|
Milindaa
| |
| Monday, March 06, 2006 - 9:57 am: |
| 
|
Sharmila_72, Thanks for your efforts to put the recipe in the appropriate section.
|
mala gaboli fry /patice chi recipe havi ahe. kuthe milel ti mala.
|
Dineshvs
| |
| Tuesday, August 22, 2006 - 4:22 pm: |
| 
|
मालवणी खाजा किंवा शेवखंडे. अजुनहि कोकणात जत्रेत हा पदार्थ आवर्जुन विकायला असतो. आमच्या घरी लहानपणापासुन हा पदार्थ येत असल्याने, मला मात्र तितकासा आवडत नाही. याला शेवखंडे म्हणतात हे हल्लीच ऐकले. कोकणात तरी हा शब्द वापरात नाही. सव्वा वाटी जाडसर कणीक व सव्वा वाटी बेसन चाळुन एकत्र करावे. त्यात दोन चमचे तेलाचे मोहन घालुन पाण्याने घट्ट मळावे. जरा वेळ तसेच ठेवुन मग त्याचे कडबोळीप्रमाणे पण सरळ गाठे वळावेत. भर तेलात ते तळुन घ्यावेत. तळले कि त्याचे बोटभर लांबीचे तुकडे करावेत. पाव वाटी काळे तीळ भाजुन घ्यावेत. दोन वाट्या चिरलेला गुळ घेऊन, पाणी न घालता त्याचा मंद आचेवर पाक करावा. त्यात अर्धा चमचा सुंठपुड घालावी. आणि मग त्यात तळलेले गाठे घालुन अलगद हाताने ढवळावे. पाक लगेच शोषला जातो. तो अगदी सुकायच्या आत, त्यावर तीळ शिवरावेत.
|
दिनेश, या खाज्यांबद्दल फार ऐकले होते म्हणून मध्यन्तरी मालवणला गेलो असता मुद्दाम घेतले.मला तर अजिबात आवडले नाहीत. त्यापेक्षा देशावरील गोडीशेव मला अधिक चांगली वाटली...
|
दिनेश ते काय असते. orange color चे, गोड असते चवीला आणि हातगाडीवर विकतात?
|
Dineshvs
| |
| Wednesday, August 23, 2006 - 1:14 am: |
| 
|
हेच असावे ते रचना. याचा आकार म्हणजे एक सेमी जाड शेव, असा असतो.
|
Chandya
| |
| Wednesday, August 23, 2006 - 3:11 pm: |
| 
|
... त्याला रेवडी म्हणतात.
|
नाही रेवडी पांढर्या रंगाची असते बहूतेक. शेवखंड म्हणजे काय दिनेश?
|
Dineshvs
| |
| Wednesday, August 23, 2006 - 4:10 pm: |
| 
|
या पदार्थालाच शेवखंड म्हणतात. रेवडी लंबगोल वा गोल आकाराची साधारण दोन सेमी आकाराची असते. पांढर्या तीळाची करतात, म्हणुन रंगाने पांढरीच असते. चवीला कुरकुरीत लागते.
|
रेवडी कुरकुरीतच लागते असे नाही. त्यात गूळ वापरतात. गुळाच्या नरमपणावर रेवडीचा नरमपणा अवलम्बून असतो. ठिसूळ रेवड्याही असतात.किम्बहुना त्या ठिसूळच असतात अपवादात्मक कडक असतात. साखरेच्या रेवड्या चवीला बरोबर नसतात पण त्या कडक असतात. रेवडी तयार करताना पद्धती पहीली तर माणूस आयुष्यात पुन्हा रेवडी खाणार नाही. म्हणतात ना दृष्टीआड सृष्टी!!
|
Dineshvs
| |
| Thursday, August 24, 2006 - 4:56 pm: |
| 
|
रॉबीन, तसे कुठलेच बाहेर मिळणारे पदार्थ तयार होत असताना, बघवत नाहीत. हा अनुभव मी अगदी पंचतारांकित हॉटेल्समधेहि घेतलाय. पण एवढे असुनहि ते पदार्थ पांढरेशुभ्र कसे होतात, याचेच नवल वाटते.
|
Swa_26
| |
| Thursday, December 14, 2006 - 10:10 am: |
| 
|
मागे नीलुने बेसन भरुन कुर्ल्यांची रेसिपी विचारली होती. मी अशी करते: कांदे बारीक उभे चिरुन भाजून घ्यावे, ओले खोबरे किसून भाजून घ्यावे, आलं-लसूण, (लसूण थोडा जास्त) थोडी कोथिंबीर हे सर्व बारिक वाटायचे. बेसन असेच तव्यावर खरपूस भाजून घ्यावे (मंद आचेवर भाजावे, खमंग वास आला पाहीजे आणि रंग थोडा बदलला पाहीजे.) कुर्ल्यांचे डेंगे मिक्सरमधुन अगदी थोड्या वेळात फिरवून काढायचे आणि मग त्यातील पाणी निवळून घ्यायचे. (हे थोडे कौशल्याचे काम आहे, कारण त्या डेंग्याच्या कपच्या पण येऊ शकतात, पण जमू शकेल.) आता वरील वाटणातील थोडे वाटण, बेसन, मीठ आणि थोडे लाल तिखट हे या पाण्यात मिक्स करावे. मिश्रण आपण त्या कुर्ल्यांमधे भरू शकु एवढे पातळ करावे, खूप पातळ नको. कुर्ल्या स्वच्छ करुन त्याचे दोन्ही भाग वेगळे करावे आणि त्यातिल रिकाम्या भागात हे मिश्रण भरून त्याला आणि दुसर्या भागाल दोर्याने बांधावे. आता पातेल्यात थोडे तेल घालून त्यात थोडे जिरे, एखादे तमालपत्र, थोडा कांदा घालून परतावे. मग त्यात वरील आणि उरलेले वाटण घालून परतावे आता त्यात उरलेले पाणी (किंवा साधे पाणी) घालावे आणी एक उकळी येऊ द्यावी. त्यानंतर मग त्यात भरलेल्या कुर्ल्या घालून शिजवावे.
|
Bgovekar
| |
| Thursday, February 08, 2007 - 9:31 am: |
| 
|
रॉबीन तुमच्या खाण्यात आलेले खाजे कदाचीत गुळ नरम वगैरे झालेले असे आले असेल. पण आल्याचं खाजं खुप छान लागतं मालवणात गेलं की सापळे किंवा पारकर यांच्या दुकानातुन या खाण्याच्या वस्तु म्हणजेच खाजं तसेच खडखडे लाडु, शेंगदाण्याचे लाडु घ्यावेत अगदी रोजच्या रोज या वस्तु बनतात व हातोहात विकल्याही जातात. स्वाती कुर्ल्यांचा तुझा हा बनवण्याचा प्रकार थोडा वेगळा आहे.. पण खर सांगु.. ते डेंगे खायलाच मस्त मजा येते.
|
Manuruchi
| |
| Wednesday, September 12, 2007 - 9:42 am: |
| 
|
Kalya vatanyache sambar hi malvani lokanchi khasiyat, pan te kase karayache te sangal ka koni ?
|
Jagu
| |
| Thursday, October 04, 2007 - 6:19 am: |
| 
|
काकडीचे धोंडस कुकर मध्ये कसे करतात?
|
Dineshvs
| |
| Thursday, October 04, 2007 - 3:19 pm: |
| 
|
सगळे मिश्रण तयार झाले कि डब्याला तुपाचा हात लावुन ते दहा ते पंधरा मिनिटे प्रेशरवर शिजवावे. गव्हाच्या जाड्या रव्याला इतका वेळ लागतो. तांदळाचा रवा वापरला तर लवकर होईल.
|
Sonalisl
| |
| Thursday, November 01, 2007 - 6:12 am: |
| 
|
मला कोणी सोलकढी कशी करायची ते स सन्गाल का? Please
|
सोनाली ही लिन्क चेक कर , /hitguj/messages/103383/4807.html?1193417243
|
Sonalisl
| |
| Friday, November 02, 2007 - 4:23 pm: |
| 
|
मी नेट वर सर्च केलं होतं पण त्यात बराच फ़रक होता. Thanks Trupti
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|