Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मटाराची उसळ

Hitguj » Cuisine and Recipies » भाज्या » उसळी » मटाराची उसळ « Previous Next »

Moodi
Tuesday, July 26, 2005 - 4:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maI baryaaca vaoLa 2 pwtInao KallaIya
%yaatlaI ek mhNajao ek tr maTarcao daNao AaQaI qaÜDo iXajavauna Gyaavao maga to maa[ËÜvaovh iknvaa kukrlaa eka iXa+It ]kDavao nantr naohomaIp`maaNao fÜDNaIt baarIk icarlaolaa kaMda prtavaa naMtr %yaavar qaÜDI AalaolasauNa posT Takuna maga %yaavar baarIk icarlaolaa Ta^maoTÜ pNa prtavaa AaiNa naMtr lavaMga dalaicanaI pavaDr iknvaa garma masaalaa Takuna prtuna maga qaÜDo sauko KÜbaro iksa Takuna itKT maIz tsaoca cavaIlaa qaÜDI saaKr Gaalauna prtuna hvao tovaZo paNaI Gaalauna ]kLavao AaNaI XaovaTI kÜiqaMbaIr GaalaavaI
kahI vaoLosa maI kaLa masaalaa AaNaI lavaMga dalaicanaI Asao Takuna krto

Ta^maoTÜ Ana sauko KÜbaro AavaDInausaar Gaalaavao



Bee
Tuesday, January 03, 2006 - 7:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सध्या बाजारात वाटाण्याच्या शेंगा भरपूर आल्या आहेत. मला मटाराचे वेगळे version देईन का? म्हणजे खूप spicy नको. अगदी साधेच आणि चवदार.

Charu_ag
Tuesday, January 03, 2006 - 11:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या दिवसात हिरव्या मटारच्या शेंगा बघुनच तोंडाला पाणी सुटते.
मुडी, मस्त वाटतेय तुझी रेसिपी.

मला पण मटारच्या उसळीत जास्त मसाला आवडत नाही.

मी मटारचे दाने कधीच आधी शिजवत नाही. त्याची चव जाते असा एक समज पक्का असल्या मुळे की काय कधीच प्रयत्न केला नाही.

मटारच्या उसळीसाठी आले लसुन पेस्ट मस्ट आहे.

आधी जिर्‍याची खमन्ग फोडणी द्यायची. कांदा बारीक चिरुन तेलावर परतायचा. मग मटारचे कच्चे दाने परतायचे. मीठ आणि आले लसुन पेस्ट घालुन मन्द आचेवर ठेवायचे. हा प्रकार पातेल्यात चांगला होतो. शिजवन्यासाठी पाणी अज्जिबात घालायचे नाही. मिठामुळे आणि ओल्या दाण्यातील आर्दतेमुळे मन्द आचेवर त्याला आपोअप पाणी सुटते. तरिही थोडी काळजी म्हणुन पातेल्याअर खोलगट ताटली ठेवुन त्यात पाणी ओतायचे, म्हणजे करपण्याची उरलीसुरली शक्यता ही संपली. अर्थात हे आच मंद ठेवुनच करायचे.
तोपर्यन्त वाटण करुन घ्यावे.

वाटणासाठी ओले खोबरे, टोमॅटो, आले हे मिक्सरमधुन अगदी बारिक करुन घ्यायचे. हिरव्या मिरच्या आवडत असतील त्या ही या वाटनात वाटुन घ्यायच्या.
मटार शिजल्याचे वासावरुन लगेच कळते. (करपल्याचा वास नव्हे. आल्याचा अश्या भाजीत एक वेगळाच वास येतो, शब्दात पकडणे अवघड आहे.]
मटार शिजले की वाटन त्यात घालुन परतायचे. तळाला लागु द्यायचे नाही. वाटणात हिरवी मिरची नसेल तर लाल तिखट घालयचे. ही उसळ नेहमी सारखी कोरडी होत नाही. कोरडी हवी असेल तर भाजलेल्या तीळ काजुची पुड घालावी.
आवडत असेल तर धणे भाजुन त्याचे पुड ही घालता येईल.

फुलकोबी, मटार यांची भाजी करताना सुद्धा मी असेच शिजवते. या भाजीत बटाटा हवा असेल तर मात्र तो आधी शिजवुन घ्यावा लागतो, बाकी कृती सारखीच.


Bee
Wednesday, January 04, 2006 - 4:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चारू, कृती एकदम आवडली. कालच मी मटार सोलून ठेवलेत.

Prady
Wednesday, February 22, 2006 - 8:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi

A little different version of matar usal.As said earlier jiryachi fodani karayachi ani matar partayache thode.aala lasun paste ghalayachi ani oola khobara, kothimbir,hiravi mirachi asa watan karoon ghyacha. khobara bharpoor ghalayacha.watibhar matarche dane wegale kadhun tehi mixer madhe bharad watayache ani bhajit ghalayache.chavi pramane meeth,thodi dhane jire pood ani thoda garam masala ghalayacha. ani bharpoor ras thewayacha ya usalila.khobryamule ani watlelya matarchya danyamule daatsar hoto.Thandichya diwasat punyala baryachada mazya relatives kade matar usal ani bread asa menu asato.barobar kanda limbu ghyayacha tondi lawana mhanun.

Bee
Thursday, February 23, 2006 - 10:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रज्ञा, म्हणजे ही मटाराची उसळ नाहीतरी आमटीसारखा प्रकार म्हणता येईल ह्याला, व्हय ना? पण कृती खूपच छान वाटली. घरी आहेत मटार, करून पाहता येईल.

