|
Lalu
| |
| Monday, September 13, 2004 - 5:05 pm: |
|
|
हल्लीच 'शाही तुकड्या' बद्दल वाचले इथे. माझ्याकडे ही एक वेगळी रेसिपी होती, ती देत आहे. शाही तुकडा १ ब्रेड (मिल्क ब्रेड, किंवा दुसरा कुठलाही जरा गोड असलेला) १ नारळ खवून ४ कप दूध कस्टर्ड पावडर ( vanilla ) जिलेटिन पावडर (लाल रंगाची) काजू, बेदाणे साखर १ च. चमचा वेलचीपूड ब्रेडच्या कडा काढून टाकाव्यात आणि ब्रेडछे स्लाईस एका पसरट चौकोनी काचेच्या डिश मधे लावावेत. कपभर थंड दुधात २ चमचे साखर आणि अर्धा चमचा वेलचीपूड मिसळून ते चमच्याने हळूहळू त्या स्लाईसेस वर घालावे. फार जास्त घालू नये, स्लाईस सुटे होता कामा नयेत. डिश फार मोठी नसेल तर स्लाईस चे दोन थर द्यावेत. पहिल्या थरावर दूध घालून झले की दुसरा थर द्यावा. पुन्हा दुसर्या थरावर दूध घालावे. ओल्या खोबर्याला २ मोठे चमचे जिलेटिन पवडर आणि १ चमचा साखर चोळून १० मिनिटे ठेवावे. त्याला लाल रंग येतो. ते खोबरे ब्रेडच्या थरावर पसरावे. त्यावर काजू, बेदाणे लावावेत. कस्टर्ड पॅकवरच्या कृतीप्रमाणे दुधात करून घ्यावे, फार घट्ट करू नये. जरा निवल्यावर ते खोबर्याच्या थरावर ओतावे. डिश हलवून सगळीकडे सारखे पसरावे. डिशला वरून प्लास्टिक wrap लावून ती फ़्रीझमधे टाकून द्यावी. तास दोन तासानी कस्टर्ड चा थर सेट झाल्यावर काढावी. सर्व्ह करताना सगळे थर येतील अशा पद्धतीने कापून द्यावे.
|
Arch
| |
| Monday, September 13, 2004 - 5:32 pm: |
|
|
laalaUÊ hI trifle pudding caI modified recipe vaaTt. XaahI tukDa bread cao tukDo tLUnaÊ pakat GaalaUna %yaavar rbaDI GaalaUna serve krayacaa AsatÜ. AaiNa serve krtanaaÊ kajaU ipstaÊ AaiNa gaulaabaacyaa pakL\yaa va$na Takayacyaa Asatat.
|
Manuswini
| |
| Thursday, September 28, 2006 - 6:07 am: |
|
|
आर्च तु म्हणते ते बरोबर आहे शाही तुकडा हा नेहमी ब्रेड तळून पाकात टाकून रबडी त्यावर टाकून थंडगार serv करतात. माझी आई अशी करते, basically she saw her north indian friends doing it ५ ते ६ ब्रेड, त्याची कडा काढून घ्यावी, तूप तळायला, साखरेचा घट्ट पाक (इथे पुन्हा ती recipe देत नाही, सगळ्यांना माहीती असेल घट्ट पाक कसा करावा ते), १०० gm रबडी(घरी ही बनवू शकता, इथे US मध्ये ज्यास्त सोपं आहे कारण thick milk मिळते, चांदीचा वर्ख, काजु,बदाम,पिस्ता काप, rose essense , कृती : ब्रेड तुकडे त्रिकोणी कापून tringular कापून तळून घ्यायचे तूपात, साखरेचा घट्ट पाकात थोड्यावेळ मुरु द्यावे लगेच कढईतून काढून, पाकात rose essense घालायचा, खोलगट डीश मध्ये arrange करून त्यावर ही रबडी, चांदीच वर्ख, बदाम,पिस्ता,काजू काप लावून freez करायचे, रबडी नसेल तर full cream आणून, त्यात condensed milk टाकून दूध आटवून rose essense दूधात घातला तरी चालते.
|
साखरेचा पाक टाळायचा असेल तर काय उपाय आहे? :-) किंवा मग कसा करायचा घट्ट पाक ते सांगेल कुणी परत प्लीज? ,धन्यवाद
|
Chafa
| |
| Wednesday, March 14, 2007 - 3:50 am: |
|
|
Condensed milk वापरायचं. ते बरंच गोड असल्यामुळे साखरेचं प्रमाण तपासावं लागेल. अंडी चालत असतील, तर फेटलेली अंडी, condensed milk , whole milk , dry fruits , टोस्टेड ब्रेडचे तुकडे वगैरे सगळं एकत्र करुन बेक करुन पण चांगला प्रकार होतो. मी केला होता एकदा. Multigrain bread वापरावा. तो मुळात गोडसर असतो आणि शिवाय healthy पण.
|
Mvrushali
| |
| Wednesday, March 14, 2007 - 4:51 am: |
|
|
धन्यवाद रे,पण मला मनुस्विनी नी सांगितलेल्या कृतिमधे साखरेचा पाक टाळायचा आहे,एक म्हणजे मला पाकाचं तंत्र जमत नाही आणि दुसरं,इतका खटाटोप करण्यापेक्षा दुसरा काहि पटकन उपाय असेल तर, म्हणुन विचारतेय.तुझ्या पद्धतिनी पण करून बघेन नक्कि,तसाही बराच ब्रेड आहे घरात :-)
|
Lalu
| |
| Wednesday, March 14, 2007 - 1:49 pm: |
|
|
मी वर दिलेली रेसिपी पर्टुची आहे हां. त्याने याच नावाने दिली होती. आर्च च्या पोस्ट नंतर मी तसे लिहिल्याचे आठवते, पण वर्गीकरण करताना माझे पोस्ट हरवलेले दिसते! चाफ्या, बेक्ड प्रकार पण चांगला आहे. तळण्यापेक्षा बरं.
|
Milindaa
| |
| Wednesday, March 14, 2007 - 2:17 pm: |
|
|
त्याने याच नावाने दिली होती.<<< कोणत्या? लालू नावाने?
|
Mvrushali
| |
| Wednesday, March 14, 2007 - 4:32 pm: |
|
|
चाफ्या,जरा तुझी कृती डिटेल प्रमाणासकट लिहिशील का प्लीज?
|
Chafa
| |
| Wednesday, March 14, 2007 - 7:28 pm: |
|
|
वृषाली, माझी कृती गूगल जिंदाबाद आहे! तू bread pudding अशा नावानी गूगल केलंस तर बर्याच रेसिपीज मिळतील. आधी ब्रेडला थोडंसं पातळ तूप लावून टोस्टरमधे, तव्यावर किंवा ओवन मधे ते टोस्ट करुन घ्यायचे. त्यांचे तुकडे करुन फॉइल लावलेल्या बेकिंग डिश मधे रचायचे. ब्रेडच्या अर्ध्या loaf ला १ छोटा कंडेंस्ड मिल्क चा कॅन पुरेल. Whole milk मधे आवडीप्रमाणे साखर विरघळावी. आता ही दोन्ही दुधं आणि फेटलेली अंडी एकत्र करुन हे मिश्रण ब्रेड वर ओतायचं. पिस्ता, बदाम वगैरे घालायचे. ब्रेडच्या सगळ्या तुकड्यांमधे ते मुरलं की ओवन मधे 350 F वर तासभर बेक करायचं. Serve chilled.
|
Mvrushali
| |
| Wednesday, March 14, 2007 - 9:07 pm: |
|
|
नक्की करून बघते,धन्यवाद रे!!
|
Psg
| |
| Thursday, March 15, 2007 - 6:28 am: |
|
|
ओवन मधे 350 F वर तासभर बेक करायचं. Serve chilled. ओव्हन मधे तासभर बेक केलं की 'चिल' होतं का? बेक झालं की बाहेर काढून रूम टेंपला आलं की फ़्रीझर मधे ठेवा, चिल करून सर्व्ह करा.. असं असावं ते.. चाफ़ानी शॉर्टकट मारला का? चाफ़ा, दिवे घे!
|
Chafa
| |
| Thursday, March 15, 2007 - 1:26 pm: |
|
|
Psg, तेच ते. पण serve chilled हां, frozen नाही. तेव्हा फ्रीझरमधे न ठेवता नुसतं रेफ़्रिजरेट करा. ( thanks सविस्तर लिहिल्याबद्दल; मी कंटाळा केला होता.)
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|