|
Suniti_in
| |
| Tuesday, December 13, 2005 - 6:20 pm: |
| 
|
काकडी, गाजर रायता- १ काकडी साल काढून बारीक कापून घ्यावी, १ गाजराचे बारीक तुकडेल्/किसून घेतले तरी चालेल बेबी कॅरेट्स असतील तर बारीक गोल काप करावेत.), १ हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, साखर, फोडणीसाठी मोहरी,जीरे, हिंग. आवडत असल्यास बिया काढलेले टोमॅटोचे तुकडेही टाकता येतील. टोमॅटो थोडे कच्चे असावेत. एका भांड्यात २ कप दही घेउन फेटून घ्यावे. दही फार घट्ट असेल तर थोड पाणी घालावे. यात काकडीचे चिरलेले तुकडे हलक्या हाताने दाबून त्यातले पाणी काढून टाकावेत. गाजराचे तुकडे, कोथिंबीर टाकावी. रायता जर लगेच खाण्यासाठी हवा असेल तर थोड्याश्या तेलात मिरची, जीरे, मोहरी,हिंगाची फोडणी द्यावी. शेवटी २ चिमूट साखर आणि चवीप्रमाणे मीठ टाकावे. रायता आधी करून ठेवायचा असल्यास सर्व चीरलेले साहित्य फ्रीजमध्ये ठेवून आयत्या वेळेस एकत्र करून फोडणी मीठ, साखर घालावे. थोडी चटपटीत चव हवी असल्यास वरून चिमूटभर चाट मसाला, जीरा पावडर भुरभुरावी.
|
Bage
| |
| Sunday, September 17, 2006 - 9:58 pm: |
| 
|
सुनिती, thanks for the recipe .मी काल हा रायता केला होता without chaat masala खुप छान झाला
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|