday, January 06, 2006 - 4:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आंबोशीचे लोणचे

दोन किलो बाठीच्या आंबट कैर्‍या घेऊन तिच्या ऊभ्या फ़ोडी कराव्यात. त्याना दोन चहाचे चमचे मीठ आणि एक चमचा हळद लावुन त्या ऊन्हात वाळवाव्यात. ऊनच पाहिजे असे नाही, थंडीत बाहेर ठेवल्या वा फ़्रीजमधेहि ऊघड्या ठेवल्या तर या फ़ोडी वाळतात. अर्थात काहि ठिकाणी तयार अंबोशी पण मिळते. ती पाव किलो घ्यावी.
पाव वाटी मोहरीची डाळ कोरडीच बारिक वाटुन घ्यावी.
दोन चमचे मेथी, तीन चमचे बडीशेप वेगवेगळे भाजुन त्याची एकत्र पुड करावी.
अर्धी वाटी, शक्यतो मोहरीचे तेल घेऊन त्यात आधी मेथीची पुड, मग अर्धा चमचा हिंग मग बडीशेपेची पुड मग मोहरीची पुड घालुन मंद आचेवर परतावे. त्यात पाव वाटी तिखट व अर्धी वाटी मीठ घालावे. जरा परतुन ऊतरावे व त्यात पाव वाटी गुळ बारिक करुन घ्यावा. त्यात अंबोशी घोळवुन घ्यावी. आणखी अर्धी वाटी तेल तापवुन त्यात दोन चार मेथी दाणे व थोडी मोहरी घालुन फ़ोडणी थंड करावी व सगळे मिसळुन घ्यावे. हे मिश्रण आठ दहा दिवस तसेच ठेवावे.
मग जाड बुडाच्या कढईत हे लोणचे काढुन मंद आचेवर गरम करावे.

या लोणच्याची एक आठवण सांगण्यासारखी आहे. मी एका पार्टीला हे लोणचे केले होते. पहिले वाढुन झाल्यावर. एका वहिनीने ते लोणचे ऊचलुन आत नेऊन झाकुन ठेवले. मला वाटलं चव आवडली नाही कि काय, मग पार्टी झाल्यावर, सरळ त्या वहिनी ते लोणचे घेऊन घरी गेल्या, मला हळुन म्हणाल्या, सगळ्यानी संपवले असते कि, म्हणुन आधीच बाजुला काढुन ठेवले.



Moodi
Friday, January 06, 2006 - 4:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश तोंडाला पाणी सुटले हो. मी केप्रचा मसाला आणला आहे, आता दोन तर्‍हेची लोणची होतील, मागच्या वेळी मला राजापुरी कैर्‍या मिळाल्या होत्या.
ह्या कैर्‍या फ्रिझमध्ये किंवा बाहेर अश्या किती दिवस वाळवाव्यात?


Dineshvs
Friday, January 06, 2006 - 5:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडि, आता तिथे ऊन नसेल ना, मग फ़्रीजमधेच राहुदेत. आठ दहा दिवसात वाळतील. ऊघड्याच ठेवायच्या.
पण या लोणच्यासाठी तयार मसाला नाही वापरायचा. हा असाच ताजा करुन घ्यायचा. कैर्‍या जास्त आंबट असतील तर गुळ थोडा जास्त घालायचा.


Moodi
Friday, January 06, 2006 - 5:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश धन्यवाद पण अजुन एक शंका आहे, मेथी मंद आंचेवर जरी परतली तरी तेल तापले की लगेच जळुन तिला वास येतो मग हे पटापट परतत रहायचे का? म्हणजे एका पाठोपाठ एक असे? अन हे मिश्रण गरम असतानाच गुळ घालुन ढवळुन मग कैर्‍या घालायच्या की थोडे गार होऊ द्यायचे?

Sharmila_72
Saturday, January 07, 2006 - 4:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, तुमचे किती आभार मानु? माझ हे अतिशय आवडत लोणच. माझ्या ओळखीच्या एक आजी करायच्या हे लोणच. का कोण जाणे पण आज्यांच्या हाताला एक छान मायाळू चव असते. विशेषत: पुरणपोळ्या, लोणची या पदार्थांत तर यांचा हातखंडा असतो.
बरं माझ्या काही queries :
१. तेलात या सर्व पावडरी परतताना तेलाचे तापमान किती असावे?
२. मोहरीच्या तेलाऐवजी तिळाचे तेल वापरले तर चालेल का? कारण मोहरीच्या तेलाला फार वास येतो बुवा. भैय्ये लोक जवळुन गेल्यावर येतो तसा. तापवल्यावर या तेलाचा वास जातो पण तोपर्यन्त तरी हा वास सहन करणं म्हणजे कर्मकठिण.
३. आठ दहा दिवसांनी हे लोणचं पुन्हा का गरम करायचं?

( " कित्ती प्रश्न विचारतात या बायका! " असं मनात नक्कीच आलं असेल तुमच्या)


Dineshvs
Sunday, January 08, 2006 - 2:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शर्मिला,
१. तेल अगदी मंद आचेवर गरम करायचे, कारण हे तळायचे नाही. फ़क्त कच्चट वास जाईतो गरम करायचे.

२. बाकि कुठलेहि तेल वापरले तरी चालेल. पण मोहरीच्या तेलाने ती ओरिजिनल चव येते. आणि तापल्यावर जातोच कि हा वास. दोन तेले मिसळुन वापरली तरी चालतील.

३.ले लोणचे तसेच टेवलं तर, अंबोशीचे तुकडे तसेच चिवट राहतात. मराठी पद्धतीने केलेल्या लोणच्यात त्यावर ऊकळीचे पाणी ओतुन ती मऊ करुन घ्यायला संगितले असते. या लोणच्यात तसे करायचे नाही. पुन्हा गरम केल्यावर या फ़ोडी मऊ व खाण्यायोग्य होतात. हे लोणचे तसेहि टिकेल, फ़क्त खायला घेण्यापुरते गरम केले तरी चालेल.

माझ्या पाककृतिवर मायबोलि आणि मायबोलिकरांचा हक्कच आहे, त्यामुळे माझे आभार मानणे हा ईथे गुन्हा आहे.
एकदा वॉर्निंग देतोय.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators