|
Savani
| |
| Friday, April 21, 2006 - 12:37 pm: |
| 
|
आर्च, मला तुझ्या मदतिची गरज आहे अगं काल मी थोडे काजू अंजीर रोल्स करून बघु म्हटले. आणि मला अंजीर सुद्धा मिळाले. मग आणखी उत्साह आला. तर अंजीर तुझ्या सांगण्याप्रमाणे व्यवस्थित झाले. काजूची पूड केली. त्यात साखर घालून भांडं ठेवलं gas वर पण अग किती तरी वेळ त्याचे काही मिश्रण होइना. ते आपल. शिर्यासाठी रवा भाजतो तस भाजलं जात होते. थोड्या वेळाने अगदी रंग बदलून खमंगपणा यायल लागला. आणि मग म्हटले चुकले काहीतरी. मला सांग कसं ती काजूची पूड करायची? आणि साखर वितळलीच नाही मी करताना. तर कसं करू?
|
Arch
| |
| Friday, April 21, 2006 - 4:47 pm: |
| 
|
सावनी, अग, त्या मिश्रणात थोड दूध घाल न. मी काजू वाटतानाच थोड दूध घालते. त्या recipe त राहून गेल की लिहायच.
|
Seema_
| |
| Friday, April 21, 2006 - 4:59 pm: |
| 
|
दुसरी method म्हणजे काजु भिजत घालायचे अर्धा तास आणि मग त्याची paste करायची. साखरेचा एकतारी पाक करायचा आणि त्यात ती paste घालुन थोडावेळ शिजवायचे मिश्रण कडा सोडु लागले कि खाली उतरवुन गार होवु द्यायचे. छान मळुन आपल्याला हवे तसे वापरावे. थोडे अधिक कष्ट आहेत या method मध्ये आणि पाक जमण महत्वाच आहे.
|
Savani
| |
| Friday, April 21, 2006 - 6:18 pm: |
| 
|
ही ही.. मला खुपच हसू येतयं स्वताचं. मी काजुची अगदी कोरडी पूड आणि साखर कितितरी वेळ ढवळत होते. आणि ती साखर काही वितळेना, शेवटी लाडवासारखा खमंग वास यायला लागला मग मात्र डोक्याला हात लावला
|
Savani
| |
| Wednesday, April 26, 2006 - 3:27 pm: |
| 
|
सीमा, काल मी तू सांगीतल्याप्रमाणे पाक करून काजू रोल्स करुन पाहिले. मस्तच झाले. thanks
|
Saj
| |
| Monday, August 11, 2008 - 7:36 pm: |
| 
|
hya rolls madhe fresh anjir vaprta yetil ka mala kal farmers market madhe fresh anjir milale karan.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|