Bee
Friday, February 24, 2006 - 5:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रज्ञा, काल मी करून पाहिली ही उसळ पण वेळ नव्हता म्हणून नारळाचे वाटण ऐवजी नारळाचे तयार मिळणारे दुध घातले आणि मटार तसेच अख्खे ठेवलेत. छान झाले होते. आता पुढल्या वेळी मटार भरड वाटून करून पाहीन. धन्यवाद!

ह्यावरून मला आठवले, आमच्या वर्‍हाडात, तुरीच्या ओल्या शेंगा सोलून त्यातील दाणे काढले जातात आणि मग ते पाट्यावर वरवंट्याने वाटून त्याचे छान मसालेदार वरण केले जाते. थोडा गुळ घातला जातो. ह्याला आम्ही सोले म्हणतो. सोले हे सुकेही केले जातात. सुके सोले कचोरीतही भरले जातात. खास करून शेंगा यायच्या दिवसात. माझ्या तोंडला आता भरभरून पाणी सुटले आहे.


Prady
Friday, February 24, 2006 - 7:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi Bee

mala watala olya harbharyala sole mhantaat.me ekada khalli hoti turichya danyachi kachori ani khoop awadali hoti mala. olyaa turichi pan hote ka kachori. turee chya danya waroon athawala mazi aaji tureeche dane ghaloon danagela nawachi ek dish karat ase. khoop kharpoos chhan lagata. takeen me lawakarach tyachi kruti.

Sharmila_72
Wednesday, November 22, 2006 - 1:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी अगदी साधी करते मटारची उसळ. मटारची मूळ चव कायम ठेवून.

तेलावर फोडणीत मोहरी, हिंग,हळद टाकावी. त्यावर मटारचे दाणे टाकावेत. लगेचच आधी तयार करुन ठेवलेली आल-हिरवी मिरची-जीरे याची पेस्ट टाकावी. आल बेतान घ्याव नाहीतर उग्र लागेल तसेच जीरे पण. पाण्याचा हबका मारून वर झाकण ठेवावे, झाकणावर पण पाणी ठेवावे. एक वाफ आणावी. मीठ, साखर घालून सारखे करावे. लिंबू पिळून ओलं खोबरं-कोथिंबीर घालून गरम गरम घ्यावी. ही उसळ फक्त ताज्या मटाराचीच करावी. फ्रोझन मटारची नाही.


Prady
Wednesday, November 22, 2006 - 1:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा अजून एक प्रकार. थोडा मसालेदार पण छान लागते अशी उसळ पण

साहित्य:
१) एक किलो मटार
२) २ कांदे
३) २ टोमॅटो
४) चवी प्रमाणे मीठ
५) पाव चमचा हळद
६) १ चमचा साखर
७) २ टेबलस्पून तेल

वाटण मसाला:
१) अर्धी वाटी ओलं खोबरं
२) ७-८ हिरव्या मिरच्या. जसं तिखट हवं तसं प्रमाण कमी जास्त करावं
३) ४-५ लसूण पाकळ्या
४) अर्धा इंच आलं
५) १ तुकडा दालचिनी
६) ४-५ काली मिरी दाणे
७) १ लवंग
८) अर्धा चमचा जिरे
९) १ मूठ कोथिंबीर.
( आधी कोरडे जिन्नस वाटावे मग बाकी साहित्य घालून वाटण तयार करावे.)

फोडणी:
१) जिरे
२) मोहरी
३) हिंग
४) कढीपत्ता

कृती:
मटार सोलून घ्यावा.कांदे, टोमॅटो अगदी बारीक चिरावे. पातेल्यात तेल तापल्यावर फोडणीचे मसाले घालावेत. त्यावर कांदा परतावा. नंतर टोमॅटो घालून परतावे. तेल सुटायला लागलं की मटार दाणे आणी हळद घालून परतावे. मटार वाफेवर शिजू द्यावा. मटार शिजला की वाटण, मीठ, साखर घालावे. ५-७ मिनिटांनी गॅस बंद करावा.

( साभार्: परफेक्ट रेसेपीज सौ प्रतिभा कोठावळे)


Seema_
Wednesday, November 22, 2006 - 4:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

prady वरती लिहिलेली ही मटार उसळ म्हणजे bread बरोबर वरती शेव वैगरे घालुन जी उसळ मिळते तीच का ? मी जनसेवा मध्ये एकदा खाल्लेली . आवडलेली मला . आपण नेहमीची उसळ करतो त्या पेक्षा थोडी पातळ , रगड्या सारखी असते ती .

Prady
Wednesday, November 22, 2006 - 4:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ती भरपूर खोबरं वाली उसळ शेव वगैरे घालून ब्रेड बरोबर खातात.

Disha013
Wednesday, November 22, 2006 - 4:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शर्मिला,अगदी अशीच करते उसळ मी पण.
अजुन त्यात जरासे variation करुन....
मटार कोरडे भाजणे. थोडा भाजुन झाला की अर्धा चमचा तेल टाकुन परत खमंग भाजणे. (झाकण लावु नये.)
आले+जिरे+लसूण+हिरवी मिरची ई पेस्ट करणे. कढईत तेलात कान्दा परतुन घेणे,टोमटो परत्णे. पेस्ट टाकणे. परतणे.
मटार वाटीने हलके ठेचून घेणे. कढईत टाकणे. झाकूण वाफ़ा आणणे. वरून ओले खोबरे,कोथींबिर टाकणे.


Deepant
Sunday, November 26, 2006 - 2:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi, i am new user of mayboli. Please, Masurachi usal/bhaji koni sangu shakel ka?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators