|
Dineshvs
| |
| Wednesday, December 14, 2005 - 4:33 pm: |
| 
|
एक वाटी पाणी ऊकळुन त्यात मीठ आणि दोन चमचे सोडा किंवा एक चमचा पापडखार घालुन पाणी गार करावे. चार वाट्या चण्याच्या डाळीचे पीठ घेऊन त्यात हिंग घालावा व मैद्याच्या चाळणीने चाळुन घ्यावे. वरील पाणी घेऊन त्यात हे पीठ अगदी घट्ट भिजवावे. अगदी थोडे तेल लावुन हे पीठ पांढरट रंग येईस्तो कुटुन मऊ करावे. याच्या लहान गोळ्या करुन पातळ लाटाव्यात. कडकडीत तेलात न करपवता तळुन काढाव्यात. साचा वापरला तरी चालेल. किंवा मनगटाच्या आतल्या बाजुने दाबुन फ़ाफ़डा केला तरी चालेल. पण याला जरा सराव लागतो. वरुन मिरपुड, लाल तिखट शिवरुन खावे. सोबत पपईची भाजी घ्यावी. किंवा जिलेबी घ्यावी. ओके, ओके दोन्ही घ्यावे.
|
Moodi
| |
| Wednesday, December 14, 2005 - 4:47 pm: |
| 
|
अरे व्वा मस्तच काम झाले हो दिनेश. मला पापडखाराची चिंता पडली होती पण सोड्याने काम भागतय म्हटल्यावर काम एकदम फत्ते होईल. आता घरी हे फाफडा, शेव अन बुंदी करायची की झाले ताजे फरसाण तयार. तुम्ही पण या खायला. आता धन्यवाद हजारोने. 
|
Bhagya
| |
| Wednesday, December 14, 2005 - 11:56 pm: |
| 
|
दिनेश, मूडी काय चाललंय तरी काय? मस्त मस्त रेसिपीज देताय दोघं पण. अशाने आमच्या diet ची वाट लागेल ना? पण तुम्हा दोघांना भेटायलाच लागेल.
|
Dineshvs
| |
| Thursday, December 15, 2005 - 4:48 pm: |
| 
|
भाग्य, थंडीच्या दिवसात कसले डाएट करतेस. ओ, पण तुमच्याकडे ऊन्हाळा नाहि का ? तरीपण कांजी चालेल.
|
Bhagya
| |
| Friday, December 16, 2005 - 2:21 am: |
| 
|
दिनेश, आत्तापासूनच diet करतेय. कारण भारतात आले, कि मुळीच करणार नाही. फाफडा, फरसाण जे समोर दिसेल ते खाणार....
|
Moodi
| |
| Friday, July 28, 2006 - 9:26 am: |
| 
|
दिनेश काल संध्याकाळी थोडा फाफडा करुन बघितला छानच झाला. पापडखार नसल्याने बेकिंग सोडा वापरला. 
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|