Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
दही भेंडी

Hitguj » Cuisine and Recipies » भाज्या » भेंडी, गवार, तोंडली, Tinda » भेंडी » दही भेंडी « Previous Next »

Rachana_barve
Monday, December 12, 2005 - 6:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भेंड्या धु-उन आणि पुसून घ्याव्यात. जर फ़ार जाड असतील तर उभे अर्धे काप करावेत. आणि तेलावर खरपूस तळाव्यात.
नंतर दही घेऊन त्याला फ़ोडणी द्यावी. आले व मिरची कुटून त्या फ़ोडणीत घालावे. आणि मग दह्यात ते घालून मिठ थोडा गरम मसाला किंवा चाट मसाला आवडीप्रमाणे घालावे त्यात ती भेंडी टाकावी. कोथींबीर चिरुन वर घालावी.


Bee
Tuesday, December 13, 2005 - 1:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भेंडीचे अनेकवचन भेंड्या नाही होत रचना :-) :-)

कृती छान आहे, cholesterol चा विचार नाही केला तर एक छान भाजी खायला मिळेल. हवे तर Olive oil rich in Omega-3/6 वापरायचे :-)


Chinnu
Tuesday, December 20, 2005 - 11:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रच, दही भेंडी करुन पाहीली ग. मस्त झाली होती. मैअह्या नवर्याला लयी आवडली. झटपट झालि अगदी. :-)

Mita
Friday, January 06, 2006 - 5:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना, खूपच छान झाली दही भेंडि. Thanks
मी थोडा चेंज केला की आधी जीरे मोहरी आणि हिंगाची फ़ोडणी दिली आणि त्यातच भेंडि तळुन झाल्यावर हळद आणि तिखट घातले. आणि ह्या भेंड्या दह्यात मिसळल्या.


Megha16
Thursday, February 23, 2006 - 2:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना
काल मी दही भेंडी केली होती तु सांगीतल्या प्रमाणे.
छान झाली होती,एकदम झट्पट,सोपी,स्वादीस्ट.
Thanks
मेघा


Sonalisl
Friday, December 14, 2007 - 10:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद रचना आणि मिता तुला पण.
मी आधी फ़ोडणी करुन दही भेंडी केली, छान झाली होती.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators