|
Charu_ag
| |
| Wednesday, June 08, 2005 - 3:39 pm: |
| 
|
साहित्य :- मध्यम आकाराचे बटाटे, दही, बारिक चिरलेला पुदिना कांदा, टोमॅटो, टोमॅटो प्युरी, खोबरे, लवंग दालचिनी पावडर, तिखट. क्रुती :- बटाटे धुवुन त्याच्या साधरन मोठ्याच फोडी कराव्यात. दही बारीक चिरललेला पुदिना चवीनुसार मीठ एकत्र करावे. या दह्यातच बटाट्याच्या फोडी घालाव्यात. साधारण वीस मिनिटे तरी ठेवावे. तोपर्यंत कांदा आणि टोमॅटो बारीक चिरुन घ्यावे, टोमॅटो आणि कांदा कढईत तेल गरम करुन चांगले परतावे. त्यातच तिखट ही घालावे. किसलेले खोबरे भाजुन घ्यावे. मिक्सरमधुन प्रथम हे भाजलेले खोबरे वाटुन घ्यावे. नंतर त्यातच तिखटाबरोबर भाजलेला कांदा व टोमॅटो वाटुन घ्यावे. कढईत तेल तापवुन जिर्याची फोडनी करावी, त्यात हे वाटन आणि टोमटो प्युरी आणि दह्यात भिजवलेले बटाटे दह्यासह घालावेत. थोडा पुदिना या फोडनीत घालायला हरकत नाही. थोडे पाणी घालावे. बटाटे शिजत आल्यानंतर लवंग दालचिनी ची पावडर घालावी. आंबट तिखट अश्या चवीचा बटाटा छान लागतो.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|