Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
घोळाना..

Hitguj » Cuisine and Recipies » Soups and Salads » Salads » घोळाना.. « Previous Next »

Bee
Friday, December 02, 2005 - 9:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घोळाना हा संपूर्ण विदर्भीयन पदार्थ आहे.

अर्धा जुडी चिरलेली पालक,
अर्धा जुडी बारीक चिरलेली कोथिंबीर, फ़ुले आलेली कोथिंबीर मिळाली तर छानच,
पाव वाटी अर्धवट भिजलेली चनाडाळ,
दोन चिरलेले टोमॅटो,
दोन चमचे शेंगदाण्याचे तेल,
हरबर्‍याची भाजी असेल तर तीही एक मूठ घ्यायची,
एक चमच लाल तिखट

वर दिलेले सगळे काही एकत्र करून घोळायचे, त्यावर तिखटाची भुकटी टाकायची, दोन चमचे तेल टाकायचे, मिठ टाकायचे. साखर मुळीच नाही. अर्धा तास झाकून ठेवले की छान पाणी सुटते.


Prajaktad
Friday, December 02, 2005 - 3:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी,पण या बीबी वर लिहलेस म्हणजे नुसतेच खायचे का?कि पोळि वैगेरे बरोबर?

Bee
Saturday, December 03, 2005 - 2:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता, जसे आपण कोशिंबीर खातो तसेच घोळाना खायचा. खरे तर हा एक कोशिंबीरीचा प्रकार आहे असे बर्‍याचदा मला वाटते आहे पण घरचे मान्य करत नाही म्हणून मी स्वतंत्र बीबी केला.

Malavika
Thursday, June 15, 2006 - 12:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घोळण्यची रेसिपी वाचून बारे वाटले. अस्सल वैदर्भीय पदार्थ. पालकाऐवजी मेथी घातली तरी छान लागेल.

Dineshvs
Thursday, June 15, 2006 - 4:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान वेगळा प्रकार आहे हा. काहि काहि शब्दांची गंम्मत असते. ऊन्हाळ्यात जेंव्हा नाकातुन रक्त येते, त्याला घोळणा फुटला असे म्हणतात आमच्याकडे.

Sunilsavan
Monday, June 19, 2006 - 12:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Reciepy aavadlee karoon paahu.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators