|
Pama
| |
| Wednesday, January 04, 2006 - 7:51 pm: |
| 
|
साहित्य: चिकन boneness छोटे तुकडे. कांदा १ चौकोनी चिरलेला गाजर २ गोल किंवा चौकोनी तुकडे करून celery stalk 2 sliced मटर १/४ box frozen किंवा २ मुठी dumplng साठी: dumpling flour १ कप अंडी १ sour cream १ टे स्पू baking powder १/४ टी स्पू मीठ चवीला बटर १ टे स्पू कृती: १. एका मोठ्या पातेल्यात थोड बटर टाकून कांदा गुलाबी रंगावर परतावा. जास्त रंग नको यायला. २. आता चिकन चे तुकडे टाकून चांगले परतावे. ३. त्यात गाजर, celery मटर टाकून परताव. जरा परतल्यावर चिकन stock किंवा कोमट पाणी टाकून उअकळी येऊ द्यावी. ३. उकळी आल्यावर मीठ, मिरी पूड हवीत्या प्रमाणात टाकून झाकण ठेऊन मंद आचेवर शिजू द्याव. ४. तो पर्यंत बटर, sour cream , मीठ, baking powder एकत्र करावी. त्यात मग dumpling flour टकावा. गरज असल्यास, चमचा भर दूध धालाव. mashed potatoes सारख दिसल पाहिजे. म्हण्जे त्याची consistancy मेडूवड्याच्या पोठासारखी हवी. चम्च्यात धरून राहिल पाहिजे आणि पडताना एक मोठा गोळा पडला पाहिजे पातळ नाही. ५. चिकन जवळपास शिजत आल कि आच एकदम मंद करून, वरून चमच्याने ही dumpling mixture सोडवे. stock किंवा पाणी भरपूर हव, soup सारख. नाहीतर सगळ गिचका होईल. ७-८ लहान लहान dumpling सोडावे. जास्त गर्दी करू नये. हे सगळे dumplings तरंगून वर राहतात आनि बरेच फुगतात, त्याप्रमाणात घालावे. ६. आता झाकण न ठेवता मंद आचेवर १५ मिनिट शिजू द्यावे. dumpling आत पर्यंत शिजले पाहिजे कच्चे राहता कामा नये. एखादा बाहेर काढून चाकूने टोचून बघावा. पाणी कमी वाटल्यास अजून घालता येत. ७. वाढताना आधी सूप वाढून मग dumpling वाढाव, म्हणजे गिचका होणर नाही. सूप फार पाणीदार वाटल तर एक dumpling फोडून mix करावे, लगेच घट्ट होईल. या रेसिपीत छोट्या आकाराचा कुठलाही pasta पण घालता येईल. हे dumplings bisquick चे पण बनवता येतात. डब्यावर असते रेसिपी. त्यात फक्त दूध घालाव लागत. शिवाय त्यात पातीचा कांदा, मिरे, दालचिनी असे पदार्थ घालून वेगळी चव देता येते. या सूप चे जरा घट्ट version करून एका oven proof casserole मधे ठेऊन वरून bread crumbs आणि cheese टाकून बेक करून one dish meal पण करता येईल.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|