|
Dineshvs
| |
| Tuesday, August 10, 2004 - 3:30 pm: |
| 
|
खुपदा होटेलमधे टोमॅटो ऑमलेट बनवताना डोश्याचे पीठच वाप्रले जाते. त्यामुळे त्याला छान जाळी पडते हे खरे पण ते जरा जड जाते पचायला. तसे करण्यासाठी तयार डोश्याच्या पीठात हळद, चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर व तिखट किंवा लाल मिरची घालायची. मग हे उत्तप्पम प्रमाणे जाडसर पसरायचे, सोनेरी रंग आला की परतायचे. त्यापेक्षा वेगळ्या घरगुति चवीचे करायचे असेल तर एक बारिक कापलेला कांदा व टोमॅटो एकत्र करायचा. हे कापण्यासाठी चॉपर वापरला तर फ़ारच छान. मग त्यात हळद, हिंग, कोथिंबीर, हिरवी मिरची, थोडे कच्चे तेल, मीठ घालायचे. नुसते बेसन वापरण्यापेक्षा थोडे तांदळाचे पीठ घालायचे आणि जरा घट्टसरच भिजवायचे. त्यात थोडेसे केचप घातले तर छान चव येते. हे पीठ थोडा वेळ तसेच ठेवुन द्यावे मग तव्यावर पसरावे. आधी तेल घालावे. अगदी थोडावेळ झाकण ठेवावे. (नाही ठेवले तरी चालेल). मग दोन्हीकडुन तांबुस भाजावे. घट्ट भिजवल्यामुळे उलटायला त्रास होत नाही तसेच तांदळाच्या पीठामुळे ते कुरकुरीत होते.
|
Ana
| |
| Tuesday, August 10, 2004 - 3:45 pm: |
| 
|
टोमटो आॅमलेट मधे थोडा baking soda घातला तर छान fluffy होत
|
Keshar
| |
| Tuesday, August 10, 2004 - 10:40 pm: |
| 
|
tomato mixermadhun paste karun ghetala ...tar ultyala sope jate tasech besanmadhe tandul pith,ek chamcha kanik ektra kele tar ajibat modat nahi
|
Najuka
| |
| Tuesday, August 30, 2005 - 7:50 pm: |
| 
|
he mishran takat bhijavayache aani thodasa eno kiva fruit salt ghalayacha... chan fasfasta, instant jaali padte .... aani takamule chav kinchitshi aambat pan chan yete ....
|
Pinkikavi
| |
| Tuesday, August 30, 2005 - 7:55 pm: |
| 
|
ह्या आम्लेट मधे गाजर, बटाटा किसुन घातला तर छान लागते..
|
Sayonara
| |
| Wednesday, August 31, 2005 - 12:22 am: |
| 
|
माझी आई कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर सगळं मिक्सरमधून काढून मग डाळीच्या पिठात मिक्स करते. सगळं छान एकजीव होतं.
|
Supermom
| |
| Wednesday, July 26, 2006 - 9:54 pm: |
| 
|
बेसन आणि तांदळाच्या पिठाचे प्रमाण किती घ्यायचे? कोणीतरी लवकर सांगा प्लीज, आजच करून बघायचा विचार आहे.
|
Dineshvs
| |
| Thursday, July 27, 2006 - 10:12 am: |
| 
|
पाऊण कप बेसनाला पाव कप तांदळाचे पिठ घ्यायचे.
|
Manuswini
| |
| Monday, October 30, 2006 - 6:16 am: |
| 
|
आज मी असे tomato omlett केले, २ वाट्या बेसन, चिमुटभर हिंग, पाव वाटी तांदूळाचे पिठ(कुरकुरीतपणा ज्यास्त येते), आले,लसुण paste (एक मस्त झणझणीतपणा येतो, flatulence,gas सुद्धा होणार नाहे too much बेसन खावून) भरपुर कोथींबीर, धणा पॉवडर, जिरा पॉवडर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, चिमुटभर आमचुर पॉवडर (झकास taste येते), नक्कीच टाकुन पहा, मिठ, तिखट किंचीत, ३ मोठे टॉमटो microwave मध्ये किंचीत cut करून ३ मिनीटे ठेवायचे, साल काढून directly पिठात कुसकरले, पाणी अजीबात न घालता थोड्यावेळ Warm oven मध्ये ठेवून चहा वगैरे केला, १०-१५ मिनीटाने छान कुरकुरीत आमलेट तयार. आल्याची,आमचुरची चव छान लागते, जाळी पडते. बरोबर तिखट पुदीन, कोथींबीर, हिरवी मिरची नी लिंबू पिळुन केलेली चटणी. वेलची आले चहा, घरगुती ननकटई.
|
Bee
| |
| Monday, October 30, 2006 - 7:35 am: |
| 
|
मनु, मधेच चहाचे कुठुन आले हे. कृती बाजुला सोडून तू एकदम चहावर आलीस. बाकी पुढची तेप कोण लिहिणार? पाणी अजीबात न घालता थोड्यावेळ Warm oven मध्ये ठेवून चहा वगैरे केला, >>> आणि हे पाणी न घालता चहा केला म्हणजे फ़क्त दुधाचा चहा केलास की अजुन कशाचा :-)
|
Manuswini
| |
| Tuesday, October 31, 2006 - 1:12 am: |
| 
|
बी तुला वाचतानाचा पन problem आहे का रे? मी त्या १०-१५ मीनीटात ते पिठ किंचीत गरम oven मध्ये ठेवून फावल्या वेळात चहा केला... धन्य आहेस तु
|
Bee
| |
| Tuesday, October 31, 2006 - 3:03 am: |
| 
|
मनु, बरेच दिवस झालेत तू मला दिवे दिले नाहीस म्हणून आठवण करुन दिली तुला. ते वाक्य कुणीही वाचले तरी तिथे थोडे बिचकायलाच होईल बघ.. दिवे घे :-)
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|