|
Charu_ag
| |
| Wednesday, August 10, 2005 - 7:07 am: |
|
|
अतिशय सोपी, सुटसुटीत आणि प्रथिनयुक्त भाजी. साहित्य(एक ते दोन व्यक्तींसाठी) :- सालासहित भाजेले शेंगदाणे (एक वाटी), १ कांदा बारिक चिरुन, फोडणीसाठी जिरे, कढीपत्ता, २ - ३ टेबल्स्पुन काळ तिखट,चवीपुरते मीठ कृती :- भाजलेल्या शेंगदाण्याचे शक्यतो सालासहीत कुट करुन घ्यावे. हे कुठ अगदी बारिक न करता भरड च करावे. बारिक केले तर चव जाते. कढईत तेल तापवुन त्यात जिरे आणि कढीपत्ता टाकवा. कांदा सोनेरी रंगाचा होइपर्यंत परतावा. काळा मसाला जर तेलात परतुन आवडत असेल तर तेलात परतावा. आता पाणी घालावे. या पाण्यात मीठ घालावे. पाण्याला चांगली उकळी येवु द्यावी. जर काळा मसाला तेलात परतला नसेल तर या उकळीत टाकावा. हे पाणी चांगले उकळ्यल्यानंतर त्यात शेंगदाण्याचे कुट घालावे. हे मिश्रन मंद आचेवर चांगले ढवळावे. थोडे घट्ट झाले की आणखी एकदा खालवर करावे, जेणेकरुन तळाला लागणार नाही. पिठळ्याप्रमाणे सरबरीत झाले की कढई उतरावी. भाजीला शेंगदाण्यामुळे भरपुर तेल सुटते. वरुन कोथींबीर घालावी. म्हाद्या खायला तयार. चपाती किंवा भाकरीबरोबर छान लागतो. पण बेतानेच खावा. सालासहीत असल्याने दिसायला अगदी काळपट दिसेल, पण साले काढुन केला तर तितकासा चांगला लागत नाही. तिखट थोडे चढेच हवे. पाणी उकळत असताना यातच थोडे ओले खोबरे किसुन घातले तर आणखी वेगळी चव येते.
|
Itsme
| |
| Wednesday, August 10, 2005 - 7:47 am: |
|
|
हा कुठला प्रकार आहे म्हणजे, वर्हाड, खांदेश ई. ई. ... आमटी इतके पात्तळ करावे की पळीवाढ भाजी सारखे
|
Charu_ag
| |
| Wednesday, August 10, 2005 - 7:58 am: |
|
|
आरती, हा सातार्याकडचा प्रकार आहे. हे आमटीसारखा पातळ नसुन सेमीसॉलिड प्रकारात येईल. बेसन पिठाच हिरवी मिरची घालुन पिठल करतो तस. पाणी जास्त आटल तर कोरड्या पिठल्यासारख पानात लावता येत.
|
caaÉ nao idlaolyaa recipe laa kaMVaca klsa Asa pna mhNatat.
|
Hi chaaru, kaalach me Mhaadya kela hota, khup avadala, pan thoda kadavat vatala, salamule asel ka?
|
Charu_ag
| |
| Monday, August 22, 2005 - 7:55 am: |
|
|
mastanaIÊ barÜbar. mhaVa saalaaMmauLoca kDvaT laagatÜ. %yaasaazIca itKT qaÜDo jaast GaalaayacaoÊ maga
kDvaT cava kLt naahI. saalao kaZuna pNa kÉ Xaktosa pNa cava AgadIca imaLimaLIt laagato.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|