|
Moodi
| |
| Monday, January 02, 2006 - 5:45 pm: |
| 
|
पकवान. १ वाटी चण्याची डाळ, १ मोठा कांदा, २ टॉमेटो, हिरवी मिर्ची, आले लसुण यांची १ चमचा एकत्र पेस्ट, मीठ, आमचुर पावडर, गरम मसाला, तेल, कोथिंबीर, मैदा. कृती : चणा डाळ धुवुन २ तास भिजत घालावी. कुकरमध्ये १ चमचा तेल घाअलुन त्यावर बारीक चिरलेला कांदा गुलाबी परतुन घ्यावा. त्यातच आले लसुण मिर्ची पेस्ट परतावी. टॉमेटोही चिरुन घालुन परतावा. नंतर त्यात डाळ घालुन ती परतावी. मग पाणी घालुन कुकर बंद करुन प्रेशर लावावे, अर्धा तास मंद आंचेवर शिजु द्यावी. कुकर थंड झाला की झाकण उघडुन डाळीत आमचुर, मीठ अन गरम मसाला घालुन घोटावी. व कोथिंबीर घालुन झाकावी. २ वाटी मैद्यात २ मोठे चमचे तेलाचे वा तुपाचे मोहन व मीठ घालुन मैदा घट्ट भिजवुन त्याच्य जाड पुर्या लाटुन मंदाग्नीवर तेलात तळाव्यात अन आधी केलेल्या डाळीबरोबर खाव्यात. हा नाश्ता तसा जड असल्याने जेवणाची गरज भासत नाही.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|