|
Keya
| |
| Thursday, April 18, 2002 - 8:01 pm: |
| 
|
Hi ppl, mi swatha mase khat nahi pan navaryala aavadtat mhanun karaycha prayatna karate. I have some questions. You may find these questions stupid but I really need the anws. Right now I buy fillets but kuthalya mashachi skin kadhatat? Aakha masa ghetalyavar saf kasa karaycha? Dokya kadachi baju takun dyayachi ka? Skin sakat shijavata yeto ka? All guidance greatly appreciated.
|
Swati2
| |
| Friday, April 19, 2002 - 2:12 pm: |
| 
|
Keya mashyachi skin kadhayachi garaj nahi. phakta khavale asale tar te kadhayche. tya sathi vili var masa ulatya dishene ghasatat. pan bahutek thikani khavale kadhalele mase milatat. akhkha masa saf karunhi milato. doke takun det nahit. ghari masa saf karaycha zalyas mashala gills asatyat tithe tiraki chir detat ani intanal organs kadhun takatat.
|
salmon ला हिवळाण असते, तेव्हा शक्यतो नुसता फ़्राय करण्या पेक्षा आंबट तिखट, आल लसुण लावुन फ़्राय करणे, ओल्या नारळा च्या सां/बार्यात शिजवणे वगैरे जास्ती बर पडत... अमेरिकेत करतात तस करायच असेल, तर एखाद स्ट्रॉंग वासाचा हर्ब वापरुन बेक करायच, उदा oregona, thyme, sage, basil (or all of them mixed together). ह्यानी हिवळाण कमी व्हायला मदत होते. वास सहन होत असेल, तर कसाही करुन खाऊ शकतो. incidently, this fish is very good for health.
|
हिवळाण म्हणजे वास... especially non-veg च्या वासाला हिवळाण किव्हा हिवळण म्हणतात... (मराठित म्हणतात की नाही माहित नाही.. बहुतेक कोकणी शब्द आहे.. आजुन पण variations ऐकले आहेत मी ह्या शब्दाचे.. )
|
काही बेसिक माहिती.. मासे खाण्या पूर्वी त्यांना मीठ लावुन ठेवावे लागतात.. frozen Asaitla tr pUNa- qaa^ kÉna maga AMdajaanao maIz laavaayacaoÊ maI eka maQyama Aakaracyaa maaXyaacyaa ÔÜDIlaa
ek CÜTa camacaa (a p`maaNaat maIz laavato... to tsaoca saaQaarNa AQaa- tasa zovaayacao. maga sva%C QauvaUna
Gyaayacao. %yaalaa hLd imacaI- laavalaI.. kI maga to iXajavaayalaa tyaar hÜtat
|
Shyamli
| |
| Sunday, January 22, 2006 - 1:20 pm: |
| 
|
मलाही माश्यांबद्द्ल जरा माहिति हवी होति १)खायला सोपे असलेले मासे कोणते? २)ते विकत घेताना कसे काय घ्यायचे? ३)खेकडा खुप चांगला लागतो/असतो असे म्हणतात? तो कसा कधि( season ) घ्यावा. ४)हॉटेल मधे ट्राय करताना कोणत्या माश्यापासुन सुरवात करावी?
|
Dineshvs
| |
| Sunday, January 22, 2006 - 3:38 pm: |
| 
|
कोलंबी म्हणजेच प्रॉन हा खायला सगळ्यात सोपा मासा, त्यत काटे नसतात. पापलेट मधे एखादाच काटा असतो. एका खास पद्धतीने कापला तर तो पण रहात नाही. सुपरमार्केट मधुन घेत असाल तर त्यात ताजा वा फ़्रोझन घेताना तसा धोका नसतो. भारतात घेताना मात्र जाणकाराची मदत हवी. तरिहि मासा फ़डफ़डीत असावा, कोलंबीचे पाय चुरमडलेले नसावेत असे काहि आडाखे आहेत. खेकडे बारा महिने मिळतात, पण अमावस्ये दरम्यान ते भरलेले असतात. त्याची माहिती हल्लीच पोस्ट झालीय. टिनमधे त्याचे खरे व कृत्रिम मास मिळु शकते.
|
Lalu
| |
| Sunday, January 22, 2006 - 5:57 pm: |
| 
|
इथे अजून काही टिप्स लिहिल्या होत्या पूर्वी. ताजे मासे prawns हा मासा नाही हो दिनेश. आता आपण सरसकट सीफूड ला कधी कधी मासे / मच्छी म्हणतो. माशाचे fillet घेतले तर त्यात काटा नसतो. तिकडे काय काय मिळते माहित नाही पण पापलेट मिळत असेल तर त्यापासून सुरवात करायला हरकत नाही.
|
hi mala gabolichi (fry) recipe havi ahe? mi eke thikani khalli hoti patice sarakhich hoti ekdam apratim pan mala yet nahi kashi karaychi te? koni sangu shakat ka
|
Manuswini
| |
| Wednesday, November 15, 2006 - 6:57 am: |
| 
|
श्यामली, तु आधी पापलेट खायला try कर, ते इतके उमसं लागत नाही, दुसरे मासे जरावेळ लागतात.. वास जरा strong वाटेल ज्यांनी कधीच खल्ले नाहीत. कोंलबी तु खातेस ना ग? मला एकदा म्हणालीअसे वाटतेय बोलताना? ... कोंलबीपण बघ खावुन नसेल खाल्ली तर.. तो मासा नाही तुमच्याकडे red snapper वगैरे मासे असतील तर नंतर तो try कर चविष्ट लागतो. नाहीतर butter fish , मला मराठी नावे माहीत नाहीत. goodluck
|
Jagmohan
| |
| Wednesday, August 29, 2007 - 7:39 pm: |
| 
|
नमस्ते, इंडियामध्ये माशे ताजे मिळतात. शक्यतो एकच माशेवाला (फारतर दोन) करावा, म्हणजे ताजे आणि चांगले माशे मिळतिल ह्याची खात्री मिळू शकते. उदाहरणार्थ्: माझे वडील गेली २०-२५ वर्षे एकाच माशेवाल्याकडुन माशे घेतात. गेल्याबरोबर साधारणपणे एक फेरी मारल्यावर आज कुठल्याप्रकाराचे माशे आले आहेत त्याचा अंदाज घेतात. मग माशेवाल्याला विचारतात, "काय आज सुरमई कशी आहे?" जर त्याचे उत्तर आले की "घेउन जा सर दोन किलो!" म्हणजे सुरमई मस्त आहे. जर त्याचे उत्तर आले की, "बांगडा बघा सर मस्त आहे!" म्हणजे सुरमई चांगली नाही. बाकी सराईत माशे घेणार्या बरोबर जाउन माशे घ्यायला मजा येते. काही माशे ताजे आहेत की नाही ते चेक करायच्या पद्धती: १. कुठलाही मासा सर्वप्रथम, दिसायला देखील ताजा दिसला पाहिजे. साधारणपणे स्किन आणि डोळे बघितले की अंदाज येतो. डोळे शक्यतो लाल असता कामा नयेत. २. पापलेट्: त्याचे कल्ले (गील्स) कडे जरा दाबून पहा. सफेद आणि स्वच्छ पाणी बाहेर आले पाहिजे. ३. बांगडे: त्याचे कल्ले (गील्स) वर उचलून बघा. लालसर ब्राऊन दिसले पाहिजेत. जरा दाबून बघा. कडक वाटला पाहिजे. डोळे लाल नकोत. (अगदी ताजा बांगडा कापल्यावर, लाल रक्त बाहेर येते.) ४. सुरमई: साधारणपणे स्किन फ्रेश दिसते. कापल्यावर, लाल रक्त बाहेर येते. जरा दाबून बघा. कडक वाटलं पाहिजे. ५. सरंगा: त्याचे कल्ले (गील्स) वर उचलून बघा. लालसर ब्राऊन दिसले पाहिजेत. ६. सुळे: शेपटीकडे धरुन उभा करा. मलूलपणेनिर्जिवपणे एका बाजुला पडता कामा नये. ७. गुंजुली: सुळ्याप्रमाणेच पण शेपटीच्या ऐवजी डोक्याकडे पकडा. नवीन सुरु करणार्याना: १. सुरमई (मोठी) अथवा पापलेट (कापून. घरात कापायचा प्रयत्न इतक्यात करु नका.) २. माश्याला मीठ लाऊन ठेवायला विसरू नका. ३. वास घालवण्याकरता: मरिनेट करण्यासाठी: लिम्बुचिंचेचा कोळ, हळद, तिखट माशे आधी धुवुन घ्या. मग वरचे सगळे सामान माश्यांच्या कापांना लाउन एक तासतरी ठेवा. तज्ञांनी आणखी भर घालावी किंवा चुका सुधाराव्यात. आपला, जगमोहन
|
Jagmohan
| |
| Wednesday, August 29, 2007 - 7:45 pm: |
| 
|
गाभोळी इंडियामध्ये खाल्ली होती का? शक्यतो, सुरमईची गाभोळी मिळते माशेवाल्याकडे. तिलाही हळद, तिखट, चिंच लावायची आणि इतर तुकड्याबरोबर फ्राय करायची. जरा जास्ती वेळ लागतो फ्राय करायला. फ्राय करताना जपुन फटकन अंगावर उडते.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|