|
Dineshvs
| |
| Monday, July 08, 2002 - 8:02 am: |
| 
|
पनीर माखनवाला अनेक प्रकाराने करता येतो. त्यापैकी एक असा. पाव किलो पनीरचे चौकोनी तूकडे करून तळून घ्यावे. ( वाटल्यास पनीर जिरापावडर, आले लसूण व लिम्बू रसात मूरवून घ्यावे) पाच सहा काश्मिरी मिरच्या पाण्यात भिजत ठेवाव्या. तीन कान्दे पाण्यात ऊकळून वाटून घ्यावे. आठ दहा काजू व दोन चमचे खसखस बारीक वाटून घ्यावी. तूप तापवून त्यात वेलचीचे दाणे व दालचिनी टाकवी मग एक चमचा आलेलसूण पेश्ट टाकावी. ती परतून कान्दा पेश्ट टाकावी. मग तीन चार टोमाटो वाटून टाकावे व तूप सूटेस्तोवर परतावे. मग लाल मिरच्या ( फ़क्त साले) वाटून घालाव्या. थोडे परतून हळद धणेजिरे पावडर व गरम मसाला टाकावा. थोडे दही घालून परत तेल सूटेस्तोवर परतावे. मग हवे तेवढे पाणी व मीठ घालून ऊकळावे. मग त्यात पनीरचे तूकडे टाकून जरा गरम होऊ द्यावे. मग पाव कप साय घोटून घालावी. खाली ऊतरून बारीक चिरलेली हिरवी मिरची व कोथिम्बिर घालावी.
|
Mumbai12
| |
| Tuesday, March 07, 2006 - 6:26 pm: |
| 
|
काल पनीर माखनवाला करुन बघितला एकदम मस्त झाला Thank u Dineshji for gr8 (perfect) recipe.
|
Anilbhai
| |
| Tuesday, March 07, 2006 - 7:01 pm: |
| 
|
अरे त्या पाच सहा काशिरी मिरच्यांच काय करायच रे?. त्या तश्याच पाण्यात ठेवायच्या का?. 
|
Moodi
| |
| Tuesday, March 07, 2006 - 7:18 pm: |
| 
|
अहो भाई वर लिहीलय की. त्या मिर्च्या साले काढुन फक्त ती साले वाटुन मग पदार्थात टाकायच्या. बीया फेकुन द्या. 
|
Anilbhai
| |
| Tuesday, March 07, 2006 - 7:29 pm: |
| 
|
ओ. मला वाटल त्या लाल मिरच्या वेगळ्या आहेत. काश्मीरी मिरच्या हिरव्या असतात ना.
|
नाही लाल च असतात वाटत. काश्मीरी तिखट नसत का?
|
Tanya
| |
| Friday, May 05, 2006 - 5:19 am: |
| 
|
काश्मिरी मिरच्या लालच, आणि आकाराने लांबट असतात. त्या जास्त तिखट नसतात.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|