|
Moodi
| |
| Thursday, December 08, 2005 - 1:57 pm: |
|
|
पपई आईस्क्रीम साहित्य : २ वाट्या गोड पिकलेल्या पपईचे तुकडे, अर्धा लिटर दुध,३ मोठे चमचे साखर, २ मोठे चमचे दुधाची पावडर, ३ मोठे चमचे क्रीम, चेरी अन पिस्ता सजवायला. कृती : दुध उकळायला ठेवा. ते नंतर थंड करुन त्यात पपईचे तुकडे, दुध पावडर अन क्रीम अन साखरे बरोबर मिक्सरमधुन फेस येईपर्यंत फिरवुन घ्या. नंतर एका मोठ्या रुंद तोंडाच्या भांड्यात काढुन, वरुन चेरी अन कातरलेले पिस्ते सजवुन रात्रभर फ्रिझरमध्ये ठेवा. घट्ट झाले की सर्व्ह करा. सकाळी हे तयार केल्यास सेट करायला ठेवल्यावर १ दा परत बाहेर काढुन मिक्सरमधुन फिरवुन घ्या, म्हणजे soft होईल. अन आवडीनुसार इसेन्स अन इतर फळांचे तुकडे घालू शकता.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|