|
ओल्या हळदीचे लोणचे साहित्य: ओल्या हळदीचे गड्डे, ओल्या मिरच्या, मीठ, लिम्बू, आलं, (पाव वाटी मोहरी कुटुन, १ चमचा मेथी व १ चमचा हिंग तळुन कुटुन, हे तीन जिन्नस एकत्र करुन तयार करुन घेतलेला मसाला ओल्या हळदीच्या गड्ड्यांचे व आल्याचे गोल गोल तुकडे प्रत्येकी एक वाटी करावे. ते एकत्र करुन त्यांना वरील मसाला चोळावा. नंतर अंदाजाने मीठ व लिंबाचा रस त्या तुकड्यांवर घालावा. तसेच ओल्या मिरच्यांचे तुकडे एक वाटी करुन तेही त्यात घालावे. नंतर तेलाची फोडणी करुन थंड झाल्यावर त्यावर घालावी. हे लोणचे कालवून सारखे करावे आणि बरणीत भरुन ठेवावे. बरेच दिवस टिकते.
|
Dineshvs
| |
| Monday, December 05, 2005 - 4:08 pm: |
| 
|
या लोणच्याने तोंडाला चव येते. हळद आणि आले किसुन घेतले तर लोणचे छान मिळुन येते, पण किसणी पिवळीधमक होवुन जाते.
|
वीणा, झालं ग माझ पण आम्बेहळदीचं लोणचं तयार. मी यावेळेस थोडी आम्बेहळद, आल, आणि २ बुटुक साधी ओली हळद असे सर्व किसून घातले दिनेश यांनी सांगितल्याप्रमाणे. ( हातांचा विशेषत: नखान्चा पिवळेपणा आहे अजून ) आणि बाकीची आम्बेहळद गोल गोल तुकडे करुन घातली मला ती चावून खायला आवडते म्हणुन. छान मिळुन आलय त्यामुळे.घरी हळद लावून पहायला काहीच हरकत नाही, म्हणजे हळदीची पाने पण मिळतील मोदक वाफवताना, पातोळ्या करताना
|
Madhura_d
| |
| Thursday, December 22, 2005 - 3:05 pm: |
| 
|
शर्मिला, मला तू सान्गितल्या प्रमाणे लोणचे करुन बघायचे आहे. पण लोणच हा प्रकार मी पहिल्यान्दाच करत असल्याने, फोडणी किती घालायची ते कळत नाहीये. मला प्रमाण सान्गशील का?? हळद १ वाटी आल १ वाटी मिर्ची १ वाटी मसाला पाव वाटी फ़ोड्णी च तेल ?????????? नेहमीची फ़ोडणीची मोहरी मिक्सर मधुन चालेल की मोहरी ची डाळ विकत आणू?????
|
मधुरा, आपली नेहमीची मोहरी पाव वाटी घेऊन ती मिक्सरमधून काढ. पण फार वेळ फिरवू नकोस मिक्सर. जस्ट फ़िरव.भरड हव. आणि तेल साधारण पाऊण ते एक वाटी घे. आणि मधुरा, तेल जरी कमी वाटल ना तरी नंतर केव्हाही फोडणी करुन घालता येतं. तेव्हा पाऊण वाटी प्रथम घेतलस तरी चालेल. आणि थंड झाल्यावर मगच ओतायची हं फोडणी, माहीत आहे ना?
|
Savani
| |
| Thursday, September 14, 2006 - 1:40 pm: |
| 
|
शर्मिला, मला हे हळदीचे लोणचं करायच आहे. मला सांगा की ह्यात आलं किती घालायचं? म्हण्जे हळदीच्या बरोबरीने का? दिनेशदा, तुम्ही पण सांगा. आणि हळद लावायची आयडीया छान आहे. लावून पाहते.
|
Dineshvs
| |
| Thursday, September 14, 2006 - 5:06 pm: |
| 
|
हळदीच्या बरोबरीने आले घेतले वा कमी घेतले तरी चालेल. चकत्या करुनच हे लोणचे करतात, पण किसुन केले तर छान मिळुन येते. ओल्या हळदीने किसणीला मात्र पिवळा राप चढतो, हे लक्षात ठेवायचे. मिरचीपेक्षा मिरीदाणे, वा ओले मिरीदाणे मिळाले तर फार छान. शक्य असेल तर या पिंपळीपण मिसळावी. हा मिरीसारखाच एक प्रकार असतो. किसुन केलेल्या लोणच्यात नुसता लिंबाचा रस, साखर मीठ व हिंग घातला तरी चालतो फोडणी वा मसाला नाही घातला तरी चालेल.
|
Savani
| |
| Thursday, September 14, 2006 - 5:56 pm: |
| 
|
दिनेशदा, धन्यवाद. हे लोणचं मुरायची वाट नाही न बघावी लागत. लगेच खाता येत न.
|
Dineshvs
| |
| Friday, September 15, 2006 - 5:29 am: |
| 
|
हो हो खाता येते. पण कच्च्या हळदीने कधीकधी घश्याला त्रास होतो. म्हणुन आठवडाभर तरी मुरु द्यावे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|