Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
कचोरी

Hitguj » Cuisine and Recipies » उपाहार » कचोरी « Previous Next »

Anuli
Saturday, July 09, 2005 - 10:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mala kachori chi recipe havi ahe. konala mahit aslyas pls post kara. Dhanyavad..

Eliza
Saturday, July 09, 2005 - 11:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

AnaulaIÊ maaJaI ÌtI hI Aaho.. pNa BarpUr vaoL Asaola trca kr..

[MdÜrI kcaÜrI

kvhr

maOda tola AaiNa imaz GaalaUna pÜL\yaaMcyaa ipzapoxaa Ga+ iBajavaavaa. kcaÜáyaa krNyaa AaQaI AQaa- tasa trI iBajaayalaa hvaa.

saarNa

p`oXar kUkor maQyao maugaacaI DaL iXajavaUna GyaayacaI. paNaI Ôar GaalaU nayao. DaL iXajalaI kI baahor kZšt tola tapvaUna %yaalaa ijaro AaiNa baDI XaÜpocaI ÔÜDNaI VayacaI. %yaat maga hLdÊ itKT Gaalaayacao. iXajalaolaI DaL GaalaayacaI. va$na garma masaalaaÊ QaNao - BarD vaaTlaolao Gaalaayacao. cavaIlaa maIz Gaalaayacao. ho sagaLM AgadI paNaI AaTo pya-Mt iXajavaayaca. pNa AgadI dry k$ nayao. cavaIlaa qaÜDI AamacaUr pavaDr pNa Gaalata yaoto. maI naahI Gaalat.

kvhrcaa purI cyaa Aakaracaa gaÜLa k$na Gyaa AaiNa laaTa. %yaat maQya BaagaI saarNa zovaUna purNaacyaa pÜLIsaarKM baMd kra. saarNa purNaasaarkM kvhrlaa icakTUna AsaavaM. Aat hvaa nakÜ. Aata na laaTta hatanaoca capTa k$na saarNa sagaLIkDo spread kra. dusarIkDo kZšt tola tapt zovaa. tola garma nasaavaM..... saaQaarNa maQyama AsaavaM. AgadI maMd Aacaovar zovaa AaiNa hI kcaÜrI %yaat Taka. hI kcaÜrI saarKI turn k$ nayao. p`%yaok baajaU ekdaca tLavaI. maÜzI kZš Gao}na ekdma 8 - 10 kcaÜáyaa eka vaoLI tLlyaasa ]<ama.


Sas
Friday, February 17, 2006 - 2:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Instant Kachori चि Recipe
माहित आहे का कुणाला???

Supermom
Friday, February 17, 2006 - 2:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण कोणाकडे तरी खाल्ली होती. रेसिपी नाही माहीत. पण सावर क्रीममधे पीठ भिजवले होते येवढे आठवते. अन बेक करून केली होती.

भाग्या मला वाटते तुला माहीत असेल. पोस्ट करतेस का प्लीज.


Milindaa
Friday, February 17, 2006 - 12:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इन्स्टन्ट कचोरी म्हणजे काय हे जरा सांगाल का ?

Suniti_in
Friday, February 17, 2006 - 6:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे काय विचारणे झाले? इन्स्टन्ट कचोरी म्हणज झटपट होणारी कचोरी.

Kitkat
Wednesday, March 15, 2006 - 8:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"झटपट कचोरी "
साहित्य: पाव किलो प्रत्येकी बारीक रवा व मैदा, थोड मीठ, तीन टे. स्पून पातळ केलेल्या तुपाचे मोहन.
सारण-फुटाण्याच्या डाळीचे पीठ दोन कप, तिखट, मीठ, जाड कुटलेली बडीशेप एक चमचा, धनेपूड दोन चमचे, ओवा एक चमचा, पादेलोण अर्धा चमचा, आमचूर एक चमचा, हिंग पाव चमचा.
कृती:
रवा मैदा भिजवून ठेवा.सारण साहित्य एकत्रकरून त्यात ठोडं तेल घाला. पीठाची पारी लाटून थोडं सारण भरा, तोंड बंद करून लाटून तळा. सारण चवीला चटपटीत पाहीजे. छूंदा किंवा लोणच्याबरोबर खा.


Sayuri
Tuesday, February 06, 2007 - 6:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला ओल्या नारळाचं सारण असलेल्या आणि वरुन बटाट्याचं कव्हर असलेल्या कचोरीची रेसिपी हवी आहे...इथे दिसली नाही दुसरीकडे कुठे टाकली आहे का?

Dineshvs
Tuesday, February 06, 2007 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओले खोबरे, साखर, थोडे काजुगर, थोडासा आल्याचा किस, आणि अगदी थोडी हिरवी मिरची असे एकत्र करुन सारण बनवायचे. किंचीत गरम करायचे, पण मोदकाच्या सारणा ईतके शिजवायचे नाही.
बटाटे उकडुन मॅश करायचे. त्यात मीठ आणि अरारुट घालायचे. हलक्या हाताने पारी करुन त्यात हे सारण भरायचे आणि डीप फ़्राय करायचे. घुसळलेल्या गोड दह्याबरोबर खायचे.
पाव किलो बटाट्याना अर्धी वाटी अरारुट व एक नारळाचे सारण लागेल. शॅलो फ़्राय केले तरी चालेल. तसे करायचे असेल तर कचोर्‍या चपट्या करायच्या. डीप फ़्राय करायच्या असतील, तर गोल वळायच्या.
मी रताळ्याच्या करंज्याची कृति लिहिली होती, ती यापेक्षा खुमासदार लागते.


Uno
Tuesday, February 06, 2007 - 6:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशभाई आरारूटला ईन्ग्लिश मधे काय शब्द आहे.

Sami
Tuesday, February 06, 2007 - 7:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

arrowroot असं म्हणतात. ...

Sayuri
Wednesday, February 07, 2007 - 12:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दिनेश! अरारुटला काही पर्याय? (कॉर्न स्टार्च?) अरारुट घालण्यामागे काय कारण..as a binder/thickening agent म्हणून....?

Dineshvs
Wednesday, February 07, 2007 - 1:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो बाईंडर म्हणुनच. नुसत्या बटाट्याची पारी बांधली जात नाही. म्हणुन अरारुट, पावाचा चुरा, मैदा वैगरे घालावे लागते. कॉर्न स्टार्च पेक्षा कॉर्नफ़्लोअर चांगले. राजगिर्‍याचे, वर्‍याचे, तांदळाचे पिठहि चालेल.

Mrinmayee
Wednesday, February 07, 2007 - 2:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या कचोर्‍या करताना सारणात मी ओला नारळ खवून, त्यात मीठ, हिरवी मिरची ओबडधोबड वाटून, बारिक चिरलेली कोथिंबीर आणि (घरी आवडतात म्हणून) बेदाणे घालते. जरासं लिंबु पिळलं यात तर छान चव येते. नारळ फारसा गोड नसेल तर थोडी साखर पण घालते.
सारणासाठी बाटाटा युकॉन गोल्ड घ्यावा. त्याचा चिकटपणा या कचोरीच्या पारिला अगदी योग्य असतो. उकडलेला बाटाटा किसून थंड होऊ द्यावा. त्यात मीठ (बटाट्याच्या अंदाजापेक्षा जरा जास्त) आणि जरासा चाट मसाला घालावा. बटाट्याचा लगदा एकत्र कालवून इथे मिळणारं कॉर्न फ्लावर त्यात मिसळंत जावं. साधारण घट्ट झालं (पणतीच्या आकाराची पारी करण्याइतपत) की कॉर्न फ्लावर मिसळणं थांबवून तेलाचा हात घेऊन मग दिनेशदानी सांगीतल्याप्रमाणे सारण भरून त्याचे गोळे करून घ्यावेत. एका वाटीत याच मक्याच्या पिठाचं, पाणी घालून पातळसं मिश्रण करून घ्यावं. एकेक गोळा यात बुडवून मध्यम आचेवर तेलात तळावा. कॉर्न फ्लावर कमी झालं तर कचोर्‍या फुटतील. तसंच खूप कचोर्‍या एकत्र तळू नयेत. तेल थंड होतं आणि कचोरी फुटून सारण बाहेर येतं.
मांसाहारी असलेल्यांना यात मटर खीमा भरून कचोर्‍या करता येतात.
तसंच डीप फ़्राइड नको असतील तर बेकिंग शीट्ला तेलाचा हात लावून चपट्या कचोर्‍या ३५० डिग्रीवर बेक कराव्यात. (न झाकता, १०-१५ मिनिटं, एकेका बाजूनी). मधून मधून तेलाचा ब्रश लावावा. शेवटी अगदी १ मिनिट ब्रॉइलवर ठेवावं. अगदी खरपूस कचोर्‍या होतात.


Sayuri
Wednesday, February 07, 2007 - 2:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थॅंक्स दिनेश! तांदळाचे पीठ, मैदा दोन्ही घरात आहे..ट्राय करीनच आता. मृण्मयी छान रेसिपी. आम्ही गुज्जु दुकानातल्या कचोर्‍या आणायचो त्यात बेदाणे असायचे.

Zee
Wednesday, February 07, 2007 - 3:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बेदाणे म्हणजे काय? प्लीज हासु नका. पण मला नेहेमीच बेदाणे म्हणजे किसमीस वाटतात.

Robeenhood
Thursday, February 08, 2007 - 1:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बेदाणे म्हनजे किसमिसच! हसू नका काय?
हसू देत त्याना. हसतील त्याचे दात दिसतील....


Sami
Thursday, February 08, 2007 - 2:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतात आपण corn flour ज्याला म्हणतो त्याला इथे corn starch म्हणतात... कचोरीसाठी आरारूट, किंवा corn starch चालतं. मक्याचं पीठ वेगळं मिळतं इथे ते नाही चालणार.

Mrinmayee
Thursday, February 08, 2007 - 3:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कॉर्न फ़्लावर म्हणजे कॉर्न स्टार्च नाही. (ब्रिटिश रेसिपीज मधे जरी हे शब्द समानार्थी वापरल्या जात असतील तरीही.) मक्याचं पीठ ( corn flour ) हे अख्खा दाणा दळून तयार करतात तर कॉर्न स्टार्च हा एन्डॉस्पर्मपासून होतो. ( endopserm : a nutritive tissue surrounding the embryo in a seed of a flowering plant. This contains food reserves such as starch, proteins and fat).

Mrinmayee
Thursday, February 08, 2007 - 3:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समी, कचोर्‍यात मी मक्याचा स्टार्च नाही पीठ घालते. पण कधी प्रॉब्लेम झाला नाही. बटाटा आधीच स्टार्ची, म्हणून मक्याचे एक्स्ट्रा स्टार्च घालणं टाळते. (पीठ मात्र हवं. कॉर्न मील नावाचा जो रवाळ प्रकार मिळतो तो नको.)

Sami
Thursday, February 08, 2007 - 4:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mrinmayee मला corn meal च म्हणायचं होतं पिवळ्या रंगाचं दाणेदार जे चालत नाही. आणि indian store मधे जे पिवळ्या रंगाच्या box मधे मिळतं त्यावर corn starch असं लिहिलेलं असतं... ते चालतं.. मी नेहमी तेच वापरते. ते आपण भारतात ज्याला corn flour म्हणतो आणि जे chinese recipes मधे thickening agent म्हणून घालतात त्यासारखं असतं.

Sas
Tuesday, March 27, 2007 - 10:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कचोरी तळतांना मध्यम आचेवर तळावी की मोठ्या की एकदम कमी आचेवर. माझि कचोरी तोंडाच्या बाजुला कच्ची रहाते. (सारण भरल्यावर सगळ्या कडा जिथे आपण एकत्र करतो). Pls help.

Dineshvs
Wednesday, March 28, 2007 - 5:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कचोरी बंद करताना, मोदकाप्रमाणे करुन वरचे जास्तीचे पीठ काढुन टाकावे.
तळताना, तेल तापवुन कढई खाली उतरवुन घ्यायची, त्यात दोनचार कचोर्‍या सोडायच्या, आणि बुडबुडे याचे बंद झाले कि परत गॅसवर ठेवुन, झार्‍याने तेल उडवत तळायच्या.
पण तरिही यात आणखी कुणी अनुभवाच्या अधिकाराने सांगितले तर बरे, मी तळण वैगरे फारसे करत नाही.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators