Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मूगाची उसळ

Hitguj » Cuisine and Recipies » भाज्या » उसळी » मूगाची उसळ « Previous Next »

Moodi
Wednesday, January 04, 2006 - 9:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी आई मुगाच्या डाळीची उसळ करते.

मुगाची डाळ १ ते २ तास भिजत घालायची. फोडणी करुन त्यात ही डाळ घालायची, चमचाभर पाणी ठेवायचे अन झाकण ठेवले तरी थोड्या थोड्या वेळाने पाण्याचा शिपका देवुन मऊ शिजवायची, पण ही गाळ म्हणजे एकदम मऊ होत नाही.

फोडणीत जीरे, मोहरी,हळद, हिंग अन हिरवी मिर्ची एवढेच घालायचे त्यात. छान लागते करुन बघ. पहिजे तर वरुन चिरलेली कोथिंबीर घाल.


Vrushs
Tuesday, January 30, 2007 - 10:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी हिरव्या आख्ख्या मुगाची उसळ करते. हिरवे मुग ४ ते ५ तास भिजत ठेवायचे.मग कुकर मधून शिजवून घ्यायचे.तेलाची जिरे,मोहरी घालून फोडणी करायची.मग त्यात लसूण थोडा ठेचून घालायचा. नंतर हळद,तिखट,गरम मसाला घालून त्यात शिजवलेले मुग घालायचे.मग पाणी,मीठ,थोडासा गुळ घालून थोड्यावेळ उकळून घ्यावी.

Ksha
Saturday, June 23, 2007 - 5:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिरव्या मुगाच्या उसळीत ओल्या खोबर्‍याचं वाटण लावायचं. सही होते भाजी.

Dineshvs
Tuesday, April 22, 2008 - 7:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज सकाळी एक झटपट मूगाची भाजी केली. छान चव आली होती. ती कृति शेअर करतोय.

भिजवुन मोड काढलेले मूग चार वाट्या. ( मोड काढलेले नसतील तर नुसते भिजवलेले मूगही चालतील, ते तीन वाट्या पुरतील ) घेऊन त्यात एक मध्यम गाजर जाडसर किसून टाकावे. तुपाची किंवा तेलाची फ़ोडणी करून त्यात जिरे, हिंग आणि दोन हिरव्या मिरच्या घालाव्यात. थोडा कढिपत्ता घालावा. तेल वा तूप अगदी चहाचा चमचाभरच घ्यावे. मग त्यावर मूगाचे मिश्रण टाकावे. ज़रा परतून मीठ व साखर घालावी. हळद घाळु नये. अर्धा कप दहि घुसळून टाकावे, आणि लागेल तसे पाणी टाकावे, व भाजी झाकण ठेवुन शिजू द्यावी. आवडीप्रमाणे करकरीत वा मऊ शिजवावी. मी प्रेशर पॅनमधे केल्याने अगदी पटकन झाली. हवे तर वरुन लिंबु पिळावे व कोथिंबीर पेरावी. भाजीला रंग तर छान येतोच, आणि चवही मस्त येते. खोबरे वगैरे नसल्याने, भाजी पथ्यकर आहे.



Lopamudraa
Tuesday, April 22, 2008 - 7:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रेसीपी छाने, आणि मुख्य म्हणजे तेल तुप फ़ार नाही वापरलेय शिवाय कांदा लसुण नाही,झटपट अगदी करुन बघेन नक्के. मी मुग अथवा मटकी मोड आणल्याशिवाय वापरत नाही. मोड आणलेले कडधान्य जास्त चांगले


Ami79
Tuesday, April 22, 2008 - 9:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दही नही घातले तरी चालेल का? मी दही खात नाही. त्या शिवाय काय घालू शकतो?

Dineshvs
Tuesday, April 22, 2008 - 10:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दहि घालायचे ते ग्रेव्हीला थोडा दाटपणा येण्यासाठी. त्याच्या जागी एखाद्या बटाट्याच्या फ़ोडी, दूध किंआ दाण्याचे कूट घालता येईल

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators