|
Dineshvs
| |
| Monday, August 14, 2006 - 2:06 pm: |
| 
|
वा सुरभी. आमच्याकडे या गाठीत, म्हणजे सुरळी वळताना थोडी भिजवलेली चण्याची डाळ, खोबर्याचे व आल्याचे तुकडे, काजुचे तुकडे वैगरे घालतात. पण मी स्वतः मात्र अळु खाऊ शकत नाही.
|
Surabhi
| |
| Tuesday, August 15, 2006 - 7:53 am: |
| 
|
दिनेश माझी आत्या मोड आलेल्या मुगाची ज्यात कांदा घालून पातळ भाजी करतात त्यात सुद्धा ह्या वाफवलेल्या गाठी घालते. तशी पण चांगली लागते. सॉरी तुम्ही अळू खाऊ शकत नाहीत.
|
Dineshvs
| |
| Tuesday, August 15, 2006 - 4:19 pm: |
| 
|
सुरभी, सॉरी कश्याला. मला मागे किडनी स्टोनचा त्रास झाला होता, त्यामुळे स्वतःहुन बंधन घालुन घेतलय. कारवारी लोकात अळुची पाने घालुन ईडली पण करतात. तसेच कोकणात भाजणी पेरुन कोरडी भाजीपण करतात. अळुच्या देठीचे भरीत पण करतात. आपल्या जपानमधल्या मायबोलिकारणीनी लिहिले होते कि ते लोक देठ खातात आणि पाने फेकुन देतात.
|
Miseeka
| |
| Tuesday, August 15, 2006 - 10:29 pm: |
| 
|
आळुच्य देटिचे भरित मि असे करते: देटिचे साल कढुन मग ति बरिक चिरुन घेते नन्तर ति जरश्या पाण्यात शिजवुन घेते.शिजवल्यावर पाणी कढुन मग जरा गार झाले कि जर हाताने mash करुन मग त्यात दहि, मीट,साखर घालुन नेहमी प्रमाणे मिर्चिची फ़ोड्णी देते.दाण्या चे कुट पण घालतात यात. dinesh तुम्ही कसे करता हे भरित?
|
Surabhi
| |
| Wednesday, August 16, 2006 - 8:23 am: |
| 
|
कारवारी लोकात अळुची पाने घालुन ईडली पण करतात." अळुच्या पानात दिनेश? आई सांगायची की पुर्वी माझी आजी फणसाच्या पानाच्या द्रोणामधे ईडलीचे पीठ उकडून त्याच्या इडल्या करायची. त्याला काहीतरी म्हणतात. पण मी ते नाव विसरलेय. असे अनेक विस्मृतीत गेलेले प्रकार असतील जे पूर्वी आमच्यात करत असतील आणि त्याची मला माहितीही नाही. 
|
Lalitas
| |
| Wednesday, August 16, 2006 - 8:38 am: |
| 
|
दिनेश, मी स्वत: कारवारी आहे.... आमच्यात कधीच अळुच्या पानांत इडल्या करत नाहीत. सुरभीने लिहिल्याप्रमाणे फणसाच्या पानांचा द्रोण करून त्यांत इडल्या उकडतात. त्याला 'हीट' म्हणतात माझ्या आठवणीप्रमाणे.
|
Surabhi
| |
| Wednesday, August 16, 2006 - 2:25 pm: |
| 
|
ललीता "इट" म्हणतात का त्याला? कदाचित इडलीवरून हा शब्द तयार झाला असेल. 
|
Prady
| |
| Wednesday, August 16, 2006 - 2:57 pm: |
| 
|
माटुंग्याला ए. रामानायकच्या उडुपी restaurent मधे मिळते ही फणसाच्या पानातली ईडली. त्याला ते लोकं " खुट्ट" म्हणतात.
|
Lalitas
| |
| Wednesday, August 16, 2006 - 2:57 pm: |
| 
|
माझी आई व आजी "हीट" म्हणत असत. आमच्याकडे आतासारखी गोल छोटी इडली बनवतच नसत. तांब्याचे इडलीपात्र असायचे, त्यांत प्रेशर कुकरमध्ये असतात तशी भांडी असायची. त्यांत इडलीचे पीठ उकडून त्याचे तुकडे करुन वाढत असत. प्रज्ञा, आठवलं त्याला "खॉट्टे" म्हणत व साध्या इडलीला "हीट" नाव होतं
|
Surabhi
| |
| Wednesday, August 16, 2006 - 3:11 pm: |
| 
|
ललीता तांब्याचे ऊकडपात्र म्हणजे पेडावण का ग? आमच्या कडे एक जुने माळ्यावर पडलेले असायचे. माझी आई कुकरमध्येच सर्व करायची. आठवण म्हणून आपले ठेवले होते. आता त्या गोष्टींचे अप्रूप वाटते. प्रज्ञा अजूनही मिळते का ग तिथे? कधी गेल्यावर try करायला पाहीजे.
|
Lalitas
| |
| Wednesday, August 16, 2006 - 3:15 pm: |
| 
|
हो, ते पॅडावणच आहे... एक गंमत सहज सुचलं म्हणून... जाडजूड बाईला पॅडावण म्हणत असत.
|
Prady
| |
| Wednesday, August 16, 2006 - 3:34 pm: |
| 
|
सुरभी मिळते अजुनही तिथे ही ईडली. आणी अजुन बरेच प्रकार. जुलै मधे देशात गेले होते तेव्हा रामानायक मधे झाली एक चक्कर.
|
Dineshvs
| |
| Wednesday, August 16, 2006 - 5:47 pm: |
| 
|
आमच्या सोसायटीत सरोज भट म्हणुन एक बाई राहतात. त्या करतात अळुच्या पानाची ईडली. ( अळुच्या पानात नाही ) गुलाबी रंगाची असते ती, व त्यात अळुचा पाला बारिक चिरुन घातलेला असतो. त्याला चटणी वैगरे लागत नाही. फणसाच्या पानातल्या ईडल्या पण करतात त्या. माटुंग्याचे रामा नायक आणि मणिस अजुनहि आहेत. किंग्ज सर्कलजवळ पण त्यांचे एक हॉटेल आहे. तिथेहि काहि अनोखे प्रकार मिळतात. पाच वर्षे काढली ना त्या परिसरात ? मोदकपात्र आमच्याहि घरात आहे, पण ते माळ्यावरुन काढले जात नाही. खलबत्ता, जाते, पाटा वरवंटा सगळे आहे, पण आता कुणी वापरत नाही. पुर्वी आई अनारश्याचे पीठ खलबत्त्यात कुटत असे, मोदकाचे पीठ जात्यावर दळत असे आणि ईडलीचे तांदुळ पाट्यावर वाटत असे.
|
Lalitas
| |
| Thursday, August 17, 2006 - 6:53 am: |
| 
|
हे पहा दिनेश, एक कोणी सरोज भट तशा इडल्या करतात म्हणुन समस्त कारवारी जमात तशाच इडल्या बनवतात हा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे, त्यांत तुम्ही लिहिलेत की अळुच्या पानांत करतात म्हणुन तुम्हाला खोडण्यात आले. हिरवी अळुची पाने चिरून घातल्यावर इडली गुलाबी कशी काय होते? परत अळु खाजणार नाही का? मला अजिबात हे पटत नाही, कदाचित भटबाई पालक किंवा मायाळूची पाने घालत असतील, तरीही गुलाबी इडली?
|
ललिता आणि मंडळी, फणसाच्या पानातील इडल्या हा प्रकार गोड असतो का?
|
Lalitas
| |
| Thursday, August 17, 2006 - 9:12 am: |
| 
|
गजानन, हा प्रकार आपल्या साध्या इडलीसारखाच आहे, गोड अजिबात नाही. फणसाच्या पानाचा एक वेगळा सुगंध इडल्यांना येतो.
|
ok.. मी इथे एक रेसिपी लिहिली आहे पहा.
|
Dineshvs
| |
| Thursday, August 17, 2006 - 4:56 pm: |
| 
|
आत्ताच आईला विचारुन घेतले. त्या ईडल्यात त्या लाल मिरच्या, हिंग वैगरे घालतात म्हणुन गुलाबी रंग येतो. आणि अळुच घालतात त्या. कदाचित त्यानी स्वतः शोधलेली क्रुति असावी. आता कारवारी बायका, त्याच घटकातुन नविन नविन पदार्थ करण्यात पटाईत असतात, हे तर मान्य करावेच लागेल.
|
Lalitas
| |
| Thursday, August 17, 2006 - 8:01 pm: |
| 
|
दिनेश, आता हळुच लाल मिरच्या, हिन्ग आला, तरीही अळु घातला तर मिरच्यांमुळे मळकट हिरवाच रंग येणार, गुलाबी शक्यच नाही. कारवारी बायका स्वयंपाकघरांत पटाईत असतातच शिवाय उगाचच गोलमाल सांगितले तर ते न खपवून घेण्यांतही पटाईत असतात हो!
|
Prady
| |
| Thursday, August 17, 2006 - 8:31 pm: |
| 
|
वादाचा मुद्दा बाजुला पण ललिता ताई कारवारी बायका सुगरण खर्या!! मी मगाशी त्या तवशाच्या बीबी वर जिचा उल्लेख केला तिच्या आई आणी मावशीच्या हातचे इतके पदार्थ खाल्लेत. अगदी साधा स्वयपाक पण खरंच इतका चविष्ट बनवतात की खाणारा बोटं सुद्धा चाटतो.
|
Bee
| |
| Friday, August 18, 2006 - 6:17 am: |
| 
|
कारवारी बायका सर्वाधिक कुठे राहतात जसे पुण्यात ब्राह्मण अधिक राहतात?
|
Dineshvs
| |
| Friday, August 18, 2006 - 6:41 am: |
| 
|
ललिता, गेली वीस वर्षे या ईडल्या आमच्या घरात येत आहे. त्याला चटणी वैगरे लागत नाही याचा उल्लेख आलाच आहे.तो मिरची मुळेच. मायाळु आणि पालक घातला तर ती पाने मऊ शिजुन ईडलीचा रंग हिरवा होईल, ( पालक ईडली, आता बाजारातदेखील मिळते ) पण अळुने खास करुन वडीच्या अळुने तसे होणार नाही, या पानाच्या मजबुतीमुळेच वड्या बांधता येतात. ती विरघळत नाहीत. आता परत कधी येणार ? त्यावेळी करुनच आणीन. आमच्या भटमामींच्या ईभ्रतीचा सवाल आहे ना ? असो, हाहि संवाद माझ्यातर्फे मी ईथेच थांबवत आहे.
|
Aandee
| |
| Sunday, August 20, 2006 - 5:23 am: |
| 
|
अळुची पान आपण धुतो तेव्हा आणि उकडतो तेव्हा त्या पाण्याचा रंग लालसर असतो इड्ल्या कदाचित त्यामुळे गुलाबी होत असतील?
|
Prady
| |
| Sunday, October 29, 2006 - 6:14 pm: |
| 
|
इथे पहा अळूच्या गाठींची भाजी http://www.loksatta.com/daily/20061026/viva12.htm
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|