|
Moodi
| |
| Sunday, January 01, 2006 - 6:24 pm: |
| 
|
कॉलीफ्लॉवर बेक. साहित्य : २ सिमला मिर्च्या, २ ते ३ मोठे लाल टॉमेटो, २ मध्यम कांदे, दीड ते २ वाटी मटार दाणे / वाटाणे, १ मध्यम बटाटा, १० ते १२ फ्लॉवरचे तुरे, 2-3 लवंगा, ६ ते ७ लसुण पाकळ्या, अर्धा चमचा ताजी मिरीपुड, २ चमचे लोणी, १ वाटी ब्रेड क्रब्म्ज्स, मीठ, कोथिंबीर. कृती : सिमला मिर्ची, बटाटा, कांदे यांचया पातळ चकत्या कराव्या. वाटाणा थोडा ठेचावा. टोमेटो २ मिनिट गरम पाण्यात ठेवुन सोलुन वेगळे ठेवावे. फ्लॉवरचे लहान तुरे करावेत. सर्व भाज्या एकत्र करुन त्यावर लवंगपुड,मीरेपुड, मीठ,लसुण बारीक चिरुन घालावा. कांदा थोड्या लोण्यावर परतुन बदामी करावा. एका ओवन प्रुफ डिशला लोणी लावुन एकावर एक असे भाज्यांचे थर लावावे, वर टॉमेटोचा गर अन कोथिंबीर घालावी. पावाचा चुरा अन लोणी एकत्र करुन वर शेवटी घालावे. ओव्हनमध्ये हे ठेवुन २ ते अडिच तास बेक करावे, मधुन मधुन लक्ष ठेवावे.. तांबुस रंग आला की डिश काढावी अन लोणी लावलेल्या गरम टोस्टबरोबर सर्व्ह करावी.
|
Prajaktad
| |
| Monday, January 02, 2006 - 1:07 pm: |
| 
|
मूडी ब्रेड्च्या चुय्राबरोबर वर चिझ पण घातले तर
|
Moodi
| |
| Monday, January 02, 2006 - 1:35 pm: |
| 
|
चालेल ग प्राजक्ता. चीज किसुन घाल म्हणजे पटकन वितळेल आणी सगळ्या भाज्यात मिक्स होइल. वरुन घाल.
|
Prasadp77
| |
| Monday, January 02, 2006 - 3:51 pm: |
| 
|
Moodi, please state the temperature as well otherwise emergency services would stop by my door in no time ;-)
|
Moodi
| |
| Monday, January 02, 2006 - 3:58 pm: |
| 
|
प्रसाद माझ्याकडे Electric oven आहे त्यामुळे यात टेंपरेचर १५० ते १६० च्या दरम्यान चालते मात्र आजच्या दिवस थांब, दिनेशना विचारते Gas assisted oven बद्दल.
|
Dineshvs
| |
| Monday, January 02, 2006 - 5:45 pm: |
| 
|
वरच्या पाककृतिला १६० से. तपमान लागेल. केक सोडुन कुठल्याहि पाककृतिसाठी, वास, वरुन आलेला रंग यावर पण लक्ष ठेवावे. दिलेली वेळ हि सर्वसाधारण असते. रुमचे तपमान, घटकांचे तपमान, पाण्यातील द्रवपदार्थ यावर काहि मिनिटे कमी जास्त होतात. सराईत नाकाला हा वास बरोबर समजतो. साधारण गॅस मार्क ४ म्हणजे, १८० से असे सेटिंग असते.
|
Moodi
| |
| Monday, January 02, 2006 - 5:48 pm: |
| 
|
धन्यवाद दिनेश. प्रसाद आता तुझ्याकडे ज्या प्रकारचा ओव्हन आहे त्याप्रमाणे सेटींग कर. तसे इलेक्ट्रीक ओव्हनमध्ये लवकर बेक केले जाते.
|
Moodi
| |
| Monday, January 02, 2006 - 7:45 pm: |
| 
|
बेक व्हेजी २ २०० gm गाजर, १०० gm वाटाणा, १०० gm फ्लॉवर, ५० gm फरसबी, ५० gm चीज, ३० gm मैदा, ३० gm लोणी, १ कप दुध, अर्धा चमचा सफेद मिरी पावडर, १ टीस्पुन मीठ. कृती : वाटाण्याचे तुकडे करा., फरसबी, गाजराचे लांब तुकडे कापा. फ्लॉवरचे लहान तुरे करा. सर्व भाज्या मीठाच्या पाण्यात थोडा वेळ शिजवा, जास्त शिजवु नका. भाज्या शिजल्या तरी अख्या स्वरुपात पाहिजेत, गाळ नको. एका pan मध्ये लोणी वितळवा, त्यात मैदा टाकुन सतत हलवा, गोळे होऊ देवु नका. १ मिनिट परतल्यावर थोडे थोडे करुन दुध घाला, सॉसप्रमाणे उकळु द्या अन सतत ढवळा. उकडल्यावर हा व्हाईट सॉस उतरवा. त्यात अर्धे किसलेले चीज टाका. सर्व उकडलेल्या भाज्या अन सफेद मिरी पावडर घालुन नीट मिक्स करा. हलक्या हाताने बेकिंग डिशला तुपाचा हात लावुन वरील मिश्रण त्यात ओता. वर उरलेले चीज पसरा. आधीच तापवलेल्या ओव्हनमध्ये ही डिश १८० 0 वर ठेवा. १० ते १२ मिनिट बेक करा. वरचे चीज वितळुन बदामी झाले पाहिजे. गरम वाढा.
|
Parijat30
| |
| Monday, January 23, 2006 - 10:19 pm: |
| 
|
मुडी आजच केली होती मी ही बेक्ड वेजीटेबल. छान झाली होती.
|
Moodi
| |
| Monday, January 23, 2006 - 10:23 pm: |
| 
|
प्राजक्ता मी पण परत करणार आहे. मात्र चिमुटभर मसाला घातला तरी चालतो यात. 
|
Harini
| |
| Thursday, January 26, 2006 - 10:39 am: |
| 
|
मूडी मीसुध्दा केली होती कालच. खूप छान झाली होती. माझ्या मुलीसाठी विचारते, नाचणीचं पीठ वगैरे घातलं तर चालेल का?
|
Sia
| |
| Monday, May 22, 2006 - 12:06 pm: |
| 
|
Moodi hya baked vegetables Microwave madhe pan karata yetat ka? Tuza kuthala oven aahe kalala nahi mhanun vicharala.
|
Moodi
| |
| Monday, May 22, 2006 - 12:11 pm: |
| 
|
सिया मी मायक्रोव्हेवमध्ये करुन नाही पाहिली. माझा इलेक्ट्रीकचा ओव्हन आहे. हरिणी खुप दिवसानी उत्तर देतेय त्याबद्दल सॉरी, पण नाचणीचे पीठ मी पण नाही वापरले कधी, जर तुला घालायचे असेल तर ते चांगल्या नॅपकीनमध्ये चाळणीने चाळतो तसे मऊ चाळुन मग घालुन बघ.
|
Asira
| |
| Tuesday, May 23, 2006 - 4:34 pm: |
| 
|
ह्यात अननसाचे तुकडे पण मस्त लागतात.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|